"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शिक्षक दिन मराठी/हिंदी भाषणे

     


   शिक्षक दिन मराठी भाषण 1    

उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर मंडळी माझे मार्गदर्शक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, माझे वर्गमित्र यांना शिक्षक  दिनाच्या शुभेच्छा.....
गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
 गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
 भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला...

  आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.

  हिंदू धर्मग्रंथांनुसार, आध्यात्मिक गुरू बनवणे फार महत्त्वाचे आहे, आध्यात्मिक गुरूशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. खऱ्या आध्यात्मिक गुरूची ओळख पवित्र गीतेच्या अध्याय १५ श्लोक १ ते ४ मध्ये लिहिलेली आहे. २०२२ मध्ये शिक्षक दिन "अभार दिवस" ​​म्हणून साजरा करण्यात आला. १९९४ मध्ये युनेस्कोने स्थापन केलेल्या जागतिक शिक्षक दिनासोबत अनेक देश ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा शिक्षक दिन साजरा करतात.

गुरुविना न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान...
जीवनभवसागर तराया,
चला वंदु गुरुराया...
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
                  ═••═
                शिक्षक दिन मराठी भाषण 2   
   आदरणीय मंच, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, माझे मार्गदर्शक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, माझे वर्गमित्र यांना शिक्षक  दिनाच्या शुभेच्छा.  शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.

   `गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.

     भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.

                      ═••═

        शिक्षक दिन मराठी भाषण 3    
   आदरणीय मंच, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, माझे मार्गदर्शक मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, माझे वर्गमित्र ज्यांच्या अथक प्रयत्नांमधून मी आज इथपर्यंत पोचलो त्या सर्व माझ्या गुरूंना प्रथम वंदन करतो...
शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल  त्यांचा सन्मान करण्यासाठी शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना १९ व्या शतकात अनेक देशांमध्ये रुजली; इतर अनेक  देश हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करतात.
   भारतात दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सप्टेंबर) यांचा जन्मदिवस १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि गुरुपौर्णिमा हा दिवस हिंदूंनी शिक्षकांची पूजा करण्याचा दिवस म्हणून साजरा केला.

    शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. अज्ञांनी मुलाला ज्ञानी बनवतो. विद्यार्थ्यांमधील दुर्गुण बाजूला काढून त्याच्या सद्गुणाना वाव देतो. उत्तम खेळाडू, उत्तमप्रशिक्षक, उत्तम वक्ता, उत्तम वैज्ञानिक घडविण्यासाठी शिक्षक हे अविरत पणे कार्य करत असतात. समाजाला अशा शिक्षकांची गरज असते. आज देशभरात जगभरात शिक्षकांच्याकडे पाहिले तर हे शिक्षक विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार करत असतात. शिक्षकांना सर्वांत जास्त आनंद केव्हा  मिळत असतो. आपला एखादा विद्यार्थी सामान्य असेल, पण तो जेव्ह त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून ज्यावेळी समाजात वावरत असतो. त्यावेळी शिक्षकांना आनंद होत असतो. आज शिक्षकांनी आपल्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श ठेवण्याचे कार्य करतात. व्यक्ती मनुष्य आणि विद्यार्थी समाज या सर्व गुणांचा अभ्यास करून शिक्षक एक विचारांची चौकट आपल्यासमोर निर्माण करतात यातून आपण गुरुजनांच्या विचारांचा आदर्श घेतला तर एक नवा समाज, नवी पिढी निर्माण होऊ शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र !                      ═••═



         शिक्षक दिन मराठी भाषण 4    
आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक आणि माझे सर्व सहकारी मित्रांनो..
गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण जगी न होई सन्मान,
जीवन भवसागर तराया,
चला वंदूया गुरुराया,

   आपल्या देशामध्ये गुरुपरंपरेला फार महत्त्व आहे. पूर्वी या देशामध्ये गुरूच्या कुलात जाऊन विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत होते. त्या पद्धतीला शिक्षण पद्धती असे आपण पाहतो. आजया देशामध्ये मुले शाळेत जाऊन शिकू लागली. पूर्वा शिक्षण हे वनामध्ये दिले जायचे. आज शिक्षण हे शाळेमध्ये दिले जाते. विद्यार्थ्यांची जडणघडणीत त्याच्या गुरुजनांचे योगदान महत्त्वाचे असते. आपल्या देशामध्ये त्याच गुरुजनांचा सन्माननीय शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा आढावा, मागोवा लोकांनी घ्यावा याचसाठी शिक्षक दिन हा साजरा केला जातो. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
    एक सामान्य माणूस, उत्तम शिक्षक ते उत्तम प्रशासक या देशाचे राष्ट्रपती हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा प्रवास सर्वांच्या समोर आदर्श प्रेरणादायी पहावयास मिळतो. आज शिक्षक दिन साजरा करत असतांना आपण आपल्याला ज्ञानाचे, जीवनाचे, आयुष्याचे, कला, क्रीडा, साहित्य यासारख्या क्षेत्रामध्ये आपणास घडवणाऱ्या गुरुवर्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करत असतो. शिक्षक तन, मन, धन, अर्पण आणि समर्पित करून एक पिढी घडविण्याचे पवित्र कार्य करत असतात. या देशामध्ये शिक्षण हे पूर्वी विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, पण हे शिक्षण आजसर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले. या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक आपणास आपलं आयुष्य संस्कारमय, शिस्तबद्ध परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असत. याचाच आदर्श आपण घेतला पाहिजे.
                       ═••═

                शिक्षक दिन मराठी भाषण 5    
    शिक्षक दिन कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर माझे सर्व गुरुजन व विद्यार्थी मित्रांनो मी प्रथम  मला घडवणाऱ्या सर्व गुरूंना सन्मानपूर्वक सलाम करतो...!!

     भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.

  शिक्षक दिन हा सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे आणि सर्व आदरणीय शिक्षकांच्या कठोर परिश्रम आणि शिकवणीचा सन्मान करतो. गुरुजनांच्या विचारांचा आदर्श घेतला तर एक नवा समाज, नवी पिढी निर्माण होऊ शकते.

   समाजाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने ज्ञान दानाचे कार्य करणाऱ्या आपल्या गुरुवर्य म्हणजे आपल्या प्रिय शिक्षकाच्या सन्मानाचा आज दिवस आहे. तो दिवस म्हणजे शिक्षक दिन.                   जय हिंद, जय महाराष्ट्र !

                   ═••═

        शिक्षक दिन मराठी भाषण 6    

अध्यक्ष! महाशय , गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी 5 सप्टेंबर संपूर्ण भारतभर जो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो याविषयी माझे दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे. ही नम्र विनंती.

देतो समाजाला आकार ,
घडवूनि नररत्ने थोर,
स्थान तुझे मोठे माझ्या आयुष्यात,
नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ

या कवितेच्या ओळी शिक्षकाचे आपल्या जीवनातील स्थान सांगायला पुरेशा आहेत. शिक्षक की जो समाजाला आकार देतो हा समाज पुढे योग्य मार्गावर चालावा त्यासाठी थोर व्यक्तींची निर्मिती करतो.एवढेच काय माता-पित्यानंतर जर नमन करण्याची जागा असेल किंवा महत्त्वाचे स्थान कोणाचे तर ते आहेत आपले शिक्षक. शिक्षकांना नमन करण्याचा वंदन करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन...

    शिक्षकांसाठी गुरु जनांसाठी मी एवढेच म्हणू इच्छिते की शिक्षक जगतात अज्ञानाचा नाश करून  समाजाला प्रकाशमान बनवितात.
     माझ्या आजपर्यंतच्या जीवनाच्या प्रवासात मला कळत नकळत ज्ञान देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना गुरुजनांना माझा नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या आपणास मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद...!!
  ═••═

              शिक्षक दिन मराठी भाषण 7    
  आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक आणि माझे सर्व मित्रांनो डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

गुरुविना ना मिळे ज्ञान
ज्ञान विन ना मिळे सन्मान...
जीवन भव सागर तराया
चला वंदू गुरु राया...

   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित सर्व माझे आदरणीय प्रिय शिक्षक वर्ग व माझे मित्र मैत्रिणींनो.
आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन, अशा या शुभ दिवशी म्हणजेच शिक्षक दिनी आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे, मला आशा आहे की तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे.

शिक्षक म्हणजे अंधारात हरवलेल्याना प्रकाशात आणणारा...
शिक्षक म्हणजे वाळवंटामध्ये हरवलेल्या व्यक्तीला रस्ता दाखवणारा...
शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे सोने करणारा...

   अशा कितीतरी उपमा शिक्षकाला दिल्या तर त्या कमीच पडतील. शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.
5 सप्टेंबर या दिवशी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षकाविषयी खूपच आवड होती. त्यांच्या आयुष्यात त्यांनी शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे असे म्हणणे होते की शिक्षणाशिवाय कोणताही व्यक्ती आपले ध्येय गाठू शकत नाही. ते म्हणतात की व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाचे खूप असे अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे.
    डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये मद्रास येथील तिरुवल्लुर या गावी झाला.
ते स्वतंत्र भारतातील पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी ते एक नामांकित शिक्षक तज्ञ होते त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय असे योगदान दिले.
  ═••═

        शिक्षक दिन मराठी भाषण 8    
शिक्षक दिन कार्यक्रमासाठी उपस्थित  सर्व मान्यवर माझे सर्व गुरुजन व विद्यार्थी मित्रांनो मी प्रथम  माझ्या सर्व गुरूंना सर्व गुरूंना त्रिवार वंदन करतो...!!
    शिक्षणामुळे व्यक्ती आज समाजामध्ये उच्च ठिकाणी पोहोचू शकतो याचे सर्व श्रेय शिक्षकाला जाते.शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला, त्याच्या जीवनाला योग्य ती वळण लागते.
   ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याला आकार देऊन योग्य प्रकारे घडवत असतो. त्याचप्रमाणे शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यांच्या भविष्याला आकार देत असतो. वर्गात तासन्तास उभे राहून घसा कोरडा होईपर्यंत चा निर्मल भावनेने शिक्षक हे आपल्या ज्ञानदानाचे कार्य करत असतात.
    शिक्षक म्हणजे कोण तर शिक्षक म्हणजे असत्या कडून सत्याकडे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ शिक्षक हे नेहमी विद्यार्थी यान सोबत असतात.नवनवीन ज्ञान संकल्पना जाणून घेऊन शिकण्याची त्यांची मानसिकता असते. 
    शिक्षक हे प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन काहीतरी शिकवण्याचे कार्य करते. शिक्षक दिनाच्या माध्यमातून या देशामधील करोडो शिक्षकांच्या विचारांनुसार आपण जर आपली योग्य पद्धतीने वाटचाल केली तर एक संस्कारमय, संस्कृतीरक्षकं, वैज्ञानिक दृष्टिकोण असणारा विद्यार्थी समाजातून निर्माण होऊ शकतो.
    शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी गुरुजींच्या वाणीतून व कृतीतून येणाऱ्या गोष्टींचा संग्रह करून आपण वाटचाल केली तर यशाचा आनंदसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. यासाठीच शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रामाणिकपणे पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गुरुजींच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे.
  ═••═

        शिक्षक दिन मराठी भाषण 9    
आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक, उपस्थित पालक आणि माझे मित्र मैत्रिणींनो मी...... शिक्षक दिन/ गुरुचे महत्व या विषयावर माझे विचार मांडणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी मी अशा व्यक्त करतो
   भारतात प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे गुरु म्हणजे शिक्षक. शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यात तो सर्व संकटांना कसे सामोरे जाईल याचे शिक्षण देत असतो.शिक्षक हा त्याचा भविष्याचा निर्माता असतो.

   भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.

   आजच्या काळात नवसमाज निर्मिती व समाज परिवर्तन अशी दुहेरी जबाबदारी शिक्षकांवर येऊनप पडली आहे . विद्यार्थ्यांची व पर्यायाने भावी समाजाची विवेकबुद्धी जागृत करून ती कार्यप्रवण करण्याचे काम हे फक्त शिक्षकच करू शकतात.

   माझ्या आजपर्यंतच्या जीवनाच्या प्रवासात मला कळत नकळत ज्ञान देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना गुरुजनांना माझा नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद...!!

  ═••═

        शिक्षक दिन मराठी भाषण 10    

शिक्षक दिन कार्यक्रमासाठी उपस्थित  सर्व मान्यवर माझे सर्व गुरुजन व विद्यार्थी मित्रांनो मी प्रथम  माझ्या सर्व गुरूंना सर्व गुरूंना त्रिवार वंदन करतो...!!

     भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली. शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. साधरण विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. भारतामध्ये सर्वात आधी १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. ५ ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन साजरा करतात. 

गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान...

जीवनभवसागर तराया, चला वंदु गुरुराया... शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  ═••═



        शिक्षक दिवस पर हिंदी भाषण 1    

आदरणीय मुख्य अतिथि महोदय, सम्मानित शिक्षकगण मेरे साथियों।  ‘शिक्षक दिवस’ के इस पावन अवसर पर अपने विचार व्यक्त करने का सुअवसर प्राप्त कर मुझे हर्ष की अनुभूति हो रही है।

   भारत में ‘शिक्षक दिवस’ प्रत्येक वर्ष 5 सितम्बर को मनाया जाता है। शिक्षक का समाज में आदरणीय और सम्माननीय स्थान होता है। भारत हर साल डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन की जयंती को उनके योगदान और उपलब्धियों को श्रद्धांजलि के रूप में राष्ट्रीय शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है। स्कुल से लेकर कॉलेजों तक छात्र-छात्राएं बड़े ही धुमधाम से उनकी जयंती मनाते हैं। इस दिन छात्र अपने शिक्षकों का सम्मान करते हैं।

   साल 1962 में डॉ. राधाकृष्णन स्वतंत्र भारत के दूसरे राष्ट्रपति बने। इस दिन को मनाने का मुख्य महत्व यह है कि डॉ राधाकृष्णन के छात्रों ने उनके जन्मदिन को एक विशेष दिन के रूप में मनाने की अनुमति देने के लिए उनसे संपर्क किया। वह उस सम्मान से हैरान और खुश थे जो छात्रों द्वारा उनके शिक्षक न होने के बाद भी उन्हें दिया जाता है।

  ═••═

     शिक्षक दिवस पर हिंदी भाषण 2     

   आदरणीय मुख्य अतिथि महोदय, सम्मानित शिक्षकगण मेरे साथियों।
सभी सम्मानित लोगो को सादर प्रणाम !

एक शिक्षक और शिष्य के बीच में शिक्षा और ज्ञान का संबंध होता है। हमारे जीवन में शिक्षा और शिक्षक दोनों ही बहुत ज़रूरी हैं, क्योंकि हमारी जिंदगी को संवारने में हमारे माता-पिता के बाद इनकी भूमिका सबसे अहम होती है। जिस तरह से हमारे माता-पिता ही हमारे भगवान होते हैं, उसी प्रकार से हमारे गुरु में भी ईश्वर का वास होता है क्योंकि “गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म:, तस्मै श्री गुरुवे नमः”। ये भी सच है कि बिना शिक्षक के हमें शिक्षा और ज्ञान नहीं मिल सकता। कहते हैं कि समय से बड़ा गुरु कोई नहीं होता, क्योंकि देर से ही सही मगर समय हमें सब कुछ सीखा देता है। लेकिन मैं मानता हूं कि हम सीखने में देर ही क्यों करें, क्यों न समय रहते ही हम अपने गुरु या शिक्षक से शिष्य के रूप में पहले से ही वो सीख या ज्ञान प्राप्त क्यों न कर लें, जिससे बाद में होने वाली परेशानी से बचा जा सके। क्योंकि वो एक शिक्षक ही होता है, जो हमें सीखता है कि मुश्किल चीजों का सामना कैसे करना है।

  ═••═

      शिक्षक दिवस पर हिंदी भाषण 3    

    सम्मानित शिक्षक, सम्मानित अतिथि, और प्रिय छात्र....आज के शिक्षक दिवस समारोह में आपका हार्दिक स्वागत है।आज हमारे पूर्व उप-राष्ट्रपति और राष्ट्रपति डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन का भी जन्मदिन है, जिनकी याद में हम सभी शिक्षक दिवस मनाते हैं। डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ने भी कहा है कि ‘पूरी दुनिया एक विद्यालय है, जहां हम कुछ न कुछ नया सीखते हैं। हमारे शिक्षक हमें केवल पढ़ाते ही नहीं हैं, बल्कि हमें अच्छे और बुरे के बीच का फर्क भी समझाते हैं।’ उनकी कही ये बात हमें बताती है कि हमारे जीवन में शिक्षकों का होना कितना महत्त्वपूर्ण है। और हम कितने सौभाग्यशाली हैं कि हमने अपने शिक्षकों से कितना कुछ सीखा है, अब भी सीख रहे हैं और आगे भी ऐसे ही सीखते रहेंगे।  
     अब मैं आपको बताना चाहूंगा कि हमारे देश में शिक्षक दिवस की शुरुआत कब और कैसे हुई? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 13 मई सन् 1962 को भारत के दूसरे राष्ट्रपति बन गए थे। इसी वर्ष 5 सितंबर को उनके जन्मदिवस की खुशी के मौके पर उनके कुछ साथियों और छात्रों राधाकृष्णन से उनका जन्मदिवस मनाने के लिए कहा। तो राष्ट्रपति जी ने उनसे कहा कि अगर आप मेरा जन्मदिन शिक्षकों के सम्मान के लिए शिक्षक दिवस के रूप में मनाएंगे, तो मुझे आप सभी पर बहुत गर्व होगा। राष्ट्रपति डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन के इस नेक विचार का सभी ने सम्मान किया और हर साल 5 सितंबर को शिक्षक दिवस मनाने का फैसला किया।
  ═••═

     शिक्षक दिवस पर हिंदी भाषण 4    

    आदरणीय मुख्य अतिथि महोदय, सम्मानित शिक्षकगण मेरे साथियों। आप सभी को मेरा प्यार भरा नमस्कार। मेरा नाम ____ है और मैं आप सभी का आभार व्यक्त करता हूं कि आपने मुझे बोलने का मौका दिया। ये तो हम सभी जानते हैं कि आज शिक्षक दिवस है और शिक्षकों के सम्मान में आज हम सब यहाँ पर एकत्रित हुए हैं, इसीलिए मैं ज़्यादा समय न लेते हुए शिक्षक दिवस के बारे में अपने विचार प्रकट करना चाहूंगा और आशा करता हूं कि आप सभी लोग मुझे ध्यान से सुनेंगे।

     गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: गुरुर साक्षात  परम ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः अर्थात गुरु ही ब्रह्म है गुरु ही विष्णु है गुरुदेव ही शिव है और गुरुदेव ही साक्षात साकार स्वरूप आदि ब्रह्म है मैं उन्हीं गुरुदेव को नमस्कार करता हूं. सुप्रभात,

    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिन्हें बच्चों से बहुत प्यार था. और जिनके कहने पर ही पहली बार शिक्षक दिवस मनाया गया था | उन्हीं के जन्मतिथि को याद करके हर साल 5 सितंबर को शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है. ये दिन शिक्षक और उनके शिष्यों का दिन होता है. बच्चों के लिए शिक्षक दिवस किसी त्योहार से कम नहीं होता.

   तो सबसे पहले मैं अपने शिक्षकों को कोटि कोटि नमन करता हूँ | आज का दिन हमारे लिए बहुत खास है क्योंकि आज हम सभी यहाँ शिक्षक दिवस मनाने के लिए इकठ्ठा हुए हैं. कहा जाता है गुरु से बड़ा दूसरा कोई नहीं होता, आज मैं ये मानता भी हूँ |तो चलिए आज हम सभी ऐसे गुरुयों को नमन करते हैं और हमारे जीवन मे उनके महत्व को समझने की कोशिश करते हैं. गुरु वो दिपक होते हैं जो अंधरे में भी हमें उजाला देते हैं. वो वृक्ष होते हैं जो खुद धूप सह के हमें छाव देते हैं. और वो पेड़ होते हैं जो हमेशा हमें मीठा फल देते हैं.हमारे अंदर से अज्ञान के अंधरे को दूर कर ज्ञान का प्रकाश भर देते हैं. हमसे ज्यादा हममें विश्वास रखते हैं.  शिक्षक हमें केवल पढ़ाते नहीं बल्कि हमें आकार देते हैं, एक ज़िम्मेदार नागरिक बनाते हैं. हममें गलतियां निकालते है इसलिए नहीं ताकि हम हताश हो बल्कि इसलिए ताकि हममें निरंतर सुधार हो. हमें बाहरी दुनिया के लिए तैयार करते हैं. उन सभी मुश्किलों के लिए जो जीवन के हर नए पड़ाव पे हमें मिलेंगे. आपने हमें, हमें बनाया है. बहुत बहुत धन्यवाद सर/मैम हमें सच्चाई, अच्छाई ,और न्याय के पथ पर निरंतर आगे बढ़ाने के लिए.
धन्यवाद! 
  ═••═

     शिक्षक दिवस पर हिंदी भाषण 5    

   सम्मानित शिक्षक, सम्मानित अतिथि, और प्रिय छात्र....आज के शिक्षक दिवस समारोह में आपका हार्दिक स्वागत है। हम सभी हमें ज्ञान देने वाले अपने  सभी शिक्षकों के योगदान का आभार व्यक्त करने के लिए भी यहां एकत्रित हुए हैं। इस विशेष अवसर पर हम अपने शिक्षकों के अथक समर्पण और अटूट प्रयासों के लिए अपनी गहरी कृतज्ञता व्यक्त करते हैं।

    शिक्षक हमारे दिमाग को आकार देते हैं और हमारे सपनों को संवारते हैं। शिक्षकों कि ही देन है कि हम आगे चलकर अपने जीवन में सफल होते हैं। हर एक इंसान के जीवन में शिक्षकों या गुरुओं का बहुत ही योगदान है। क्योंकि अगर शिक्षक नहीं होते तो आने वाली पीढ़ियों को अच्छा ज्ञान नहीं मिल पाता है। शिक्षकों की ही देन है कि आज भारत पूरी दुनिया में अपना परचम लहरा रहा है।
      शिक्षक सभी स्टूडेंट्स का बराबर ध्यान देते हैं। हम अपने शिक्षक का साथ छोड़ सकते हैं, मगर शिक्षक हमारा साथ कभी नहीं छोड़ते। अब मैं अपनी बात को यहीं पर खत्म करना चाहूंगा। मुझे इतने ध्यान से सुनने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद। सभी शिक्षकों को मेरी तरफ से शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
  ═••═

     शिक्षक दिवस पर हिंदी भाषण 6    

    आदरणीय मुख्य अतिथि महोदय, सम्मानित शिक्षकगण मेरे साथियों। शिक्षक दिवस के इस पावन अवसर पर अपने विचार व्यक्त करने का सुअवसर प्राप्त कर मुझे हर्ष की अनुभूति हो रही है।
आज के शिक्षक दिवस समारोह में आपका हार्दिक स्वागत है।

    शिक्षक दिवस भारत के पहले उपराष्ट्रपति और देश के दूसरे राष्ट्रपति डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्मदिन पर मनाया जाता है। डॉ. राधाकृष्णन एक प्रतिष्ठित शिक्षाविद् थे। एक बार उनके छात्रों ने श्रद्धा से उनसे पूछा, क्या वह उन्हें उनके जन्मदिन पर कोई उपहार दे सकते हैं और उनका जन्मदिन मना सकते हैं। इस पर डॉ. राधाकृष्णन ने छात्रों से उपहार लेने से मना कर दिया और कहा कि वे इस दिन को शिक्षक दिवस के रूप में मना सकते हैं। लेकिन जब बाद में उनका निधन हुआ तो उन्हें श्रद्धांजलि देने के लिए शिक्षक दिवस मनाया जाने लगा।

हर दिन छात्रों को कुछ नया सिखाते हैं।

मुश्किल सवालों का सीधा-सरल हल बताते हैं शिक्षक सिर्फ अक्षरों या अंकों का ज्ञान नहीं देते अपने अनुभवों से छात्रों का भविष्य उज्जवल बनाते हैं।

सभी शिक्षकों को मेरी तरफ से शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

  ═••═

          शिक्षक दिवस पर 10 लाइनमें भाषण     

★आदरणीय मुख्य अतिथि महोदय, सम्मानित शिक्षकगण मेरे साथियों।

★हर साल भारत में शिक्षक दिवस 5 सितंबर को मनाया जाता है।

★विश्व स्तर पर शिक्षक दिवस 5 अक्टूबर को मनाया जाता है।

★भारत के पहले उपराष्ट्रपति और दूसरे राष्ट्रपति डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन की याद में शिक्षक दिवस मनाया जाता है।

★ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्म 5 सितंबर सन् 1888 को हुआ था।

★डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ने ही अपने जन्मदिवस पर ही शिक्षकों का सम्मान करने के लिए शिक्षक दिवस की शुरुआत की थी।

★शिक्षक दिवस शिक्षकों के आदर और सम्मान का दिन का है।

★इस दिन को सभी छात्र अपने गुरुओं को सम्मान देकर और तोहफे देकर मनाते हैं।

★शिक्षक दिवस हमारे जीवन में शिक्षकों के महत्त्व को बताता है।

★शिक्षक ही अपने छात्रों को शिक्षा और ज्ञान देता है।

★सभी शिक्षकों को मेरी तरफ से शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

  ═••═

No comments:

Post a Comment