"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सावित्रीबाई फुले



  स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्‍या, पहिल्या महिला शिक्षिका, 
"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" 
💎💎🌼🙏🌼💎💎

   शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी घराचा उंबरठा ओलांडणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली स्त्री, भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या शिक्षिका, समता चळवळीच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
🙏🙏🌹🌹🌹🙏🙏 
●जन्म :~ ३ जानेवारी १८३१, नायगाव,तालूका खंडाळा, जिल्हा सातारा
●मृत्यू :~ १० मार्च  १८९७, पुणे

    स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले... सावित्रीबाई केवळ महिलांना शिक्षण देऊन थांबल्या नाहीत.  त्यांना सक्षम करण्यासाठी, धाडसी करण्यासाठी आणि विविध रूढींमध्ये त्रासलेल्या महिलांना त्यातून सोडवण्याचे महान कार्य केले. शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांच्या पवित्र स्मृतीस पुन:श्च विनम्र अभिवादन...!!
    ⚜ सावित्रीबाई फुले
      या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

       १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते.

      सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘⌘⌘⌘✽


🔅 सावित्रीबाई फुले ~
भाषणे डाऊनलोड करा..🔅
  ⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⛯⋐⋑

 💎  "महिला मुक्तिदिन"  💎

 ■ सावित्रीबाई फुले समाजसेविका यांचे अनमोल विचार जागतिक बालिका दिना निमित्त सूत्रसंचालन, मराठी, हिन्दी व इंग्रजी विद्यार्थी भाषने, शायरी/ चारोळ्या व 
सावित्रीबाई फुले 
– जीवनपट सावित्रीबाई फुले कार्य  
सर्व Pdf माहिती... 
   डाऊनलोडसाठी एकाच पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
   
      ⛔ डाऊनलोडसाठी खाली ⏬⏬⏬ क्लिक करा...

✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘⌘⌘⌘✽

      १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनर्‍यानी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे.

      सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी
"धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

      केशवपन बंद करण्यासाठी व पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
      सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच  प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.

    समजातल्या दिन : दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतध्नता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

@@@$$$$$@@$$$$$@@@ 
  
 ■ सावित्रीमाई कोण होत्या? ■
      ================
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
• मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले.
• मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका.
• शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञ. “अभ्यासक्रम नियोजन” हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो.
• सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक. राज्य सरकारने “आनंददायी शिक्षण” ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे.
• त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी” काढली होती.
• त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केद्र “नॉर्मल स्कूल” काढले व चालवले होते.
• त्यातून “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्धा सावित्रीबाई व जोतिबा यांना जाते.
• पुणे व आजूबाजूंच्या १८ शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका.
• विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिका.
• सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षण-तज्ञ. त्यासाठी वेताळ-पेठेत सह-शिक्षण देणारी शाळा काढली. पण विवाहित महिलांनी मुलांसोबत बसण्यास नकार दिल्याने मुलांची व मुलींची अशा दोन शाळा केल्या.
• शालेय विद्यार्थ्याना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. सरकार अलीकडे हा उपक्रम राबवीत आहे.
• प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका.
• विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या समस्या याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक. विकसित देशांत शाळाशाळांत समुपदेशक असणे आवश्यक आहे.
• सरकार तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका.
• विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य. 
• विधवा स्त्रियांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य.
• फुले दाम्पत्त्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते. शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या.
• सावित्रीबाई व जोतीराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या धुराजी आप्पाजी चांभार व रानबा महार यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात दलित व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो. 
• मारेकरी म्हणून आलेल्या धोंडीराम नामदेव कुंभार याला ब्राह्मणेतरातील पहिला पंडित बनविण्याचा मान फुले दांपत्याकडे जातो.
• आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या.
• आधुनिक काव्याच्या जनक. (केशवसुतांच्या सुमारे ४० वर्षे आधी आधुनिक शैलीत व पंतकाव्य व संतकाव्य यापेक्षा वेगळ्या आणि जनसामन्यांच्या विविध विषयांवर कवितांचे लेखन.) ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
• खादीचा पुरस्कार व प्रसार करणाऱ्या पहिल्या सामाजिक नेता.
• अस्पृश्यांना स्वत:च्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य.
• वाट चुकलेल्या विधवांच्या प्रसूतीसाठी व आधारासाठी “बालहत्या-प्रतिबंधक-गृह” सुरु करून चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. भारतातील हा असा पहिलाच प्रयोग होता.
• फुले दाम्पत्याने अनाथ व अवैध संतती म्हणून जन्माला आलेल्या मुलांसाठी अनाथाश्रम काढले होते. हा भारतीयांचा अशा प्रकारचा पहिला अनाथाश्रम होता. त्यांच्या मातांसाठी सुद्धा वसतिगृह काढले होते. 
• विधवा पुनर्विवाह सभेचे आयोजन व संघटन करणाऱ्या पहिल्या सुधारक.
• विधवा ब्राह्मण स्त्रीचा अनौरस मुलगा दत्तक घेतला. परक्या जातीतील मुलास दत्तक घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
• आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारी समाज सुधारक. स्वत:च्या दत्तक मुलाचा सुद्धा आंतरजातीय विवाह करून दिला होता.
• हुंडाविरहित सामुहिक विवाहाच्या प्रवर्तक.
• रोटीबंदीच्या काळात सर्व जातीय महिलांचे तीळ-गुळासारखे मोठमोठे मेळावे घेणाऱ्या पहिल्या जाती-निर्मूलक. 
• मराठीतील पहिली पुस्तक संपादिका आणि प्रकाशिका. महात्मा फुले यांची भाषणे टिपणे काढून संपादित करून प्रकाशित केली.
• विधवांच्या केशवपन (टक्कल करणे) विरोधात न्हाव्यांचा यशस्वी संप घडवून आणला. हा भारतातील पहिला यशस्वी संप होता.
• त्या प्रभावी वक्ता होत्या. सत्यशोधक समाजाच्या व इतर कार्यक्रमांत त्यांनी बरीच भाषणे दिली होती.
• पतीच्या अंत्ययात्रेत स्वत: टिटवे घेऊन जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
• पतीच्या चितेला अग्नी देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. 
• सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्ष.
• १८९६ साली दुष्काळात पोटासाठी शरीरविक्रय करणार्याय बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
• १८९६ साली दुष्काळात सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडून दुष्काळग्रस्तांसाठी रोजगार हमीसारखी दुष्काळी कामे सरकाराला सुरु करण्यास भाग पाडले. 
• १८७६ च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने ५२ अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता. १८९६ च्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालविली. 
• बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी.
• भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेत्या.
संदर्भ:- “सावित्रीमाई कोण होत्या?”

 -धनंजय आदित्य

$$$$$$####$$$$$$###$$$$

"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" 

★काल तू होतीस म्हणून आज आम्ही आहोत माई..
नाहीतर आम्हाला स्वयंपाकघर-न्हाणीघर-देवघर यापलिकडे अस्तित्वच नव्हतं..

★तू उंबरठा ओलांडला नसता तर आम्ही आजही उंबरठ्याआडच राहिलो असतो.. खिडकीतून दिसणार्‍या टीचभर आभाळात नशिबातील अमावस्या-पौर्णिमा मोजत बसलो असतो..

★तू खाल्ल्या शिव्या-शाप म्हणून आम्ही आज 'आशीर्वाद' जगतो आहोत.. तुझ्या अंगावर फेकले होते शेण, दगड आणि माती पण अक्षर ओळखीने आज आम्ही स्वर्गात नांदतो आहोत..

★तुझा लढा आमच्यासाठीचा.. काल इतिहास सांगून गेला..
आज वर्तमानात तुझ्या लेकी माई.. भविष्य घडवत आहेत!!
तुझ्या आजन्म ऋणी.. तुझ्या लेकी आज तुझ्या मार्गावर चालत आहेत.. 

    🙏🙏🙏◆★◆🙏🙏🙏

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 
🙏🙏🙏💐💐💐



3 comments: