*21/04/19 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
*❁ दिनांक :~ 21/04/2019 ❁*
*🔘 वार ~ रविवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *21. एप्रिल:: रविवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
चैत्र कृ. २
तिथी : कृष्ण पक्ष द्वितिया,
नक्षत्र : विशाखा,
योग : सिद्धि, करण : गर,
सूर्योदय : 06:17, सूर्यास्त : 18:57,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━
21. *विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
21. *सोनाराने टोचले कान*-
*★ अर्थ ::~* योग्य माणसाने समज देणे व दोष दाखवणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
21. *पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
⭐अर्थ ::~ अभ्यासू मनुष्य कधीही मूर्ख बनत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
🛡 *★21. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील १११ वा (लीप वर्षातील ११२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : आई वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.
●१९९७ : भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल (वय ७८ वर्षे) यांनी सूत्रे हाती घेतली. गुजराल हे वयाने ज्येष्ठ असलेले दुसर्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. याआधी मोरारजी देसाई यांनी ८१ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली होती.
●१९७२ : ’अपोलो १६’ या अमेरिकन अंतराळयानातुन गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३४ : डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक
◆१९५० : शिवाजी साटम – अभिनेते
◆१९२६ : एलिझाबेथ (दुसरी) – इंग्लंडची राणी. प्रदीर्घ कारकिर्दीच्या बाबतीत राणी व्हिक्टोरिया खालोखाल राणी एलिझाबेथचा दुसरा क्रमांक लागतो.
◆१८६४ : मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
●१९४६ : जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ
●१९३८ : सर मुहम्मद इक्बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते
●१९१० : मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा* satishborkhade.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
21. *✹ देश मेरा प्यारा ✹*
●●●●●००००००●●●●●
देश मेरा प्यारा, दुनिया से न्यारा
धरती पे जैसे स्वर्ग है।
जां भी इसे उत्सर्ग है।
ऊँचे पहाड़ों में फूलों की घाटी।
प्यारे पठारों में खनिजों की बाटी।
माटी में मोगरा-गंध है।
बजता हवाओं में छंद है।
घन-घन घटाएँ, मुझको बुलाएँ।
हरे-भरे खेतों में सरगम बजाएँ।
बूँदों की भाषा सुरीली।
गीली हुई तीली-तीली।
जहाँ दिखे झरना, वहीं धरूँ धरना।
नदियों के पानी में चाहूँ मैं तरना।
मन ये गगन में उड़े रे।
ऐसे ये जी से जुड़े रे।
दूर मेरा देश ये गाँवों में बसता।
मुझको पुकारे है एक-एक रस्ता।
पैठा पवन मेरे पाँव में।
आना जी तू भी गाँव में।
देश मेरा प्यारा, दुनिया से न्यारा।
धरती पर जैसे स्वर्ग है।
जाँ भी इसे उत्सर्ग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थणा 💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
21. *❂ संपू दे अंधार सारा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
*संपू दे अंधार सारा*
उजळू दे आकाश तारे
*गंधाळल्या पहाटेस येथे*
वाहू दे आनंद वारे....
*जाग यावी सृष्टीला की*
होऊ दे माणूस जागा
*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
घट्ट व्हावा प्रेम धागा...
*स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
अन् मने ही साफ व्हावी
*मोकळ्या श्वासात येथे*
जीवसृष्टी जन्म घ्यावी...
*स्पंदनांचा अर्थ येथे*
एकमेकांना कळावा
*ही सकाळ रोज यावी*
माणसाचा देव व्हावा....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
21. *❃❝ माणूस व देश ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
इनामदार सर शाळेत फार प्रसिद्ध होते. कारण ते नेहमी आपला विषय जरा वेगळ्या पद्धतीने शिकवीत असत. इनामदार सर हे राष्ट्रभक्त होते. त्यांना आपला देश, मातृभूमी याबद्दल प्रेम होते. ते एक उपक्रमशील शिक्षक असल्याने त्यांनी एकेदिवशी मुलांना असाच एक उपक्रम सांगितला. भारताचा नकाशा ! भला मोठा नकाशा असलेला एक कागद त्यांनी बरोबर आणला. त्यावर विविध प्रांतांच्या हद्दी निरनिराळ्या रेषांनी दाखविल्या होत्या, शिवाय नकाशाच्या चित्राच्या मागेसुद्धा एक चित्र सरांनी काढला होता. मग त्यांनी कात्री घेतली, त्यामागील भागावर जे चित्र होतं, त्या चित्राचे जे निरनिराळे भाग होते त्यानुसार त्या चित्राचे तुकडे कापले, अर्थातच भारताच्या नकाशाचेही तुकडे झाले, मग सर म्हणाले, "मुलानो! आता हे तुकडे एकत्रित करा आणि भारताचे नकाशाचे चित्र पूर्ण करा," सारे विद्यार्थी सरसावले, हे तुकडे वेडेवाकडे कापले गेले होते.बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना ते चित्र जोडणे जमले नाही. त्याच वर्गात सलील नावाचा विद्यार्थी होता. तो पुढे आला आणि म्हणाला," सर मला एक संधी द्या मी चित्र पूर्ण करतो." सलील तुकडे जोडू लागला, त्याने नकाशाच्या बाजूने चित्र जोडले नाही तर मागील चित्राच्या बाजूने चित्र जोडायला सुरुवात केली, भारताचा नकाशाच्या मागच्या बाजूला माणसाचा चित्र इनामदार सरांनी काढला होता. सलीलने माणसाचं चित्र जोडला आणि भारताचा नकाशा तयार झाला. इनामदार सरांनी सलील ला शाबासकी दिली आणि म्हणाले, "देश म्हणजे सीमा नाहीत तर देश म्हणजे माणूस, माणूस जोडला कि आपोआपच देश जोडला जातो."
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
माणसांचे हितसंबंध चांगले असले कि देशाची एकात्मता सिद्ध होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
21. आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही...
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी
मिळतं ज्याची कधीच
अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या
चांगल्या कामाबद्धल
मिळालेले *"आशिर्वाद"*
असे म्हणतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
21. *✿ वैज्ञानिक प्रश्न ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ एकूण जलसंपत्तीपैकी समुद्रात किती टक्के पाणी सामावलेले आहे?
उत्तर : 97 %
■ पाण्याचा गोठनांक किती?
उत्तर : 0 ℃
■ स्थायु पदार्थास उष्णता दिल्यास त्याचे ---------- रूपांतर होते.
उत्तर : द्रवात
■ हळद ,कांडा,बटाटा,शेवंती हि भूमिगत ------- होय.
उत्तर : खोडे
■ एकपेशीय प्राण्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रजनन होते?
उत्तर : विभाजन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
21. *❒ भगतसिंग ❒*
─┅━━●●★◆★●●━━┅─
टोपणनाव :~ भागनवाला
जन्म :~ २७ सप्टेंबर १९०७
ल्यालपूर, पंजाब, भारत
मृत्यू :~ २३ मार्च १९३१
लाहोर, पंजाब,
चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना :~ नौजवान भारत सभा,
कीर्ती किसान पार्टी, हिंदुस्तान सोशालिस्ट, रिपब्लिकन असोसिएशन
वडील :~ सरदार किशनसिंग संधू
आई :~ विद्यावती
२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग
लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो.
*त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात "शहीद दिन" म्हणून पाळला जातो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁ रविवार ~ 21/04/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment