"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

स्वातंत्र्य दिन मराठी भाषणे




 हिंदी /इंग्रजी/ मराठी स्वातंत्र्य दिन भाषणे...

                         ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -1       

                    ═••═

आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या आजच्या स्वातंत्र्य दिन कार्यकमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण, पूजनिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो…

देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य क्रांतिकारक समाज सुधारक इंग्रजांच्या  धोरणा विरोधात असंख्य आंदोलने केले.

लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेत स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला. आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.

टिळक यांच्यां नंतर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी मिळवण्याचा सत्याग्रह करून स्वातंत्र्यलढा च्या नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, याप्रमाणे अनेक लढे व सत्याग्रह केले.

त्याचप्रमाणे भगतसिंग राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आजाद अशा कित्येक स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांनी त्यांच्यासोबत  देशातील असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राण पणाला लावले. तेव्हा भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले.

दे सलामी इस तिरंगे को....
जिससे तेरी शान है
सिर हमेशा ऊँचा रखना इसका...
जब तक दिल में जान हैं...!!

सर्व देशवासियांना  स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
🌻वंदे मातरम्🌻

            ❂~~●~~~~~~~~●~~
                      👇👇CLICK HEAR 👇👇
 

                         ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -2        

                         ═••═

      सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन, वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, उपस्थित सर्व माझ्या देश बांधवांनो.15ऑगस्ट 1947 हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.

   15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे दीडशे  वर्षे होता. इंग्रजांच्या दिलेल्या असमानतेचा वागणुकीचा, भेदभाव आणि सक्तीचे नियम यांच्यामुळे अनेक शूर वीर स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण भावना निर्माण होऊ लागली व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे वाटू लागले.

याच कारणांमुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व  समाज सुधारक विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे देऊ लागले. यामध्ये मोलाचे कार्य लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आजाद अशा कित्येक स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांनी त्यांच्यासोबत  देशातील असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राण पणाला लावले. तेव्हा भारत मातेला स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट पाहायला मिळाली.

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -3       

                    ═••═

    आजच्या या मंगलमय पावन स्वातंत्र्य दिन कार्यकमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण, पूजनिय गुरुजन वर्ग आणि मित्र मैत्रिणींनो … भारताला स्वातंत्र्य मिळून आज 76 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि या वर्षी आज आपण 77 वा गणराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र दिवस साजरा करीत आहोत.

    आज भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखला जातो.भारत हा आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.स्वातंत्र्यानंतर आपल्या आपल्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानात आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे.

     परंतु असे असले तरी देशामध्ये अनेक समस्या आज आपल्याला दिसत आहे त्यामध्ये गरीबी, असमानता, भ्रष्टाचार,दंगली, स्रिया वरील होणारे अत्याचर आजही आपल्या देशामध्ये दिसून येत आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशांमधील युवा हा सोशल मीडिया, मोबाइल च्या गुलामगिरीत अडकत चाललेला आहे. यावर उपाय म्हणजे एकच देशातील सर्व नागरिकांनी जागे होऊन, या सर्व समस्यांवर मात केला पाहिजे.



                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -4        

                    ═••═

     सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन, वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, उपस्थित सर्व माझ्या देश बांधवांनो... 15 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.

    आपण भारत या देशाचे नागरिक या नात्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून , ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे.

     

                   ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -5       

                    ═••═

निळ्या शार यां नभा मध्ये..

तिरंगा माझा दिमाखात डोलतो आहे..!

सांगण्यास तयाची थोरवी..

मी आज गर्वाने बोलतो आहे...!!

      आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यकमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण, पूजनिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो… भगतसिंग राजगुरू सुखदेव बटुकेश्वर दत्त  यासारखे अनेक युवा क्रांतिकारकांनी सशस्त्र हल्ले घडवून आणले.

     भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी  इंग्रज अधिकाऱ्याच्या हत्येचा कट केल्यामुळे भगतसिंग राजगुरू सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना लाहोर येथे फाशी देण्यात आली. त्यानंतर काकोरी कट, मीरत कट,चितगाव कट असे अनेक क्रांतिकारी लढे हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाले. 1942 पासून चले जाव आंदोलन म्हणजे छोडो बांधव आंदोलन सुरू झाले. यावेळी  स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी अधिक प्रखर प्रयत्न केला. आठ ऑगस्ट रोजी गांधींजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा हा संदेश दिला याशिवाय ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले . आणि नेताजी सुभाषचंद्र  बोस भारतीय ना तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे आव्हान केले. शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही रम्य पहाट उगवली आणि दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत च्या शृंखलेत जखडलेला भारत स्वतंत्र झाला.दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून तेथे भारतातील तिरंगा फडकवण्यात आला.

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -6       

                    ═••═

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते.

सूर्य तळपतो प्रगतीचा.

भारत भूमीच्या पराक्रमाला

मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा.

     सन्माननीय  व्यासपीठ आदरणीय वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या भावी शिलेदार यांना माझा नमस्कार  आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा दिवस.

आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि  मानाचा दिवस आहे.अशा या क्रांतिकारी शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक खूप खूप  हार्दिक शुभेच्छा.

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -7       

                    ═••═

    आजचा दिवस मांगल्याचा! आजचा दिवस भारतीय गणराज्याचा। आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा। माझा- तुमचा सगळ्यांचा…आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यकमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण, पूजनिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो…

       अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व वीरांना, महापूरुषांना वंदन मी करतो… वंदन करुनी माझ्या प्राणप्रिय भारतमातेला, मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो…

   भारतीय जनता, थोरपुरुष, क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता, त्यामुळे समस्त भारतीयांकरिता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असाच दिवस आहे.



                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -8       

                    ═••═

     सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन, वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, उपस्थित सर्व माझ्या देश बांधवांनो... आजचा दिवस मांगल्याचा! आजचा दिवस भारतीय गणराज्याचा। आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा। माझा- तुमचा सगळ्यांचा…

   भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण होत असताना देशातील प्रत्येक नागरिक समान आहे. प्रत्येक नागरिकांनी आपापसातील वैर सोडून प्रत्येक भारतीय देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. व जगामध्ये देश महासत्ता म्हणून उदयास येईल.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत.

  ❂~~●~~~~~~~~●~~
                      👇👇CLICK HEAR 👇👇

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -9       

                    ═••═

   सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन, वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, उपस्थित सर्व माझ्या देश बांधवांनो. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.

    देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्यापैकी  सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, मंगल पांडे,  लाला लजपत राय आणि खुदी राम बोस इत्यादी

   महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी सत्याग्रह चळवळ सुरू केली आणि त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. पण त्यांनी हार मानली नाही,

आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत स्वतंत्रभूमीत आपला जन्म झालाय म्हणून आपणाला स्वातंत्र्याची किंमत कळत नाही किंवा आपण या गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाहत नाही.

    आपला भारत देश गाव तालुका जिल्हे आणि राज्य सर्व मिळून बनलेला आहे. आपला जिल्हा आपले गाव स्वच्छ असेल तर आपला भारत सुद्धा स्वच्छ ठेवण्यास आपली मदत होईल आपण काय करतो सकाळी रस्त्यावर संडास करतो कशी स्वच्छता येईल आपल्या गावात... स्वच्छता नसल्यामुळे विविध आजार आपल्या गावात शिरकाव करत आहेत.

    आपल्या घरातील परिसर जसा आपण स्वच्छ ठेवतो तसाच बाहेरचा परिसर सुद्धा आपण स्वच्छ ठेवला पाहिजे.निसर्ग कोपल्याप्रमाणे आज पाऊस ऊन दरवर्षी आपल्याला दिसत आहे. याचे कारण झालेली वृक्षतोडआज प्रत्येकाने एक झाड आपल्या शेतात आपल्या घरी कुठेही लावले तरी निसर्ग रक्षणाला मदत होईल. खऱ्या अर्थाने आपल्या देशाला मदत होईल आजच्या स्वातंत्र्यदिनी आपण सर्वजण एक शपथ घेऊ.. आपला भारत समृद्ध करण्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेल.

~●~~~~~~●~~
Pdf डाउनलोड करा प्रिंट करा व विद्यार्थ्यांना सरावासाठी देऊ शकतो.....

~●~~~~~~~~●~~

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -10       

                    ═••═

   आजच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन, वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो उपस्थित सर्व गणमान्य नागरिक देशाच्या पावन राष्ट्रध्वजाला प्रथम मी सलाम करतो.

    आपण सर्वजण 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. म्हणूनच संपूर्ण देश दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो, जो मोठ्या आनंदाने आणि देशभक्तीने साजरा केला जातो. त्यादिवशी आपण त्या महान योद्ध्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन करतो ज्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाचा विचार न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना आपले प्राण गमावले. दरवर्षी १५ ऑगस्टला प्रत्येक संस्थेत त्या शहिदांचे स्मरण करून भाषण केले जाते ज्यांनी आपले रक्त सांडले. देशासाठी, जेव्हा ब्रिटीश राजवटीच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने क्रांतिकारक मंगल पांडे यांना गोळ्या घातल्या, तेव्हापासून देशवासीयांनी इंग्रजांविरोधात आवाज उठवला. देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. 

   महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी सत्याग्रह चळवळ सुरू केली आणि त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. पण त्यांनी हार मानली नाही, देशाला इंग्रजांपासून मुक्त करणे हे त्यांचे एकच ध्येय होते. खूप संघर्षानंतर यश मिळालं आणि देश स्वतंत्र झाला.


                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -11       

                    ═••═

   आजच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन, वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो उपस्थित सर्व गणमान्य नागरिक देशाच्या पावन राष्ट्रध्वजाला प्रथम मी सलाम करतो.

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि जनतेच्या अथक परिश्रमानंतर आणि बलिदानानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला ब्रिटिशांच्या जुलमी आणि गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून आपण हा ऐतिहासिक दिवस स्वातंत्र्याचा सण म्हणून साजरा करतो. स्वातंत्र्याचा हा राष्ट्रीय सण देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. त्याचा उत्सव सर्व सरकारी, खाजगी संस्था, शाळा, कार्यालये, बाजारपेठेत पाहायला मिळतो. या दिवशी सर्वजण देशभक्तीच्या वातावरणात बुडालेले दिसतात. या देशभक्ती कार्यक्रमात मला दोन शब्द बोलणे संधी दिली फिरता आयोजकांचे खूप खूप आभार...!

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -12       

                    ═••═ 

   स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन, वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो उपस्थित सर्व गणमान्य नागरिक प्रथमता सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

   राजधानी दिल्लीत आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात. येथे हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. पंतप्रधान देशाला संदेश देतात. अनेक सभा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण हा स्वातंत्र्य दिन उत्साह मध्ये साजरा करत आहोत.

   भारत माता की जय… जय हिंद…! जय भारत...!!

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -13       

                    ═••═

   सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन, वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, उपस्थित सर्व माझ्या देश बांधवांनो.
   या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. या दिवसाची आठवण येताच शहीदांप्रती आपले मस्तक आदराने झुकते. या सैनिकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली होती. यामुळे आफण आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षम करावे हे आपले कर्तव्य आहे. देशाचे नाव जगात उंचावले पाहिजे असे आपल्याला वाटले पाहिजे. तिरंगा सलामी करून माझे दोन शब्द बंद करतो. धन्यवाद...!!

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -14       

                    ═••═

   आदरणीय प्रमुख अतिथी आदरणीय शिक्षक, उपस्थित पालक आणि माझे मित्रांनो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

   इंग्रजांचे अत्याचार आणि अमानुष प्रथांना कंटाळून भारतीय जनता एकवटली आणि त्यातून सुटका करण्याचा निर्धार केला. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतीची आग पसरवली आणि प्राणांची आहुती दिली. 1947 चा दिवस आपल्यासाठी ‘सुवर्ण दिवस’ ठरला. आपण आणि आपला देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाल्याने याची जाण प्रत्येकाला असली पाहिजे एवढे बोलून माझे दोन शब्द बंद करतो.. धन्यवाद...!!

    भारत माता की जय… जय हिंद…! जय भारत...!!

                    ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -15       

                    ═••═

    आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक, उपस्थित पालक आणि  मित्रांनो
  15 ऑगस्ट 1947  हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता. स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्वाचा त्याग करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, भारतीयांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या रूपाने आपला पहिला पंतप्रधान निवडला, ज्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील  लाल किल्ल्यावर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला. आज प्रत्येक भारतीय हा खास दिवस एखाद्या सणासारखा साजरा करतो.
भारत माता की जय… जय हिंद…! जय भारत...!!


                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -16       

                    ═••═

    आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय शिक्षकांना, पालकांना आणि प्रिय मित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा महान राष्ट्रीय सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही आज येथे जमलो आहोत. जसे आपण जाणतो की स्वातंत्र्यदिन हा आपल्या सर्वांसाठी एक शुभ प्रसंग आहे. हा दिवस सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून इतिहासात त्याचा उल्लेख कायम आहे. भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आपल्याला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.
आपल्या पूर्वजांच्या अपार कष्टाने मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू ही शपथ घेऊन माझे दोन शब्द बंद करतो. जय हिंद... जय भारत...!!

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -17       

                    ═••═

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे माननीय मुख्याध्यापक सर्व उपस्थित आदरणीय शिक्षक आणि प्रिय मित्रांनो. आज, स्वातंत्र्य दिनानिमित्त, माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे, मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगतो.

स्वातंत्र्य दिन हा एक ऐतिहासिक सण आहे, ७६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. अस्तित्व गमावलेल्या भारताला पुन्हा ओळख मिळाली. इंग्रज भारतात आले आणि त्यांनी पर्यावरणाची अत्यंत बारकाईने माहिती करून आणि परिक्षण करून, आपल्यातील दुर्बलता लक्षात घेऊन आपल्यावर हल्ला केला आणि सुमारे दोनशे वर्षे राज्य केले. आपल्या शूर योद्ध्यांनी अनेक लढाया केल्या आणि त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.

तेव्हापासून आजपर्यंत आपण दरवर्षी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करत आहोत. आपल्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते दरवर्षी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. यानंतर ते देशाला संबोधित करतात आणि त्यानंतर काही रंगारंग कार्यक्रम सादर केले जातात. दूरदूरचे लोक ते पाहण्यासाठी दिल्लीला जातात आणि ज्यांना जाता येत नाही ते त्याचे थेट प्रक्षेपण पाहतात.

अशा प्रकारे आपण आपल्या शूर सैनिकांचे स्मरण करून आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

भारत माता की जय… जय हिंद…! जय भारत...!!

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -18       

                    ═••═

    आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक, उपस्थित पालक आणि माझे वर्गमित्र मला स्वातंत्र्य दिनाच्या या शुभ मुहूर्तावर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो. तो आमचा ७७ वा स्वातंत्र्यदिन सोहळा होता. आज बरोबर ७६ वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या स्वातंत्र्यलढ्याची गाथा एका दिवसात वर्णन करता येणार नाही. स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचा आहे.

    ७६ वर्षांपूर्वी आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते, ते व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले आणि हळूहळू सर्व काही आपल्या ताब्यात घेऊन आम्हाला त्यांचे गुलाम बनवले. त्यानंतर अनेक आंदोलने आणि लढाया लढून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. आपल्या देशाच्या शूर योद्ध्यांमुळे आज आपण स्वतंत्र झालो आहोत आणि त्या लोकांना आदरांजली अर्पण करून हा दिवस साजरा करतो. स्वातंत्र्य दिन हा भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक आहे.

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -19       

                    ═••═

  उपस्थित सर्व आदरणीय मान्यवरांना विनम्र अभिवादन! आज आपण आपल्या देशाचा एक अतिशय खास दिवस आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि आनंद वाटतो तो दिवस. या दिवशी, आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर स्त्री-पुरुषांचे स्मरण करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. स्वातंत्र्यदिन हा आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. ७६ वर्षांपूर्वी याच दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. आपल्या देशासाठी आणि नागरिकांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे. आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपल्यासाठी बलिदान दिले हे लक्षात घेऊन आपला देश एक चांगला देश बनवण्याची शपथ घेतली पाहिजे.

  भारत माता की जय… जय हिंद…! जय भारत...!!

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -20       

                    ═••═

  आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक, उपस्थित पालक आणि माझे वर्गमित्र 

या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने आपण जिथे देशाच्या प्रगतीच्या नवनवीन विकास कामांची चर्चा करतो, तिथे आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या थोर पुरुषांना कधीही विसरता कामा नये. आजही त्या महान व्यक्तींचे स्मरण करून आपले डोळे ओलावतात. आजच्या नव्या भारताच्या झगमगाटात ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले त्या महान आत्म्यांना आपण कधीही विसरता कामा नये.

    आज या शुभ प्रसंगी तुम्हाला संबोधित करताना मी त्या स्वातंत्र्य सैनिक महान आत्म्यांना माझे शेकडो वंदन आणि श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे शब्द संपवतो, आजच्या प्रसंगी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्यासाठी आयोजकांचे खूप खूप आभार.

भारत माता की जय… जय हिंद…! जय भारत...!!

                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -21       

                    ═••═

निळ्या शार यां नभा मध्ये..

तिरंगा माझा दिमाखात डोलतो आहे..!

सांगण्यास तयाची थोरवी..

मी आज गर्वाने बोलतो आहे...!!

   आपण भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांनी आपल्याला शांतता आणि आनंदाची स्वतंत्र भारताची पावन भूमी दिली आहे जिथे आपण रात्री न घाबरता झोपू शकतो आणि दिवसभर आपल्या शाळेत आणि घरात आनंद घेऊ शकतो. आपला देश तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा, वित्त आणि इतर अनेक क्षेत्रात झपाट्याने विकसित होत आहे जे स्वातंत्र्याशिवाय शक्य झाले नसते. भारत हा अणुऊर्जेने समृद्ध देशांपैकी एक आहे. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ यांसारख्या खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्हाला आमचे सरकार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि आम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा वापर करत आहोत. होय, आपण स्वतंत्र आहोत आणि आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तथापि आपण आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांपासून स्वतःला मुक्त समजू नये. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सदैव तयार असले पाहिजे

भारत माता की जय… जय हिंद…! जय भारत...!!



                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -22       

                    ═••═

       स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर माझे सर्व गुरुजन व विद्यार्थी मित्रांनो मी प्रथम भारत मातेच्या राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक सलाम करतो व माझे थोडक्यात विचार व्यक्त करतो.

     आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कसा संघर्ष केला आणि फिरंग्यांच्या क्रूर यातना सहन केल्या याची आपण इथे बसून कल्पना करू शकत नाही. १८५७ ते १९४७ या काळात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या प्राणांची आहुती आणि अनेक दशकांचा संघर्ष यात आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध पहिला आवाज ब्रिटिश सैन्यात कार्यरत असलेल्या मंगल पांडे यांनी उठवला होता.

      पुढे अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपले संपूर्ण आयुष्य दिले. भगतसिंग, खुदीराम बोस आणि चंद्रशेखर आझाद यांना आपण सर्वजण कधीही विसरू शकत नाही ज्यांनी लहान वयात देशासाठी लढताना प्राण गमावले. नेताजी आणि गांधीजींच्या संघर्षाकडे आपण कसे दुर्लक्ष करू शकतो. गांधीजी हे एक महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी भारतीयांना अहिंसेचा धडा शिकवला. ते एकमेव नेते होते ज्यांनी अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला आणि अखेर प्रदीर्घ संघर्षानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस आला.

  भारत माता की जय… जय हिंद…! जय भारत...!!



                        ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -23        

                    ═••═

     आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक, उपस्थित पालक आणि माझे सर्व सहकारी मित्रांनो...   भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या सर्व महान नेत्यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आपण दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करतो.

    १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर आपल्याला आपल्या राष्ट्र आणि मातृभूमीत सर्व मूलभूत अधिकार मिळाले. आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपण स्वतंत्र भारताच्या भूमीत जन्मलो या आपल्या भाग्याचे कौतुक केले पाहिजे. 

भारत माता की जय… जय हिंद…! जय भारत...!!

~~●~~~~~~~~●~~

    ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -24    

    आजचा दिवस मांगल्याचा! आजचा दिवस भारतीय गणराज्याचा। आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा। माझा- तुमचा सगळ्यांचा… आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

ह्रदयात माझ्या तिरंगा.....  कर्मात माझ्या तिरंगा....!! 

श्वासात माझ्या तिरंगा... नसांत माझ्या तिरंगा....!! 

भासांत माझ्या तिरंगा... जगात माझ्या तिरंगा....!!

नभात माझ्या तिरंगा... रंगात माझ्या तिरंगा....!!

ढंगात माझ्या तिरंगा....!! मेरी आन बाण शान तिरंगा....!!!

   स्वतंत्रता दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा..!!

~~●~~~~~~~~●~~

  ★स्वातंत्र्य दिन मराठी भाषण -25    

                      " दिन हा भाग्याचा....
                  स्वातंत्र्य दिनाचा,
                चला साजरा करूया....
                 क्षण हा सौख्याचा.”

आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक, उपस्थित पालक आणि माझे वर्गमित्र 

   स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !  प्रत्येक भारतीयांसाठी स्वाभिमानाचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन होय. अनेक हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना आपण प्रत्येकाने सदैव त्यांचे स्मरण केले पाहिजे. सर्व हुतात्म्यांना शतशः नमन...!! ज्यांनी लिहिली आझादीची गाथा, त्यांच्या चरणी ठेविते माथा...

   १५ ऑगस्ट २०२३ भारतात सगळीकडे ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.... बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो !!

   सीमेवर प्राणपणाने देशाची राखण करून देशवासीयांना सुखासमाधानाने जगू देणाऱ्या आमच्या जांबाज सैनिकांना मानाचा मुजरा. नतमस्तक मी त्या सर्वांसाठीज्यांनी भारत देश घडवीला...!!

   माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
जय हिंद,जय भारत... भारत माता कि जय... वंदे मातरम्...!! 

🔴🔵🟢🔘🟢🔵🔴





1 comment: