"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

मराठी शै. साहित्य निर्मिती व वापर


    सौ. अलकाताई राकेश फुलझेले  उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी स्वतः शाळेसाठी तयार केलेले  ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य..
   "माझी शाळा ~ माझे साहित्य"   

सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे ज्ञानरचनावादी मराठी शैक्षणिक साहित्य...

~~●~~~~~~~~●~~
         ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  १    
     
           🌺 उपस्थितीची फुले 🌺     
                 ═••═
           👉🌼इयत्ता पहिलीतील  दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी उपस्थिती वाढवण्यासाठी मी राबविलेला उपक्रम🌼
         👉साहित्य - लोकर,रंगीत कागद,सेलो टेप,काञी,स्केच पेन,खराट्याच्या काड्या...

         👉 प्रत्यक्ष कृती -
🔹प्रथम तीन रंगाची लोकर घेऊन वेणी तयार करा.
🔸रंगीत कागदापासून आकर्षक फुले तयार करा.
🔹इयत्ता पहिलीला दाखलपाञ विद्यार्थी संख्येएवढी फुले तयार करा.
🔸रंगीत तयार फुलावर विद्यार्थ्यांची नावे लिहून घ्या.
🔹रंगीत फुलाच्या मागे खराट्याची काडी सेलो टेपने चिकटवा.

          👉प्रत्यक्ष कार्यवाही -
🔹इयत्ता पहिलीला दाखलपाञ विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाचे फुल देऊन स्वागत करा.
🔸सतत सात-आठ दिवस फुलावरील त्याचे नाव दाखवून ओळख करून द्या.
🔹विद्यार्थी आपल्या नावाचे फुल त्या अक्षरांच्या आकारावरून व फुलाच्या रंगावरून लक्षात ठेवतील.
🔸टेबलावर फुलदाणीत फुले ठेवावी.
🔹विद्यार्थी रोज शाळेत आल्यावर फुलदाणीतील आपल्या नावाचे फुले वेणीत लावतील.
🔸माझ्या नावाचे फुल वेणीत सर्वात वर लावले पाहिजे म्हणून मुले लवकर शाळेत येतात.
🔹उपस्थितीचे प्रमाण वाढते.
🔸विद्यार्थ्यांना स्वत:चे व दुसऱ्यांची नावे एका दृष्टीक्षेपात लक्षात राहते.
   👉टीप - उपस्थितीची फुले समजून घेण्यासाठी वरील छायाचित्र पाहा.
           ~~●~~~~~~~~●~~
               ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  २   
       
       🦁 बहुपयोगी मुखवटे 🦁   
            ═••═
        👉साहित्य -
जूना पूठ्ठा , क्रेऑन  रंग , काञी✂📦🖍🎨
       👉 कृती -
🐯दुकानातून नविन शर्ट किंवा नवीन कपडे घेतल्यावर त्यात जो पूठ्ठा असतो तो घ्यावा.
🐰पूठ्ठ्याच्या पांढर्‍या बाजूवर प्राणी , पक्षी यांचे मुख रेखाटणे.
🐴मुखवटे रंगवतांना क्रेऑन ( Crayon ) रंगाचा वापर करावा.
🐶  क्रेऑन रंग स्वस्त असून मुखवट्यांना पाण्याचा हात लागला तरी खराब होत नाही. ऑन 
🐵 मुखवटे रंगवून झाल्यावर नीट कापून घ्यावे.
🦁अशा प्रकारे आपले आकर्षक मुखवटे तयार होतात.

      👉साहित्याचा उपयोग -
 ➽ इयत्ता पहिलीला येणारे बालगोपाल वर्गात रममान होण्याकरिता....
 ➽  एकाग्रता व शाळेची गोडी निर्माण करणे.
 ➽ प्राणी व पक्षांची ओळख होते.
 ➽ वर्गात आनंदातून शिक्षण हा उद्येश सफल होतो.
 ➽  प्राण्यांच्या गमती जमती या मुखवट्यातून घेता येतात.
 ➽  नाट्टीकरणासाठी मुखवट्यांचा वापर करता येतो.
टीप - साहित्याचे छायाचित्र सोबत दिले आहे. 
             ~~●~~~~~~~~●~~
         ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  ३  
       
       📦 घनाकृती ठोकळे 📦          
        ═••═
  👉 साहित्याची कृती व वापर -
🔹एकाच आकाराचे तीन घनाकृती ठोकळे तयार करा.
🔸तयार केलेल्या ठोकळ्यावर रंगीत कागद चिकटवा.
🔹एका ठोकळ्याच्या सहा बाजूवर कर्ता असलेले शब्द मार्कर पेनने लिहा.
🔸दुसर्‍या ठोकळ्यावर कर्म आणि तिसर्‍या ठोकळ्यावर क्रियापद असलेले शब्द लिहा.
🔹शब्द असे लिहा की ठोकळ्याची बाजू बदलवली की नवीन वाक्य तयार होईल.
🔸विद्यार्थ्यांचे गट पाडून विद्यार्थ्यांना वाक्य तयार करून वहीत लिहायला सांगा.
🔹विद्यार्थी ठोकळे फिरवून विविध वाक्य तयार करतात.
🔸जो विद्यार्थी सर्वात जास्त वाक्य तयार करेल त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन करा.

      👉 साहित्याचा फायदा -
🎯विद्यार्थ्यांना वाक्य रचना करता येते.
🎯विद्यार्थी तीन ठोकळ्यापासून विविध वाक्य तयार करतात.
🎯वाक्य संपल्यावर पूर्ण विराम देण्याची सवय लागते.
🎯विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण होते.
🎯कर्ता,कर्म,क्रियापद यांचा विचार करून वाक्य तयार करता येते.
          ~~●~~~~~~~~●~~
         ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक ४    
   
     💠 चिञवाक्य साचे व वाक्यपट्ट्या संच.....! 💠        
      ═••═
     👉 साहित्य -
माउंट बोर्ड (पूठ्ठा),प्राणी,पक्षी,फळे,भाज्या यांची चिञे,स्र्कू,मार्कर पेन...
      👉  कृती-
🔹प्रथम माउंट बोर्डच्या एकसारख्याआयताकृती पट्ट्या कापून घ्या.
🔸पट्ट्यांवर मधोमध चिञ चिकटवून वाक्य लिहा.
🔹काही पट्ट्यांवर चिञ न चिकटवता वाक्य लिहा.
🔸दहा वाक्य पट्ट्या एकञ ठेवून स्र्कू बसवा.
🔹खालील छायाचिञात दाखवल्याप्रमाणे...

       👉साहित्याचा वापर -
🔸प्रथम विद्यार्थ्यांकडून चिञावरून वाक्य वाचन करून घ्या.
🔹चांगला सराव झाल्यावर चिञावर त्या चिञाच्या नावाची पट्टी ठेऊन वाचन घ्या.
🔸चिञ नसलेल्या वाक्यपट्ट्यांचे वाचन करून घ्या.
🔹विद्यार्थ्यांना वाक्यसंच देऊन एकेक वाक्यांचे वाचन करून घ्यावे.
       *👉साहित्याचा फायदा—
🎯चित्रावरून वाक्य वाचता येते.
🎯योग्य स्वराघातासह वाक्य वाचन करतात.
🎯एका दृष्टीक्षेपात वाक्य वाचता येते.

              ~~●~~~~~~~~●~~
         ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक ५    
     

           💠 म्हणी तयार करा...!! 💠     
       ═••═
     👉 साहित्य -
माऊंट बोर्ड (पूठ्ठा),मार्कर पेन...
     👉 कृती व वापर -

🔹माऊंटबोर्डवर 11 उभे व 11आडवे रकाने आखा.
🔸रकान्यात म्हणीतील अक्षरे मार्कर पेनने लिहा.
🔹अक्षरांची जुळवा जुळव करून विद्यार्थ्यांना म्हणी तयार करायला सांगा.
🔸तयार केलेल्या म्हणींचा अर्थ लिहायला लावा.

       👉साहित्याचा फायदा —
🎯विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते.
🎯अक्षरांची जुळवाजुळव करून म्हणी तयार करता येतात.
🎯म्हणी व त्यांचे अर्थ लिहिता येतात.
               ~~●~~~~~~~~●~~
         ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक ६    
              
       🐍 शब्द सापशिडी 🐍         
              ═••═
         👉साहित्य —
 *चार्ट पेपर, जाड पुठ्ठा,प्लॅस्टिक पेपर , सोंगटी , फासा.....🎲
         👉प्रत्यक्ष कृती—
🔹 प्रथम चार्ट पेपर वर पट्टीच्या साह्याने 100  सारखे रकाने काढून घ्यावे.
🔸 प्रत्येक रकान्यात 1 ते  100 अंक लिहून सापाची व शिडीची चिञे काढून घ्यावी.
🔹 काही रकान्यात स्वरचिन्हासहित अक्षरे लिहावी तर काही रकान्यात प्राणी , पक्षी यांची चिञे लावावी.
🔸 चार्ट पेपर जाड पुठ्यावर  चिकटवून त्यावर जाड प्लॅस्टिक कव्हर लावावे.त्यामुळे साहित्य दिर्घकाळ टिकते.

          👉प्रत्यक्ष कार्यवाही -
🔹 चार विद्यार्थी एका वेळेस खेळ खेळू शकतात.
🔸 1 या अंकावर सोंगटी ठेऊन फासा टाकून खेळाची सुरूवात करतील.
🔹 अक्षरावर सोंगटी आल्यास त्या अक्षरापासून शब्द सांगावा.शब्दापासून वाक्य तयार करावे.
🔸 प्राणी व पक्षी यांच्या चिञावर सोंगटी आल्यास त्यांची नावे व माहिती सांगावी.
🔹सोंगटी शिडीवर आल्यास वर चढावे व सापाच्या तोंडावर आल्यास खाली शेपटीपर्यंत उतरावे.
🔸 अशाप्रकारे जो प्रथम 100 या अंकावर पोहचणार तो विजेता.🏆
                👉 साहित्याचा उपयोग —
🎯 शब्दसंपत्तीत वाढ होते.
🎯शब्दापासून वाक्य तयार करता येते.
🎯 प्राणी व पक्षी यांची नावे व माहिती सांगतात.
 🎯 खेळातुन भाषा विषय शिकतात.
🎯 विद्यार्थी खेळातून आनंदाने शिकतात.
🎯 दप्तरावीना शाळा या उपक्रमासाठी वरील साहित्य अतिशय उपयुक्त आहे.
🟣🔵🟢🔴
                ~~●~~~~~~~~●~~
         ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  ७   
       


       🌸 शब्दांची फुलदानी 🌸       
         ═••═
     उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करूया..!! शैक्षणिक साहित्य तयार करून शाळेतील मुलांसाठी खाऊ तयार करूया....!!!
       👉साहित्य —
जूने प्लॅास्टीकचे चमचे,लाॅलीपाॅप स्टॅन्ड,जून्या वह्यांचा पूठ्ठा,रंगीत कागद, permanent मार्कर,काञी,कटर,सेलो टेप,खराट्याच्या काड्या.....✂
 👉सूचना —ज्या दुकानात लाॅलीपाॅप विकले जातात तेथे लाॅलीपाॅप स्टॅन्ड मिळतो.प्रत्येक पॅकेटवर एक लाॅलीपाॅप स्टॅन्ड दुकानदाराला फ्री मिळतो.दुकानदार नंतर तो स्टॅन्ड फेकूनच देतो.
           👉 कृती क्रमांक -- 1
🔹लग्नसमारंभासाठी प्लॅास्टिकचे चमचे आणतात.
🔸वापरलेले प्लाॅस्टिकचे चमचे साबन लावून स्वच्छ धुऊन घ्यावे.
🔹धुतलेले चमचे थोडा वेळ उन्हात सुकवावे.
🔸Permanent मार्कर पेनने त्यावर शब्द लिहून घ्यावे.
🔹चमचे खालच्या बाजूने कटरने थोडे निमूळते कापावे.
🔸लाॅलीपाॅप स्टॅन्डवर चमचे खोचावे.
         👉कृती क्रमांक -2
🔹रंगीत कागदावर विविध फुलांचे आकार काढावे.
🔸रंगीत कागद पातळ असतो म्हणून तो जून्या वहींच्या पूठ्यावर  काढलेले फुलांचे आकार चिकटवणे.
🔹काञी किंवा कटरचा वापर करून ती फुले कापून घ्यावी.
🔸कापलेल्या फुलांना मार्कर पेनने बाॅर्डर करून त्यावर शब्द लिहावे.
🔹फुलांच्या मागच्या बाजूला खराट्याची काडी सेलो टेपने चिकटवावी.
🔸तयार रंगीत फुले लाॅलीपाॅपच्या स्टॅन्डवर खोचावी.
🔹सुंदर व आकर्षक फुलदानी तयार होईल.
          👉साहित्याचा उपयोग -
🎯 शब्द ओळख व शब्द वाचनासाठी...
🎯टाकाऊतून टिकाऊ साहित्य निर्मितीसाठी...
🎯वर्गसजावट व टेबलावरील सजावटीसाठी...
🎯 शैक्षणिक साहित्याच्या स्टाॅल सजावटीसाठी...
  👉 टिप - शब्दांची फुलदानी समजून घेण्यासाठी वरील छायाचिञ पाहावे.
                    ~~●~~~~~~~~●~~
         ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक ८    
               
   ★ शब्दफुले ★   
             ═••═
   सर्वांना आता उन्हाळी सुट्टी सुरू झाली असेलच...या उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग करूया..!! शैक्षणिक साहित्य तयार करून शाळेतील मुलांसाठी खाऊ तयार करूया....!!!
     👉साहित्य - चहाचे कप , काञी , स्केचपेन ☕✂🖍

     👉 कृतीची कार्यवाही-
🌸लग्नसमारंभाच्या वेळी चहाचे कप आणतात.
🌸वापरलेले चहाचे कप स्वच्छ धुऊन घ्यावे.
🌸कप दोन्ही बाजूने कडक उन्हात सुकवावे.
🌸कप चांगले सुकले की एका कपाचे आठ समान भाग करावे.
🌸काञी घेऊन हळूवार कापावे.
🌸कापल्यावर फॅन सारखे पाते दिसतात.
🌸मध्यभागी एक अक्षर लिहून पात्यांवर त्या अक्षरापासून तयार होणारे शब्द मार्कर पेनने लिहावे.
🌸कपाच्या मागच्या व पुढच्या बाजूला शब्द लिहावे.
🌸अशाप्रकारे आपली शब्दफुले तयार होतात.
👉  टीप - शब्दफुले समजून घेण्यासाठी वरील छायाचिञ पाहावे.

       👉 साहित्याचा उपयोग -
*🌺विद्यार्थ्यांना अक्षर ओळख व अक्षर वाचनासाठी.
*🌺विद्यार्थ्यांना शब्द ओळख व शब्द वाचनासाठी.
*🌺अक्षरांपासून शब्द तयार करणे.
*🌺टाकाऊतून टिकाऊ साहित्य निर्मिती.
*🌺वर्गसजावट व स्टाॅलसजावटीसाठी उपयोग होतो.
                 ~~●~~~~~~~~●~~
         ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  ९   
               


     ♻ डायमंड ♻       
                  ═••═
                👉 साहित्य - रंगित जाड कागद , पट्टी , फेव्हीकाॅल , काञी , स्केचपेन.....📏✂
                👉 कृती -
💎 50 x 20 सेमी.आयताकृती रंगित जाड कागद कापून घ्या.
💎 50 सेमी. चे 8 सेमी. अंतर घेऊन समान सहा भाग करा.
💎 2 सेमी. ची पट्टी शिल्लक राहिल.
💎  कागदाच्या उभ्या बाजूवर 4 सेमी. चे अंतर घेऊन 5 समान भाग करून घ्या.
💎 त्या समान भागावर 5 आडव्या  रेषा आखून घ्या.
💎 50 सेमी.च्या भागावर 16 सेमी. चे अंतर घेऊन तिरप्या रेषा आखा.
💎 तशाच प्रकारे दुसर्‍या विरूद्ध बाजूच्या रेषा आखून घ्या.
💎 खालील अाकृतीत दाखविलेला रेखांकित  भाग कापा.
💎 उभ्या व तिरप्या रेषांवर पट्टीच्या साह्याने घडी घाला.
💎 समान ञिकोणाच्या भागास फेव्हीकाॅल लावा.
💎 प्रथम एक नंबरचा ञिकोण कागदाच्या खालच्या ञिकोणास चिकटवा.
💎 अशाप्रकारे दुसरा व तिसरा ञिकोण चिकटवा.
💎 2 सेमी. च्या वरील भागाला फेव्हीकाॅल लावून शेवटच्या ञिकोणाच्या आतील भागात सरकवून चिकटवा.
💎 आता आपला डायमंड तयार झाला.
💎 त्यावर चिञ चिकटवा किंवा अक्षर , शब्द लिहा.
           👉 सूचना -
💎 डायमंड समजून घेण्यासाठी वरील छायाचिञ बघा.
           👉 शै.साहित्याचा फायदा-
🚩 शैक्षणिक खेळणी म्हणून याचा वापर करता येतो.
🚩 स्वंयअध्यन साहित्य म्हणून वापर करता येतो.
🚩 वर्गसजावटीसाठी.....
🚩 शैक्षणिक स्टाॅल सजावटीसाठी.....
🚩 विद्यार्थ्यांना खेळता खेळता ज्ञान व आनंद मिळतो.
🚩 डायमंड अार्कषक, रंगित व गोल फिरत असल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्सुकता निर्माण होते.
              ~~●~~~~~~~~●~~
         ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर     

      शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रमांक  १०    
               
    🌺महाफुल 🌺    
               ═••═
     👉साहित्य - रंगित चार्ट पेपर,काञी,चिञे व चित्रांच्या नावाच्या शब्दपट्टया....
       👉प्रत्यक्ष कृती —
🔹रंगित चार्ट पेपरवर 15 सेमी ञिज्या असलेले वर्तुळ काढा.
🔸त्या वर्तुळावर एक बिंदू घेऊन दुसरे वर्तुळ काढा.
🔹हे वर्तुळ पहिल्या वर्तुळावर ज्या ठिकाणी छेदेल तो केंद्रबिंदू घेऊन आणखी एक वर्तुळ काढा.
🔸अशाप्रकारे पहिल्या वर्तुळावर सहा वर्तुळ काढा.
🔹खालील आकृतीत दिल्याप्रमाणे मूळ वर्तुळाचा केंद्रबिंदू तसेच मूळ वर्तुळावरील छेदनबिंदू यांना जोडणारी रेषा काढा.
🔸अशाप्रकारे एकूण सहा रेषा काढा.
🔹मूळ वर्तुळावर आकृतीत दिल्याप्रमाणे षटकोन काढा.
🔸सहा वर्तुळाचा बाह्य भाग कापून घ्या.
🔹षटकोन व उभ्या रेषा स्केच पेनने आखून घ्या.
🔸ञिकोणी आकाराचा आतील भाग येईल अशी मोड मारा.
🔹वर्तुळातील सर्व षटकोनाच्या सर्व बाजूने मोड मारा.
🔸अशाप्रकारे लहान मोठ्या आकाराचे महाफुल तयार करून आतील बाजूने चिकटवा.
🔹तयार झालेल्या महाफुलाच्या आतील बाजूस फळे,भाज्या,फुले,प्राणी यांची चित्रे चिकटवा.
🔸विद्यार्थी चित्रांवर त्या नावांच्या शब्दपट्टया ठेवतील.
        👉 साहित्याचा उपयोग -
🎯शैक्षणिक खेळणी म्हणून वापर करता येतो.
🎯स्वयंम अध्ययनासाठी अतिशय उपयुक्त साहित्य आहे.
🎯वर्गसजावटीसाठी....
🎯शैक्षणिक स्टाॅल सजावटीसाठी...
🎯रंगित व आकर्षक असल्यामूळे विद्यार्थ्यांना साहित्याविषयी कुतूहल वाटते.
  👉 महाफुल समजून घेण्यासाठी वरील छायाचिञ पाहा.
                ~~●~~~~~~~~●~~



No comments:

Post a Comment