सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची
तसेच, आमच्या परिपाठाला साथ असते काही विद्यार्थ्याची...
"ढगातील पावसाची पडते, धरणीशी गाठ...
अशा या सुंदर समयी,
सादर करत आहोत आम्ही परिपाठ"
माझे नाव ........ मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.
"संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट
इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट,
इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट,
अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ...
म्हणून आज आम्ही इयत्ता......वी मुले/मुली परिपाठ सादर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने एकून घ्यावा हि नम्र विनंती.
=======================
राष्ट्रगीत
सावधान, विश्राम
सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
आणि भारताचा भाग्यविधाता..
अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा..
गाऊनी राष्ट्रगीता,गाऊनी राष्ट्रगीता...!!
सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर...=======================
राष्ट्रवंदना
राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा पिता
राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा दाता
या राष्ट्रा करूया वंदन
तोडूनी साऱ्या धर्मांचे बंधन
एकसाथ राष्ट्रवंदना शुरू करेंगे शुरू कर
=======================
देशा विषयी प्रेम मोठ्यां विषयी आदर
करून घेऊ बंधुभाव व कर्तव्याची जान
उजळू सर्वांची प्रज्ञा...
घेऊन प्रतिज्ञा,घेऊन प्रतिज्ञा...!!
एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर...======================
संविधान
लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
घेऊनी भारताचे संविधान
घेऊनी भारताचे संविधान
एकसाथ संविधान शुरू करेंगे शुरू कर...
======================
सुविचार
सांगून सर्वांना थोरांचे विचार...
रुजवू विचारातून संस्कार...
सांगून सुविचार,सांगून सुविचार...!!
सुविचार सांगण्यासाठी येत आहे-------
B) माणुसकी खूप कमी होत चाललीय. ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होत. विज्ञान सांगते उद्या सुख असेल. पण माणुसकी सांगते, जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते. आणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.......
=======================
आजचे पंचांग
A) आपल्याला वार , दिनांक , शके यांची माहिती असणे अवश्यक असते, म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे.........=======================
आजचे दिनविशेष
A) नवीन दिवस नव्या उम्मेदी जरा शोधूया.नवीन वाटा प्रकाशाकडे वाटचाल अन अंधाराच्या थोपवू लाटा.खरच येणारा दिवस कालच्या पेक्षा अधिक आनंदाने,उत्साहाने आणि चांगल्या दृष्टीकोण जगायचा असतो आजचा दिवस हि असाच आहे.म्हणून आजच्या दिवसाचे महत्व दिनविशेषातून सांगण्यासाठी दिनविशेष घेऊन येत आहे......
B) कधी सोनेरी, कधी काळा दिवस असतो विशेष
घेऊन येत आहे...... आजचा दिनविशेष...
Assembly in English CLICK HERE..
=======================
आजच्या बातम्या
A) आपल्या शिक्षकांची आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजचे बातमी पत्र घेऊन येत आहे....C) आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे.............
D) काय घडले जगात काय घडले देशात...
जाणून घेऊया आजच्या बातम्यात...!!
बातम्या सांगण्यासाठी येत आहे -------
=======================
बोधकथा
A) सर्व काही मनासारखं होत नाही,पण मनासारखं झालेलं विसरू नका. आणि अशा या जीवनात वेळोवेळी कठीण प्रसंग हे येणारच पण कठीण प्रसंगी आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे. म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे......C) खूप काही शिकून जाते जाता जाता म्हणून रोज ऐकायची असते एक छोटीशी बोधकथा म्हणून आजची बोध कथा सांगण्यासाठी येत आहे......
D) संस्काराशी नाते जडे...
बोधकथेतून घेऊ धडे...
बोधकथा सांगण्यासाठी येत आहे-----
=======================
सामान्य ज्ञान
A) उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते, अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो. तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्या साठी ज्ञानाची गरज असते , म्हणून सामान्य ज्ञान घेत आहे......
B) प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ दे लाख चूका खरंच माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो.अन आयुष्यभर विद्यार्थी म्हटल्यावर प्रश्न हे पडणारच तसेच आम्हाला हि काही प्रश्न पडले आहेत बघूया तुम्हाला त्याची उत्तरे येतात का?म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे......
C) सागरा समान विस्तृत ज्ञाना
थेंब थेंब मी वेचून घेतो
सामान्य ज्ञानातून मिञा
मोती होवून चमकून जातो
सामान्य ज्ञान सांगण्यासाठी
येत आहे ---------
D) आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात. काही सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक, शैक्षणिक वगैरे... आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत. बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे...
❂~◆~●~~●~~●★●~~●~~●~◆~❂
❂~◆~●~~●~~●★●~~●~~●~◆~❂
प्रार्थना गीत
साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
त्यांचे रचित गाऊया गान
त्यांचे रचित गाऊया गान
एकसाथ ....... शुरू करेंगे शुरू कर....
=======================
स्फूर्ती गीत
राह पे चलते वक्त
मुसिबते तो आयेगी
स्फुर्तीगीतोंसे वों कंही
दूर भाग जायेगी
एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे शुरू कर....
=======================
कोडे
A) छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच मिळत नसत.असंख्य चांदण्यांनी भरूनही आपलं आभाळ मात्र रिकामं असतं.हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात.पण नमिळणाऱ्या गोष्टीच का माणसाला हव्या असतात? म्हणून म्हणतात जीवन एक खेळ नव्हे,फुकट मिळालेला वेळ नव्हे जीवन एक कोडे आहे.सोडवला तितके थोडे आहे.म्हणून जीवनासारखे एक मजेदार कोडे घेऊन येत आहे....
B) आपलं आयुष्य हे कोड्याप्रमाणेच असतं. थोडं कठीण,थोडं सोप तर थोडं मजेदार... आजचे कोडे हे आयुष्यासारखेच आहे. थोडे कठीण, थोडं सोप तर थोडं मजेदार म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे ......
=======================
इंग्रजी संवाद
A) आपल्याला इतर विषयाबरोबरच इंग्रजी विषयही सोपा वाटावा. म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दाबरोबर आपल्याला छोटे छोटे संवाद सादर करता आले पाहिजेत. म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे...
B) इंग्रजी भाषा हि आंतरराष्ट्रीय भाषा आहे.त्याचा पाया मजबूत होण्यासाठी शब्दार्था बरोबर छोटे छोटे संवाद येणे गरजेचे आहे म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे....
=======================
स्वच्छतेची प्रतिज्ञा
तन-मनास देण्यास आज्ञा
घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा...
एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर
=======================
पसायदान
समाज उद्धरण्या मागीतले दान
ज्ञानेश्वरांचे पसायदान...
एकसाथ पसायदान शुरू करेंगे शुरू कर...
समारोप
A) शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन
"जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका...
येईल तारावयास कोणी
वाट कुणाची पाहू नका..,
यश तुमच्याजवळ आहे.
जिंकल्याशिवाय राहू नका...!!
B) शेवटी जात जात एवढंच म्हणेन
"किती क्षणाच हे आयुष्य असतं...
आज असतं तर उद्या नसतं...
म्हणून ते हसत हसत जगायचं असतं ...
कारण येणारे दिवस येत असतात,
जाणारे दिवस जात असतात,
येणाऱ्यांना घडवायच असतं,
जाणाऱ्यांना जपायच असतं,
अन आयुष्याच गणित सोडवायच असतं,
म्हणूनच कधीतरी कोणासाठी तरी जगायच असतं..!!
C) प्रत्येक माहिती नवीन मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.
=======================
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
Very Good
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice job sirji
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteछान खूप छान
ReplyDeleteखूपच छान सरजी..
ReplyDeleteVery Nice....
💐💐💐💐💐💐💐💐
Very nice sir
DeleteVery Nice sir
DeleteNice
DeleteVery nice sirji
ReplyDeleteEnglish hidi cha paripath avshk
ReplyDeleteVery nice congratulations sir
खूप छान
ReplyDeleteखूपच उपयुक्त माहिती.
ReplyDeleteThanks all frends
ReplyDeleteSuper very nice
ReplyDeleteपरिपाठ सूत्रसंचालन खूप छान याचप्रमाणे इंग्रजीतून तयार केले तर भरपूर vidyarthaविद्या फायदा होईल
ReplyDeleteChhan upakram aahe sir
ReplyDeleteअतिशय सुंदर सुत्रसंचलन तयार केले सर.केवळ अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम.
ReplyDeleteबहुत बढिया सरजी
ReplyDeleteVerry good sirji
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteVery best Sirji
ReplyDeletevery nice!
ReplyDeleteNice
ReplyDeleteThanks all frends...
ReplyDeleteGood Job
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअतिशय सुंदर छान.....
ReplyDeleteखूप सुंदर 💐💐💐
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteअतिशय सुंदर परिपाठ नियोजन सरजी
ReplyDelete