"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शालेय शैक्षणिक गीते ⏭


शाळेतील कार्यक्रम व इतर प्रोग्रामसाठी संपूर्ण शैक्षणिक गीते DOUNLOAD करा... 


⌘⌘⌘✽⌘✽⌘✽⌘⌘⌘⌘⌘✽

        शैक्षणिक ओवी....     
पहिली माझी ओवी ग
सरस्वतीच्या मंदिराला
विद्यार्थ्यांच्या आगमनाने
हर्ष होतो मनाला....

दुसरी माझी ओवी ग
विद्यार्थ्यांच्या कलेला
आस्वाद घेतात उपक्रमाचा
उधाण येते हो आनंदाला.....
तिसरी माझीओवी ग
शाळेतील फलकाला
रंगीबेरंगी खडूंनी सजवी
उत्साह देते अध्यापनाला...,

चौथी  माझी ओवी ग
शब्दांच्या कलात्मकतेला
विरामचिन्हांच्या सजावटीने
अर्थ येतो सुखदुःखाला.......
पाचवी माझी ओवी ग
वंदनीय गुरूजनांना
अध्यापन करूनी छान
घडविती विद्यार्थ्यांना......

सहावी माझी ओवी ग
संस्कारीत विद्यार्थार्थ्यांना
उद्याचे भावी नागरीक ते
वंदन करिती गुरूजनांना.....

       वसुधा नाईक,पुणे







5 comments:

  1. खुपच छान सर. .....

    ReplyDelete
  2. सर खुप छान फार आवडली सर अती सुंदर

    ReplyDelete
  3. खुपच छान..

    ReplyDelete
  4. खूप छान 🙏🙏👌👌👍👍

    ReplyDelete