"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

July 22, 2019

★ चांद्रयान २ ★


  चांद्रयान २ ही मोहीम चांद्रयान १ नंंतरची भारताची दुसरी चंंद्रमोहीम आहे. हेे यान इस्रोने बनवले असून, ते दिनांक २२ जुुुलै २०१९ रोजी श्रीहरीकोटा अवकाश केेंंद्रातूूून (GSLV MK III -M1)द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या यानात कक्षाभ्रमर (Orbiter), लँडर ( Lander) व रोव्हर (Rover) यांचा समावेश असून त्यांना देशातल्या देशात विकसित केले आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान २ अवकाशात झेपावले.
      चंद्राच्या भूमीवर चांद्रयान ४८ दिवसांनंतर म्हणजे ६-७ सप्टेंबरदरम्यान उतरणार आहे. तेव्हा भारत चंद्रावर यान उतरवणारा जगातील चौथा देश ठरणार आहे.
◆ चांद्रयान २ ◆ चंद्राच्या दिशेने भारताचा ऐतिहासिक प्रवास सुरू: सिवन 

सौजन्य :~ महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चांद्रभूमीवरील मानवाने पहिले पाऊल ठेवले त्या दिवसाचा सुवर्णमहोत्सव अवघ्या जगाने साजरा केल्यानंतर दोनच दिवसांनी आज भारताचे चांद्रयान २ अवकाशात झेपावले. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी या प्रक्षेपणाची माहिती देताना सांगितलं की, 'चंद्राच्या दिशेने भारताचा एक ऐतिहासिक प्रवास सुरू झाला आहे. आम्ही विचार केला होता, त्याहीपेक्षा अधिक चांगलं प्रक्षेपण झालं आहे. टीम इस्रोने यासाठी रात्रंदिवस कठोर मेहनत घेतली होती. या यशस्वी प्रक्षेपणाद्वारे आम्ही आपल्या तिरंग्याचा सन्मान केला आहे.'
श्रीहरीकोटा: 
चांद्रभूमीवरील मानवाने पहिले पाऊल ठेवले त्या दिवसाचा सुवर्णमहोत्सव अवघ्या जगाने साजरा केल्यानंतर दोनच दिवसांनी आज भारताचे चांद्रयान २ अवकाशात झेपावले. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी या प्रक्षेपणाची माहिती देताना सांगितलं की, 'चंद्राच्या दिशेने भारताचा एक ऐतिहासिक प्रवास सुरू झाला आहे. आम्ही विचार केला होता, त्याहीपेक्षा अधिक चांगलं प्रक्षेपण झालं आहे. टीम इस्रोने यासाठी रात्रंदिवस कठोर मेहनत घेतली होती. या यशस्वी प्रक्षेपणाद्वारे आम्ही आपल्या तिरंग्याचा सन्मान केला आहे.' 
चंद्राच्या भूमीवर चांद्रयान ४८ दिवसांनंतर म्हणजे ६-७ सप्टेंबरदरम्यान उतरणार आहे. तेव्हा भारत चंद्रावर यान उतरवणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. सिवन यांनी या मोहिमेची माहिती देताना सांगितलं की, 'ही तीन उपग्रहांची मोहीम आहे. लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. जीएसएलव्ही एमके-३ च्या माध्यमातून चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.' 
१६ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार 
चांद्रयान - २ भारताचं सर्वात शक्तीशाली रॉकेट जीएसएलव्ही एमके-३ द्वारे प्रक्षेपित केलं गेलं. प्रक्षेपणानंतर अवघ्या १६ मिनिटांत ते पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावलं. तेथे ते १६ दिवस पृथ्वीची परिक्रमा करून नंतर चंद्राकडे झेपावणार आहे. यादरम्यान, त्याची कमाल गती १० किमी. प्रति सेकंद आणि किमान गती ३ किमी. प्रति सेकंद असेल. 
२१ दिवसांनंतर चंद्राच्या कक्षेत 
१६ दिवसांनंतर पृथ्वीच्या कक्षेतून चांद्रयान २ बाहेर पडेल. यावेळी चांद्रयानातून २ मधून रॉकेट वेगळं होईल. पाच दिवसांनंतर चांद्रयान - २ चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. यादरम्यान त्याची गती १० किमी. प्रति सेकंद आणि किमान गती ४ किमी. प्रति सेकंद असेल. यानंतर चंद्रावरील लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. 
चंद्राच्या भूमीवर उतरण्याआधी... 
पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर सुमारे ३ लाख ८४ कि.मी. आहे. चांद्रयान २ मधील लँडर 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरणार आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या ४ दिवस आधी रोव्हर विक्रम चांद्रयानातून डिबूस्ट होईल आणि चांद्रभूमीच्या आणखी जवळ पोहोचेल. तेथून लँडिंगच्या जागेचं स्कॅनिंग करेल. त्यानंतर विक्रम चांद्रभूमीव लँड होईल आणि त्याचा दरवाजा उघडेल आणि रोव्हर प्रज्ञान बाहेर पडेल. ही प्रक्रिया सुमारे चार तास चालेल. एकदा का रोव्हर चांद्रभूमीवर चालू लागला की पहिल्या १५ मिनिटांत इस्रोकडे या लँडिंगची छायाचित्रे येण्यास सुरुवात होईल. 
स्वदेशी तंत्रज्ञान 
पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं असलेल्या चांद्रयान २ मध्ये एकूण १३ पेलोड आहेत. यापैकी ८ पेलोड ऑर्बिटरमध्ये, तीन लँडर विक्रममध्ये आणि दोन पेलोड रोव्हर प्रज्ञानमध्ये आहेत. या १३ पैकी ५ भारताचे, ३ युरोप, २ अमेरिकेचे तर एक बुल्गारियाचा आहे. लँडर 'विक्रम' चं नाव भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम ए. साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. रोव्हर प्रज्ञान म्हणजे संस्कृत भाषेत बुद्धिमत्ता. या रोव्हरचं वजन २७ कि.ग्रॅ. आहेत. सहा चाकांचा तो एक रोबोट आहे. 
१४ दिवसांनी रोव्हर होणार बंद 
रोव्हर प्रज्ञान चांद्रभूमीवर फिरून तेथील माहिती इस्रोपर्यंत पोहोचवणार आहे. तो तेथे लँडर विक्रमच्या माध्यमातून ही माहिती पाठवेल. त्याचं आयुष्य केवळ चंद्रावरील एका दिवसाइतकं आहे. मात्र चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांइतका असतो. त्यामुळे रोव्हर प्रज्ञान सतत १४ दिवस इस्रोला माहिती पाठवणार आहे. तो चांद्रभूमीवर ५०० मीटर परिसरात फिरणार आहे. ऑर्बिटर मात्र चंद्राच्या कक्षेत १०० कि.मी. उंचीवरून चंद्राची परिक्रमा करत राहणार आहे. ऑर्बिटर एक वर्षापर्यंत कार्यरत असणार आहे. 
चांद्रभूमीची माहिती 
चांद्रयान २ मधील १३ पेलोड्स तेथील खनिजे, मातीचे नमूने, पृष्ठभागावरील रासायनिक घटक अशा अनेक गोष्टींची माहिती घेतील. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर, लेझर किरणं सोडणारा ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप असे विविध पेलोड्स चंद्रावरील पृष्ठभागाचा नव्याने अभ्यास करणार आहेत. 
कठोर मेहनतीचं यश 

चांद्रयान - २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सिवन म्हणाले, 'शास्त्रज्ञ आणि टीम इस्रोच्या कठोर मेहनतीचं हे फळ आहे. १५ जुलै रोजी तांत्रिक बिघाडानंतर टीम इस्रोने रात्रंदिवस कठोर मेहनत घेतली. सतत सात दिवस टीम इस्रो घरदार सोडून येथे झोकून देऊन काम करत होती. मी सर्वांचं अभिनंदन करतो.


★★★■■■■■★★★★■■■■■★★★
           ★★★ चांद्रयान ★★★

         चांद्रयान मोहीम ही अनेक कारणांमुळे गाजत आहे , अवघ्या देशाचेच नव्हे तर साऱ्या जगाचे लक्ष त्यावर आहे . कमीत कमी खर्चात स्वदेशी बनावटीची उपकरणे वापरून चंद्राच्या वेगळ्या भागावर उतरण्याची ही वैशिष्ट्यपूर्ण मोहीम .

          जगभरातून करोडो लोक ह्याचे लाईव्ह प्रक्षेपण बघत होते आणि ज्या वेळी विक्रम लँडर शी संपर्क तुटला त्या वेळी इस्रोच्या प्रमुखांच्या वेदना केवळ तेच जाणोत . सर्व देशवासियांच्या झालेल्या अपेक्षाभंगास स्वतःला जबाबदार समजून भावनाविवश होणं हे आपल्या संस्कृतीतच आढळेल .

         अपयश आणि अपेक्षाभंग या दुहेरी दुःखाचं ओझं पेलण्यासाठी आपल्या पंतप्रधानांच्या खांद्याचा आधार आपल्याला मिळेल इतपत त्या प्रमुखाला त्यांच्याविषयी विश्वास वाटणं आणि त्यांनीही तो सार्थ ठरवणं ही निश्चितच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे .

         अपयशानंतर बळीचा बकरा शोधून त्याच्या गळ्यात माळ घालायची पद्धत न अवलंबिता पंतप्रधानांनी त्यांना मारलेली मिठी आणि सांत्वन हे प्रतिकात्मक आहे . जरी अपयश आलं आहे असं जरी सध्या वाटत असलं तरीही केलेल्या प्रयत्नांबद्दल सारे देशवासीय इस्रोच्या पाठीमागे उभे आहेत आणि खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न करा हा संदेश साऱ्या इस्रोवासीयांना पोहोचविण्यात ते यशस्वी झाले आहेत . खरं तर ही मिठी नुसती मिठी नसून ती ' मीठी ' मिठी आहे .

          हजारो शब्द जे काम करू शकले नसते ते एका कृतीने करून त्यांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत हे नक्कीच अशा पंतप्रधानांबद्दल आणि इस्रोच्या प्रमुख आणि इतरही संशोधकांबद्दल आम्हाला कायमच आदर , अभिमान आणि कौतुक वाटत होतं , आहे आणि वाटत राहील . जयहिंद

1 comment:

  1. The nmrc syllabus 2019 pdf is now availble on the website. So all the aspirants can now download it easily.
    All the NMRC aspirants who are preparing for the exam can now download the syllabus in PDF format from the official website too.
    Thanks.

    ReplyDelete