"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सूत्रसंचालन कसे करावे.. काही टिप्स

       सूत्रसंचालनकार्यक्रमाच्या स्वरुपानुसार निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्यालासूत्रसंचालनअसे म्हणतात. सूत्रसंचालनालाकार्यक्रमात व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळींप्रमाणेच महत्त्व असतेस्वरूप सूत्रसंचालन हे केवळ दोन वक्त्यांमधील, दोन गाण्यांमधील दुवा नसतो.  तो व्यासपीठ आणि श्रोते- प्रेक्षक यांच्यातीलसंवाद साधणारा सेतू असला पाहिजे. संवादामध्ये रंजकता आणून समर्पक शब्दांनी त्याने पुन्हा-पुन्हा श्रोत्यांनागुंतवून ठेवणे सूत्रसंचालन करतांना महत्त्वाचे असते. याकाळात श्रोत्यांच्या भावनेत वाहात न जाता अलिप्त राहत सातत्याने भानावर असणे गरजेचे असते. केवळ निवेदन वाचणे अथवा भाषण करणे इतकेच याचे स्वरूप नसून कार्यक्रम खुलवण्याचे काम सूत्रसंचालका मार्फत केले जाते.

 सूत्रसंचालन करताना -कार्यक्रम भरकटतोय का? प्रत्येक टप्पा नियोजितरित्या वेळेवर सादर होतोय का?हे पाहिले जाते.सूत्रसंचालनात भाषा व शैलीचे महत्त्वकार्यक्रमा नुसार सूत्रसंचालनाची शैली बदलते. गाण्याच्या मैफलीचं सूत्रसंचालन करतांना भाव प्रकट करणारी वापरली जाते. व्याख्यानाचेआणि वैचारिक भाषणे यात संचालन असेल तर संदर्भासहीत नेमक्या शब्दांची आणि मांडणीची सूत्रसंचालन केले जाते. समारंभानुसार आवेशयुक्त, उत्साहवर्धक शैलीने सूत्रसंचालन केले जाते.सूत्रसंचालनातील विविध टप्पे, नियोजन, कार्यक्रमाच्या विषयाचा अभ्यास व वाचन, स्थळनिश्चिती, निमंत्रणपत्रिका, प्रसिद्धी सूत्रसंचालन प्रकार निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी सूत्रसंचालन करताना संहिता लिखाणाची पद्धत वेगळी असते. कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार निवेदन व सादरीकरण बदलते. शासकीय कार्यक्रम सूत्रसंचालन शासकीय समारंभात ‘प्रोटोकॉल’ महत्त्वाचा असतो. अधिकारपदानुसार नामावली तयार करावी. उपस्थितांची नावे सांगताना कुणानंतर कोणाचा क्रम यालाही महत्त्व दिले जावे. या साठी आधीच रास्त विचार केला जावा. सत्कार असल्यास कुणाच्या हस्ते कुणाचा सत्कार याचे विचार पूर्व नियोजन महत्त्वाचे असते. शासकीय समारंभात क्रमवारी ही महत्त्वाची असते या सूत्रसंचालनात शाब्दिक कोट्या शक्यतो करू नयेत. यातून ध्यानीमनी नसताना कुणाच्या तरी भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींची नावे घेतांना करताना त्यांची पदे आणि कार्य याविषयी सतर्कता बाळगली पाहिजे.

~~●~~~~●●~~~~●~~



~~●~~~~●●~~~~●~~

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? 
       या संबंधी काही टिप्स :- कार्यक्रम पत्रिका:- 

आगतम् स्वागतम् सुस्वागतम्
1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण
2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार
3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.
4) स्वागतगीत
5) प्रास्ताविक
6) पाहुण्यांचा परिचय
7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी
8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.
9) अध्यक्षीय समारोप
10) आभार
11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी


सूत्रसंचालकाचे काही गुण :-
@ भाषाप्रभुत्व
@ नीटनेटकेपणा
@ संवेदनशिलता
@ सभाधीटपणा
@ हजरजबाबीपणा
@ सौजन्यशिलता
@ सुक्ष्मावलोकन क्षमता
@ आंगिक हुशारी
@ चाणाक्षपणा
@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
@ भावनिक सक्षमता
@ वाचन व्यासंग
@ संग्रहन
@ बहुश्रुतता

सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-
1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे इत्यादी
~~~~~~~~~~~~~~~~~~~

@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी
* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी

@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते       
         
" आम्ही नुसतेच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे.
   आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे."

"मेल्यावरती तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे
  माझ्या क़ातडयाचे जोड़े तुझ्या पायात वाजू दे".

"दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है
   एक बार इस देशपर मर मिटना सौ जन्मोंके समान है---भगतसिंग

" दोन ओन्डक्याची होते सागरात भेट
    एक लाट दोघा तोड़ी पुन्हा नाही भेट

जळमटाना जुन्या जाळले पाहिजे
घर पुन्हा नव्याने बांधले पाहिजे
लोक येतील लाख धावून पण
तुमचे वागणे चांगले पाहिजे


आओ झुककर सलाम करे उन्हें जिनके हिस्से में ये मक़ाम आया है
कितने खुशनसीब है वो लोग जिनका खून वतन के काम आया है




1 comment: