"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

गणित शै. साहित्य निर्मिती व वापर


    सौ. अलकाताई राकेश फुलझेले  उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी स्वतः शाळेसाठी तयार केलेले  ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य..
   "माझी शाळा ~ माझे साहित्य"   
🟣
सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे ज्ञानरचनावादी गणित शैक्षणिक साहित्य...
~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  १   

           शतकवीर पाटी 
     ═••═
              👉  साहित्य -
आयताकार पूठ्ठा, रंगित कार्ड पेपर,दोरा, ४ मोठे रंगित मणी, स्केच पेन...
            👉  कृती -
🔹एक आयताकृती पूठ्ठा घ्यावा.
🔸रंगित पिवळा कार्ड पेपर घेऊन आयताकृती कापून घ्यावा.
🔹आयताकृती कार्ड पेपरवर आठ उभे सारखे रकाने आखावे.
🔸आठ रकान्याचे दहा आडवे भाग करावे.
🔹रकान्याच्या वर एकक व दशक असे लिहावे.
🔸प्रत्येक एकक व दशकाच्या रकान्यात 0 ते 9 अंक लिहावे.
🔹पिवळा कार्ड पेपर आयताकृती पूठ्ठ्यावर चिकटवावा.
🔸एकक व दशकाचा मणी वेगवेगळ्या रंगाचा असावा.
🔹 दोरा घट्ट बसवावा.जेणेकरून मणी खाली वर सरकवता यावा.
🔸अशाप्रकारे आपली शतकवीर खेळपाटी तयार होईल.
🔹शतकवीर खेळ कसा खेळावे याविषयीची माहिती उद्याच्या पोस्ट मध्ये.....
 👉  शतकवीर पाटी समजून घेण्यासाठी वरील छायाचिञ पाहावे.
              ~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  २    
 



         ⏰ घड्याळ प्रतिकृती  ⏰           
              ═••═
   👉साहित्य -
 जाड पूठ्ठा,रंगीत कागद,स्र्कू,जूनी दिनदर्शिका,एक लहान खोका...🎲
   👉कृती -
🔹प्रथम जाड पूठ्ठ्यावर 20 सेमी.व्यासाचे वर्तुळ कापून घ्या.
🔸कापलेल्या वर्तुळावर रंगीत कागद चिकटवा.
🔹वर्तुळावर 1 ते 12 अंक जून्या दिनदर्शिकेवरील कापून चिकटवा.
🔸पूठ्ठ्यापासून तास व मिनिट काटा कापून त्यावर सिल्व्हर किंवा गोल्डन पेपर चिकटवा.
🔹तास व मिनिट काटा मध्यभागी ठेवून स्र्कू बसवा. म्हणजे तास व मिनिट काटा सहज फिरविता येईल.
🔸एक लहान रिकामा खोका घेऊन त्यावर रंगीत कागद चिकटवून फासा तयार करा.🎲 फास्यावरील सहा बाजूने वेळ लिहा. *उदा. — 7 वाजून 35 मिनिटे,12 वाजून 15 मिनिटे.....
🔸पूठ्ठ्याचे पत्ते तयार करून त्यावर वेळ लिहा. उदा.— 12 वाजून 45 मिनिटे , दिड वाजला,4 वाजून 55 मिनिटे.....
⏰ सूचना - याच घड्याळीचा वापर करून ज्ञानरचनावादी खेळ खेळायचा...
                ~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  3    

   
      🌳कल्पवृक्ष / खरेदी विक्री साहित्य...🌳   
         ═••═
     👉 साहित्याचा वापर -
🔹दहा विद्यार्थ्यांचा एक गट तयार करा.
🔸हुशार विद्यार्थी गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹एका विद्यार्थ्यास दुकानदार म्हणून निवड करा.
🔸गटातील इतर विद्यार्थी ग्राहकाची भूमिका करतील.
🔹गटात ग्राहक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100₹,500₹,50₹,20₹,10₹ याप्रमाणे वाटप करावे.
🔸एकेक विद्यार्थी दुकानातील वस्तूंवरची किंमत पाहून हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी करतील.
🔹वस्तूंवरच्या किंमतीची तोंडी बरीज करून तेवढी रक्कम दुकानदारास देतील.
🔹दुकानदार वस्तूंच्या किमतीएवढीच रक्कम घेऊन बाकी रक्कम परत करतील.
🔸दुकानदाराने परत केलेले पैसे बरोबर आहे किंवा नाही याची ग्राहक खाञी करतील.
🔹हिशोब करता न आल्यास गटप्रमुख मदत करतील.
🔸अशाप्रकारे खालील साहित्याचा वापर करून आपण वर्गातच सराव घेऊ शकतो.
       👉 साहित्याचा फायदा -
🎯नोटा व नाणी यांची ओळख होते.
🎯प्रत्यक्ष नोटा व नाणी यांचा वापर करून वस्तू खरेदी करता येते.
🎯दुकानात जाऊन पटकन तोंडी हिशोब करता येतो.
🎯विद्यार्थी वर्गातच खरेदी विक्रीचे व्यवहार करतात.
🎯व्यवहारी ज्ञानात भर पडते.
🎯स्वंयअध्ययनासाठी उपयुक्त साहित्य आहे.
🎯विद्यार्थ्यांची दुकानात गेल्यावर फसगत होणार नाही.
          ~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  ४     

        🎲 गणितीय कॅरम बोर्ड 🎲                               
     ═••═
           👉साहित्य- माउंट बोर्ड , जूना पुठ्ठा , कॅरमच्या सोंगट्या , स्ट्राईकर ( Striker....)
    👉प्रत्यक्ष कृती-
🔹 माऊंट बोर्ड व जुन्या पुठ्यापासुन कॅरम बोर्ड तयार करून घ्यावा.
 🔸काळ्या व पांढर्‍या सोंगट्यावर 1 ते 9 अंक लिहून घ्यावे.
 🔹लाल सोंगट्यावर 10 अंक लिहावा.
 🔸स्ट्राईकरवर 2 ते 9 अंक लिहावे.
👉घरी जूना कॅरम बोर्ड असल्यास तो वापरता येईल.

        👉प्रत्यक्ष कार्यवाही-
🔹 कॅरम बोर्डच्या मध्यभागी काळ्या व पांढर्‍या सोंगट्या रचून ठेवणे.
🔸 एका वेळेस चार ते पाच विद्यार्थी खेळू शकतात.
🔹 एकेक विद्यार्थी स्ट्राईकर घेऊन सोंगट्या उडवतील.
🔸 सोंगटी कोपर्‍यातून बाहेर आल्यावर सोंगटीवर असलेला अंक व स्ट्राईकर असलेला अंक यापासून लहान , मोठी संख्या तयार करणे , त्यांची बेरीज , वजाबाकी , गुणाकार करण्यास सांगणे. सर्व अचुक क्रिया केल्यावरच ती सोंगटी त्या विद्यार्थ्थास द्यावी.
 👉अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्याजवळ जास्त सोंगट्या जमतील तो विद्यार्थी विजयी घोषीत करावा.
         👉फलनिष्पती -
🎯 खेळातून गणित विषयाची आवड निर्माण होते.
🎯 संख्याज्ञानाचे दृढीकरण होते.
🎯 लहान मोठी संख्या तयार करता येते.
🎯 तोंडी बेरीज व वजाबाकी करता येते.
🎯 तोंडी गुणाकार करता येतो.
🎯 पाढ्यांचे दृढीकरण होते.
                 ~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  ५    

         🍡कागदाच्या लगद्याची शतक,दशक माळ,वजनमापे....!!       
              ═••═
👉दररोज विद्यार्थी वर्गात वहीचे कागद फाडून फेकत असतात.कार्यानुभव विषयाच्या तासिकेला तर कागदाचे बोळे वर्गभर  विखुरलेले असतात.तेव्हा वर्गातील या कागदाच्या कचर्‍याचा वापर करून (विद्यार्थी सहभाग घेऊन )शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी वापर करूया....
 🍡साहित्य क्रमांक — १🍡
    👉साहित्य - कागदाचे तुकडे,Camal Acrylic Colour,दाभण,सुतळ,नदीकाढावरील गोल दगड......
      👉प्रत्यक्ष कृती -
🔹प्रथम वर्गातील कागदाचे तुकडे गोळा करा.
🔸कागदाचे बारीक बारीक तुकडे करा.
🔹एका मोठ्या बादलीत पाणी घेऊन त्यात कागदाचे बारीक तुकडे टाका.
🔸कागदाच्या तुकड्याच्या वरपर्यंत पाणी भरलेले असावे.
🔹तीन ते चार दिवस कागदाचे तुकडे पाण्यात भिजत ठेवा.
🔸रोज सकाळी पाणी बदलवा म्हणजे पाण्याचा वास येणार नाही.
🔹पाचव्या दिवशी एक जूना कापड घेऊन त्यात लगदा बांधा म्हणजे लगद्यातील पाणी निघून जाईल.
🔸कागदाचा लगदा कणिक मळतो तसा मळून घ्या.
🔹आता कागदाचा लगदा कणकेसारखा एकजीव दिसतो.त्याचे छोटे मण्यांच्या आकाराचे गोळे तयार करा.( फेव्हीकाॅल मिक्स करू नका कारण पालघर जिल्ह्याचे वातावरण दमट आहे.लवकर बुरशी येते.)
🔸गोळे ओले असतांनाच मधोमध दाभणाने एक छिद्र पाडा.
🔹जवळपास 230 गोळे तयार होतात.
🔸तयार केलेले गोळे दोन-तीन दिवस कडक उन्हात चांगले सुकवा.
🔹सुकलेल्या मण्यांना Camel Acrylic Colour घेऊन ब्रशने रंगवा. (80 रूपयाला सहा रंगाच्या बाॅटल मिळतात.)
🔸थोडा वेळ फॅनखाली सुकवा.
🔹सुतळ घेऊन दहा-दहा वेगवेगळ्या रंगाचे मणी घेऊन 100 मण्यांची शतक माळ तयार करा.
🔸दहा-दहा मण्यांची दशक माळ तयार करा.
🔹30 सुट्टे मणी ठेवावे.
🔸मणी पुढे मागे सहज हलविता येतील अशी माळेची रचना करावी.
*⚖साहित्य क्रमांक — २ ⚖
🔹कागदाचा लगदा फरशीवर चांगला मळून घ्या.
🔸1 किलो वजनाचा गोलाकार गुळगुळीत नदीकाढचा दगड घ्या.
🔹दगडाला लगद्याचे बाह्य आवरण लावून किलोच्या वजनाचा आकार द्या.
🔸अशाप्रकारे वेगवेगळ्या वजनाचे दगड घेऊन वजनमापे तयार करा.
🔹वजनमापे कडक उन्हात चांगले सुकवा.
🔸उन्हात सुकल्यावर ब्रशने काळा रंग द्या.

          👉साहित्याचा फायदा -
🎯१ ते १०० अंकाचे वाचन करतात.
🎯१०० पर्यंतची संख्या पटकन दाखवता येते.
🎯संख्याज्ञानाचे दृढीकरण होते.
🎯दशकाची संकल्पना स्पष्ट होते.
🎯शतकाची संकल्पना स्पष्ट होते.
🎯क्रमवाचक व मूल्यवाचक संख्या ओळख.
🎯टप्प्याने संख्या दाखवता येते.
🎯बेरीज-वजाबाकी झटपट करतात.
🎯वजनमापांची ओळख होते.
🎯वस्तुमान घटक शिकविणे सोपे होते.
🎯ग्रॅम,किलोग्रॅम संकल्पना स्पष्ट होते.
🎯वजनमापे असल्यामुळे बाजारहाट उपक्रम घेता येतो.
👉सूचना — साहित्य समजून घेण्यासाठी वरील छायाचिञ पाहावे.
            ~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  ६     

                 🔘 कालमापन चक्र  🔘         
     ═••═
         👉 साहित्य -
*माऊंट बोर्ड , मार्कर पेन , स्केल , स्कृ.....
         👉 कृती -
🔹प्रथम एका पुठ्यावर मोठा वर्तुळ कापून घ्यावा.
🔸नंतर दोन लहान वर्तुळ कापून घ्यावे.
🔹मोठ्या वर्तुळाच्या एका बाजूला ७ सारखे भाग करून आठवड्याचे वार लिहावे.
🔸मोठ्या वर्तुळाच्या दुसर्‍या बाजुला १२ सारखे भाग करून त्यावर महिन्यांची नावे लिहावी.
🔹 एका लहान वर्तुळावर तीन रेषा मारून आधी , हा महिना ,नंतरचा असे लिहून घ्यावे.
🔸दुसर्‍या लहान वर्तुळावर तीन रेषा मारून काल , आज , उद्या असे लिहून घ्यावे.
🔹मोठ्या वर्तुळावर छोटे वर्तुळ लावून मध्यभागी स्कृ लावावा.
🔸अशा प्रकारे कालमापन चक्र तयार होईल.
           👉  कार्यवाही -
🔹लहान वर्तुळ फिरवून काल , आज , उद्या कोणता वार होता याचे विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक घ्यावे.
🔸दुसर्‍या बाजुचे लहान वर्तुळ फिरवून आधीचा महिना , हा महिना , नंतरचा महिना कोणता याचे प्रात्यक्षिक घ्यावे.
       👉 फलनिष्पत्ती -
🎯 विद्यार्थी वारांची व महिन्यांची नावे सांगतात.
🎯 काल , आज , उद्या कोणता वार होता हे अचूक सांगतात.
🎯 आधीचा महिना , हा महिना ,नंतरचा महिना कोणता ते सांगतात.
🎯 एका साहित्यातून दोन उद्येश साध्य होतात.
            ~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  ७     

          🏵 चढता —उतरता क्रम पायर्‍या.... 🏵     
             ═••═
   सुट्टीचा सदुपयोग करूया..!! शैक्षणिक साहित्य तयार करूया...
        👉 साहित्य - रिकामे आयताकृती खोके , रंगित कागद , जूना पूठ्ठा ,चार्ट पेपर, मार्कर पेन.... 📦✂🖍
          👉 कृती -
 🔹रिकामे उभ्या आकाराचे आयताकृती खोके लहान मोठे कापून घ्यावे.
🔸खोके उभे करून उंचीनुसार चिकटवून घ्यावे.
🔹खोक्यावर रंगित कागद चिकटवून त्यावर चढता उतरता क्रम लिहावे.
🔸पुठ्यावर चौकोनी आकाराचे कार्ड कापून घ्यावे.
🔹कापलेल्या चौकोनी पूठ्यावर  1 ते 100 संख्या लिहून संख्याकार्ड तयार करून घ्यावे.
      👉  शैक्षणिक साहित्याचा उपयोग -
 🎯संख्याज्ञानाचे  दृढीकरण होते.
🎯लहान मोठी संख्या ओळखता येते.
🎯चढता उतरता क्रम सहज लावता येतो.
🎯चढता उतरता क्रम संबोध लवकर स्पष्ट होतो.
🎯टाकाऊतून टिकाऊ साहित्य निर्मिती.
               ~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  ८    

       💠 मापन साहित्य- १  💠       
      ═••═
     👉 साहित्याचा वापर -
🔹मापनाचा दुसरा तक्ता विद्यार्थ्यांसमोर ठेवावा.
🔸चढत्या क्रमाने प्रत्येक मापनास 10 ने गुणल्यास पुढील मापन  मिळते.खालील उदाहरणे देऊन संबोध स्पष्ट करावा.👇
🔹उदा...१) 1 सेंटीग्रॅम = 1 x 10 = 10 मिलीग्रॅम
२) 1डेसीग्रॅम = 1 x 10 = 10 सेंटीग्रॅम
३) 1 ग्रॅम = 1 x 10 = 10 डेसीग्रॅम
४) 1 डेकाग्रॅम = 1 x 10 = 10 ग्रॅम
५) 1 हेक्टोग्रॅम = 1 x 10 = 10 डेकाग्रॅम
६) 1 किलोग्रॅम = 1 x 10 = 10 हेक्टोग्रॅम
🔸अशाप्रकारे उतरत्या क्रमाने प्रत्येक मापनास 10 ने भागल्यास मागील मापन मिळते.खालील उदाहरणे देऊन संबोध स्पष्ट करावा.👇
🔹उदा... १) 1 किलो = 10 हेक्टोग्रॅम
२) 1 हेक्टोग्रॅम = 1 ÷ 10 = 0 ·1 किलोग्रॅम
३) 1 डेकाग्रॅम = 1 ÷ 10 = 0 ·1 हेक्टोग्रॅम
४) 1 ग्रॅम = 1 ÷ 10 = 0 · 1डेकाग्रॅम
५) 1 डेसीग्रॅम = 1 ÷ 10 = 0 · 1 ग्रॅम
६) 1 सेंटीग्रॅम = 1 ÷ 10 = 0 · 1डेसीग्रॅम
७) 1मिलीग्रॅम = 1 ÷ 10 = 0 · 1 सेंटीग्रॅम
🔸अशाप्रकारे मापन घटकावर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून कृती करून सराव घ्यावा.
           ~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  ९    
   

            💠 मापन साहित्य- २  💠     
     ═••═
👉साहित्याचा वापर -
🔹प्रथम मापनाचा तक्ता विद्यार्थ्यांसमोर ठेवावा.
🔸विद्यार्थ्यांना मिली,सेंटी, डेसी,डेका,हेक्टो,किलो या मापनाबद्दल माहिती देऊन तोंड पाठ करून घ्यावे.
🔹प्रत्येक मापन घेऊन उदा.ग्रॅम हे मापन घेतल्यास सर्वात लहान मापन मिलीग्रॅम आहे व सर्वात मोठे मापन किलोग्रॅम आहे.हे समजावून सांगावे.
🔸लिटर मापन घेतल्यास सर्वात लहान मिलिलीटर व सर्वात मोठे मापन किलोलिटर आहे.हे समजावून सांगावे.
🔹मिटर मापन घेतल्यास सर्वात लहान मिलिमिटर व सर्वात मोठे मापन किलोमिटर आहे.हे समजावून सांगावे.
🔸उदा....2 डेसीग्रॅम = किती सेंटीग्रॅम ?
सेंटीग्रॅमच्या रकान्यामध्ये एक शून्य ठेवायला लावावा.म्हणजे 20 सेंटीग्रॅम उत्तर मिळेल.
🔸उदा....2 डेसीग्रॅम = किती मिलीग्रॅम ?
सेंटीग्रॅम व मिलीग्रॅमच्या रकान्यात प्रत्येकी एक-एक शून्य ठेवायला लावावा.म्हणजे 200 मिलीग्रॅम हे उत्तर मिळेल.
🔹उदा....5 हेक्टोग्रॅम = किती मिलीग्रॅम ?
यासाठी डेकाग्रॅम,ग्रॅम,डेसीग्रॅम,सेंटीग्रॅम,मिलीग्रॅम या रकान्यात प्रत्येकी एक-एक शून्य ठेवायला लावावा.म्हणजे 500000 मिलीग्रॅम हे उत्तर येईल.
🔹उदा....3 किलोग्रॅम = किती हेक्टोग्रॅम  ?
हेक्टोग्रॅमच्या रकान्यात एक शून्य ठेवायला लावावा.म्हणजे 30 हेक्टोग्रॅम हे उत्तर मिळेल....
🔸उदा.....3 किलोग्रॅम =किती डेकाग्रॅम ?
हेक्टो व डेकाच्या रकान्यात एकेक शून्य ठेवल्यास 300 डेकाग्रॅम हे उत्तर मिळेल.
🔹उदा....3 किलोग्रॅम = किती ग्रॅम ?
हेक्टो,डेका,व ग्रॅमच्या रकान्यात एकेक शून्य ठेवल्यास 3 किलोग्रॅम = 3000 ग्रॅम हे उत्तर मिळेल.
            ~~●~~~~~~~~●~~
      ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

     शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  १०    

        📦 घनाकृती ठोकळे तयार करणे...📦   
      ═••═
      👉साहित्य -
बाॅक्स पेपर ,काञी,मार्कर पेन....
       👉कृती -
🔹बाॅक्स पेपरवर 20 सेमी लांबी व 13 सेमी रूंदी असलेला आयताकृती आकार काढा.
🔸चौरसाकृती आकाराच्या चारही बाजूला 2 सेमी अंतर सोडून 4 सेमी x 3 सेमीचे चौरस आखा...खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे.....👇
🔹आडव्या चौरसावर 2 सेमीच्या 4 कडा व उभ्या चौरसावर 2 सेमीच्या 3 कडा आकृती क्रमांक 2मध्ये दिल्याप्रमाणे काढा.
🔸आकृतीमध्ये दिलेला आकार कापून घ्या.
🔹चौरसाच्या कडा व बाजू आतील बाजूस मोडा.
🔸चौरसाच्या कडांना फेव्हीकाॅल लावून आतील बाजूने चिकटवा.
🔹अशाप्रकारे घनाकृती ठोकळा तयार होईल.
🔸तयार घनाकृती ठोकळ्यावर मार्कर पेनने मूळाक्षर,स्वरचिन्हांकीत अक्षर,शब्द,चिञ, लिहा.
      👉साहित्याचा वापर -
🔹ठोकळा फिरवून मूळाक्षरांचे वाचन करून घ्या.
🔸मूळाक्षरे ओळखण्यास सांगा.
🔹ठोकळ्यावरील अक्षरांपासून शब्द तयार करण्यास सांगा.
🔸शब्दापासून वाक्य तयार करण्यास सांगा.
🔹ठोकळ्यावरील चिञाचे नाव ओळखण्यास सांगा.
🔸चिञ व शब्द यांच्या जोड्या लावायला सांगा.
🔹चिञाबद्यल माहिती लिहायला लावा.
🔸ठोकळ्यावरील संख्याचे वाचन, अक्षरीलेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया करून घेता येतात.
🔹स्वयंअध्ययनासाठी हे साहित्य अतिशय उपयुक्त आहे.
👉पुढील पोस्टमध्ये घनाकृती तयार ठोकळ्यांचा वापर प्रत्यक्ष विद्यार्थी कसे करतात ते पाहू या....

        👉 साहित्याचा फायदा -
🎯एका दृष्टीक्षेपात अक्षर,शब्द वाचता येतात.
🎯शब्दावरून वाक्य तयार करतात.
🎯चिञावरून माहिती लिहितात.
🎯संख्याज्ञान व संख्येवरील क्रिया करतात.
👉 साहित्य समजून घेण्यासाठी वरील छायाचित्र पाहावे.
               ~~●~~~~~~~~●~~





No comments:

Post a Comment