Dr Babasaheb Ambedkar Charoli in Marathi /Shayari in Hindi......
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
Dr. Babasaheb Ambedkar
मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर या चारोळ्या /शायरी आपण बाबासाहेबांच्या जयंती निमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त भाषण देताना वापरू शकता. आणि आपल्या भाषणाने श्रोत्यांची मने जिंकू शकता....
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
सर्वसामान्यांचे आधार,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार…
ज्या ज्ञानसूर्याने दूर केला,
दिन-दलितांच्या जीवनातील अंधार…
अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना,
वंदन करतो मी त्रिवार…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
अमोघ वाणी आणि प्रचंड विद्वत्ता !
जगी झाले ते एकमेव अद्वितीय नेता !!
संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना माझे शत शत नमन,
त्यांच्या विचारांचे आपण
करूयात जतन..!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
आज हम उनकी बातो को
आज दिल से अपनायेंगे,
चलो आज हम सब मिलकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मनायेंगे!
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तुम्ही देव नव्हतास…
तुम्ही देवदूतही नव्हतास…
तुम्ही मानवतेची पूजा करणारे,
खरे महामानव होतास…!!!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
मान वर करून जगायला शिकवले…
अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले…
शिक्षणाचे महत्त्व समाजाला समजावले…
अशा महामानव बाबासाहेबांना,
शत – शत नमन !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
देश प्रेम में जिसने,
आराम को ठुकराया था !
गिरे हुए इंसान को,
स्वाभिमान सिखाया था !!
जिसने हमको मुश्किलों से,
लड़ना सिखाया था !
इस आसमां पर ऐसा इक दीपक,
बाबा साहेब कहलाया था !!
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
नजारों मे नजारा देखा
एसा नजारा नही देखा,
आसमान मे जब भी देखा
मेरे बाबासाहब जैसा सितारा नही देखा।
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
है ये सारा जहाँ जिनकी शरण में
हमारा है नमन उन बाबा के चरण में
है पूजा के योग्य बाबा हम सबकी नजर में
आप मिलकर फूल बरसायें बाबा के चरण में.
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
मोजू तरी कशी उंची,
तुमच्या कर्तुत्वाची !
तुम्ही जगाला शिकवली,
व्याख्या माणुसकीची !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा
उद्धार झाला…
दीन-दुबळ्यांना जगण्याचा
अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या
महामानवाला…
ज्यांनी संविधानरूपी समतेचा
अधिकार दिला..!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
दलितांची तलवार होऊन गेले…
अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले…
होते ते एक गरीबच,
पण या जगाचा “कोहिनूर” होऊन गेले…
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा,
भारताचे संविधान लिहून गेले…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
अमोघ वाणी आणि प्रचंड विद्वत्ता !
जगी झाले ते एकमेव अद्वितीय नेता !!
संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना माझे शत शत नमन,
त्यांच्या विचारांचे आपण
करूयात जतन..!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
बाबा साहेब आंबेडकर जिनको
ममता,करणा और समता
जिसका है आधार !
हमारी उजाड़ी जिन्दगी में,
ला दी बाबा साहेब ने बहार !!
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
भीम जी ने हमे बलवान बना डाला है
हटा ना पाये वो चट्टान बना डाला है
नये युग की हमे पहचान बना डाला है
और हवा के ये झोके को तुफान बना डाला है.।
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
संविधानाचा उघडूनी पत्ता !
जातीवाद्यांची उलथवली सत्ता !!
जातीभेद मिटवीला लेखणीच्या पातीवर !
माझ्या भिमाचे नाव मी कोरले माझ्या छातीवर !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
बुद्धांसारखं होतं ज्ञान !
देऊन गेले संविधान !!
मिळवून दिले समाजात स्थान !
बाबासाहेब आमचे प्राण !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
अंधार दाटला फार
आता दिवा पाहिजे !
नव्या या युगात सूर्य
नवा पाहिजे !!
जातीपातीत विखुरलेल्या
या मायभुमीला !
पुन्हा एकदा भिमाईचा
भिवा पाहिजे !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
चवदार तळ्याचे पाणी
ज्याने चवदार केलं !
पशुसारखं जगणाऱ्यांना
ज्यांनी माणसात नेलं !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
ज्ञानसूर्य, भारतरत्न
भिमराय माझा
पहा आभाळापार गेला !
त्याचा माणुसकीचा वेलं !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
शिल्पकार तुम्ही घटनेचे,
पंडित तुम्ही कायद्याचे !
प्रचारक तुम्ही समतेचे,
भारतरत्न तुम्ही देशाचे !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है!
ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है!
औरो को जो मिला है वो मुकदर से मिला है!
हमें तो मुकदर भी तेरे संविधान से मिला है!
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
ना जिंदगी की खुशी
ना मौत का गम !
जब तक है..दम…
“जय हिंद” कहेंगे हम.!!
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
नमन त्या पराक्रमाला,
नमन त्या देश प्रेमाला,
नमन त्या ज्ञान सूर्याला,
नमन त्या महापुरुषाला,
नमन त्या बाबासाहेबांना.!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
चुकीच्या निर्णयाविरोधात बंड करण्याची
हिम्मत ज्यांच्यात असते !
स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची
धमक त्यांच्यात असते !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
समूहात वेगळं पडण्याचं फक्त
त्यांनाच भय असते !
ज्यांना गुलाम म्हणून
जगण्याची सवय असते !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
फुलांची कहाणी वसंताने लिहिली…
रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली…
आम्ही नाही कोणाचे गुलाम
कारण आमच्या आयुष्याची कहाणी,
डॉ. बाबासाहेबांनी लिहिली..!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
फूलो की कहानी बहारो ने लिखी…
रातो की कहानी सितारों ने लिखी…
हम नहीं है किसी के गुलाम…
क्योंकि हमारी जिंदगी,
बाबासाहब जी ने लिखी!!
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
कर गुजर गये वो भीम थे,
दुनिया को जगाने वाले भीम थे,
हमने तो सिर्फ इतिहास पढा है यारो,
इतिहास बनाने वाले मेरे भीम थे।
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
करून गेला तो भीम होता !
लढून गेला तो भीम होता !!
आम्ही फक्त पुस्तकातून
वाचला आहे इतिहास !
पुस्तक वाचून इतिहास
घडवून गेला तो भीम होता !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
सागराचे पाणी कधी आटणार नाही !
सूर्याचे तेज कधी मिटणार नाही !!
एकच काय हजार जन्म झाले तरी !
बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
नजाऱ्यात पाहिले नजारे,
असा नजारा नाही पाहिला…
जेव्हा मी आकाशात पाहिले,
भीमा सारखा तारा नाही पाहिला…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
किती आले आणि किती गेले !
सांगा कुणाच्या लक्षात राहिले !!
डॉ. आंबेडकर असे एक नेते झाले !
ज्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य केले !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
माणसाला माणुसकी शिकवली भिमान !!
ज्ञानियांचा तो ज्ञानी, ज्ञानवंतांचा
मुकुटमणी शोभला खरा !
या भारत भूमीवर डॉ. आंबेडकर
जन्मले कोहिनूर हिरा !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
हमारी आजादी की कहानी,
लिखी हमारे भीम ने !
खुशियों भरा सजाया,
हमारा संसार भीम ने !!
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
नज़ारे देखे हमने हजारों
देखा न कभी ऐसा नजारा
आसमां में देखे सितारे बहुत
पर भीम जैसा सितारा न देखा
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
होता सिंहासारखा बाबा आमचा
नव्हती त्याला कोणाची भीती !
अरे होऊन गेले वर्षे जरी ही किती
आजही बोलावते आम्हाला,
ती चैत्यभूमीची माती !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
असा मोहरा झाला नाही,
पुढे न होणार…
भीमरावांचे नाव,
सतत गर्जत राहणार…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
आले किती गेले किती,
उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही,
माझ्या भिमाचा दरारा..!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
भारतरत्न बाबासाहेबांचे,
कर्तुत्व आहे महान !
त्यांच्यापुढे वाटतात,
चंद्र – सूर्यही लहान !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
करून जीवाचे रान,
दिला सर्वांना समतेचा मान,
अशी भीमरावांची शान,
भल्या भल्यांची झुकते मान..!
देश के लिये जिन्हो ने
विलास को ठुकराया था।
गीरे हुये को जिन्होंने
स्वाभिमान सिखाया था।
जिसने हम सबको तूफानों से
टकराना सिखाया था।
देश का वो था अनमोल दिपक
जो बाबा साहब कहलाया था।
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
गरज उठे गगन सारा,
समुन्दर छोडें आपना कीनारा,
हिल जाए जहान सारा,
जब गूंजे “जय हिंद” का नारा।
⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄⟃⟄
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
संविधान असे लिहिले की,
सूर्य चंद्र असेपर्यंत मिटणार नाही !
ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे,
या जन्मात फिटणार नाही..!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
मोजू तरी कशी उंची,
तुझ्या कर्तुत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या,
माणसातल्या माणुसकीची..!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात,
अन्यायाविरुद्ध प्रहार करूनी गेलात,
होता तुम्ही गरीबच मात्र या,
जगाचा कोहिनूर होऊन गेलात .!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
दलितांचे कैवारी तुम्ही…
गोरगरिबांचे उद्धारक तुम्ही…
बाबासाहेब तुमच्या कर्तुत्वामुळे,
सर्वांना मिळाली जगण्याची हमी…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
करून जीवाचे रान…
दिला सर्वांना समतेचा मान…
अशी भीमरावांची शान…
लिहिले भारताचे संविधान…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
माझ्या भिमाने डोळे उघडले,
प्रत्येक जण मानव झाला…
माझ्या भिमाने पुस्तक उघडले,
प्रत्येक जण विद्वान झाला…
माझ्या भिमाने लेखणी उचलली,
आणि देशाचे संविधान तयार झालं…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
अंधार होता ज्यांच्या नशिबी,
त्यांना प्रकाशाचे दान दिलं…
तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब,
तुम्हीच देशाला संविधान दिलं…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
एक थेंब होतो आम्ही,
आम्हाला समुद्र बनवलं…
अधिकार दिला आम्हाला,
आमचं नशीब घडवलं…
पायाची धूळ होतो आम्ही,
आंबेडकरांनी आम्हाला आकाश बनवलं…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार !
तुम्हीच महामानव जनतेचा आधार !!
दुःखी पीडितांचे तारणहार !!
जातिभेदाची भिंत तोडली…
अनियतिशी नियतीची युद्ध लढली…
बाबासाहेब तुम्ही होता,
म्हणूनच क्रांती घडली…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
आमच्या स्वातंत्र्याची कहाणी लिहिली भिमाने,
आनंदाने सजवला आमचा संसार भिमाने,
भिमाने केलं आम्हाला बलवान,
नव्या युगाची दिली आम्हाला जाण.!
धगधगत्या सूर्या परी प्रकाश दिला !
आपल्या तेजाने देश प्रकाशमय केला !!
गोरगरिबांना अधिकार मिळवून दिला !
06 डिसेंबर 1956 रोजी हा ज्ञानसूर्य
आपल्याला सोडून गेला !!
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
भीमाने आपल्याला शक्तिमान बनवलं…
जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं…
नव्या युगातील ओळख आम्हाला बनवलं…
आणि एका हवेच्या झुळकेला वादळ बनवलं…
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग होता…
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
No comments:
Post a Comment