"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

राजमाता जिजाऊ


 
हिंदवी स्वराज्य प्रेरिका,राजमाता ,जिजाऊ साहेब  यांच्या जन्मोत्सवा निमित्त व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त  विनम्र अभिवादन....

   12 जानेवारी हा दिवस अख्ख्या महाराष्ट्राला लाभलेला सोनेरी दिवस आहे.या दिवशी राजमाता जिजाऊ यांची जयंती ,राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना व त्यांच्या कार्याला अभिवादन केले जाते.

    ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ

   जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभूछावा....!
    जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा.....!
   जिजाऊ तुम्ही नसता तर, नुसते लढले मावळे.....!
   जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे.....!

माँसाहेब राजमाता जिजाऊंना माझे शतशः नमन...!!
   19 फेब्रुवारी 1630 रोजी  माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी पराक्रमी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.आपल्या पतीचं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पुत्र शिवबाच्या मनात पेरलं. नुसतं पेरलं नाही तर सुसंस्कारांच्या अमृतसिंचनाने ते फुलवलं. फुलवून वाढवलं. त्याला दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीवापाड जपलं. त्याला नवनवी पानं फुलं दिली.

   राजमाता जिजाऊसाहेब यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवराय यांना ज्ञानाच्या दुर्य चरित्र संघटना व पराक्रम अशा राजास व सद्गुणाचे बाळकडू पाजले.प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे अशी राजमाता ने शिकवण शिवरायांना दिली होती.

    राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं, जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं.
   राजमाता जिजाऊंच्या  शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजार वर्षाचे गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून हिंदवी  स्वराज्याची स्थापना केली.
 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

 *❒ राजमाता जिजाऊ ❒*
मुजरा माझा त्या माँ जिजाऊला 
घडविले तिने त्या शूर शिवबाला ! ! 

साक्षात होती ती आई भवानी 
जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी ! ! 

मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा 
तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा ! ! 

सांभाळीले तिने सर्वांना प्रेमाने 
घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने! ! 

तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म 
सर्व धर्म समभाव हे एकच तीचे कर्म ! ! 

तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा 
धन्य धन्य जिजाऊ माता 
धन्य धन्य शिवाजी राजा ! ! 

छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या आदर्श राजमाता तसेच महान अशी मातृशक्ती...  
राजकीय राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त शतशः अभिवादन..!!!


!! जय जिजाऊ जय शिवराय !!        

🚩🚩राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त  शुभेच्छा 🚩◢◢◣◢◣ ❁❁❁◢◣◢◣◢
     🚩🚩 जय जिजाऊ🚩🚩
     🚩🚩जय शिवराय 🚩🚩

◢◣◢◣◢  ❁❁❁  ◣◢◣◢◣


●पूर्ण नाव :~ जिजाबाई शहाजीराजे भोसले
●जन्म :~ १२ जानेवारी १५९८, सिंदखेडराजा,बुलढाणा.
●मृत्यू :~ १७ जून १६७४, पाचाड, रायगडचा पायथा
●वडील :~ लखुजीराव जाधव
●आई :~ म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
●पती :~ शहाजीराजे भोसले


       ◆ जिजाबाई शहाजी भोसले◆
    सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई.  जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

        💎 राजमाता जिजाऊ 💎
■ राजमाता जिजाऊ यांचे अनमोल विचार,   सूत्रसंचालन,  मराठी, हिन्दी व इंग्रजी विद्यार्थी भाषने, व सर्व Pdf माहिती करिता.... 🔗🔗👇CLICK 👇🔗🔗

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
    ◆भोसले व जाधवांचे वैर
      पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली. पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ.

     दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले.
हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.
हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.

     या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.
नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
       ◆ जिजाबाईंची अपत्ये
    जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले.
त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला.

      १९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वैद्य तृतीया सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.

■राजांचे संगोपन आणि कुशल कारभार

    शिवाजी १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.
कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले.
       निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत  नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले.
    शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईम्नी नुसत्याच्गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले .

     शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.

      शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

     राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता.
या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या.
     एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

    शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धाप
काळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

   जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.
●~~●~~●~~◆~~●~~●~~
◆ राजमाता जिजाबाई ◆

राजमाता जिजाबाई
खाण होती सगुणांची
तिने शिकविले शिवा
आणबाण  ही मातीची

केला उध्दार मोठाच
दोन्ही कुळे उध्दारली
लाज शहाजी कुंकाची
मानानेच तू राखिली

राजनीती  तुझ्यातली
दिली शिवबांना दान
एक मावळा केलास
माय मराठीची शान

दादोजींची निवडही
किती केली सफाईने
पैलू सहज पाडिले
धडे घेतले शिस्तीने

साथ दिली शहाजींना
गाजे रणी पराक्रम
देखरेख कारभारी
नीट बसवला जम

तुझ्या संस्काराचा डंका
वाजतोहे  चोहीकडे
पुन्हा एकदा वाजू दे
स्त्रीजन्माचे हे चौघडे

दूरदृष्टी तुझी खरी
उभा असा महाराष्ट्र
पेरलेस काळजात
स्वातंत्र्याचे ते उदिष्ट

प्रा. कल्पना निंबोकार अंबुलकर    ●~~●~~●~~◆~~●~~●~~●


5 comments: