"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

ए.पी.जे. अब्दुल कलाम

भारताचे लोकप्रिय वैज्ञानिक, भारताचे अकरावे राष्ट्रपती...
अग्निबाणाचे शोधक - मिसाईल मॅन म्हणून ख्याती मिळवलेले..
         
       
  ❒ ए.पी.जे. अब्दुल कलाम ❒
   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    भारताचे लोकप्रिय वैज्ञानिक, भारताचे अकरावे राष्ट्रपती
◆राष्ट्रपती कार्यकाळ :~ (२५ जुलै२००२ ते २५ जुलै२००७)

●जन्म :~ १५ ऑक्टोबर १९३१
●मृत्यू :~ २७ जुलै, २०१५

 ★डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम★

      विज्ञानाचा परम भोक्ता असणारे वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्‍न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वी ’भारतरत्‍न’ हा भारताचा सर्वोच्‍च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत.
●~~●~~~~●●~~~~●~~●


📖15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन, मा. राष्ट्रपती अब्दुल कलाम जयंती

    ⭕ सूत्रसंचालन - वाचन प्रेरणा दिन, ए.पी.जे.अब्दुल कलाम- जीवन परिचय, 
परमानु शास्त्रज्ञ - अब्दुल कलाम, 
अग्निबाणाचे शोधक - अब्दुल कलाम, 
मिसाईल मॅन - अब्दुल कलाम, अब्दुल कलामांचे निवडक विचार, 
वाचन प्रेरणा दिन pdf, मा.अब्दुल कलाम pdf डाऊनलोड,
वाचन प्रेरणा दिन निमित्ताने शिक्षक व विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती.....                 
 pdf स्वरूपात DOUNLOAD  ⏬⏬⟱⏬⏬ करा...

●~~●~~~~●●~~~~●~~●
कौटुंबिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे लहान वयातच  डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. 

    शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले.

     माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस राज्यात ‘वाचन प्रेरणा दिवस’  म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा १५ ऑक्टोबरला राज्यात एकाच दिवशी तब्बल २० कोटी पुस्तकांचे वाचन होणार असल्याचे संकेत राज्याचे शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी दिले आहेत. या उपक्रमाची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाण्याची शक्यता आहे.
●~~●~~~~●●~~~~●~~●


 *📖 वाचन प्रेरणा दिन पूर्वतयारी 📖*
●════════════════●

        आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती - अग्निबाणाचे शोधक - मिसाईल मॅन म्हणून ख्याती मिळवलेले..
        ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने 15 ऑक्टोबर हा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा होणार आहे.....

            पुस्तकाविषयी प्रेरणादायी विचार...  

   आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही (सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
   
    भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

       क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

      डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत. 

 ●════════════════●

        ★"वाचन प्रेरणा दिन..."★


    १५ आॕक्टोबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते.

  आदरणीय डॉ. अब्दूल कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.

    बालपण अत्यंत परिश्रमात व्यतित करून अखंड ज्ञानाची साधना करणाऱ्या डॉक्टर कलाम यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पदमश्री, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता, रामानुजन, यासारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. किंग चार्ल्स दुसरा पदक,हुवर पदक देऊन त्यांचा जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला गेला.यु के,सिंगापूर, अण्णा युनिव्हर्सिटी यांनी त्यांचा डॉक्टरेट देऊन सन्मान केला. स्वतंत्र भारताचे 11 वे राष्ट्रपती झाले हा मान प्रथमच एका शास्त्रज्ञ व्यक्तीला मिळाला होता. 

    देशाच्यासुरक्षितेच्या दृष्टीने त्यांनी अनेक मोहीम यशस्वीकेल्या. अर्जुन रणगाडा, लाईट कॉबॉट एअर क्राफ्ट,त्रिशूल व पृथ्वी हेअग्निबाण आकाश, नाग, अग्नी, ब्रह्मोस प्रक्षेपण अस्त्रे या सर्व निर्मितीत त्यांचा वाटा मोलाचा होता.राजस्थान मधील पोखरणची अणुचाचणी यशस्वी करताना त्यांनी देश अण्वस्त्र अणुशक्ती संपन्न बनवला. 

    इंडिया माय ड्रीम, टर्निंग पॉईंट, टार्गेट मिलेनियन, साइंटिस्ट टू प्रेसिडेंट यासांरखी त्यांची अनेक पुस्तके गाजली.मराठी भाषेत अग्निपंख हे त्यांच्या जीवनावरील पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले.पुढिल वीस वर्षांचे आधुनिक भारताचे स्वप्न पाहणाऱ्या या माणसाचे अनेक युवक युवती प्रचंड चाहते होते.इतक्या बुद्धिमान माणसाचा व्याख्यान देता देता शेवट होणे यासारखे परमभाग्य ते काय असणार. डॉक्टर कलाम यांचे आयुष्य कष्टमय  होते पण ते लढले आणि जिंकलेही. त्यांचे जीवन आपल्यालाही सतत हेच सांगत राहते की येणाऱ्या आव्हानांना भिडायची तयारी असेल तर समोरचा प्रसंग कितीही बाका असेल तरी तुम्हाला प्रचंड, दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर कठीण आयुष्याची लढाई जिंकता येते.

   पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आमच्या शाळेत "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आली.


   वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.


 'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे.


  लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे.


  वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.


    !!वाचाल तरच वाचाल !!

'वाचाल तर वाचाल !' हे ब्रीद मानू या धन,

 वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन.

No comments:

Post a Comment