"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

App कसे बनवावे ?


        अॅप नेमकं कसं बनवलं जातं याच्या पायऱ्या : अॅप बनवताना सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे, हे अॅप नक्की काय काम करणार आहे, हे लक्षात घेणं. म्हणजेच त्याची फंक्शनॅलिटी काय आहे.
       मग त्या फंक्शन्सनुसार त्या अॅपचे किती स्क्रीन्स बनतील याची नोंद घेतली जाते. या प्रत्येक स्क्रीनला अॅक्टिव्हिटी असं म्हणतात. उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला ई-मेल्स चेक करायचे असतात, तेव्हा आपण आधी लॉगइन पेजवर जातो, ही पहिली अॅक्टिव्हिटी. मग लॉगइन केल्यावर आपल्याला मेल-लिस्ट दिस्ते, ही दुसरी अॅक्टिव्हिटी.

          या अॅपमध्ये सर्व्हरकडून येणारा डेटा जर आपल्याला पुश नोटिफिकेशन्सच्या स्वरुपात हवा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला ब्रॉडकास्ट रीसिव्हर तयार करावा लागतो. ब्रॉडकास्ट रीसिव्हर म्हणजे या पुश नोटिफिकेशनसाठी लागणारा कोड. हे तयार झालेलं अॅप प्रत्येक ओएसच्या स्टोअर अथवा मार्केटवर अपलोड केलं जातं. याच्यासाठी आपल्याला त्या मार्केटवर आपलं अकाऊंट बनवावं लागतं.
 या अॅपमधला डेटा जर आपल्याला ऑफलाइन सेव्ह करुन ठेवायचा असेल, तर हे काम आपण एसक्युएलआइट (SQLite) हे डेटाबेस व्हर्जन वापरुन करु शकतो. हे सगळं झाल्यावर या अॅपचा लूक आणि फील, ड‌िझाइन व्यवस्थित केलं जातं. याशिवाय या अॅपचं टेस्टिंग व्हर्चुअल डीवाईज किवा एम्युलेटर वापरुन कॉम्प्युटरवर अथवा थेट मोबाइलवर केलं जातं. हे झालं की आपलं अॅप पूर्णतः तयार होतं.

    जर हे अॅप सर्व्हरशी कम्युनिकेट करणार असेल, तर मग त्याचे वेब सर्व्हिसेस डेवलप केले जातात. वेब सर्व्हिसेस म्हणजे अॅप आणि सव्हरमध्ये होणाऱ्या कम्युनिकेशनचं कोडिंग.मग हळू-हळू या अॅपचं फ्रंट एंड आणि बॅक एंड तयार होतं.  या अॅक्टिव्हिटीजचं कोडिंग सुरु होतं.  अकाऊंट बनवल्यावर शेवटी हे अॅप त्या मार्केटवर अपलोड केलं जातं. इथून मग युजर्स हे अॅप डाऊनलोड करू शकतात.
 
 १) अॅप डेव्हलपमेंटमध्ये मुख्यतः जावा किंवा एक्सएमएल लँग्वेज वापरली जाते. तर वेबसाइट डेव्हलपमेंटमध्ये एचटीएमएल, सीएसएस आणि जावा स्क्रिप्ट वापरली जाते.
                       
 २) अॅप डेव्हलपमेंटमध्ये आपण ऑफलाइन किंवा ऑनलाइन डेटाबेस तयार करु शकतो. वेबसाइट डेव्हलपमेंटमध्ये डेटाबेस हा ऑनलाइन असतो.

   ब्लॉगचे अॅप कसे तयार करावे?  


       ➽ ब्लॉग / वेबसाईटचे App कसे तयार करावे?

● प्रथम http:// www.appsgeyser.com/creat /start  या वेबसाइटवर जा.

● यानंतर website या icon वर क्लिक करा.

● नंतर तूमच्या वेबसाइटचा Address(URL) टाका.
उदा. www.satishborkhade.blogspot.in व Next या बटणवर क्लिक करा.

● यानंतर App चे नाव, Description, Icon टाका.  व Next या बटणवर क्लिक करा.

● यानंतर Create App वर क्लिक करा. आपल्या माहितीचा Form भरा. ( उदा. Email Address व Password )

● नंतर Sign up करून App डाऊनलोड करून घ्या, त्याची Link काॅपी करून इतरांशी शेअर करा.  ⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺⟺




3 comments:

  1. खूपच छान ब्लॉग कसा लिहायचा मार्गदर्शन कराल का

    ReplyDelete
  2. ब्लॉग मध्ये पेज व पोस्ट मध्ये टेबल कसे टाकावे

    ReplyDelete
  3. सरजी खूपच छान माहिती मिळाली. माझा ब्लॉग केला आहे परंतु डिझाईन करता येत नाही. आपल्या या माहिती नुसार मी प्रयत्न करतो.

    ReplyDelete