निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हटले की ते भावनाप्रधान असते. अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना ज्यांना निरोप दिला जात आहे त्यांच्या कार्याचा , आठवणीचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याला उजाळा दिला पाहिजे. याप्रसंगी केलेले निवेदन हे क्लेशकारक किंवा कुणाच्या भावना दुखविणारे असता कामा नये. तसेच ते एवढे गंभीरही होता कामा नये ,की त्यामुळे मुळ कार्यक्रम बाजूला राहुन जाईल.. निरोप देणाऱ्यांचा सत्कार, त्यांचे कौतुक, त्यांची पुढे जाणवणारी उणीव.. याची मांडणी सूत्रसंचालनात ओघवत्या स्वरुपात यावी.
निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं तर थोडं हसायच सुद्धा असतं... जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी ते गालावर आणायच नसत . निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हातात हात केवळ स्पर्श सांभाळायचा असतो मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात मधुन साद मात्र आपण दयायचा नसतो प्रतिसाद . निरोपाच्या वेळी फक्त एकच करायचं असतं , दुस-याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सूर्याचे हृदयही पाघळते
दिवस मावळत आल्यावर
कठोर मनेही हळवी होतात
निरोप समारंभ जवळ आल्यावर...
❂~◆~●~~●~~●★●~~●~~●~◆~❂
*🎤निरोपासाठी...*
निरोपाचा क्षण जणु
हळव्या तो फुलांचा...
आठवांची जणु गर्दी
क्षण हा विरहाचा...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
नको नको वाटे निरोप
घेऊन येतो दुःखद क्षण...
पण गाठण्या ते यशोशिखर
घेऊ शपथ प्रत्येक जण...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोप दयायचा आहे कोणाला
अन् निरोप घ्यायचा कुणी...
आपण सारेच तर आहोत
या जगती निरोपाचे धनी...
निरोप समारंभासाठी.......
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
कोणताही माणूस आपल्या. कार्यकौशल्यावर आपले जीवन घडवत असतो जीवनात आलेल्या प्रत्येक सवालाचा जबाब शोधत असतो जबाब छान दिले तर तो लाजबाब होत असतो असे आमचे लाडके मुख्याध्यापक श्री ........ यांच्यासाठी
आप जैसे भी हो हमारे दिल मे हो!!!!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या आठवणी देऊन जाईन…
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
निरोप द्यावा निरोप घ्यावा
परी न क्लेश मनी ठेवाल
आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा
स्मितवदन जरुर कराल😊
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
काही नाती तुटत नाहीत
ती आपल्या नकळत मिटून जातात.....
जशी बोटांवर रंग ठेवून.....
फुलपाखरंहातातून सुटून जातात....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
★एक कविता खास निरोप समारंभ कार्यक्रमा साठी...★
...निरोपाच्या वेळी
....असे गुंतवायचे नाही हातात हात....
स्पर्श फक्त सांभाळायचा
रेशमी मखमली मृदू ह्रदयात.।
...निरोपाच्या वेळी.....
...असे मोजायचे नाहीत भूतकाळातले क्षण
धूवून स्वच्छ ठेवायचे
झाले गेलेले व्रण।।
....निरोपाच्या वेळी
असे थांबवायचे नाही एकमेकांना
वाटेवर अंथरायचं
जवळच्या सुगंधी फुलांना...।।
.....निरोपाच्या वेळी....
अशा आठवायच्या नाहीत कटू आठवणी...
आठवायचे ते फक्त
गोड सुगंधी क्षण....।।
.....निरोपाच्या वेळी....
फक्त एक करायच
समोरच्याच्या ङोळयातलं पाणी
आपल्या ङोळयात घ्यायच......
......................................
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
.....मी पाहिलं तुम्हाला...
आर्दशाचा गाङा हाकताना......
..स्वाभिमानानं जगताना....
प्रेमाने पाठीवर हात फिरवताना....
संस्काराच्या वेळी रागावताना
संकटात वादळ थोपवताना
......सरांना..../मॅङमला मी पाहिले
सदैव आशिर्वाद देताना......
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🎤🎤निरोप समारंभासाठी उपयूक्त चारोळ्या ...📝📝
निरोप घेता तुमचा
ह्दय दाटले ।
स्नेह बंध आपूलकिचे
मनात साठले ।।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
हे बंध रेषमी प्रेमाचे
आपल्या गोड नात्याचे ।
ठेवा आठवण आमुची
हे बंध विश्वासाचे ।।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोप द्यावया आपुला
मन होई हे जड ।
हे गुरू शिष्याचे नाते
शाश्वत राहो अखंड गोड ।।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
कधीकाळी जर दुखावली
आम्ही आपली अंतरे ।
सोडून द्यावे राग ,द्वेश
माफ करावे बरे ।।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
घ्यावी उंच झेप गगणी
आपण यश किर्तीची ।
शोभा वाढवावी
या ज्ञानमंदिराची ।।
निरोपाचे क्षण हे आले,
पापण्या ओलावून गेले,
आठवणींच्या हिंदोळ्यावर,
मन हे वेडे स्वैर झाले।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
शाळेचा निरोप घेताना,
वळून शेवटी पाहताना |
स्मृती दाटल्या मनात,
पाणी डबडबल्या डोळ्यात|2|
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*निरोपाची चारोळी.
निरोपाचा क्षण हा...
किती समीप आला...
निरोप कसा देऊ तुम्हा...
कंठ दाटून आला...
डोळ्यात आसू अन्..
ओठात हसू ठेऊन...
शुभेच्छा देते तुम्हाला ...
मुलांनो,
स्नेहमय शुभेच्छा तुम्हाला..
निरोपाचा क्षण जणु
हळव्या तो फुलांचा.,.
आठवांची जणु गर्दी
क्षण हा विरहाचा,,,
नको नको वाटे निरोप
घेऊन येतो दुःखद क्षण
पण करण्या ती प्रगती
घेऊ शपथ प्रत्येक जण...
निरामय,आरोग्यदायी, निखळ आयुष्य जगा ही सदिच्छा!
निवृत्ती नंतरच्या जीवनासाठी तुम्हाला शुभेच्छा!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
जीवनाचा आनंद पुरेपूर मिळावा.
नातीच्या सुरांमध्ये सूर तुमचा जुळावा.
राहून गेले मनात की जे करायचे होते,
वेळेच्या आभावी ते ते जमत नव्हते.
सर्व त्या इच्छा पूर्ण आता करा
जीवनाचा कलश आनंदाने भरा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
शाळेच्या आठवणींनी कधी मन भरून येईल,
नातीच्या बोबड्या बोलात विरघळून जाईल.
असं नाही म्हणत आम्हाला पूर्ण विसरून जा,
काही क्षण तुमचे शाळेसाठीही द्या.
पूर्ण होवोत तुमच्या मनातल्या इच्छा!
पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!
निरोप हा निरोप नसतोच
तर ती असते गोड आठवण..
आयुष्याच्या वाटचालीत
असते प्रेमाची साठवण...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
तुमचा निरोप घेताना
वळून शेवटचे पाहताना
स्मृती दाटल्या मनात
पाणी डबडबले डोळ्यांत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या आठवणी देऊन जाईन…
आज घेऊया निरोप आपण
विरह दाटतो उरी
असू द्या
प्रेमच सर्वावरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोप द्यावा निरोप घ्यावा
परी न क्लेश मनी ठेवाल
आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा
स्मितवदन जरुर कराल😊
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोपाच्या हळव्या क्षणी
दाटून येती आठवणी
डोळ्यात साठते पाणी
मूक होते वाणी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हासू अन् दुस-यात आसू
नितळ नितांत आठवणींत मग दुखःत कसे बसू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आठवणी तर दिल्यात भरपूर
पुरून उरतील त्या आयुष्यभर
एकटेपणात येईल आठवांचा पूर
डोळ्यात आसवांची लागेल धार
सुंदर बिलोरी आरसा
आपुलकीची प्रतीमा जसा
ह्दयातील झराच कसा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोपाचे क्षण
साठवून हृदयी ठेवू
मखमली मोरपिस
मनी जपून ठेवू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आठवणींचा गुलकंद
देईल मना आनंद
गतकाळच्या स्मृतीमधे
बागडू आम्ही स्वच्छंद
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोप नव्हे हा
ओलावा माणुसकीचा
विसरू कसा मी
क्षण हा सौख्याचा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आपल्या ऋणात
सदैव राहीन मी
मनाच्या कप्प्यात
तुम्हा साठवीन मी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सूर्याचे हृदयही पाघळते
दिवस मावळत आल्यावर
कठोर मनेही हळवी होतात
निरोप समारंभ जवळ आल्यावर...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
◆ निवृत्तीसमारोह-
ज्ञान,संस्काराचा तुम्ही दिला वसा
आम्ही चालवु हा पुढे वारसा
सा-या जगाने करावे ज्याच्यावर सुभाष्य
असे लाभावे उदंड आयुष्य
निवृत्तीने संपणार नाही तुमच्याबद्दलची आस्था
जिथे भेटाल तिथे ठेऊ चरणावरती माथा
होऊ दया पुर्ण मनातील सर्व इच्छा आकांक्षा
ह्याच सेवानिवृत्ती सोहळयानिमित्त शुभेच्छा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
दृष्ट लागण्या जोगे सारे काम केले ज्यांनी आजवर ...
निरोप त्यांना देणे आहे दगड ठेवला आज मनावर.....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सोडू म्हणता सुटत नाहीत,
विसरु म्हणता विसरत नाहीत,
काही प्रसंग,
काही व्यक्ति,
काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत.
आपसुकच आठवते त्याला 'आठवण' म्हणतात.
आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो,
पण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो,
ही माझी धारणा,
म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून
मग ती लहान असो अथवा मोठी,
मी काहीतरी चांगले घेण्याचा,
शिकण्याचा प्रयत्न करीत असते,
मनातल्या मनात त्यांना गुरु मानते
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
टप्यावर क्षणाक्षणाला भेटलेल्या
त्या माझ्या असंख्य गुरूंना माझा
मनापासून नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सुखदुखाच्या वाटेवर
अभ्यासाच्या वळणावर
जाणार आहात तुम्ही माझ्या
मुलांनो लक्षात ठेवा तुम्ही (१)
पर्वत डोंगर टेकड्या चढून
सदैव पुढेच जायचे असते
प्रगतीचे एक पाऊल मात्र
सदैव पुढेच टाकायचे (२)
मी कोण आहे ? कोण होणार आहे?
याचे भान ठेवायचे असते
सर्वाना आवडेल असेच मात्र
वागायचे असते(३)
नम्रतेने पुढे जा
विश्वास नेहमी संपादन करा
पाऊल पडणार आहे तुमचे
सामर्थ्याने जगायचेच(४)
अशी पाखरे येती आणि
स्मृती ठेऊनी जाती
लळा आम्हा लाविती
विचारशील प्रगती(५)
मी मात्र तुमची भरारी
घेतलेली पाहीन
तुमच्यासाठी काहीपण
वसा मी घेईन(६)
या पाखरांनो पुन्हा परतूनि या
चालणा-या वाटेवर हाक मारत जा
चुकले असेल माझे काही
माफ करून जा (७)
सांगेन मात्र एवढेच
खूप मोठे व्हा
मी नेहमी मला
तुमच्यात पाहिन (८)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
अशाच होतात गाठीभेटी,
डोळे ओले होण्यासाठी.
चार दिवस सोबत राहून,
पुन्हा दूर जाण्यासाठी......
समारोप चारोळी.....👆
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ही आदर्शाची माती,
इथे संस्काराचा ओलावा।
पिकलेल्या पानामधून,
नित्य मधुमास बहरावा।।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोपाचे क्षण हे आले,
पापण्या ओलावून गेले,
आठवणींच्या हिंदोळ्यावर,
मन हे वेडे स्वैर झाले।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोप हा निरोप नसतोच
तर ती असते गोड आठवण..
आयुष्याच्या वाटचालीत
असते प्रेमाची साठवण...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
तुमचा निरोप घेताना*
वळून शेवटचे पाहताना
स्मृती दाटल्या मनात
पाणी डबडबले डोळ्यांत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
. ■ निरोप समारंभ प्रसंगी ■
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या आठवणी देऊन जाईन…
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आज घेऊया निरोप आपण
विरह दाटतो उरी
असू द्या
प्रेमच सर्वावरी
निरोप द्यावा निरोप घ्यावा
परी न क्लेश मनी ठेवाल
आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा
स्मितवदन जरुर कराल
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोपाच्या हळव्या क्षणी
दाटून येती आठवणी
डोळ्यात साठते पाणी
मूक होते वाणी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हासू
अन् दुस-यात आसू
नितळ नितांत आठवणींत
मग दुखःत कसे बसू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोप हा निरोप नसतोच
तर ती असते गोड आठवण..
आयुष्याच्या वाटचालीत
असते प्रेमाची साठवण...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आठवणी तर दिल्यात भरपूर
पुरून उरतील त्या आयुष्यभर
एकटेपणात येईल आठवांचा पूर
डोळ्यात आसवांची लागेल धार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोपाचे क्षण
साठवून हृदयी ठेवू
मखमली मोरपिस
मनी जपून ठेवू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आठवणींचा गुलकंद
देईल मना आनंद
गतकाळच्या स्मृतीमधे
बागडू आम्ही स्वच्छंद
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
निरोप नव्हे हा
ओलावा माणुसकीचा
विसरू कसा मी
क्षण हा सौख्याचा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आपल्या ऋणात
सदैव राहीन मी
मनाच्या कप्प्यात
तुम्हा साठवीन मी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Khupch sunder charolya ani kavya
ReplyDeleteVery nice work
ReplyDeletenice this block is very nice
ReplyDeleteall the best for new block
Thanks all frends
ReplyDelete