"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

जागतिक महिला दिन शुभेच्छा..!!

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ति तू, 
झाशीची राणी... मावळ्यांची भवानी तू,
  प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू... म्हणुनच....
     स्त्री-शक्तिला माझा सलाम ! "
~~~~~~~~~~~
हज़ारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए।।
हज़ारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए।।
हज़ारों बूंद चाहिए समुद्र बनाने के लिए।।
पर एक स्त्री अकेली ही काफी है
घर को स्वर्ग बनाने के लिए।।
═══════🦋🦋════════
 
   ◆जागतिक महिला दिनाचा इतिहास...
    ━═•●◆●★◆★●◆●•═━
    संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्या करता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
     त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यां बरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

~~●~~~~●~~

"जागतिक महिला दिन"  प्रभावशाली भाषणे साठी क्लिक करा..      

  

~~●~~~~●~~

कधी ती प्रेमाने डोक्यावर हात ठेवणारी 
*आई असते,
कधी ती घासातला घास काढून देणारी 
*ताई असते,
काळजी नको मी आहे ना म्हणणारी 
*मैत्रीण असते,
कधी ती अधाऀगिनी म्हणून साथ देणारी 
*बायको असते,
तर कधी बाबा लवकर या म्हणणारी 
*लेक असते,

अशा एक ना एक अनेक भुमिका मनापासून बजावणारी नारी शक्तीला मानाचा मुजरा. 🙏🏻
              
कधी शौर्याची ढाल
कधी मायेची ऊबदार शाल,
प्रत्येक स्त्रीच्या
आत्मविश्वासाला सलाम..!

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे असावे..!!
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व हे सारे असावे...!!

    पुरुषांच्या तुलनेत नेहमीच महिलांचे कष्ट जास्त राहिले. इतिहास साक्षी आहे काहींनी बंधन झुगारून उंबरठ्याबाहेर पाऊल टाकलं. स्वतःशी आणि समाजाशी संघर्ष करत आपलं असं आभाळ बनवलं की तिची आकाशभरारी क्षितिजापार गेली तरीही आई, बहिण, पत्नी, मुलगी ही निसर्गनिर्मित पाऊलवाट मात्र कायम राहिली. या निसर्गदत्त देण्यालाही पुरेपूर खरं उतरून आपली ओळख कायम राहावी यासाठी तिचे हे कष्ट आजही अव्याहत सुरूच आहेत...

    स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे वास्तल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तुत्व, स्त्री म्हणजे अडथळ्यावर मात... 
     प्रत्येक नारीला तिच्या कर्तुत्वाला तिच्या नेतृत्वाला तिच्या सहनशक्तीला तिच्या त्यागाला तिच्या प्रेमाला तिच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा
     मातृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व या गुणांचा संगम असलेली महान शक्ती म्हणजे नारीशक्ती...
     
जागतिक महिला दिनानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!


🔲 जागतिक महिला दिन भाषणे व सम्पूर्ण माहिती डाऊनलोड करा...
  ♧🇲♕♧♕🇸♕♧♕🇵♧

◆ जागतिक महिला दिन शायरी/ चारोळ्या
◆ जागतिक महिला दिन सूत्रसंचालन
◆ जागतिक महिला दिन...
 हिंदी भाषणे,मराठी भाषणे, इंग्रजी भाषण.
◆ कर्तुत्ववान भारतीय महिलांची माहिती.
      ➖➖➖👆👆➖➖➖
   ■ वरील सर्व व इतर माहिती pdf स्वरूपात डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे....

⛔ डाऊनलोडसाठी क्लिक करा.



●~~●~~●~~◆~~●~●~●~~◆~~●~~●~~●
     भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.
     ✿⭖⭖⭖✿⭖⭖⭖✿⭖⭖⭖✿
तिच्या ‘अर्ध्या आभाळा’तला श्रद्धेचा, विश्वासाचा सूर्य कधीच न मावळो हीच या जागतिक महिला दिनानिमित्त तिला शुभेच्छा..!!

   भारतीय नावे ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे भारतीय स्त्रीवादी विचारसरणीला उत्तेजना दिली, अगदी पुराणकाळातील गार्गी-मैत्रेयी पासून... कुणालाच विसरुन चालणार नाही, अगदी रझिया सुलतानाला सुद्धा! अशी अजून काही महत्वाची नावे-
जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई,राजा राममोहन रॉय, ईश्वरचद्र विद्यासागर, केशवचन्द्र सेन, म.ज्योतिबा फुले, चन्द्रमुखी बासू, कंदबिनी गांगुली, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भिकाजी कामा,धोंडो केशव कर्वे, सुचेता कृपलानी, प्रितीलता वाडदेकर, ताराबाई शिंदे, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अमृता प्रीतम, इंदिरा गांधी, सरोजिनी साहू, कुसूम अंसल, किरण बेदी, मेधा पाटकर, मधू किश्वर...

नावे खरोखरच असंख्य आहेत. जगाच्या कानाकोपर्‍यातली आहेत. स्त्रीवादी चळवळ प्रत्येक टप्प्यावर अनंत अडचणींना सामोरे गेली. या महिलांनी आपले वैयक्तिक प्रश्न, घरदार विसरुन जाऊन त्यावर मात करत जीवाच्या कराराने लढा दिला. प्रत्येक पातळीवर उपहास, टिका, अपमान, विरोधाला त्या सामोर्‍या गेल्या. त्यांनी उभारलेल्या मुलभूत प्रयत्नांच्या जोरावर आज आपण 'स्त्रीत्व' सन्मानाने उपभोगू शकतो. एक व्यक्ती म्हणून आपले अधिकार हक्काने बजावू शकतो. पण समाजात असे अधिकार बजावू न शकणार्‍या अनेक स्त्रिया सर्व स्तरांवर अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांच्यासाठी लढा पुढे चालवण्याची, नव्या संदर्भातून पुन्हा उभारण्याची गरज आहे. वर उल्लेख केलेल्या स्त्रियांच्या कार्यामधून आपल्यात ती प्रेरणा कदाचित निर्माण होईल. म्हणूनच आजचा हा जागतिक महिला दिन स्त्रीवादी चळवळीला हातभार लावणार्‍या या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करुया. 
 ♕♧🇲♕♧♕🇸♕♧♕🇵♧♕

~~●~~~~●~~

"जागतिक महिला दिन"  प्रभावशाली भाषणे साठी क्लिक करा..      

  

~~●~~~~●~~


 ●ज्याला स्त्री ‘आई’ म्हणुन कळाली तो जिजाऊचा “शिवबा” झाला...

 ●ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणुन कळाली तो मुक्ताईचा “ज्ञानदेव” झाला...

 ●ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणुन कळाली तो राधेचा “श्याम” झाला...
 ●आणि ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळाली तो सितेचा “राम” झाला...

   “प्रत्येक महान व्यक्तिच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे” म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा सलाम...!!

“ जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ”
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

जागतिक महिला दिन शुभेच्छा कविता / चारोळ्या 
 *⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
आईच्या आईपणाला 
तिच्यातील बाईपणाला 
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना 
त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना 

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा  

बायको नावाच्या अर्धांगिनीला 
तिच्यात दडलेल्या कारभारणीला 
संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला 
दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला 

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 
सख्या , चुलत , मावस  बहिणीला 
बहिणी सारख्या प्रिय वहिनीला 
त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला 
माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला 

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 

मावशी आणि आत्याला 
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला 
मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला 
शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला 

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 

आज्जीच्या संस्कार सृष्टीला  
तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला  
घरच्या आणि शेजारच्या काकूला 
सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला 

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 

मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या 
विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या 
भूत , वर्तमान , भविष्यकाळी  रणरागिनींना 
तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना 

शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 
   स्त्री शक्तीचा जागर ⛯  

नका करू गर्भपात स्त्रीभ्रूण हत्येचा
आनंदाने जगू द्या हक्क द्या जगण्याला।।

खुलण्या आधीच नका तोडू
बहरु द्या जीवनाला
सुंदर रंग दुनियेचे 
रंग भरू द्या स्वप्नांना।।

नाहीस अबला दाखव धाडस
जिंकून साऱ्या दुनियेला
अन्यायाचा नाश करोनी
दिशा दाखव जगण्याला।।

दोन्ही घराला संस्कार देणारी
संस्काराची पणती तू
आत्मनिर्भय संरक्षणाची
मशाल आता पेटव तू।।

सुखदुःखाची सावली जन्मभर साथ असते
क्षणभराची पत्नी अनंतकाळची माता असते
कितीही वार होतील जीवनावर
संरक्षण करणारी तू ढाल असते।।

एक स्त्री ...
आई म्हणून...
बहीण म्हणून...
मैत्रीण म्हणून...
बायको म्हणून...
मुलगी म्हणून...

तिच्या कर्तव्यात कधीही कमी पडत नाही
तिला हवी असते फक्त तुमची साथ

त्या प्रत्येक स्त्री ला सलाम
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

~~●~~~~●~~

"जागतिक महिला दिन"  प्रभावशाली भाषणे साठी क्लिक करा..      

  

~~●~~~~●~~


अपने वो नही होते जो 
तस्वीर में साथ खड़े होते हैं,
अपने वो हैं जो  
तकलीफ में साथ खड़े होते हैं ..!!


 

2 comments: