"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

"आंतराष्ट्रीय योग दिन" - 21 जुन

  21 जून आंतराष्ट्रीय योग दिन तयारी..!

■ २१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस ■
    ★"करो योग रहो निरोग"★

 तन, मन, शांतीचा व संतुलनाचा एकमेव मार्ग म्हणजे योग...!!
योग व योगाचे प्रकार!
योग दिवस इतिहास !
योगासन व्हिडिओ
योग दिवस फलक लेखन!
योग फायदे व महत्व...

   वरील सर्व आणि बरेच उपयोगी शैक्षणिक माहिती  pdf..... मध्ये उपलब्ध आहे click करा....



 आमच्या शाळेतील मुलांनी सादर केलेली योगासने व्हिडिओ पाहण्यासाठी CLICK करा....



योगाभ्यास करणे म्हणजे शरीर व मन यांचा संयोग करणे होय.

  आपल्या व्यक्तीमत्वाचे शारीरिक, मानसिक, भावनिक, अध्यात्मिक व सामाजिक असे विविध पैलू असतात. या सर्व पैलूंमध्ये संतुलन प्राप्त करण्यासाठी उपयुक्त पद्धती म्हणजे "योगाभ्यास"

 ■ योगाची अंगे :~
   १. यम :~ आचरण /वर्तनविषयक 
   २. नियम :~ आत्मशुध्दी. 
   ३. आसन :~ शारीरिक व मानसिक स्थिती. 
   ४.प्राणायाम  :~ श्वास. 
   ५. धारणा  :~ चिंतन. 

■ योगाभ्यासाचे फायदे  :~
 १. शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता वाढते. 
 २. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
 ३ रक्त शुध्द व प्रवाही राहते. 
 ४.पाठीचा कणा लवचिक राहातो. 
 ५. शरीर लवचीक बनते. 
 ६.काम करण्याचा उत्साह वाढतो. 
 ७.मनःशांती मिळते. 
 ८.एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित होण्यास 
   मदत मिळते.  
★===========★★===========★
🧘‍♂ ★आंतरराष्ट्रीय योग दिवस; केवळ सुरुवात नव्हे सातत्य हवे!★


   केवळ आजारांवर मात करण्यासाठी नव्हे तर मानसिक आणि शारिरीक संतुलन ठेवण्यासाठी 'योग' हा फार महत्त्वाची भूमिका साकारतो. त्याचमुळे भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व मिळाले आहे.  

   याच पार्श्वभूमीवर पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात कधी आणि कशी झाली? याबाबत आज सविस्तर जाणून घेऊयात... 

▪ 27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली.

▪ भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिवसाची शिफारस केली. 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला.  
2014 साली 11 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघाने योगाचं महत्व मान्य करत 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

🤔 21 जूनची निवड का? :~ 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. हा सूर्याचे दक्षिणायन सुरु होण्याचा हा काळ आहे. या संक्रमण काळात योगाचा जास्त फायदा पोहोचतो. म्हणून या दिवसासाठी 21 जूनची निवड करण्यात आली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

💁‍♂ योगा शिकताना 'या' खबरदारी घ्या..!

1) नवीन योगा शिकणारे लोक बहुतेकदा इतरांशी तुलना करण्याच्या नादात स्वत:ला इजा करून घेताना दिसतात. जे चुकीचे आहे 

2) वाढत्या वयामुळे शरीराची लवचिकता आणि हालचालींवर मर्यादा येतात. त्यामुळे योगा शिकताना वयोमानानुसार शारीरिक स्थितीत होणारा बदल ध्यानात न घेणे गरजेचे आहे. 
3) प्रत्येक आसन हे योग्य माहिती घेऊन करणे गरजेचे असते. योगा वर्गांमध्ये अनेकजण नवीन उत्साहाच्या भरात क्षमतेपेक्षा अधिक ताण देतात आणि मग त्यांना दुखापतीचा सामना करावा लागतो.
4) अनेक दिवस योगापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा योगासाधनेला सुरूवात कराल तेव्हा कदाचित पूर्वी जमणाऱ्या अनेक गोष्टी करणे तुम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसांत आठवड्यातून किमान तिनदा तरी योगाप्रकार नियमितपणे करणे चांगले.
5) एखादे आसन जमत नाही. या प्रश्नांमुळेच लोक हताश होतात. निराश झालेले हे लोक मग, योगासन ही गोष्ट आपल्यासाठी नाहीच, असा ग्रह करून प्रयत्न करण्याचे थांबवतात. जे चुकीचे आहे. 

🗣 ●पंतप्रधान मोदींनी दिला कानमंत्र* :~ 

         समाजातील गरिबांपर्यंत योगा पोहचला तर ते आजारापासून वाचू शकतील. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधे व शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत. त्यामुळे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
     योगाचं पालन संपूर्ण जीवनभर केले पाहिजे. योग कधीही वय, रंग, जात-पात, धर्म-पंत, श्रीमंत-गरीब, प्रांत-देश असा भेदभाव करत नाही. योग सर्वांचा आहे आणि सर्व जण योगाचे आहेत.
★===========★★===========★
★जागतिक योग दिवस★

'जागतिक योग दिवस' हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासदांद्वारे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली. २१ जून २०१५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो. अलीकडेच सामान्यांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढत आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग. योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर नि मन हे शरीराचे मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्‍त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो. याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला. तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.
★विश्व योग दिवसाची उद्दिष्टे :~
* योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.
* योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.
* योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.
* आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.
* संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.
* लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.
* योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.
* लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.
* मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.
* योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.

औषधे ही केवळ असलेल्या रोगांना नष्ट करतात. त्यातही आयुर्वेद हाच रोगांना हळूहळू समूळ नष्ट करतो. मात्र इतर सर्व प्रकारच्या, आजार लवकर बरा व्हावा म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे एक ठिकाणचा आजार दाबला जाऊन शरीरात इतरत्र त्या औषधांचे दुष्परिणाम दिसू लागतात. ‘Prevention is better than cure’ असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते खरंच आहे. म्हणूनच या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस.


1 comment: