"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सूत्रसंचालन कार्यक्रमाचे...

     

 कर्तव्यदक्ष ,आपल्या कार्याने समाजात आपली अमिट छाप निर्माण करणारे कर्तबगार आदरणीय श्री ………. हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनती करतो.

★प्रमुख पाहुणे कार्यकुशल,  मा. श्री ………. हे व्यासपीठावर त्यांचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनती करतो.

★आजचे आदरणीय सत्कार मूर्ती श्री ……………….व्यासपीठावर त्यांचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

★मित्रांनो, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्याकडे आलेल्या अतिथींचे यथोचित स्वागत व सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे. यानंतर आपण माननीय अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा परिचय करून घेऊयात.

★आदरणीय श्री…….. यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे तरी सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायच आहे.

★ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी.....  अशा कर्तुत्ववान व्यक्तींकडून आपल्याला बरेच काही शिकायला मिळत असते. त्यांचे विचार हे यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरत असतात. तेव्हा आजच्या या ....... प्रसंगी मी मा. श्री. ....... यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे.

~~●~~●●~~●~~

❂ दीपप्रज्वलन 
ज्योत तेवते समतेची
ज्योत तेवते त्यागाची
ज्योत तेवते क्रांतीची अन् समर्पणाची
या ज्योतीने एकच संदेश दिला आहे..
स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठी जगून पाहावं..

आणि म्हणूनच या दिपाला म्हणजे दिव्याला साक्षी ठेवूनच आपण कार्यक्रम साजरा करत असतो..
म्हणून मी विनंती करतो, की ......... नी दीपप्रज्वलन करावे..
★आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो कि त्यांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करावे.

★ दीपप्रज्वलन- मित्रांनो, भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने केली जाते. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की, त्यांनी दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करावे.
~~●~~●●~~●~~
          ■ प्रास्ताविक ■
गुरूजनांचा आशीर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान...

जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून...
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून...!!
~~●~~●●~~●~~
या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा...
उजेडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा...!!        

 "विद्येअंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय ॥
शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवनजय करावया ॥

धूप मे निकलो
घटाओं मे नहाकर देखो,
जिंदगी क्या चीज़ है
किताबोंको हटा कर देखो,
सिर्फ आँखोसे ही जिंदगी
देखी नही जा सकती,
दिल की धडकन को भी,
नजर बनाकर देखो......॥
~~●~~●●~~●~~
🟣🔵
         ■ मार्गदर्शन ■
तेज तुमचे आहे सूर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----

ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा

बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन
~~●~~●●~~●~~



       बाल मेळाव्यासाठी चारोळ्या     

~~●~~●●~~●~~
          ■ आभार ■
कार्यक्रम झाला बहारदार
भाषणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार

★आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत. या समारंभप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर आपला अमूल्य असा वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित राहिले आहेत. त्यांनी आपल्याला अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी मी ........ यांना निमंत्रित करतो.


प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.

थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

वसंतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार...

~~●~~●●~~●~~

       ■ सत्कारासाठी चारोळ्या ■
शाल श्रीफळ देतांना ह्या चारोळ्या वापरू शकता

सप्त रंग ,सप्त सूर एकवटले
रसिक जनांचे बेटच तयार झाले
आम्ही कार्यक्रमाचे गालिचे विणले,
मान्यवरांना मखमली रंगमंचावर बसविले.
ऐट रूबाबदार मानाचे फेटे आता चढविले..

ऐसा सुंदर माणुसकी झरा वाहवा मनामध्ये
श्रीफळ फेटा स्विकारून मान्यवरांचा उत्कर्ष व्हावा जगामध्ये...

श्रोत्यांमध्ये पाहते ईश्वर
मानते त्यांना प्रतिपरमेश्वर
कार्य ज्यांनी केले अपार
तेव्हा केलाच पाहिजे त्यांचा सत्कार

सत्कार आपला करण्यास
हर्ष मज वाटतो ।
आनंदित झाल्या दाही दिशा
ह्दयी स्नेह दाटतो ।

श्रीफाळ आणि पुष्प देऊनी
सन्मान आपुला केला ।
आपल्या येण्याने
हर्ष मनी झाला ।

 सन्मानाचा तुरा आज
शिरपेचात तुमच्या
आदरभावाची शाल पांघरतो
जो मनात आहे आमच्या

आज इथल्या थोरवीला किर्तीचा हा गंध आला...
पावलानी आपुल्या सारा आसमंत दुमदुमला...!!

श्रीफळ  सन्मानाचा
आपण स्विकारावा ।
आपल्या किर्तिचा ध्वज
आसमंती दरवळावा ।

 पग पग सुनहरे फूल खिले ,
कभी ना हो काटोंका सामना 
जिन्दगी आपकी खुशीसे भरी रहे ,
यही है हमारी मनोकामना ।

 येथेच जुुळूनी येती
आपल्या भेटीगाठी
ज्यांच्या त्यांनी बांधून घ्याव्यात
येथेच आपल्या रेशीम गाठी.....

म्हणूनच रेशमाने विणलेली शाल व श्रीफळ देऊन तसेच फेटा बांधून............ यांचे स्वागत करण्यात येत आहे.

रानोराणी पावसाने हर्षली सर्व धरती
आहात आपण सर्वजन सत्कारमुर्ती
शाल श्रीफळाचा स्वीकार करावा
हीच तुम्हास माझी विनंती..
~~●~~●●~~●~~
       ■ शिक्षकांचा गौरव ■
          ज्ञान वारसा घेऊन,
        घडवू बालकांचे जीवन..
         कर्तुत्वाला जगी मान,
        होई गुणवंतांचा सन्मान!!

   आदर्श व उपक्रमशील शिक्षकांचा गौरव करण्याची संधी आम्हांला लाभली हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

       *'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र'* अंतर्गत विद्यार्थी विकासाचं नि विद्यार्थी गुणवत्तेचं एक नवं पर्व निर्माण करणाऱ्या, आपला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, त्यासाठी तो शाळेत टिकला पाहिजे, त्यासाठी जीवापाड प्रयत्न करणाऱ्या, विद्यार्थी अभिव्यक्तीच्या हजारो वाटा तयार करणाऱ्या, आपल्या या लेकरांना शिक्षणाबरोबरच सुरक्षितता व प्रगाढ प्रेमही देणाऱ्या, प्रत्येक मुल समजून घेऊन, त्याचं शिक्षणं अधिक अर्थपूर्ण करण्याच्या संकल्पाचं एक नवं बीज..आपल्या मना-मनात रोवणाऱ्या, शैक्षणिक गुणवत्तेचा एक नवा मानदंड निर्माण करणाऱ्या,
शैक्षणिक गुणवत्तेची समृद्ध आणि संपन्न परंपरा शाळा-शाळांतून निर्माण करणाऱ्या सर्व पुरस्करप्राप्त गुरुमाऊलींचे हार्दिक अभिनंदन!!
~~●~~●●~~●~~

🎯क्रीडास्पर्धेत मशाल प्रज्ज्वलित करतांना---


🎤1)सा-या जगतात विराजमान
असे क्रीडाक्षेत्र करुया विशाल
आरंभ करुनी जागवुया चेतना
पेटवुनी तेजोमय ही क्रीडामशाल

🎤2)ज्ञानाची पराजुन तलवार
सोबत घ्या क्रीडेची ढाल
जाऊ साता समुद्रापार
सन्मानाने पेटवु क्रीडामशाल 

      श्रीफळ, फेटा, शाल व पुष्पहार सत्कार   

 रेशमाने विणलेली शाल व श्रीफळ देऊन तसेच फेटा बांधून.....  यांचे स्वागत करण्यात येत आहे.

रानोराणी पावसाने हर्षली सर्व धरती
आहात आपण सर्वजन सत्कारमुर्ती
शाल श्रीफळाचा स्वीकार करावा
हीच तुम्हास माझी विनंती.

श्रीफळ आणि पुष्प देऊनी
सन्मान आपुला केला ।
आपल्या येण्याने
हर्ष मनी झाला ।

सत्कार आपला करण्यास
हर्ष मज वाटतो ।
आनंदीत झाल्या दाही दिशा
ह्दयी स्नेह दाटतो ।

सन्मानाचा तुरा आज
शिरपेचात तुमच्या
आदरभावाची शाल पांघरतो
जो मनात आहे आमच्या

किर्तीची ही शाल
आपण अंगी ओढावी ।
महती आपली अभिमाननने
आम्ही जगास सांगावी ।

फेटा बांधूनी एकतेचा
व्यासपीठावर आलात ।
मानवतेच्या धर्माचा
केंद्रबिंदु झालात ।

श्रीफळ  सन्मानाचा
आपण स्विकारावा ।
आपल्या किर्तिचा ध्वज
आसमंती दरवळावा ।

येथेच जुुळूनी येती
आपल्या भेटीगाठी
ज्यांच्या त्यांनी बांधून घ्याव्यात
येथेच आपल्या रेशीम गाठी.
~~●~~●●~~●~~
  उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत नेहमी नवी दिशा असावी ।
घरट्याचे काय कधीही बांधता येईल,
क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।
 चाँद तारोंसे चलना है आगे...
आसमानोंसे बढना है आगे..।
जीवन की राहपर तुम्हारे रुप मे ,
हर पल एक नया सवेरा जागे..।

   हर कामयाबी पे आपका नाम होगा ,
आपके हर कदम पे दुनिया का सलाम होगा ।
मुश्किलोंका सामना हिम्मतसे करना,
दुआ है , एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा ।

    मंजिल इन्सानके हौसले आजमाती है ,
सपनोंके परदे आखोंसे हटाती है ।
किसी भी बातसे हिम्मत ना हारना ,
ठोकर ही इन्सानको चलना सिखाती है ।

   पग पग सुनहरे फूल खिले ,
कभी ना हो काटोंका सामना ।
जिन्दगी आपकी खुशीसे भरी रहे ,
यही है हमारी मनोकामना ।
~~●~~●●~~●~~

     ■ सांस्कृतिक कार्यक्रम ■

            विद्यार्थीसाठी-....

मला वाटते,वेली वरले
व्हावे सुंदर फुल,
कलागुणांचे रंग उधळीत,
ज्याला त्याला पाडावी मी भुल.

जीवनाचे रंग बालपनीच असतात उधळायचे,
चिंता नाही काळजी, दिन हेचि बहरायचे.

साकारावे भाव फुलोऱ्यानी पानावर सुरूवातीला,
लकेरी आनंदाच्या येथेच अनुभवाला,
उमाळे, उसासे अन प्रेमाची या पानावरती गाणी,
आम्हा विद्यार्थी जगताची सापडावी येथेच तराणी.
~~●~~●●~~●~~
🎤बक्षिस वितरणात उपयुक्त चारोळ्या

मिळववलेत यश
बक्षिसास पात्र ।
कौतुक होई पहा
तुमचे सर्वत्र ।।

हे बक्षिस आहे
तुमच्या गुणवत्तेचे ।
मेहनत आणि जिद्द
तुमच्यातील हुशारीचे ।।

बक्षिस मिळवलेत
शाळेचा मान वाढला ।
आपल्या कलगुणांनी
शाळेचा परिसर बहरला ।।
~~●~~●●~~●~~
★ कार्यक्रम पत्रिका :-
आगतम् स्वागतम् सुस्वागतम्
1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण
2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार
3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.
4) स्वागतगीत
5) प्रास्ताविक
6) पाहुण्यांचा परिचय
7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी
8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.
9) अध्यक्षीय समारोप
10) आभार
11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी
~~●~~●●~~●~~
★ सूत्रसंचालकाचे काही गुण :-
@ भाषाप्रभुत्व
@ नीटनेटकेपणा
@ संवेदनशिलता
@ सभाधीटपणा
@ हजरजबाबीपणा
@ सौजन्यशिलता
@ सुक्ष्मावलोकन क्षमता
@ आंगिक हुशारी
@ चाणाक्षपणा
@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
@ भावनिक सक्षमता
~~●~~●●~~●~~
★ सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-
1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार  प्रदर्शन कोण करेल?
~~●~~●●~~●~~


2 comments: