"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      ◆राष्ट्रगीत◆ (National Anthem) :~

     *रविंद्रनाथ टागोर* यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले *‘जन-गण-मन’* या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी 'राष्ट्रगीत" म्हणून स्विकार केला.

०१) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

०२) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

०3) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

०४) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये *‘भारत विधाता’* या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

०५)  १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.
 ◎━━━━━◎━━━━━◎        
   🌐 !! राष्ट्रगीताबद्दल माहिती !!
✧═════•❁❀❁•═════✧

🔰➖ २४ जानेवारी °जन-गण-मन' राष्ट्रगीत म्हणून जाहीर करण्यात आले..

     २७ डिसेंबर १९११ रोजी 'जन-गण-मन' हे गीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता येथील कार्यक्रमात सर्वात पहिल्यांदा गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत रचलेले हे गीत भारताचे राष्ट्रगीत होईल असे त्यावेळी कोणाला वाटले ही नसेल. हे गीत २४ जानेवारी १९५० साली राष्ट्रगीत म्हणून जाहीर करण्यात आले. या गीताची पाच कडवी असून ती म्हणण्यास वेळ लागतो, यामुळे केवळ पहिलेच कडवे संबंध भारतात म्हटले जाते. पाचही कडव्यांच्या राष्ट्रगीताचे संकलन भारतीय संस्कृतिकोश खंड-८ यामध्ये प्रामुख्याने आढळते.
 
  ★'जन गण मन' पूर्ण गीत-
 
जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे ||१||
 
अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे ||२||
 
पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे ||३||
 
घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दु:स्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दु:ख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे ||४||
 
रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे भारत भाग्यविधाता ||५||

                                 

   ●राष्ट्रीय गीत● (National Song ) :

 *बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘वंदे मातरम’* हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

०१) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

०२)  १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

०३) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.
      ✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

    ♦ वन्दे मातरम् ♦    संपूर्ण माहिती click HERE  

●~~●~~~~●●~~~~●~~●

      ध्वज कसा बांधावा Video.       

     ध्वजाचा वापर करताना घ्यावयाची काळजी      

        देशभक्ती गीते          


         देशभक्ती गीते Mp3 ⏭  

      स्वातंत्र्यदिन Pdf मुलानसाठी भाषणे, सूत्र संचालन, Gr, शायरी व   इतर सर्व  
   
           प्रभातफेरी घोषणा       

      ⚫राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत⚫  

        मुलानी दिलेले भाषणे      

●~~●~~~~●●~~~~●~~●

No comments:

Post a Comment