"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

"माझी शाळा" आमचे उपक्रम

💿 घाटकिन्ही (तांडा)आमची शाळा.. आमचे उपक्रम...






छत्रपती शिवाजी महाराज जयंती व "संत सेवालाल महाराज गार्डन" उद्घाटन समारंभ ...
    दिनांक 19/02/2024 ला जि.प. उच्च प्राथमिक मराठी शाळा घाटकिन्ही तांडा केंद्र तळेगाव येथे सर्व विद्यार्थी व गावकऱ्यांच्या साक्षीने उत्साहात संपन्न..

  गावातील तरुण मित्रमंडळी व प्रतिष्ठित नागरिक यांच्या पुढाकाराने समाज सहभागातून तीस हजार रुपये खर्च करून संत सेवालाल महाराज गार्डन जि.प. उच्च प्राथमिक मराठी शाळा घाटकिन्ही तांडा केंद्र तळेगाव पंचायत समिती दारव्हा येथे
तयार करण्यात आले.

     गावकऱ्यांच्या पुढाकाराने साकारलेल्या "संत सेवालाल महाराज गार्डन" चा उद्घाटन समारोह सोहळा ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती घाटकिन्ही तांडा..  
 आयोजित कार्यक्रम गावकऱ्यांच्या साक्षीने मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला.
★कार्यक्रम अध्यक्ष★
💎डॉ. मनोज राठोड सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ दारव्हा
★उदघाटक ★
💎श्री. राजीव शिंदे, गट विकास अधिकारी दारव्हा
★प्रमुख अतिथी★
🔸श्री. विलास जाधव गट शिक्षणाधिकारी दारव्हा
🔹श्री. रमेश राठोड मुख्याध्यापक तथा प्रशासन अधिकारी नगरपरिषद दारव्हा
🔸श्री. राजेन्द्र चिंतकुटलावार, से.नि. तहसीलदार
🔹श्री. मुकेश महाराज चुडे, माजी सैनिक सामाजिक प्रबोधनकार दारव्हा
🔸श्री गणेश राऊत गट समन्वयक दारव्हा,
🔹श्री. अजय शिरडे तंत्रस्नेही शिक्षक

    इत्यादी मान्यवर सोबत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य गण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व सदस्य, तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

    संतोष जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, चेतन राठोड शिवसेना शाखा प्रमुख, नितीन चौधरी सामाजिक कार्यकर्ते, बाहुटे मॅडम ग्रामपंचायत सचिव, विशाल झाडे उपक्रमशील विषय शिक्षक, कर्तव्यदक्ष ज्येष्ठ शिक्षक अर्जुन जाधव, ज्योती काळदाते मॅडम विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षिका, विष्णू पवार शा. पो.आ. कार्यवाहक, ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती सदस्य यांनी संत सेवालाल महाराज गार्डन उभे करण्यापासून नियोजनबद्ध उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. शिक्षक प्रिय केंद्रप्रमुख भूपेश आवारे यांच्या मार्गदर्शनात सर्व नियोजन करण्यात आले.
   विशेष विशेष सहकार्य  महेश चव्हाण अतिश राठोड, मुरली राठोड यांच्या पुढाकाराने संत सेवालाल महाराज गार्डन साकार झाले. 

   जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल सहभागी सर्व विद्यार्थी व यांना मार्गदर्शन करणाऱ्या ज्योती काळदाते मॅडम यांचा विशेष सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. 

   प्रमुख अतिथी व गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांनी शाळेचे मुख्याध्यापक सतीश बोरखडे सर विषय शिक्षक विशाल झाडे सर अर्जुन जाधव सर व ज्योती काळदाते मॅडम यांनी केलेल्या शाळेतील  विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्यामुळे सर्वांचे विशेष कौतुक व गौरव केला.
➖➖➖➖➖➖➖➖
✍️सतीश बोरखडे, मुख्याध्यापक
जि.प. उच्च प्राथमिक मराठी शाळा घाटकिन्ही तांडा
➖➖➖➖➖➖➖➖➖
माझी शाळा "सुंदर शाळा"

➖➖➖➖➖➖➖➖➖





वार्षिक स्नेहसंमेलन संपूर्ण गावाच्या साक्षीने उत्साहात संपन्न...
💢💢💢🍥💢💢💢
जि.प.उच्च प्रा.म.शाळा घाटकिन्ही (तांडा) केंद्र तळेगाव

🔺वार्षिक स्नेहसंमेलन संपूर्ण गावाच्या साक्षीने उत्साहात संपन्न...

  *26 जानेवारी 2024 ला आज प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन घाटकिन्ही(तांडा) येथील संपूर्ण गावाने आमच्या बालगोपालांच्या सर्व कलाविष्कार साठी गावकऱ्यांतर्फे 7800/- बक्षीस विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन कौतुक करून स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. विशेष आकर्षण घुंगट ओढले न व पाढे झेंडा नृत्य ठरले.
 🔺 प्रमुख उपस्थिती 🔺
*★सौ. सीमा नितीन चौधरी सरपंचा*
*★श्री.संतोष जाधव शाळा व्य. समिती अध्यक्ष
*★श्री. किसन जाधव उपसरपंच
*★श्री.चेतन राठोड माजी सरपंच

*★श्री.प्रदीप जाधव तंटामुक्ती अध्यक्ष

  ग्रामपंचायत सर्व सदस्यगण, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, सेवालाल तरुण मित्र मंडळ ग्रुप व  गावातील सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व पालक आज शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते.

    ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य तर्फे विविध उपक्रमात/ स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना 4500/- रुपयांच्या भेटवस्तू पाहुण्यांच्या हस्ते देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
    तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या भारत हमको जान से प्यारा है नृत्यातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
   मुख्याध्यापक सतीष बोरखडे, विषय शिक्षक विशाल झाडे, अर्जुन जाधव सर,  कु. ज्योती काळदाते मॅडम, शा.पो.आ. कार्यवाहक विष्णू पवार या सर्वांनी आयोजन नियोजनासाठी मेहनत घेतली. मान्यवरांनी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजनासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला शिक्षक प्रिय केंद्रप्रमुख शाम आवारे सर यांनी मार्गदर्शन केले.*
➖➖➖➖➖➖➖➖
 *✍️सतीष बोरखडे, मुख्याध्यापक उच्च प्रा.म.शाळा घाटकिन्ही (तांडा)*
➖➖➖➖➖➖➖➖



🟣🟣🤞🤞🟢🟢

   शाळा पूर्व तयारी मेळावा*
  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा देऊळगाव (वळसा)
💐💐🙏🌹🙏💐💐




"वाचन प्रेरणा दिन..."

    १५ आॕक्टोबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते.
    त्याचप्रमाणे आज १५ आॕक्टोबर
जि.प.ऊ.प्रा.मराठी शाळा देऊळगाव, पं.स. दारव्हा येथील शाळेत आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांना जयंती निमित्ताने शाळेतील उपस्थित शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.

  आदरणीय डॉ. अब्दूल कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.

   पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आमच्या शाळेत "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आली.
   वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.
🟣🔵 🟩🟡🟢
 'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे.

  लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे.
  वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.

    !!वाचाल तरच वाचाल !!
'वाचाल तर वाचाल !' हे ब्रीद मानू या धन,
 वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन.
 ¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 🔻 एकच ध्यास... गुणवत्ता विकास...!!
   जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव  ⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸

*एकच ध्यास...  गुणवत्ता विकास...!!*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

👨‍💼 ♦शाळा प्रवेशोत्सव..l 👨‍💼*
👬👭👭👬👬👭👭👬



    शाळा प्रवेशोस्त्व व सामाजिक न्याय दिन हर्षोसत्व, नुतन शैक्षणिक सत्रात नवागतांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वाटप, खाऊवाटप, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्प देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत...!!

  ◆ वर्ग १ ला मधील विद्यार्थ्यांना उत्सवात शाळेत आनन्यात आले.

   जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी... 

★ मा. उषाताई प्रेमसिंग चव्हाण
            सभापती पंचायत समिती दारव्हा,

   यांची शाळेला भेट व प्रवेशोत्सव कार्यक्रमा साठी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्या व बांधकाम पाहणी करून शालेय कार्यक्रमाचे कौतुक केले..

   लोककल्याणकारी व शिक्षणप्रेमी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमा पूजन *मा. उषाताई प्रेमसिंग चव्हाण सभापती* पंचायत समिती दारव्हा यांचे हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाट्यपुस्तके वाटप करण्यात आले.

    कार्यक्रमाचे संचलन सतिष बोरखडे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन जेष्ट शिक्षक प्रमोद गोरटे सर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत विनोद केळकर सर, उषा फाटेकर मॅडम, मेघा वासे मॅडम यांनी केले. शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

    मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून  वाहणारा आनंद खरोखरच अवर्णनीयचं ...!! प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका, व शाळा व्यवस्थापन समिती देऊळगाव यांनी परिश्रम घेतले.
 ¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
 🔻 एकच ध्यास..... गुणवत्ता विकास...!!
   जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव  ⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸



        जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव स्वातंत्र्यदिन समारोह देऊळगाव
══════════✽≡✽══════════
➡  नियोजनबदध प्रभातफेरी

➡ पदाधिकारी व मान्यवर ग्रामस्थांचे उपस्थितीत ध्वजारोहन.

➡ प्रमुख उपस्थिती
★मा. आश्विनीताई कुरसिंगे सदस्य,  जिल्हा परिषद यवतमाळ

★ मा. योगिताताई किशोर राठोड,  सरपंचा देऊळगाव

★ मा. राजुभाऊ राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष देऊळगाव

★ मा. मनोज राठोड, शा. व्य. समिती अध्यक्ष देऊळगाव

➡  शालेय मंत्री मंडळाचे हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत

*➡विद्यार्थी दैवतांची देशभक्तीपर गीते, मराठी, हिंदी, इंग्रजी व बंजारी भाषेतून ठसकेबाज भाषणे व विविध कला गुणांचे प्रदर्शन

*➡ उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदाधिकारी यांचे कडून 500 रूपयाचे बक्षीसे दिली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य
बक्षीसे रुपात दिले.
*➡ कार्यक्रमाचे संचलन सतिष बोरखडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जेष्ट शिक्षक प्रमोद गोरटे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री विनोद केळकर मुख्याध्यापक, उषा फाटेकर मॅडम, मेघा वासे मॅडम, सतिष दुधे सर यांनी केले. शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

     धन्यवाद..!!
 ¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
     एकच ध्यास... गुणवत्ता विकास...!! जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव
     ⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸

¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
शाळा प्रवेशोत्सव जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव 



      नुतन शै.सत्रात (2018--19) नवागतांचे स्वागत (वर्ग 1 ला प्रवेशपात्र), पाठ्यपुस्तक वाटप, खाऊवाटप, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्प देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत...!!

   विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षण समिती सदस्य गावात प्रभातफेरी काढुन वर्ग १ ला मधील विद्यार्थ्यांना उत्सवात शाळेत आनन्यात आले.
  🟣🔵🟥💜 🟢
   जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी

★मा. उषाताई चव्हाण सभापती
       पंचायत समिती दारव्हा, व
★मा. आश्विनीताई कुरसिंगे सदस्य
          जिल्हा परिषद यवतमाळ

   यांची शाळेला भेट व प्रवेशोत्सव कार्यक्रमा साठी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्या व विद्यार्थी उपस्थिती साठी कौतुक केले..

लोककल्याणकारी व शिक्षणप्रेमी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमा पूजन *मा. उषाताई चव्हाण सभापती* पंचायत समिती दारव्हा, व *मा. आश्विनीताई कुरसिंगे सदस्य जिल्हा परिषद यवतमाळ* यांचे हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाट्यपुस्तके वाटप करण्यात आले.

   कार्यक्रमाचे संचलन सतिष बोरखडे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन जेष्ट शिक्षक प्रमोद गोरटे सर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत विनोद केळकर सर, उषा फाटेकर मॅडम, मेघा वासे मॅडम, सतिष दुधे सर यांनी केले. शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

    मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून  वाहणारा आनंद खरोखरच अवर्णनीयचं ...!! प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका, व शाळा व्यवस्थापन समिती देऊळगाव यांनी परिश्रम घेतले.

 ¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
     *एकच ध्यास...  गुणवत्ता विकास...!!*
   जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव
     ⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

    मुख्यध्यापक संजय बिहाडे यांचा वाढदिवस...
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄





No comments:

Post a Comment