विषय शिक्षक आंदोलन का करत आहोत...
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
1) सर्व विषय शिक्षक 100% वेतनश्रेणी लावण्यासाठी
2) नगरपरिषद विषय शिक्षकांचा प्रश्न
3) नवनियुक्त विषय शिक्षकांचे वेतनश्रेणी
4) विषय शिक्षक रुजू झालो तेव्हापासून वेतन वाढ
5) एकस्तर विषय शिक्षक पाच तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न
6) सेवानिवृत्त झाले पण विषय शिक्षक वेतनश्रेणी लागू झाली नाही.
7) नवीन जी.आर. नुसार विषय शिक्षक निर्धारण अन्यायकारक आहे.
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
वरील सर्व प्रश्नांच्या निरकरणासाठी महाराष्ट्रातील विशेष शिक्षक एकत्र आलो आहेत. आपले विषय शिक्षकांचे प्रश्न निकाली निघेपर्यंत आम्ही सर्व विषय शिक्षक लढा देत राहणार.
✍️सतीश बोरखडे जिल्हा समन्वयक
🔗🔗🔗🔗♦️🔗🔗🔗🔗🔗
🟣 "5 सप्टेंबर विषय शिक्षक सरसकट वेतनश्रेणी यशस्वी आंदोलन आझाद मैदान यवतमाळ"
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करण्यासाठी जिल्ह्यातील उमरखेड पासून झरी पर्यंतच्या सर्व तालुक्यातून उपस्थित विषय शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवून सरसकट वेतनश्रेणीची हाक यशस्वी रित्या शासनापर्यंत पोहोचविली...
आंदोलनासाठी उपस्थित सर्व विषय शिक्षक बंधू भगिनी जिल्हा शिक्षक नेते व आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्य करणारी सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन.. या आंदोलनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या या सर्वांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचे धन्यवाद...
★ यवतमाळ जिल्हा समन्वयक ★
सचिन तंबाखे, सतीश बोरखडे, मनीष नाकतोडे, झहीर शेख, डॉ संदीप तंबाखे, राजहंस मेंढे, रवी आडे, विशाल झाडे, प्रवीण थुल, पुष्पजित राणे, प्रशांत उमरतकर, तेजस्वी भगत, चंदा तागडे...
🔺 यवतमाळ जिल्हा तालुका तालुकासमन्वय - ●नेर - १) सुभाष राऊत, २) प्रभू कोल्हे, ३) विजयश्री वट्टी
◆राळेगाव - १) भागवत चौधरी, २) कुणाल-भगत
●पुसद -१) इम्रान खान, २) शरद काळे ३) सावन गव्हाणे
◆दारव्हा प्रमुख - १) गौतम ढळे, २) मंगेश वानखडे, ३) अमोल गायके
●वणी -१) नागोराव ढेंगळे, २) गजानन जेऊरकर सर
◆बाभूळगाव - १) परिपगार सर, २) नरेंद्र परोपटे, ३) मोहन कामडी
●मारेगाव - १) संजय फुलबांधे, २) विजय घोडमारे
◆महागाव - 1) किरण राठोड, 2) महेश रावेकर
●घाटंजी - १) अविनाश खरतडे, २) कुलदीप डंभारे
◆पांढरकवडा - १) कैलास चव्हाण, २) आनंद चिंचोले
●दिग्रस - १) मिलिंद भगत, २) नितीन साबळे
●यवतमाळ - १)विनोद शिंदे २)मीना गावंडे
३) कीर्ती पेटकर
◆झरी- १) रमेश मदीकुंटावार, २) चेतन सुरपाम
●उमरखेड -१) राजेंद्र पाटील, २) किरणकुमार कार्लेवार ३) अमोल पाईकराव ४) नारायण गारशेटवाड
◆आर्णी- 1) महेंद्र बी पाटील,
२) रंजना नालेंद्रवार
●कळंब-1) सुनिल थूल, २) मनीष लढी
पदवीधर विषय शिक्षकांनो सस्नेह नमस्कार....
नुकतेच 5 सप्टेंबर चे आंदोलन राज्याच्या विविध जिल्ह्यात यशस्वीपणे पार पडले त्याबद्दल आपले अभिनंदन. त्यानंतर नागपूर पदवीधर संघर्ष समितीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आपला विषय राज्याच्या प्रमुख नेत्यापर्यंत थेटपणे पोहोचला. बुलढाणा टीमच्या सोबत फडणवीस साहेबांचे ओएसडी महाले साहेब यांची भेट आपण घेतली होती. त्यावेळीही अतिरिक्त मुख्य सचिव वित्त यांना पत्र उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून गेलेले होते. यापूर्वी आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून आपण 3 वेळा तारांकित प्रश्न केले आहेत. त्यातूनच अभ्यास गट निर्माण झाला. त्यामुळे विधिमंडळाच्या पटलावर हा प्रश्न आलेला आहेच....
विविध जिल्ह्यातील शिलेदारांनी पदवीधर वेतनश्रेणी संघर्ष समितीच्या माध्यमातून तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे, ना. वर्षा गायकवाड, विरोधी पक्ष नेते ना विजय वडेट्टीवार, राज्याचे मंत्री ना सुधीरभाऊ मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन, ना पंकजाताई मुंडे, कामगार मंत्री ना सुरेश खाडे, मा. रावसाहेब दानवे, मा. भागवत कराड, मा. अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक आमदारांच्या आपण भेटी घेतल्या आहेत...
आता विषय आहे, या नेत्यांच्या मार्फत पाठपुराव्याचा. केवळ निवेदन देऊन भागणार नाही. ज्या पत्रावर त्यांनी स्वाक्षरी केली व आदेशीत केले ते पत्र संबंधित विभागात पोहोचले का? त्यावर काय कारवाई झाली? हे आपल्याला पाहावे लागेल. शिक्षण विभागाला पत्र देऊन आता उपयोग नाही. कारण त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले आहे. आपला प्रश्न वित्त विभागात अडकला आहे. वित्त विभागात आपली संबंधित मंत्री लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत एक बैठक होणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण आपली बाजू मांडू शकतो.
मंत्रालयात भेटी दरम्यान लक्षात आले की, आपल्या विषयाच्या अनुषंगाने 25% नंतर 33% ना वेतनश्रेणी इ. बाबत कन्फ्युजन आहे. त्यांना तो विषय नीट कळलेला नाही म्हणून आतापर्यंत या विषयाला न्याय मिळालेला नाही. परिणामी राज्यभरात वेगवेगळी स्थिती निर्माण झालेली आहे. याशिवाय ज्या 13 जिल्ह्यात वेतनश्रेणी सुरू आहे. त्याचा उल्लेख शिक्षण विभागाने कुठेही केला नाही. त्यामुळे सर्वांना वेतनश्रेणी दिल्यास राज्यावर मोठा आर्थिक भार वाढतो असे वित्त विभागाला वाटत आहे. या बाबी आपण केवळ मंत्री सोबत असतील किंवा प्रत्यक्ष बैठक असेल तरच मांडू शकतो. निवेदनाच्या वेळी मांडलेले मुद्दे तेवढे लक्षात घेतले जात नाहीत. या बाबी जोवर स्पस्ट होत नाहीत तोवर वित्त विभागाचे क्लियरन्स मिळणार नाही.
सर्वात शेवटचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे घेऊन जाणारा व आपली बाजू मांडणारा त्यांच्या पक्षाचा नेता आपणास शोधावा लागेल. म्हणजे विषय मार्गी लागण्यास अजून सोपे जाईल..
धन्यवाद...
आपला
*देवेंद्र बारगजे*
राज्य निमंत्रक/समन्वयक
प्राथमिक पदवीधर-विषय शिक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य
No comments:
Post a Comment