"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

वक्त्यासाठी उपयुक्त माहिती

 शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी......

       'प्रथम मी बोलू शकतो.... ' हा आत्मविश्वास मनात निर्माण होणे गरजेचे आहे.  वक्ता हा आपल्या भाषणातून वेगळ्या पद्धतीने मांडणी करणारा असतो. काही गोष्टी जाणीवपूर्वक शिकणे व त्यांचे परिणामकारक सादरीकरण करणे आवश्यक आहे.

मिरे जुनूँ का नतीजा ज़रूर निकलेगा,
इसी सियाह समुंदर से नूर निकलेगा !
सब्र रख मेरे बंदे तू क्योंकी चुनौती भी बहोत बडी हैं..!
बस्स उन चुनौतिया कह, मेरा हौसला तुझसे बडा हैं..!

"माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी...

माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी...!!"

१) विषयज्ञान =

         आपण ज्या विषयावर भाष्य करणार आहोत, त्याची परिपूर्ण माहिती बोलणाऱ्याला असणे आवश्यक आहे. अर्धवट माहिती असेल तर आत्मविश्वासाने बोलता येणार नाही.

२) देहबोली =      
         वक्त्याचा अभ्यास आणि आत्मविश्वास त्याच्या देहबोलीवरुन श्रोत्यांना समजतो. देहबोली आणि पेहराव ह्या गोष्टींसोबतच हावभाव, सादरीकरण, बोलण्याची पद्धत हयाही बाबी श्रोत्यांच्या नजरेतून सुटत नाहीत.

३) प्रभावी भाषाशैली =
            'भाषण म्हणजे वाचन नव्हे ' हे नेहमी ध्यानात ठेवावे. समोरच्या श्रोत्यांना समजेल अशी भाषा असावी.श्रोत्यांच्या मानसिकतेला अनुरुप उदाहरणे, आकडेवारी आणि विनोद असावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाषणशैली ओघवती असली पाहिजे.

४) नाविन्य =
          'श्रोत्यांनी मला का ऐकावं ? ' हा प्रश्न स्वतःला विचारून भाषण करावं. भाषणामध्ये नाविन्य निर्माण करता आलं तर श्रोत्यांना ते प्रभावी वाटतं. भाषणातील माहिती नवीन असली तरच ते श्रोत्यांना आवडते.

५) संवाद =
     सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच श्रोत्यांच्या मानसिकतेचा परिचय होतो. आपलं भाषण म्हणजे श्रोत्यांशी संवाद असला तर ते अधिक खुलते. भाषणाच्या ओघात येणारा प्रश्न, सुभाषित, विनोद आणि त्याला लाभणारा प्रतिसाद हे अतिशय महत्त्वाचे ठरते.
                   

१ ] "जितनेवाले कोई अलग काम   नहीं करते,
*वे हर काम अलग ढंग से करते है|"
                    
२ ] " शब्दात निखारा फुलतो,
शब्दात फुलही हळवे,
शब्दांना खेळविताना
शब्दांचे भान हवे."

3]  हातात हात घालुनी
       हृदयास हृदय जोडूनी
    ऐक्याच मंत्र जपूनी
        या कार्य कराया ला हो...!!
        
हृदयाला स्पर्श करणारी सुंदर वाक्ये.प्रसंगानुरुप वक्त्यासाठी व सुत्रसंचालना मध्ये वापरता येतील...

*🏻 .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..

*🏻 .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .

*🏻 .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..

*🏻 .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..

*🏻.. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..

*🏻.. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..

*🏻.. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
*🏻 .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. .


*🏻.. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..

*🏻 .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..

*🏻.. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..

*🏻 .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . .

*🏻.. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..

*🏻.. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..

*🏻 .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..

*🏻 .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..

*🏻 .. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..

*🏻 .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..

*🏻.. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..

*🏻.. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..

*🏻.. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..

*🏻.. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..

*🏻 .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..

*🏻 .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..

*🏻 .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..

*🏻 .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..

*🏻 .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..





                

3 comments:

  1. Every Thought is positive for not only single human but also social strainghth.

    ReplyDelete
  2. उत्कृष्ट

    ReplyDelete