23 ऑगस्ट 'राष्ट्रीय अंतराळ दिवस'
National Space Day 2024:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून घोषित केला आहे. 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतीय अंतराळ क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता. भारताने या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा देश ठरला, तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून घोषित केला आहे.
या वर्षी राष्ट्रीय अंतराळ दिन 2024 ची थीम 'चंद्राच्या स्पर्शाने जीवनाचा अनुभव घ्या: भारताची अंतराळ कथा', असं आहे. ही थीम समाज आणि तंत्रज्ञानावर अवकाश संशोधनाचा महत्त्वपूर्ण प्रभाव अधोरेखित करते.
23 ऑगस्ट 2024 रोजी साजऱ्या होणाऱ्या पहिल्या 'राष्ट्रीय अंतराळ दिना'च्या समारंभासाठी इस्रो सज्ज आहे. या दिवसाच्या निमित्ताने भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यशाचे आणि भविष्यातील उद्दिष्टांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

भारत अंतराळ संशोधनात लक्षणीय प्रगती करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन देशाच्या प्रगतीवर विचार करण्याची त्याचे योगदान साजरे करण्याची आणि भविष्यातील पिढ्यांना अंतराळ संशोधनात मोठे उद्दिष्ट ठेवण्याची प्रेरणा देते.
★राष्ट्रीय अंतराळ दिवसाची संकल्पना आणि उद्दिष्टे ~
यंदाच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची संकल्पना 'चंद्राला स्पर्श करून जीवनाला स्पर्श: भारताची अंतराळ गाथा' अशी आहे.
या दिवसाच्या निमित्ताने भारताच्या अंतराळ क्षेत्रातील उपलब्धी आणि भविष्यातील उद्दिष्टांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची स्थापना तसेच 2045 पर्यंत चंद्रावर भारतीय पाउल उमटवणे ही भविष्यातील उद्दिष्टे आहेत. गगनयान मिशनच्या अंतर्गत 2025 मध्ये प्रथमच भारतीय व्यक्तीला अंतराळात पाठवले जाणार आहे.
इस्रो चे नवीन प्रतिमा प्रकाशन
पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या पूर्वसंध्येला, इस्रोने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर घेतलेल्या नवीन प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत. या प्रतिमांमध्ये प्रज्ञानचे चंद्राच्या पृष्ठभागावरचे पहिले क्षण आणि इतर टप्प्यांचा समावेश आहे. विक्रम लँडरवर असलेल्या लँडर इमेजर (LI) आणि रोव्हर इमेजर (RI) कॅमेर्यांनी या प्रतिमा घेतल्या आहेत.
इस्रो स्पेसफ्लाइटने नमूद केले की या प्रतिमांमध्ये भारताचे राष्ट्रीय प्रतीक चंद्राच्या मातीवर उमटवण्याच्या प्रयत्नांचे सर्वोत्तम दृश्य दिसत आहे. मात्र, दक्षिण ध्रुवाजवळील चंद्राच्या मातीची रचना अपेक्षेप्रमाणे नसल्याने हे यशस्वी झाले नाही. प्रज्ञानवर असलेला नवकॅम एक काळा-पांढरा कॅमेरा आहे, तर विक्रमवरील कॅमेरे रंगीत कॅमेरे आहेत.
भारतातील राष्ट्रीय अंतराळ दिनाचे महत्त्व म्हणजे लोकांना प्रेरणा देणे आणि अवकाश संशोधनाच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करणे हे आहे. यात चांद्रयान, आदित्य एल-1, मंगळयान आणि गगनयान यासह अनेक मोहिमांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment