"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

"कारगिल विजय दिवस" - 26 जुलै

  

   देशभरात 26 जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा केला जातो आहे.
    काश्‍मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावताना पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या युद्धाला आज खऱ्या अर्थाने 20 वर्षे पूर्ण झालीत. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.
     भारतीय सैनिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून पाकिस्तानला धुळ चारत आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हाच दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

  💁‍♂ कारगिल युद्धातील काही खास बाबी :~
▪ 1998-99 च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात LOC पलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला 'ऑपरेशन बद्र' असे नाव देण्यात आले होते.
▪मे महिन्यात दुसऱ्या आठवड्याच्या सुमारास स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवून हल्ला केला.

▪ पाकिस्तानकडून कारगिलवर विजय मिळवण्यासाठी सुमारे 5000 सैनिकांची तुकडी पाठवण्यात आली होती. मात्र भारतीय सैनिकांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले.

▪ कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या सुमारे 3 हजार सैनिकांना ठार मारले. हे युद्ध 18 हजार फीट उंचीवर लढले गेले.
▪ 8 मे दिवशी कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर 11 मे दिवशी भारतीय वायुसेनेने मदतीसाठी हात पुढे केला. यामध्ये वायुसेनेच्या सुमारे 300 विमानांचा वापर करण्यात आला.

▪ कारगिल युद्धामध्ये भारतीय वायुसेने पाकिस्तानच्या विरोधात मिग 27, मिग 29 चा देखील वापर केला होता. पाकिस्तानने ज्या भागावर कब्जा मिळवला होता तेथे बॉम्बहल्ले केले. पाकिस्तानच्या अनेक ठिकाणी आर-77 मिसाईलद्वारा हल्ला करण्यात आला होता.

▪ कारगिलच्या युद्धामध्ये बोफोर्स तोफांचा वापर करण्यात आला होता. युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले तर 1363 जवान जखमी झाले आहेत.
▪ भारताला कारगिल युद्धा दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला, त्यामुळे पाकिस्तानवर अमेरिसह जगातील अनेक देशांनी सैन्य मागे घ्यावे यासाठी दबाव टाकला होता.


🙏 अनेक भारतमातेच्या पुत्रांनी देशासाठी बलिदान देत आपल्या शौर्यातून लढवय्यी प्रेरणा देशाला दिली. या वीर जवानांच्या शौर्याची, त्याग आणि बलिदानाची आठवण करुन देणारा आजचा दिवस आहे हे लक्षात ठेवुयात.

No comments:

Post a Comment