"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

निरोप समारंभ सूत्रसंचालन

 

 सेवानिवृत्ती कार्यक्रम, निरोप समारंभ सूत्रसंचालन.... 

  वयोमानानुसार प्रत्येक नोकरी करणार्‍या व्यक्तिला आयुष्यात कधी न कधी सेवानिवृत्ती घ्यावी लागते. अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना ज्यांना निरोप दिला जात आहे त्यांच्या कार्याचा, आठवणीचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याला उजाळा दिला पाहिजे. निरोप देणाऱ्यांचा सत्कार, त्यांचे कौतुक, त्यांची पुढे जाणवणारी उणीव.. याची मांडणी सूत्रसंचालनात ओघवत्या स्वरुपात यावी.

 सेवानिवृत्ती निरोप समारंभ सूत्रसंचालन -
1. कार्यक्रमाची सुरुवात -
स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम
   सज्ज सारे लोक आहेत क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमीचे, त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे, गोड मानून घ्या रसिकहो शब्द माझे स्वागताचे. आज आपण या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमले आहोत. तरी उपस्थति पाहुण्यांच व मान्यवरांच मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो.

2. पाहुण्यांना व्यासपीठावर आमंत्रित करणे - 
★ तेजस्वी व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तुत्व ज्यांच्या ठायी स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे. असे  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय श्री ……………हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.
★ आपले आजचे आदरणीय सत्कार मूर्ती श्री ……………….व्यासपीठावर त्यांचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.
★ तसेच प्रमुख पाहुणे आदरणीय श्री ……………….  हे व्यासपीठावर त्यांचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनती करतो.

3. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन -
      उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो कि त्यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी.
   ज्योत तेवते समतेची... ज्योत तेवते त्यागाची... ज्योत तेवते क्रांतीची अन् समर्पणाची... या ज्योतीने एकच संदेश दिला आहे.... स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं.... आणि म्हणूनच या दिपाला म्हणजे दिव्याला साक्षी ठेवूनच आपण कार्यक्रम साजरा करणार आहे... 
4. ईशस्तवन -
“निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा क्षण आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे.”
रसिकांनो मन शांत व प्रस्सन ठेवण्यासाठी प्राथनेची गरज भासते. म्हणूनच आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी आपणासमोर सुंदर असे प्राथना सादर करणार आहेत.

5. स्वागतगीत -
“मंगलदिनी मंगलसमयी झाले आपले आगमन येथे, करितो स्वागत हर्षभराने प्रेमे गाऊनी स्वागतगीत.”
यानंतर आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी स्वागत गीताच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांच स्वागत करतील. स्वागत गीताचे बोल आहेत “………….”

6. प्रास्ताविक -
“जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रस्ताविकेतून तसेच तुटलेली फुले सुंगध देऊन जातात, गेलेले क्षण आठवणी देऊन देतात.”
आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय ……………यांचा परिचय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक करून देतील, अशी मी त्यांना विनंती करतो.

7. पाहुण्यांची ओळख -
   व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे, त्यासाठी मी………  यांना आमंत्रित करतो. 

8. सत्कार सोहळा -
“हृदयातील आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार सत्कार
काळजाच्या मायेचा संचित म्हणजे सत्कार
कर्तुत्वान सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार...!!
“सत्कार आपला करण्यास आम्हा हर्ष वाटतो, आनंदित झाल्या दिशा सत्कारने स्नेह वाढतो.”
यानंतर सत्कार सोहळा संपन्न होत आहे. 
★ अध्यक्षांचे स्वागत :
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री ………………. यांचे स्वागत आदरणीय श्री ………… हे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करतील. यांना मी विनंती करतो.
★ प्रमुख पाहुण्यांचे स्वागत :
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री …………… यांचे स्वागत आदरणीय श्री ………………. हे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करतील. यांना मी विनंती करतो.
★ सत्कारमूर्तीचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करावा :
★आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय सत्कार मूर्ती श्री………………  यांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्षआदरणीय श्री …………………  हे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन करतील. त्यांना मी विनंती करतो.

9. विद्यार्थी व शिक्षकांचे भाषण -
    यानंतर आमच्या शाळेतील इयत्ता ……. वी तील विद्यार्थी ………… सत्कारमूर्ती विषयी आपले मनोगत व्यक्त करतील.
यानंतर आदरणीय श्री ………………सर सत्कारमूर्ती विषयी आपले मनोगत व्यक्त करतील.

10. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत -
    शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, आपल्या विचारांनी इतरांना मार्गदर्शन करणारे,  आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. 

11. सत्कार मूर्तींचे विचार -
“निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येती आठवणी, डोळ्यात साठते पाणी मुक होते वाणी.”  
आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय श्री………… आपणास मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

12. अध्यक्षांचे भाषण -
“ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा...
त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा...!!”
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री…………   आपणास मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

13. आभार प्रदर्शन -
प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली...
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली...
आपल्या मार्गदशर्नाने, आम्हाला दिशा मिळाली...!
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली...!!

     या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपण सर्वजण उपस्थति राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो.

No comments:

Post a Comment