"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शाळापूर्व तयारी मेळावा












◆ मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला प्रवेशित / दाखल सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी, व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.

◆  उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत. सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर दुसऱ्या मेळाव्याच्या रकान्यात करण्यात याव्यात. सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे : 
१) नोंदणी (रजिस्ट्रेशन), 
२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास), 
३) बौद्धिक विकास, 
४) सामाजिक आणि भावनात्मक विकास, 
५) भाषा विकास, 
६) गणनपूर्व तयारी, 
(७) पालकांना मार्गदर्शन.


◆ मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #ShalapurvaTayariAbhiyan2022, #शाळापूर्वतयारीअभियान2022 व #ShalapurvaTayari2022 या हॅशटॅगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्र च्या http://www.facebook.com/Mahascert या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

◆ शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे.
◆. शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी / विद्याप्रवेश मोड्यूलशी करावी.

◆. मेळावे आयोजित करीत असताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात यावे.
अशाप्रकारे इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळा स्तरावरील दुसऱ्या शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्याचे आयोजन  करण्याबाबतचे पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. याला अनुसरून शाळास्तरावर "शाळापूर्व तयारी अभियानाची " अंमलबजावणी करावयाची आहे. या अंतर्गत आपणास वरील बाबी करावयाच्या आहेत.

🟢




No comments:

Post a Comment