"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

टाळ्या मिळविण्यासाठी शायरी

     टाळ्या मिळवण्यासाठी चारोळी/ शायरी---    
धारेशिवाय किंमत नाही
तलवारीच्या पातीला
पाण्याशिवाय किंमत नाही
धरणाच्या मातीला
सुगंधाशिवाय किंमत नाही
फुलांच्या जातीला
रसिक माय-बाप हो,
तुमच्या टाळ्यां शिवाय किंमत नाही
आमच्या कार्यक्रमाच्या साथीला.....

1) महको तो ऐसे की, सारा बाग खिल जाए...
ताली बजावो तो ऐसे की सभी बच्चे खु श हो जाए...

2) पाईनपलच्या रसाला ज्युस म्हणतात,जो टाळ्या वाजवीत नाही त्याला कंजुष म्हणतात...

3)कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समईच्या ज्योतीला
प्रेक्षकांच्या टाळयाशिवाय शोभा येत नाही कलाकारांच्या जातीला.


4) सूर म्हणतात साथ द्या
दिवा म्हणतो वात द्या
आमच्या चिमुरड्याला
आपल्या टाळ्यांची साथ द्या
~~●~~~~●●~~~~●~~



~~●~~~~●●~~~~●~~
     कार्यक्रम/ कला सादर केल्यानंतर प्रेक्षकांची दाद मिळावी म्हणून हे आपण बोलू शकतो...

5)आवाज ऐसे दो सोये हुए को होश आ जाये।   
 ताली ऎसे बजाओ सामने वालेको जोश आ जाये।

6) पेड़ पौधों को शोभा आती है हरीभरी डालियोंसे।    प्रोग्राम को रौनक अति है जोशभरी तालियाओंसे।

7) नुसतच बरोबर चालल्याने ती सोबत होत नाही।
केवळ हाताला हात लागला म्हणून ती टाळी होत नाही। 
चला हवा येऊ दया।   
आणि  जोरदार टाळ्या होउन जाऊ दया

8)कार्यक्रमासाठी केला आहे सगळ्यांनी साज ,
आहे कुठे टाळ्यांचा आवाज.


9)🌹फूल आहे गुलाबाचे;
जरा सुगंध घेत चला,
कार्यक्रम आहे लहानग्यानचा जरा टाळ्या देत चला....
जोरदार टाळ्यांचा गजर👏👏👏👏

10)सजली आहे मैफिल ,चिमुकल्यांच्या कला अभिव्यक्ती साठी।
एकदा होउ द्या  टाळ्यांचा गजर या बालकलाकारांच्या स्वागतासाठी.

11)दिवा म्हणतो वात दे                     
 हात म्हणतो साथ दे   
आणि रसिक प्रेक्षका                 
  तू टाळ्यांची दाद दे... 👏👏👏

12) शेतकरी म्हणतो,  ढग गडगडतो पण पाऊस का पडत नाही.
या सुंदर कलाविष्कारासाठी टाळ्या का होत नाही...

13) रंगतदार कार्यक्रमाला बहारदार संगीताची जोड
आम्हा कलाकारांना फक्त तुमच्या टाळ्यांची ओढ


14) ही आपलीच बालके आहेत याचा न पडावा विसर
टाळ्या तर मोफतच आहेत
त्यात नको काटकसर ...

15) कला आहे,
कलेची जाण असणारा रसिक आहे,                                       
या कार्यक्रमाची दाद देण्यास
आपल्या टाळ्यांचा आवाज आहे 

16]  " निसर्गाला रंग हवा असतो
  फुलांना सुगंध हवा असतो
  आमचा कार्यक्रम हा असाच रंगत राहणार
  परंतु त्यांना तुमच्या  टाळ्यांचा कड़कड़ाट हवा असतो"


17] " चंद्राला जशी चांदन्याची
साथ समुद्राला जशी किनार्याची साथ
तशी आम्हाला ही हवी आहे
तुमच्या टाळ्यांची साथ

18】वो ससुराल ही क्या जहाँ साली न हों।
और वो प्रोग्राम ही क्या जहाँ ताली न हो


जिस बाग मे गुलाब ना हो उस बाग  मे क्या मजा...
जिस ससुराल मे साली ना हो  उस ससुराल मे क्या मजा...
जिस प्रोग्राम में आपकी ताली ना हो इस प्रोग्राम में क्या मजा...!!

12 comments:

  1. Very nice app.

    Plz. Join me on your whatsapp group. Mo.no. 8007993329

    ReplyDelete
  2. छान!अतिशय उपयुक्त माहिती

    ReplyDelete
  3. सर मनापासून धन्यवाद सर जी

    ReplyDelete
  4. खुपच छान सर

    ReplyDelete
  5. खुप छान चारोळ्या आहेत सर.

    ReplyDelete
  6. धन्यवाद सर्व मान्यवर मित्रमंडळीचे

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर चारोळ्या आहे सर👌💯

    ReplyDelete