"शिक्षक दिन" पूर्वतयारी करूया...
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!!
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!!
|| शिक्षक दिन - ५ सप्टेंबर ||
──┅━━═▣✧▣═━━┅──
" गुरु ब्रम्हा गुरु विष्णू,
गुरुः देवो महेश्वरा,,
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः " !!
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस....
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.
जो बनाता है इंसान को इंसान,
जिसे करते है सभी प्रणाम,
जिसकी छाया मे मिलता है ज्ञान,
जो कराये सही दिशा की पहचान,
मेरे उस गुरु को शत-शत प्रणाम…!!
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय व शिक्षकदिनाची सहज व सोप्या शब्दांतील मराठी, हिंदी, इंग्रजी भाषणे व सूत्रसंचालन Pdf स्वरूपात डाऊनलोड करा...
❂~✧~●~~●~~●★●~~●~~●~✧~❂
❒डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन❒
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
२ रे भारतीय राष्ट्रपती
★कार्यकाळ :~( १३ मे १९६२ – १३ मे १९६७ )
●जन्म :~ ५ सप्टेंबर १८८८
तिरुत्तनी, तमिळनाडू, दक्षिण भारत
●मृत्यू :~ १७ एप्रिल १९७५
★महान आचार्य व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे..
आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे..
हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश सत्ताकाळातला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठानेत्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.
शुद्ध चारित्र्य, प्रकांड पांडित्य, अपार सहिष्णुता आणि प्रभावी, वक्तृत्व यामुळे डॉ. राधाकृष्णन यांना जगभर विलक्षण लोकप्रियता मिळाली. शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. मूर्तिमंत दारिद्र्यातून त्यांनी आपले जीवन उभे केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेता देहदंड न सोसता ते हिंदुस्थानातील सर्वोच्च अशा राष्ट्रपति पदावर आरूढ झाले. राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेताच सर्वप्रथम त्यांनी आपल्या दहा हजार रुपये पगारात कपात करून केवळ अडीच हजार रुपये पगार घेण्याचा निर्णय घोषित केला. भूतपूर्व अर्थमंत्री स्व. सी. डी. देशमुख तेव्हा केवळ एक रुपया पगार घेत होते. त्याकाळी जास्तीतजास्त कोण त्याग करतो अशीच स्पर्धा होती. सिमल्याचे भव्य वैभवशाली प्रसाद जे ब्रिटिश व्हाइसरॉयसाठी बांधण्यात आले होते, ते एका संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी देऊन ते राष्टÑपती भवनात राहावयास आले. डॉ. राधाकृष्णन राष्ट्रपतिपदावर विराजमान होताच चीनने हिंदुस्थानावर आक्रमण केले. पंतप्रधान पंडित नेहरूंचा ‘हिंदी चिनी भाई भाई’ हा नारा हवेतच विरला. त्या वेळी डॉ. राधाकृष्णन पुढे सरसावले व आणीबाणी जाहीर केली. या दोन महापुरुषांनी देशाला मदतीचे आवाहन केले दोघेही त्यागी अन् चारित्र्यसंपन्न. अवघ्या देशाचा त्यांच्यावर विश्वास. लक्षावधी तरुण पुढे आले, मातृभूमीसाठी सैन्यात भरती झाले. वस्त्र, धान्य, पैसा देशभरातून हजारो ट्रकांमधून येऊ लागले. हजारो महिलांनी आपल्या अंगावरचे दागिने, मंगळसूत्र देऊन देशास सर्वतोपरी मदत केली. पक्षीय मतभेद दूर सारून जात-पात -धर्म पंथ विसरून लक्षावधी माणसे देशासाठी उभे राहिले. राष्ट्रपतिपद हे केवळ देखाव्यासाठी नसून घटनात्मकदृष्ट्या ते अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वश्रेष्ठ पद आहे. हे त्यांनी दाखवून दिले. आपल्या जवानांनीही या वेळी दाखवलेले शौर्य सुवर्ण अक्षरांनी लिहावे असेच आहे. चीनने अखेर माघार घेतली.
विश्रांती हा शब्दच डॉ. राधाकृष्णन यांच्या शब्दकोषात नव्हता ते सच्चे देशभक्त होते. आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मातृभूमीची सेवा केली आणि डोव्व्यांत तेल घालून राष्ट्रचे संरक्षण केले. देशाला आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रांत प्रामुख्याने स्थैर्य मिळवून दिले आणि जगभर देशाचा लौकिक वाढविला. अमेरिकेने ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हे सर्वोच्च पदक देऊन त्यांचा गौरव केला. तसेच एडिनबरा विद्यापीठानेही गौरव केला. सोव्हियत रशियानेही त्यांचे भव्य स्वागत केले. जगभरातील विविध देशांशी त्यांनी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित केले. १९६७ मध्ये हिंदुस्थानात चौथी सार्वजनिक निवडणूक झाली. सर्व पक्षांचा आग्रह असतानाही ते राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाले आणि त्यांनी दिल्ली सोडली. आयुष्यातील शेवटचे दिवस वाचन, मनन-चिंतनात शांतपणे घालवावे म्हणून ते मद्रासला आले. शेवटची आठ वर्ष त्यांनी अत्यंत शांतपणे घालवली. डॉ. राधाकृष्णन यांचे १७ एप्रिल १९७५ रोजी निधन झाले.
शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.
शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.
❂~✧~●~~●★●~~●~~✧~❂
मेरा होना इतिफाक हो सकता है लेकिन...
मेरा बनना आपकी साधना का परिणाम है...!!
माता पिता की मुरत है मेरे गुरू...
इस कलियुग मे ईश्वर की सुरत हैं मेरे गुरू...!!
इस कलियुग मे ईश्वर की सुरत हैं मेरे गुरू...!!
जीवन जगण्याची कला शिकवणाऱ्या तमाम गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
❂~✧~●~~●~~●★●~~●~~●~✧~❂
विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वावर शिक्षकांकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂
शिक्षकांवरील सुंदर कविता. . . . नोबेल
अंधार गडद होत जाताना
आकाशाचा फळा
चमचम चांदण्यानी जातो भरत.,
तसे शिक्षकाच्या खात्यात
जमा होत जातात विद्यार्थी .
किती तरी
भावी डाॅक्टर, इंजिनियर, व्यापारी,नेते,
पत्रकार व गुंडसुद्धा
अर्ध्या चड्डीत
असतात त्याच्या धाकात
समोर बसलेले....
त्याच्या चष्म्याचा नंबर बदलत जातो हळुहळु तसे, अनेक चेहरे अस्पष्ट होत जातात.......
मात्र प्रार्थनेसारखे शांत,कुशाग्र ,
फंडाच्या रकमेसारखे आजारी,
वेतनवाढीसारखी आनंदी , गुणी,
व शाळा तपासणीसारखी उपद्रवी मुले नोंदवली जातात ठळक,
सेवापुस्तकातल्या नोंदीसारखी ....
पुढे मागे भेटत राहातात,
अनोळखी वळणांवरुन
देत राहातात आवाज.
भर गर्दीत , समारंभात,
संमेलनात............कुठेही.
"हे माझे सर बरं का !"
"या माझ्या मॅडम बरं का ! "
आपुलकीनं सांगतात सर्वांना....
गच्च भरलेल्या बसमधे
हात धरुन करतात आग्रह
खिडकीपाशी बसण्याचा.
"नमस्कार करते हं !" म्हणत
नव-यालाही लावतात वाकायला.
तेव्हा अधोरेखित होतो त्याचा पेशा......
कसलं गारुड करतो तो पोरांवर ?
अन् स्विकारत राहातो आयूष्यभर......
एखाद्या बुज-या आवाजाला दिलेल्या हिमतीचा.... जनस्थान पुरस्कार !
कविता शिकवतांना फुटलेल्या हुंदक्याची......... फेलोशीप !
सुंदर हस्ताक्षरासाठी दिलेल्या शाबासकीची........ साहित्य अकादमी !
पाठीवरुन मायेनं हात फिरवल्याबद्दलचे........
ज्ञानपीठ !
अन् फळ्यासमोर चोख भूमिका बजावल्याचे............ नोबेल !
💐शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏🏻
खूपच छान सर तुमच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा .
ReplyDeleteबोरखाडे,आपण आपले कार्य उ-तमपणे करीत आहात.शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteThanks sir
Deleteखूपच छान सरजी
ReplyDeleteVery nice Sir
ReplyDeleteमान्यवर सर्व गुरूंजणांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ReplyDeleteखूपच छान 👌
ReplyDelete👌👌👌👌खूप छान सरजी, रोज नवनवीन माहीती देऊन आमच्या विचार शलाखात भर घलता त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद....💐💐👍
ReplyDeleteThanks सर, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ReplyDeletevery nice Sir
ReplyDelete