"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर



‘‘शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!’’

   अंधारातल्या झोपडीत ज्ञानाचा सूर्य ओतून संपूर्ण मानव जातीला प्रकाशमान करणारे..!! महामानव !! युगपुरुष !! क्रांतिसूर्य!! बोधीसत्व !! भारतरत्न !! विश्वरत्न !!  राष्ट्रनिर्माते !! भारतीय घटनेचे शिल्पकार !! परमपूज्य !!! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त  हार्दिक शुभेच्छा !!
●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●
   बाबासाहेबांची वैशिष्टे सांगायची तर बाबासाहेब हे महान संशोधक, विश्वरत्न, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, पञकार, समाजशास्ञज्ञ, अर्थशास्ञज्ञ, कायदेतज्ञ, इतिहासकार, संविधानाचे जनक, तत्वज्ञानी, मानववंश शास्ञज्ञ, दलित आणि महिला अधिकाराचे उद्धारक, देशातील पहिले कामगार मंञी, संस्कृत व हिंदी साहित्याचे अम्यासक, विज्ञानवादी, जलतज्ञ, समता, स्वातंञ्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्त्ये, गोरगरीब कामगारांचे उद्धारक होते.

  १४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. खेड्यापाड्यापासून ते दिल्लीपर्यंत बाबासाहेबांची जयंती उत्सवात साजरी केली जाते.

~~●~~~~●~~
  महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती करिता प्रभाव पूर्ण भाषणे साठी क्लिक करा.

~~●~~~~●~~

      ✿⭖⭖⭖✿⭖⭖✿⭖⭖⭖✿

●टोपणनाव :~ बाबासाहेब,
●जन्म :~ १४ एप्रिल १८९१,  महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश
●मृत्यू :~ ६ डिसेंबर १९५६, दिल्ली, भारत
●पुरस्कार: भारतरत्न (१९९०)
●वडील :~ सुभेदार रामजी सकपाळ
●आई :~ भीमाबाई रामजी सकपाळ
●पत्नी नाव : ~ रमाबाई आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर
●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●

   ◆ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ◆

    हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.
आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.
सरकारी शिवजयंती साजरी होते.

✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

🔅 डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे डाऊनलोड करा..🔅
       ●-----------------------------------------●
◆ डॉ. बाबासाहेब आंबेडकर – जीवनपट
◆ डॉ. बाबासाहेबांचे विचार
◆ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रे-
◆ डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिचय
◆ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसूची-

     वरील सर्व माहिती Pdf स्वरूपात डाऊनलोडसाठी एकाच पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


⛔ डाऊनलोडसाठी खाली ⏬⏬⏬ क्लिक करा...


✽⌘⌘⌘✽⌘⌘*⌘✽⌘⌘✽⌘⌘✽

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे.

          ◆ शैक्षणिक विचार ◆
   शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाेतेे की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते.

    व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.

                 ◆ स्वातंत्र्य लढा ◆
   डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण,  अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती,अर्थकारण,  राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेहीत्यांचे अवधान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देशहिताचाच विचार केलेला आहे. एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे ते भारतातील सर्व स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेषत हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क,घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. स्त्रीयांना त्यांचा अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा त्याग केला.

     राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले.

     १९३० सालच्या लंडन मधील गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असे ठणकावून सांगितले होते. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

प्रज्ञासुर्य, बोधिसत्व, भारतरत्न, युगपुरुष, महामानव, क्रांतीसुर्य, विश्र्वभूषन, उच्चविद्याविभूषित, घटनापती, ज्ञानयात्री, मानवी हक्कांचे कैवारी, शोषितांचे उद्धारक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, बौद्ध धर्माचे पूनारुद्धारक, आधुनिक भारताचे जनक, समजसुर्य, इतिहास संशोधक, मानव दौंड शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडित, इतिहासकार, वक्ता, लेखक, बॅरिस्टर, राजकीय नेते, जलतज्ञ, पत्रकार, संपादक, प्राध्यापक, संसदपटू, शेतकरी मजुरांचे नेते, समंतसेनानी, धर्मशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, घटनासम्राट, समाजसुधारक, तत्वज्ञ, महाविद्वान, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न....
★ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ★
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची,
तू जगाला शिकवली व्याखा 
माणसातल्या माणुसकीची...!!
तू देव नव्हतास,
तू देवदूतही नव्हतास
तू मानवतेची पूजा करणारा
 खरा महामानव होतास...
ज्ञानाच्या अथांग सागरास महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन ..!!

🙏"महामानवाचे महापरिनिर्वाण"🙏
       ✿⭖⭖✿⭖⭖⭖✿⭖⭖✿
रविवार ,२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, "आलास वेळेवर ! आज आपल्याला खूप काम करायचे आहे." ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व 'कार्ल मार्क्सचे ' 'दास कॅपिटल ' या ग्रंथातील मजकूर परत डोळ्यांखालून घालून ' buddha & his dhamma ' या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. आणि नानकचंद ला टाईप करायला देत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले .दिनांक ४ डिसेंबर ला बाबासाहेब सुमारे ८-४५ ला उठले . 

सकाळी सुमारे ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी याबाबतीत विचारविनिमय करावा अशी विनंती केली. बाबासाहेब त्यांना म्हणाले, ' यासंबंधी आपण उद्या रात्री ८-३० च्या नंतर चर्चा करू .
दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती . ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधूनमधून 'buddha & his dhamma ' या ग्रंथांचा मजकूर लिहित होते ३-४ कागद लिहून झाले होते. तेव्हा नानकचंद संध्याकाळी ५-३० आले त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला व अस्वस्थ असलेले त्याला दिसले त्यांनी नानकचंदला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात 'बुद्धं शरणं गच्छामि ' त्रिशरण म्हणू लागले . नंतर त्यांनी नानकचंद ला 'बुद्ध भक्तिगीते 'हि रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही गुणगुणू लागले.

नोकराने जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले ' जेवणाची इच्छा नाही ' पंरतु नानकचंद ने आग्रहाणे जेवावयास उठवले डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतींच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली होती. त्या ग्रंथांच्या कपाटांना पाहत पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ निःश्वास सोडला . आणि हळूहळू चालत डायनिंग टेबलापाशी गेले. इच्छा नसतांना दोन घास खाल्ले .नंतर नानकचंद ला डोकीला तेल लावून मसाज करायला सांगितले . मसाज संपल्यावर ते काठीच्या साहाय्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले ," चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा."

त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते, चेहराही एकदम निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली तेव्हा नानकचंद ने जाण्याची परवानगी मागितली . ते म्हणाले " जा आता . पण उद्या सकाळी लवकर ये. लिहिलेला मजकूर टाईप करावयाचा आहे ."
नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे ११-१५ झाले होते.
दिनांक ६ डिसेंबर ला नानाकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशीराच उठले. 

ते सायकल बाहेर काढतात तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला म्हणाला 'माईसाहेबांनी तुम्हांला लागलीच बोलावले आहे. नानाकचंद तसेच निघाले त्यांनी सुदामला विचारले एवढ्या घाईने का बोलावले आहे ? आणि बंगल्यावर पोहचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछान्याजवळ गेले आणि म्हणाले " बाबासाहेब मी आलोय ! असे भांबवून मोठयांदा ओरडले . साहेबांच्या अंगाला हात लावला त्यांना ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसाज करू लागले ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ,तेव्हा कळून चुकले कि , बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे .

बाबा गेल्याचे पाहून नानकचंद मोठ्यांदा रडू लागले. बंगल्यातील सर्व जण गोळा झाले माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळण घेतली आणि तोही रडू लागला .
पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी ९ वाजता फोन करण्यास सुरवात केली व सर्वांना हि बातमी कळविली.

बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस राजगृह येथे विमानाने आणण्यात येणार आहे हि बातमी मुंबईतील लोकांना कळली तेव्हा लोकांचे थवेच्याथवे विमानतळाकडे जाऊ लागले. दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान निघाले सांताक्रूझ विमानतळावर रात्री उतरले .तिथे आधीच सगळी व्यवस्था करण्यात आली होती .Ambulance विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली. हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यातून अश्रूंना वाट करून देत उभे होते. वंदना घेत घेत Ambulance हळूहळू चालत राजगृहाला आली. तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच आर्त स्वर निघाला .'बाबा ! ' आणि ते रडू लागले . 
स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको ! मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली. काहींनी भिंतीवर डोकी आपटली, कित्येकजणी मुर्च्छित पडल्या.

हिंदू कॉलनीतील सवर्ण हिंदूंना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत तीन-चार तास उभे राहावे लागले . हिंदू कॉलनीतील लोकांनी , ' आमच्या वस्तीतील ज्ञानियांचा राजा गेला ! आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले ! ' असे उद्गार काढले.

एवढी जरी गर्दी तेथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अत्यंदर्शनासाठी उभे होते.
बाबांचा पार्थिव देह राह्गृहात आणल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी धार्मिक विधी पार पाडला हा विधी अत्यंत साधा होता. नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर पावित्र्यनिदर्शक अशी शुभ्र वस्त्रे चढविण्यात आली पार्थिव देहाजवळ असंख्य मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती होती. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे दोन लक्ष ( लाख ) लोकांनी अंत्यदर्शन घेतले . 

बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे दोन लक्ष कामगारांनी हरताळ पाळला. त्यामुळे पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या. अनेकांनी आपली दुकाने बंद केली होती. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील हरताळात भाग घेतला होता.

एका शृंगाररलेल्या ट्रकवर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला .त्या मागे बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यांच्याशेजारीच पुत्र यशवंतराव (उर्फ भय्यासाहेब आंबेडकर ) व पुतणे मुकुंदराव बसले होते. मिरवणुकीची लांबी सुमारे दीड ते दोन मैल होती. किमान दहा लाख लोकांनी भारताच्या या बंडखोर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. एवढी मोठी प्रचंड गर्दी ! पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडला नाही. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली परळ नाक्यापासून मिरवणूक एल्फिन्स्टनरोडकडे निघाली तेव्हा जिकडे तिकडे माणसांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.बरोबर दिनांक ७ डिसेंबर ५ वाजता महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली. डॉ. बाबासाहेबांच्या पर्थिवाला अग्नी देण्यासाठी भागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूच्या भिंतीलगत एक वाळूचा प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता . बाबांचे पार्थिव  ट्रकच्या खाली उतरविण्यात आले,  मेणबत्यांचे तबके घेतलेले चार भिक्षु पुढे होते.
बाबासाहेबांचे पार्थिव सर्वांना दिसेल अशाप्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात आले. मुंबई सरकारतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती. भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रारंभ केला ते करूण दृश्य पाहतांना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा हा विधी आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला .यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले आणि डॉ. बाबासाहेबांच्या  पार्थिव देहास सशत्र पोलीस दलाने बंदुकीने त्रिवार मानवंदना दिली व बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी ७-१५ वाजता अग्नी देण्यात आला.

बाबासाहेबांच्या देहास अग्नी देताच यांचे आप्तस्वकीय यांना संयम आवरता आला नाही ते चीतेकडे धावले ओक्साबोक्शी रडू लागले . व त्यांनी पुन्हा ' बाबांचे ' शेवटचे दर्शन घेतले. आणि काही क्षणात बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला.

रविवार दिनांक ९ ला सकाळी ८ वाजता दादर चौपाटीवर विस्तीर्ण वाळूच्या पटांगणात जाहीर शोकसभा झाली अध्यक्ष भदंत कौसल्यायन हे होते. आणि अनेक वक्ते उपस्थितीत होते. अनेकांची भाषणे झाली श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी भाषणात हे उद्गार काढले ' आम्हा तरुण सभासदांना डॉ. आंबेडकर यांच्या सान्निध्यात राहण्याचा आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना व हिंदू कायद्याची संहिता जी मुळ तयार केली होती , ती उकृष्ट होती. आणि जोपर्यंत या दोन कृती भारतात अस्तीत्वात राहतील तोपर्यंत आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धीमत्तेचा व कर्तुत्वाचा स्मृतीदीप भारतात तेवत राहील .

हिंदू समाजातील पिडीत व   दरिद्रित खितपत पडलेल्या लोकांना ,महिलांना त्यांनी ज्ञानाची संजीवनी पाजून जिवंत केले आणि आपल्या मानवी हक्कांसाठी लढण्यास उभे केले. त्याचप्रमाणे त्यांनी पददलितांबद्दलची वरिष्ठ वर्गाची दृष्टी बदलून टाकली हे त्यांचे अनुपम थोर राष्ट्रकार्य होय.

आचार्य अत्रे यांनी सुद्धा भाषण केले ते म्हणाले या महान नेत्याच्या मृत्युच्या "मृत्यूने मृत्यूचीच कीव "वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे .मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत ? मग त्याने इतिहास निर्माण करण्याऱ्या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर , इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली ? 
भारताला महापुरुषांची वाण कधी पडली नाही . परंतु असा युगपुरुष शतकाशतकात तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा ,महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर , बहाद्दर पुरुष आज मृत्युच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे.त्यांचे वर्णन करण्यास शब्द माझ्याकडे नाहीत.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
            ◆ महापरिनिर्वाण ◆
     नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून ते दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. आणि बौद्ध बनून त्यांना केवळ सातच आठवडे झाले होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.
 ••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंतीनिमित्त.. ◆ बुद्ध गीत ◆
गायिका कु. स्वरा मंगेश लाड यवतमाळ .🎤🎼
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

   बोधिसत्व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकनंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.

      ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. चार मैल लांबीच्या यात्रेत १५ ते २० लाख लोक सहभागी झाले होते आणि तिला दादरमधील ‘राजगृह’या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबई शहरान पाहिलेली ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती.

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
★ बाबासाहेब व गाडगे बाबा ★
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

    गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर केलेल्या दोन्ही हातात हार घेउन स्टेजसमोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले." बाबा तुम्ही खाली का उभे.? वर या ना." " नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्याचाहार घ्या."." बाबा, तुम्ही अगोदर वर या मग मी हार घेईन."." नाही बाबासाहेब, तुम्हीच आधी खाली या." बराच वेळ ते दोन महापुरूष एकमेकांना विनंत्या करीत होते. बाबासाहेबांच्याभाषणाची तार तुटली होती. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले. " बाबा तुम्ही, स्टेजवर का येत नाही..?.त्यावर ते संतशिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले." बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही.'' गाडगेबाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली." आता तुमचे चालू द्या." असे बोलून क्षणांत गाडगे महाराज निघून गेले. याला म्हणतात एका निष्कलंकित चारिञ्याने दुसऱ्या निष्कलंकित चारिञ्याची केलेली कदर...संतांचा निरोप घेऊन बाबासाहेब मंचाकडे वळले तर काय आश्चर्य... स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या. सर्व नेते व कार्यकर्त्यांनीखाली प्रेक्षकांत बसणे पसंत केले. बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण देत होते आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.जेव्हा गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे तेव्हा बाबासाहेब तिथे गेल्यावर खालीच बसायचे. लोक त्यांना म्हणायचे की बाबासाहेब आपण वर बसा पण बाबासाहेब मात्र खालीच बसायचे आणि म्हणायचे की, जेथे संत गाडगेबाबा असतील तेथे घाण असूच शकत नाही.'' स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांवर कुठलाही परिणाम झाला नाही, परंतु बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे कळवल्यावर अवघ्या १४ दिवसात प्राण सोडणारेसंत गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे असतील.???

●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●

    ●  डॉ. बाबासाहेब आंबेडकर ●
  भारतरत्न हा सर्वोच्च नगरी सन्मान मिळालेले, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या संविधानाचे शिल्पकार, विसाव्या शतकातील सर्वात बुद्धिमान महापुरुष... अवघ्या भारतातील अखंड मानवजातीच्या उद्धाराकरिता आजन्म झटणारे महामानव....

       १) डॉ. बाबासाहेबांचे तीन गुरु – ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय; लोकनुकंपाय, हिताय सुखाय, देवमनुस्सानम, आदिकल्याणम्, अंतिकल्याणम्’ अशी आपल्या धर्माची व्याख्या करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचे पाहिले गुरु होते. बुद्धांनी धर्माच्या केलेल्या या व्याख्येतच सर्व काही येते. बौद्ध धम्मात प्रज्ञेला महत्व आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धिवाद. केवळ आपले गुरु सांगतात म्हणून तुम्ही ते खरे मानू नका, तर आपल्या बुद्धीच्या कसोटीवर ते पडताळून पहा आणि योग्य वाटले तरच त्यांचा स्वीकार करा, असा हा बुद्धिवाद होय. सर्वांना समतेने वागवणारा हा धर्म होय. या ठिकाणी आपल्या आसे लक्षात येते कि त्यांनी धर्माची निवड करताना केवळ एका जातीच्या लोकांचा विचार न करता संपूर्ण जाती-धर्माच्या लोकांच्या उद्धाराचा विचार केला आहे.

         जाति न पूछो साधु की, पूछी लीजिये ज्ञान| मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान|| या आपल्या दोह्यात जातीपेक्षा ज्ञानाला महत्व देणारे संत कबीर हे बाबासाहेबांचे दुसरे गुरु होते. आणि थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले हे त्यांचे तिसरे गुरु होते. यावरूनच आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रगल्भतेची जाणीव होते. याच गुरूंचे विचार माणूस म्हणून जगण्यासाठी आणि जीवनोद्धारासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी उपयुक्त आहेत हे आपल्याला पटल्याशिवाय राहात नाही.

      २) अहिंसेचा अर्थ – बाबासाहेबांचा अहिंसेवर विश्वास होता पण त्याचा नेमका अर्थ सांगण्यासाठी ते संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देतात. ‘दया तिचे नाव, भूतांचे पालन| आणिक निर्दालन, कंटकांचे||’. यात तुकाराम महाराज सांगतात, अहिंसा दोन गोष्टींची मिळून होत असते. एक म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी दया आणि प्रेम होय. तसेच दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, ‘सर्व दुष्टांचा संहार होय’. वाईट वृत्तींचा संहार करणे त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचे मानत असत. शीलाने नियंत्रित असलेली शक्ती हेच बाबासाहेबांचे ध्येय होते.

         ३) महिलांच्या सन्मानासाठी कार्य – भारतातील ‘सर्व जाती-धर्मातील स्त्रियांना’ जाचक रूढी आणि परंपरांपासून सुटका मिळावी यासाठी ‘हिंदू कोड बिल’ हा भारतातील कायद्याचा मसुदा बाबासाहेब आंबेडकरांनी १९४९ साली संसदेत मांडला होता. त्यात महिलांच्या हक्काचे सात घटक अंतर्भूत होते, जे महिलांना सन्मानाने वागवण्याचा हक्क देणारे होते. परंतु प्रतिगामी विचारांच्या सदस्यांनी त्याला विरोध केल्यामुळे ते संमत होऊ शकले नाही. त्यावेळी बाबासाहेबांनी पंतप्रधान पंडित नेहरू यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पाठवला. त्यात ते लिहितात, ‘हिंदू कोड बिलाचा खून झाल्यामुळे मी राजीनामा देत आहे.’ या घटनेवरून आपल्या लक्षात येते कि बाबासाहेबांना आपल्या मंत्रीपदापेक्षा स्त्रियांचे हक्क अधिक महत्वाचे वाटत होते. ज्यांच्यासाठी हे कार्य बाबासाहेबांनी केलं या स्त्रिया केवळ एका विशिष्ट जातीच्या नव्हत्या, हे या ठिकाणी ध्यानात घेणे महत्वाचे आहे.

        ४) भारतीय संविधान –   भारतीय संविधान लिहिणे हे बाबासाहेबांच्या कार्यातील अत्युच्च शिखर होय. भारतीय संविधान सभेत निवडून येण्यासाठी त्यांना काय प्रयत्न करावे लागले, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तरुणांनी तो इतिहास आवर्जून वाचवा, जेणेकरून बाबासाहेबांना ही सर्व कामे करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता, हे लक्षात येईल. हे संविधान लिहिताना त्यांनी केवळ अनुसूचित जातींच्या लोकांचाच विचार केला नाही. तर आखिल भारतातील आदिवासी, इतर मागास वर्गीय, विविध जातीधर्मातील लोकांना समान संधी उपलब्ध करून दिल्या आहे. या सर्व गोष्टी त्यांनी अत्यंत अभासपूर्वक केल्या आहेत. यावरूनही आपल्या लक्षात येते कि त्यांचे हे महान कार्य केवळ एका जातीच्या लोकांपुरते मर्यादित नव्हते तर ते सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी होते.
●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●
         वरील सर्व बाबींचा विचार करता आपल्या सहज लक्षात येईल कि बाबासाहेबांनी केवळ विशिष्ट एका समाजासाठीच काम केले नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठी कार्य केले आहे. त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर मोठ्या पगाराची नोकरी करून आपले जीवन त्यांना आरामात जगता आले असते. परंतु त्यांनी सुखासीन आयुष्याची निवड न करता, समाजोद्धार करण्यासाठी खडतर आयुष्य निवडले. ते निस्सीम देशभक्त होते. परंतु प्रतिगामी विचारांच्या लोकांनी त्यांच्या कार्याला संकुचित वृत्तीतून मांडून लहान करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी अनेक संकटे बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत परतून लावली होती. भविष्यातही अशा संकटांबद्दल सजग राहण्याबाबत बाबासाहेब आपल्या अखेरच्या संदेशात म्हणतात, ‘मी इथवर आणलेला काफला असाच पुढे आणखी पुढे चालू ठेवावा. वाटेत अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, अकल्पित संकटे कोसळतील, पण वाटचाल सुरूच ठेवावी. माझे सहकारी हा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफल्यास परत फिरू देऊ नये.’

       माणसांनी मिळून समज बनतो. परंतु काही माणसांमुळे समाज घडतो. अशा माणसांपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. ज्यांनी आपले उभे आयुष्य समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी खर्ची घातले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. आणि तसे केले तरच आपल्याला, आपण सर्व भारतीय धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे नागरिक आहोत असे अभिमानाने म्हणता येईल.    
★★$$%%$$$%$$$%%%$$★★

4 comments:

  1. Namskar sir,,,,, most information I like most .Thanks sir

    ReplyDelete
  2. Namskar sir,,,,, most information I like most .Thanks sir

    ReplyDelete
  3. अतीशय महत्वपुर्ण माहीती दिल्या बद्दल आपले मन:पूर्णक आभार..

    ReplyDelete