"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शालेय इंग्रजी नवोपक्रम मालिका


   सौ. अलकाताई राकेश फुलझेले  
उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   

सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी  उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... आजच्या संगणक युगात इंग्रजी माध्यमातून बरेचशे व्यवहार होत आहे. इंग्रजी विषयाचा पाया भक्कम व मजबूत असेल तरच आपला विद्यार्थी स्पर्धायुगात टिकाव धरू शकेल त्यासाठी मेजवानी इंग्रजी नवोपक्रम मालिका सुरू केली. 
 ~~●~~~~~~~~●~~

         🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
       ♻HIDE & SEEK♻
                  ═••═━  
   👉 इयत्ता —  तिसरी व चौथी*
   👉 साहित्य —👇
बॅट बाॅल बाॅक्स खडू डस्टर टोपी भोवरा बाॅटल पाॅट बुक पेन पेन्सिल मोबाईल फुल द्राक्ष सफरचंद केळ स्केल संञ वाटी प्लेट घड्याळ रिबन.........
  👉 कृतीची कार्यवाही—
🔹या खेळासाठी विद्यार्थ्यांच्या परिचयाच्या वस्तू टेबलावर ठेवा.
🔸 वरील साहित्यातील सर्व वस्तू टेबलावर ठेवा.
🔹सर्व विद्यार्थ्यांना खेळाचे नियम समजावून सांगा.
🔸एक एक विद्यार्थ्याला जवळ बोलावून थोडा वेळ वस्तू दाखवा व वस्तू कपड्याने झाकूण ठेवा.
🔹दाखविलेल्या वस्तूंची नावे इंग्रजीतून सांगण्याची सूचना करा.
🔸विद्यार्थी वस्तूचे इंग्रजी नाव आठवून सांगतील.
🔹विद्यार्थ्यांना सर्व वस्तूंची नावे आठवून इंग्रजीतून लिहायला सांगा.
🔸सर्व वस्तूंची नावे अचूक लिहिणार्‍या विद्यार्थ्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन करा.👏

        👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 स्मरणशक्ती वाढविणे.
🎯 बुद्धीला चालना मिळते.
🎯 इंग्रजी शब्दसंपत्ती विकसित करणे.
🎯 आत्मविश्वास वाढविणे.
🎯 इंग्रजी विषयाची आवड निर्माण करणे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                ~~●~~~~~~~~●~~
         🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
         💠 WHAT IS IT ? 💠  ओळखा पाहू ?
               ═••═━  
     👉 इयत्ता— तिसरी व चौथी
     👉 शैक्षणिक साहित्य — विविध चिञकार्ड
(मराठी साहित्य पेटीत 100 चिञकार्ड आहेत त्याचा वापर करावा.चिञकार्ड क्रमांक 11 / 01 ते 11 /100 )
       👉 कृती—
🔹प्रथम वर्गाचे दोन गट पाडा.
🔸फळ्यावर गुणांची चौकट आखून घ्यावी.
🔹दोन्ही गटाला 20 — 20 चिञकार्डे द्यावी.
🔸पहिल्या गटातील विद्यार्थी दुसर्‍या गटातील विद्यार्थ्यांना एक चिञकार्ड दाखवून *What is it ?* असे विचारतील.
🔹दुसर्‍या गटातील विद्यार्थ्यांनी त्या चिञाचे नाव योग्य उच्चारांसहित सांगितले तरच 2 गुण द्यावे.
🔸दुसर्‍या गटातील विद्यार्थी पहिल्या गटातील विद्यार्थ्यांना एक चिञकार्ड दाखवून What is it ? असे विचारतील.
🔹पहिल्या गटातील विद्यार्थ्यांनी त्या चिञाचे नाव योग्य उच्चारासहित सांगितले तरच 2 गुण द्यावे.
🔸गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला संधी द्यावी.
🔹अशाप्रकारे ज्या गटाचे गुण जास्त होतील तो गट विजयी घोषित करावा.
🔸विजयी गटाचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏


       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯इंग्रजी शब्दसंप्पती वाढविणे.
🎯खेळाद्वारे इंग्रजी स्पेलींग लवकर पाठ होतात.
🎯इंग्रजी स्पेलींग उच्चारात सुधारणा होते.
🎯खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण होते.
🎯इंग्रजी विषयाची आवड निर्माण करणे.
🎯विद्यार्थ्यांना इंग्रजीचे हसत खेळत शिक्षण दिल्यामुळे इंग्रजी विषयाची भीती दूर होते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                 ~~●~~~~~~~~●~~





▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
 
    💠  जोडध्वनी शब्दखेळ..💠 Similar sound word game...💠
                 ═••═━  
     👉कृतीची कार्यवाही —
🔹वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करावे.
🔸 गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹फळ्यावर गुणांची चौकट आखावी.
🔸प्रथम खेळ कसा खेळावा हे समजावून सांगावे.
🔹नाणेफेक करून खेळाची सुरूवात करावी.
🔸नाणेफेक जिंकलेल्या  गटाने एक शब्द सांगावा.उदा. Bat दुसर्‍या गटाने समान ध्वनीने सुरू होणारा शब्द सांगावा.
🦋 उदा..1)Bat — Bad 2) Mat — Mad 3) Sat — Sad 4) Pack — Pad  5) Back — Bad 6) Mat — Man 7) Cat — Cap 8) Top — Toy 9) Fan — Fat 10) Got — God 11) Rat — Ramp 12) Pin — Pink....etc
🔸शिक्षक फळ्यावर शब्दांचे लेखन करतील.
🔹ज्या गटाला समान ध्वनीने सुरू होणारा शब्द सांगता न आल्यास किंवा चुकीचा शब्द सांगितल्यास गुणांच्या चौकटीत 0 लिहून दुसर्‍या गटाला संधी द्यावी.
🔸ज्या गटाचे जास्त गुण होतील तो गट विजयी घोषीत करावा.
🔹विजयी गटाचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏


        👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯शब्दातील ध्वनी लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लागते.
🎯योग्य उच्चार करण्याची सवय लागते.
🎯समान ध्वनीपासून शब्द सांगता येतात.
🎯इंग्रजी श्रवण भाषण कौशल्यांचा विकास होतो.
🎯 इंग्रजी शब्दसंग्रह वाढतो.
🎯 खेळामुळे चुरस निर्माण होते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
              ~~●~~~~~~~~●~~
         🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
    💠  प्रश्नमंजुषा.....  QUIZ COMPEPITION  💠
           ═••═━  
  🦋 मेजवानी इंग्रजी नवोपक्रमा अंतर्गत...उपक्रम मालिका Activity — 4
   👉 इयत्ता — चौथी व पाचवी
   👉 साहित्य —
विविध चिञकार्ड ,  Alphabets चिठ्ठ्या
( मराठी साहित्य पेटीत 100 चिञकार्ड आहेत त्याचा वापर करावा. साहित्य क्रमांक 11 / 01 ते 11 / 100 )
    👉 कृतीची कार्यवाही—
🔹वर्गातील मुलांचे तीन गट करावे.
🔸प्रत्येक गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹गटाला SUN 🌞 MOON 🌙STAR 🌟अशी नावे द्यावी.
🔸या खेळाच्या स्पर्धेमध्ये एकून पाच फेर्‍या घेऊन प्रत्येक फेरीमध्ये गटाला एक एक प्रश्न विचारला.
🔹प्रत्येक फेरीला पाच गु ठेवले.
🔸उदा. SUN या गटाला उत्तर न आल्यास MOON गटाने उत्तर द्यावे तो गुण MOON या गटाला मिळेल.
🔹फळ्यावर गुणफलक आखले.
🔸खेळाचे नियम सर्वांना समजावून दिले.

🦋 पहिली फेरी — Alphabets च्या चिठ्ठ्या प्रत्येक गटाला उचलण्यास सांगून त्या अक्षरापासून शब्द तयार करा.उदा.b—bat , c— cup.....
🦋 दुसरी फेरी —प्रत्येक रंगाची कार्ड उचलण्यास सांगीतले.प्रत्येक गटाला प्रश्न विचारला. *What colour is it ?*
🦋तिसरी फेरी — *Join the letter* यासाठी फळ्यावर प्रत्येक गटासाठी वेगवेगळे शब्द देऊन शब्दातील सारखे अक्षर जोडण्यास सांगितले.उदा. Top , Grapes , Pen....
🦋 चौथी फेरी — *Listen &  Act* प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना एक एक सूचना दिली.उदा. Stand up , Sit down , Close your eyes , Bend down , Hands up.....etc
🦋 पाचवी फेरी — *What is this ?* प्राणी व फळांची पाच पाच चिञकार्ड  प्रत्येक गटाला दाखवली.प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला.
🔹याप्रमाणे प्रश्नमंजुषा हा खेळ घेऊन विजयी गटाचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.👏👏

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण देणे.
🎯 इंग्रजी श्रवण भाषण कौशल्यांचा विकास साधणे.
🎯 पूर्वज्ञानाचे दृढीकरण झाले.
🎯 विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा आला.
🎯 स्पर्धेमध्ये आवडीने सहभागी झाले.
🎯 विद्यार्थी न घाबरता न लाजता शिक्षकांशी संवाद साधू लागले.
🎯 इंग्रजी विषयाची भीती दूर करून इंग्रजी विषयाची गोडी निर्माण झाली.

      ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
            ~~●~~~~~~~~●~~
         🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
            चला यमक शब्दांची महाबॅंक बनवूया..!!! 
                      Rhyming words Mahabank..!!
                      ═••═━  
मेजवानी इंग्रजी नवोपक्रम अंतर्गत.... ( Activity — 5 )
     👉 इयत्ता — चौथी व पाचवी
     👉 साहित्य — वही, पेन📋
    👉 कृतीची कार्यवाही —
🔹पाच पाच विद्यार्थ्यांचे गट करावे.
🔸हुशार विद्यार्थी प्रत्येक गटाचा गटप्रमुख म्हणून नेमावा.
🔹उपक्रमाचा उद्देश व नियम समजावून सांगणे.
🔸गटचर्चा करून जास्तीत जास्त यमक जुळणार्‍या शब्दांच्या जोड्या लिहायला सांगणे.
🔹30 मिनिटांचा कालावधी द्यावा.
🔸30 मिनिटात सर्वात जास्त व अचूक Rhyming words ज्या गटाच्या बॅंकेत जमा होतील तो गट विजयी घोषित करावा.
🔹ज्या गटाचे सर्वात जास्त rhyming words लिहून होतील त्या गटाला महाबॅंक नाव देऊन टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.👏\


       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 शब्दसंपत्ती विकसित करणे.
🎯 योग्य उच्चार करण्याची सवय लागते.
🎯 उच्चारात सुधारणा होते.
🎯 पूर्वज्ञानाचे दृढीकरण होते.
🎯 अबोल विद्यार्थी गटचर्चेत सहभागी होतो.
🎯 लेखन कौशल्याचा विकास होतो.
       ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
           ~~●~~~~~~~~●~~
         🔘 उपक्रमाचे नाव 🔘  
 💠 हसत खेळत इंग्रजी बोलू या....!!!💠  Let us speak English...!!
           ═••═━  
🦋मेजवानी इंग्रजी नवोपक्रम मालिका अंतर्गत...Activity — 6
    👉 इयत्ता — चौथी
    👉 कृतीची कार्यवाही —
🔹सोपे सोपे संभाषण चिञाच्या आधारे प्रथम समजावून सांगीतले.
🔸संभाषण स्वत: प्रत्यक्ष सादर केले.
🔹नंतर मुलांच्या जोड्या करून भरपूर सराव घेतला.
🔸सुरूवातीला सोप्या संवादाचा भरपूर सराव घेतला.
*🔹For Example..
1 ) Harsha , tell me your sarname ?
My sarname is gholap.
are you happy ?
yes i am happy !

2 ) give me your pencil please ?
Here it is !
Thank you.
Welcome.
🔹ज्या जोडीचे संभाषण सादरीकरण छान ती जोडी इंग्रजी अभ्यासमंञी म्हणून घोषीत करावे.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯संभाषण कौशल्यांचा विकास होतो.
🎯विद्यार्थी आवडीने संभाषण साधू लागली.
🎯विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा आला.
🎯 विद्यार्थी उत्साहाने इंग्रजी विषयात रमू लागली.
🎯 हसत खेळत इंग्रजी शिक्षण घेत असल्यामुळे इंग्रजी विषयाची भीती दूर झाली.
       ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
            ~~●~~~~~~~~●~~    

         
 आणखी इंग्रजी नवोपक्रम  वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 ⏪⏪
 01 02

⏩⏩
~~●~~~~~~~~●~~

No comments:

Post a Comment