"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन पूर्वतयारी


   स्वातंत्र्यदिन आपला देशाभिमान..!!  
15 ऑगस्ट कार्यक्रमपत्रिका
 ★ प्रभातफेरी
 ★ सावधान स्थिती
 ★ ध्वजारोहण
 ★ ध्वज सलामी
 ★ राष्ट्रगीत
 ★ ध्वजगीत
 ★ घोषणा
 ★ स्वागत
 ★ अध्यक्षीय निवड
 ★ अनुमोदन
 ★ प्रास्ताविक
 ★ विद्यार्थी भाषण
 ★ शिक्षक भाषण
 ★ ग्रामस्थ भाषण
 ★ अध्यक्षीय भाषण
 ★ आभार प्रदर्शन
 ★ खाऊवाटप

स्वतंत्रता दिवस पूर्वतयारी करूया...

     १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.
     देशाची गौरवचिन्हे आणि मानबिंदू म्हणजे जणू राष्ट्रीय अलंकारच असतात. त्यांच्या जपणुकीतून आपला देशाभिमानच जोपासला जातो. आपले राष्ट्रीय अलंकार असे आहेत..? राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभावरील चार सिंह हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहेत. सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील शिल्पावरून ते घेतले आहे. यात चार सिंह एकामागे एक उभे आहेत. (मात्र कोणत्याही एका बाजूने पाहता तीन सिंह दिसतात.) त्याखालील पट्टीवर एक आराम करणारा, हत्ती, वेगातला घोडा, एक बैल यांच्या शिल्पाकृती आहेत व त्यांच्या मध्यभागी चक्र आहे. राष्ट्रचिन्हाखाली 'सत्यमेव जयते' हे मुंडकोपनिषदातील वाक्य देवनागरी लिपित कोरले आहे. घंटाकृती (उलट्या) कमळावर हे विराजमान आहे. २६ जानेवारी १९५० रोजी हे राष्ट्रचिन्ह स्वीकारले गेले.
   🔹🔸★🕳●●🕳★🔸🔸


प्रिय भारतवासीयांनो...
   
            *★ राष्ट्रध्वज ★*
    तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. उंची दोन भाग, तर लांबी तीन भाग या प्रमाणात तिरंगा बनवला जातो. उंचीचे समान तीन भाग बनवू. सर्वात वरचा भाग नारंगी, मधला भाग सफेद (पांढरा) व खालचा भाग हा हिरवा रंगात बनविला जातो. मधल्या भागामध्ये गडद निळय़ा रंगातील अशोक चक्र असते. या अशोक चक्राचा व्यास सफेद पट्टय़ाच्या उंचीच्या तीन-चतुर्थ्यांश असतो. या चक्राला २४ आरे असतात. राष्ट्रध्वजाच्या प्रत्येक रंगातून तसेच चक्रातून एक विशिष्ट अर्थ प्रतीत होतो. भगवा- एकात्मता, सफेद- सत्याचा मार्ग, हिरवा- निसर्गाशी व जीवनाशी नाते, अशोक चक्र - धर्माचे नियम, आरे - प्रगती, वेग, विकासाचे प्रतीक...
  ◆ १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन◆ 

 आवश्यक संपूर्ण माहिती 

जयोस्तुते श्री महान् मंगले
               शिवास्पदे शुभ दे
               स्वतंत्रते भगवती
               त्वामहं यशोयुतां वंदे...

       आपल्या भारत मातेला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या महान लोकांच्या बलिदानाची आठवण करून त्यांना कोटी कोटी नमन करूया...!!

🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
दे सलामी इस तिरंगे को....
जिससे तेरी शान है
सिर हमेशा ऊँचा रखना इसका...
जब तक दिल में जान हैं...!!

सर्व देशवासियांना  स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
🌻वंदे मातरम्🌻🇮🇳

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

No comments:

Post a Comment