"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

"भारतीय संविधान दिन"- २६ नोव्हेंबर


      "भारतीय संविधान दिनाच्या " हार्दिक शुभेच्छा.....
   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

  १९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापने विषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली.  १५ ऑगस्ट  १९४७  रोजी  भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधीरूपात काम केले होते.

      २९ ऑगस्ट १९४७  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर१९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस *"भारतीय संविधान दिन"* म्हणून साजरा केला जातो.  
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽


*🔅 २६ नोव्हेंबर "संविधान दिन" Pdf माहिती डाऊनलोड करा.. 🔅*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
"संविधान दिन" घोषवाक्य 

   ★२६ नोव्हेंबर " संविधान दिन " म्हणून देशात साजरा केला जातो. संविधान दिनानिमित्त घोषवाक्य व उपयुक्त अशी माहिती pdf स्वरूपात*

     वरील सर्व माहिती pdf स्वरूपात डाऊनलोडसाठी एकाच पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

⛔ डाऊनलोडसाठी खाली  ⏬⏬⏬ क्लिक करा...


✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

     नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

    *भारताचे संविधान ( भारताची राज्यघटना ) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा  आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.


   संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. भारताची राज्यघटना २६ नोव्हेंबर ला तयार झाली असली तरी ही घटना २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय जनतेला अर्पण का करण्यात आली?? त्याविषयी आपण थोडे जाणून घेऊ या - लाहोर येथे झालेल्या काँग्रेस च्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी पहिल्यांदा करण्यात आली आणि २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात साजरा केला जाईल असा ठराव झाला होता. पण आपल्याला प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाले ते १५ ऑगस्ट ला, त्यामुळे इतिहासातील या दिवसाचे महत्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने २६ नोव्हेंबर ला घटना तयार होऊन ही ती २६ जानेवारी ला जनतेस अर्पण करण्यात आली आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.

  आजचा भारताचा सर्व कारभार ज्या नियम-कायद्याच्या आधारे चालतो, त्या नियम कायद्याचं पुस्तक म्हणजे भारताचे संविधान. त्या संविधानाविषयी काही अपरिचित बाबी आपण खासरेवर जाणुन घेऊया…

    भारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्वप्रथम घटना समिती (संविधान सभा) स्थापन करण्यात आली. संविधान सभेत सुरुवातीला २९६ सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्या २९९ झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. ११ डिसेंबरला डॉ.राजेंद्रप्रसाद यांची घटनासमितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. १३ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरुंनी घटनासमितीत मांडलेल्या उद्देशपत्रिकेच्या आधारे घटनेचा सरनामा/प्रास्ताविक तयार करण्यात आले. पुढे त्या प्रास्ताविकेच्या चौकटीतच घटनेची निर्मिती करण्यात आली. घटना समितीने घटना निर्मितीच्या कामांसाठी ८ मुख्य समित्या व १३ उपसमित्यांची रचना केली. २९९ सदस्यांना वेगवेगळ्या समित्यांमध्ये कामे वाटुन देण्यात आली. घटना समितीने राज्यघटना तयार करणे, देशासाठी कायदे तयार करणे, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन देणे, भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्विकृत करणे, पहिल्या राष्ट्रपतींची निवड करणे आणि निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणुन कार्यभार पाहणे ही कामे केली.

    मसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती. त्यामध्ये ७ सदस्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इतर समित्यांनी केलेल्या तरतुदींचा विचार करुन घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीने केले. त्यांनी घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये सादर केला. भारतीय जनतेला त्या मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी ८ महिने वेळ दिला. जनतेची मते, सुचना, टीका विचारात घेऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये दुसरा मसुदा सादर करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन नोव्हेंबर १९४८ मध्ये तिसरा अंतीम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला. त्या मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात एकुण तीनदा वाचन झाले. या टप्प्यात एकुण ७५६३ सुधारणा सुचविल्या गेल्या, त्यापैकी २४७३ सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा घडुन आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला. मसुदा बनविण्याचे प्रमुख (Chief Draftsman) म्हणुन एस.एन.मुखर्जी यांनी काम पाहिले.

    २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. २९९ पैकी उपस्थित असणाऱ्या २८४ सदस्यांनी राज्यघटनेवर सह्या केल्या. सदस्य सह्या करत असताना बाहेर पाऊस सुरु झाला हे शुभसंकेत असल्याचे बोलले गेले. २४ जानेवारी १९५० रोजी पुन्हा एकदा घटना समितीने राज्यघटनेवर सर्वांच्या स्वाक्षऱ्या केल्या. घटनेचा अंमल २६ नोव्हेंबर १९५० पासुन सुरु झाला. हा दिवस निवडण्यामागचे कारण म्हणजे काँग्रेसच्या १९२९ च्या लाहोर अधिवेशनातील ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा “पुर्ण स्वराज्य दिन” म्हणुन साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणुन ओळखला जातो. तो दिवस प्रजासत्ताक/गणराज्य दिन म्हणुन साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० पासुन घटना समिती संपुष्टात आली. भारतीय संविधान अंमलात आल्यापासुन भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७, भारत सरकार कायदा १९३५ व त्याचे सर्व पुरक कायदे रद्द करण्यात आले.

   भारताची घटना निर्माण करण्यासाठी घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास ६० देशांच्या घटनांचा विचार केला. घटननिर्मितीसाठी २ वर्षे,११ महिने व १८ दिवसांचा कालावधी लागला. (अमेरिकेची घटना चार महिन्यात तयार झाली होती.) या कालावधीत घटना समितीने ११ सत्रात १६६ दिवस काम केले. मसुदा समितीने १४१ दिवस काम केले. घटनानिर्मितीसाठी एकुण ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये खर्च आला. भारतीय राज्यघटनेचे मुळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी लिहले. त्याच्या प्रत्येक पानावर चित्रकार नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील इतर कलाकारांनी आकर्षक नक्षीकाम केले आहे. प्रास्ताविकाचे नक्षीकाम बिओहर राममनोहर सिन्हा यांनी केले. हिंदी मुळ हस्तलिखित वसंत वैद्य यांनी लिहले. त्याला नंदलाल बोस यांनी आकर्षक असे नक्षीकाम केले. भारतीय संविधानाची इंग्रजी व हिंदी मुळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत देहारादुन येथे छापण्यात आली.

   घटना समितीची निशाणी म्हणुन हत्ती स्विकृत करण्यात आला होता. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २२ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. भारतरत्न, पद्मभुषण, किर्तीचक्र पुरस्कार प्रजासत्ताकदिनी दिले जातात. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये “Abide with me” हे गीत गायले जाते.
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

       ★★■ संविधान घोषणा ■★★

१. जब तक सूरज चाँद 
     तब तक संविधान

२. विवेक पसरवू जनाजनात
     संविधान जागवू मनामनात

३. समता, बंधुता, लोकशाही 
    संविधानाशिवाय पर्याय नाही
४. कर्तव्य, हक्कांचे भान 
     मिळवून देते संविधान 

५. संविधान एक परिभाषा है
     मानवता की आशा है 

६. संविधानावर निष्ठा 
     हीच व्यक्तीची प्रतिष्ठा 

७. संविधानाची मोठी शक्ती 
     देई आम्हा अभिव्यक्ती

८. मिळून सारे देऊ ग्वाही 
     सक्षम बनवू लोकशाही 

९. संविधानाची कास धरू
     विषमता नष्ट करू 

१०. सर्वांचा निर्धार 
       संविधानाचा स्वीकार 

११. संधीची समानता 
       संविधानाची महानता

१२. संविधानाने दिले काय?
      स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय

१३. संविधान आहे महान
       सर्वांना हक्क समान 

१४. लोकशाही गणराज्य  घडवू
       संविधानाचे भान जागवू

१५. संविधानाचा सन्मान 
       हाच आमचा अभिमान 

१६. भारत माझी माऊली 
       संविधान त्याची सावली 

१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य 
       हाच संविधानाचा मूलमंत्र

१८. नको ताई घाबरू 
       चल संविधान राबवू
१९. जर हवी असेल समता
       तर मनात जागवू बंधुता

२०. सबसे प्यारा 
       संविधान हमारा

२१. अरे, डरने की क्या बात है?
       संविधान हमारे साथ है

२२. संविधानाची महानता
       विविधतेत एकता 

२३. देशभरमे एकही नाम
       संविधान! संविधान!

२४. समानता कशाची?
       दर्जाची, संधीची

२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
      संविधान हमारा सबसे प्यारा

२६. लोकशाहीचा जागर 
       संविधानाचा आदर

२७. तुमचा आमचा एकच विचार 
       संविधानाचा करू प्रचार

२८. ना एक धर्म से, ना एक सोच से
      
1) दर्जाची, संधीची, समानता, 
हीच संविधानाची महानता.

2) समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची.

3) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय.

4) संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती. 
5) संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी.

6) ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो.

7) जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू.

8) संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे.

9) संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान. 

10) संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय.
11) संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत.

12) घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे.

13) अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा.

14) भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान.

15) स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता.

16) वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी.

17) बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान.

18) लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान.

19) भारताचा अभिमान, 
  संविधान ! संविधान !

20) समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या.

21) सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान.
22) संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण.

23) आपला देश, आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकार.

24) संविधान भारताचा आधार,
कुणी नसेल निराधार.

25) हक्क बजावू, कर्तव्य पाळू 
प्राणपणाने संविधान सांभाळू.

26) संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही.

27) नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही.

28) भारताचे एकच विधान,
संविधान ! संविधान !
  🌟🔗🔗👇👇🔗🔗🌟
 /satishborkhade.blogspot.com
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄





No comments:

Post a Comment