"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन

 

स्वागतम स्वागतम सुस्वागतम..!!

उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला...

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला...

ज्यांनी लिहिली संविधानाची पवित्र गाथा...!

त्यांच्या चरणी ठेवीतो माथा...!!


    मी सतीश बोरखडे सर्वप्रथम सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करतो.


   देशासाठी लढणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून आज सर्व भारतभर हा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो भारत देश स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्या सर्वांसाठी एवढेच मला वाटेल...

अहो झुकर सलाम करे उनको

जिनके हिस्से मे ये मुकाम आता है...!

खुश नसीब होता है वो खून

जो देश के काम आता है...!!

★स्थानापन्न करणे ~

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आपणास सर्वांना सुपरिचित असलेले माननीय श्री .............    

यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो

आपल्या विनंतीस मान देऊन आजच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री........  यांनी प्रमुख अतिथी म्हणून स्थान स्वीकारावे अशी मी विनंती करतो.

★ध्वज पूजन प्रतिमापूजन दीप प्रज्वलन~

   उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करावे...

सुमंगल या वातावरणात

संचारुणी आली देशभक्ती...

मान्यवरांच्या शुभहस्ते

प्रजल वित्त कराव्या ज्योती...!!


★ ध्वजारोहण ~

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय

यांनी ध्वज स्तंभाचे पूजन व ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो

ध्वजा रोहन नंतर विद्यार्थी राष्ट्रगीत व नारे

भारत माता की जय...!!

◆विजयी विश्व तिरंगा प्यारा समुगान घेण्यात यावे...

◆नंतर महाराष्ट्र गीत...

★पाहुण्यांचे स्वागत~

   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष....  यांचे स्वागत उत्कृष्ट उपक्रमशील मुख्याध्यापक

श्री..... करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय

1) ......  

2) ......

3) ......

4) ......

कर्तव्यदक्ष ज्येष्ठ शिक्षक श्री....... 

उपक्रमशील विषय शिक्षक श्री.....

विद्यार्थी प्रिय उपक्रम शिक्षिका कु. ........ 

   मंचावरील प्रमुख अतिथी यांचे स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

 इतर मान्यवर यांचे स्वागत घेण्यात यावे.


निळ्या शार यां नभा मध्ये..

तिरंगा माझा दिमाखात डोलतो आहे..!

सांगण्यास तयाची थोरवी..

मी आज गर्वाने बोलतो आहे...!!

★ स्वागत गीत ~

भावना हृदयात तयार होतात

शब्दांच्या रूपाने त्या ओठावर येतात

त्यातूनच साकारल्या जातात खऱ्या प्रेरणा...

    स्वागत गीत घेऊन येत आहे आमच्या शाळेतील गीत मंचाचे विद्यार्थी आणि संच...

★ प्रस्ताविक ~

    जमान्यवरांचा आशीर्वाद घेऊन

साथ द्यावी सर्वांनी मिळून

आजच्या कार्यक्रमाचा उद्देश

जाणून घ्यावा प्रास्तविकेतून

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेतील मुख्याध्यापक श्री...... हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

    आजचा दिवस मांगल्याचा! आजचा दिवस भारतीय गणराज्याचा। आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा। माझा- तुमचा सगळ्यांचा…

अनेकता मे एकता...

इस देश की शान है...!

इसीलिए गर्व से कहता हू...

मेरा भारत महान है...!!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिन या दिवसापासून झाली.

या शुभप्रसंगी देशसेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या...महात्मा गांधी, लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू यासारख्या सर्व महान विभूतींना त्रिवार वंदन !

भारतमातेचे पांग फेडण्यासाठी आपल्या प्राणाचे हसतमुखाने बलिदान करणारे भगतलसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांच्या सारख्या शूर वीरपुत्रांना श्रद्धांजली ! लढावयास देशाच्या सीमेवर निधड्या छातीने डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणाऱ्या शेकडो भारतीय जवानांना प्रणाम...!! मातृभूमीच्या रक्षणासाठी तिला आपल्या रक्तानं अभिषेक घालणाऱ्या सर्व भारत मातेच्या निधड्या छातीच्या शेकडो शूर वीरांना शतशः नमन !

   राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

मला देशाने सर्व काही द्यावे ही अपेक्षा न करता मी देशासाठी मी काय देऊ शकतो याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. सर्व भारतीयांनी देश प्रेमाचे विचार मनात ठेवून देशभक्ती हृदयातजोपासण्याची आज आवश्यकता आहे.. एवढे बोलून माझ्या प्रास्तविकास पूर्णविराम देतो धन्यवाद,.

★ विद्यार्थी व शिक्षक भाषणे~


★ अध्यक्ष भाषण ~

    आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेच्या प्रत्येक उपक्रमासाठी आवश्यक तिथे सहकार्य करणारे श्री... हे आमच्या शाळेतील विद्यार्थी व उपस्थित सर्वांना देशभक्ती ची प्रेरणा मिळेल यासाठी आपले मौलिक विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो.

★आभार~ 

कार्यक्रम झाला बहारदार... 

भाषणेही झाली जोरदार...

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार...

तेव्हा मानले हेच पाहिजे सर्वांचे आभार...!!

    आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी कष्ट घेतले व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.

थेंबा थेंबाने तलाव भरतो...

हाता हाताने कार्यक्रम फुलतो....

जेथे तेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार..!

तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार..!

आजच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री.... तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री..... तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आजच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा......... तर्फे आपणा सर्वांचे पुनश्च मनःपूर्वक आभार मानतो.


यहा प्रेम की भाषा हे सर्व परी... 

जहा धर्म की आशा है सर्व परी... 

ऐसा है मेरा देश हिंदुस्तान जहाँ देशभक्ती की भावना है सर्व परी...!!

अध्यक्षांच्या परवानगीने प्रजासत्ताक दिन कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो.

जय हिंद....!

जय भारत... जय महाराष्ट्र...!!

$$$$$$$★★★★★$$$$$$


प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पत्रिका

★ प्रभात फेरी 

★ पाहुण्यांचे आगमन

★ स्थानापन्न करणे

★ प्रतिमा पूजन  

★ ध्वज पूजन  :-

★ ध्वजारोहण  :-

★ राष्ट्रगीत  :-

★ ध्वज सलामी  :-

★ संविधान प्रास्ताविक वाचन :-

★ पाहुण्यांचे स्वागत :-

★ ध्वजगीत :-

★ प्रास्ताविक :-

★ विद्यार्थी भाषणे :-

★ पाहुण्यांचे मनोगत :-

★ आभार प्रदर्शन :-

★ खाऊ वाटप :-

● प्रजासत्ताक दिन कार्यक्रम दुसरा टप्पा ●

★ विद्यार्थी विविध स्पर्धा

★ लेझीमगीत

★ पाढे कवायत

★ सांस्कृतिक कार्यक्रम







No comments:

Post a Comment