पूर्वतयारी शाहिद भगतसिंग सुखदेव राजगुरू अमररहे..
◆इंक़िलाब ज़िन्दाबाद◆
शाहिद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांची माहिती/ भाषणे Pdf. डाउनलोड करा...
✿⭖✿⭖⭖✿⭖✿⭖⭖✿⭖✿
●23 मार्च "शहीद दिन"●
■■ २३ मार्च १९३१ चा दिवस..■■
' भारतमाता की जय ' आणि ' वंदे मातरम् ' चा जयघोष करीत फाशीच्या तख्ताकडे निघाले .
मग भगतसिंग यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली की , आपणास फाशी पूर्वी दोन मिनिटे आपल्या घोषणा करू द्याव्या. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने मौन राखून त्यांची ती विंनंती मान्य केली . तिघांनी मग जोरजोरात आपल्या घोषणा दिल्या. त्यानंतर ते तिघेही फाशीच्या तख्तावर चढले . त्यांचे पाय घोट्याशी बांधण्यात आले . प्रत्येकाने आपल्या फासाचे चुंबन घेतले .
फाशीची काळी टोपी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओढण्यात आली . नंतर ते फास त्यांच्या गळ्यात टाकण्यात आले. त्याची गाठ घट्ट झाली, तेव्हांच त्यांच्या घोषणा थांबल्या. त्यांचा आवाज क्षीण झाला.
सगळीकडे शांतता पसरली . तख्तावरचा खटका ओढला जाताच त्याच्या फळ्या दुभंगल्या नि ते तिघेही वीर मृत्युच्या खोल दरीत लोंबकळू लागले . फळ्या पडण्याचा आवाज होताच तुरुंगाच्या सर्व कैद्यांनी आपल्या कोठाड्यांचे गज जोर जोरात वाजवून ' वंदे मातरम् ' "भारत माता की जय" च्या घोषणा दिल्या .आणि मग काही वेळाने सर्वत्र स्मशानशांतता पसरली ...!!
★"२३ मार्च २०२४ अर्थात हुतात्मा दिन..."
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही लाहोर जेल मध्ये २३ मार्च १९३१ ला संध्याकाळी ७.३३ वाजता ' भारत माता की जय' , 'वंदे मातरम' म्हणत हसत हसत फासावर चढले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजां नंतर देशासाठी पारदास्यत्वाच्या श्रृखंलेत अडकलेल्या मायभुमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी तुम्ही स्वतःचे प्राणर्पण केले व अमर झाले .
आज तुम्ही ह्या जगात नाहीत पण तुमचा पराक्रम, तुमचे शौर्य, तुमचा त्याग आणि तुमचे बलिदान आम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षणाला प्रेरणा देत राहील....आजही तुमची देशनिष्ठा भारतीयांच्या मनात जिवंत आहे...
दोस्ती असावी तर तुमच्या सारखी जी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहिल....
भगतसिंग , सुखदेव , राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र त्रिवार अभिवादन...!!
※═❖══▩ஜ۩۞۩ஜ▩══❖═※
✿⭖✿⭖⭖✿⭖✿⭖⭖✿⭖✿
★ भगतसिंग ★
◆नाव :~ भागनवाला
◆वडील :~ सरदार किशनसिंग संधू
◆आई :~ विद्यावती
गाव बावली जिल्हा लायलपूर,
पंजाब,पाकिस्तान
●मृत्यू :~ २३ मार्च १९३१
लाहोर, पंजाब, पाकिस्तान
◆संघटना :~ नौजवान भारत सभा,
कीर्ती किसान पार्टी, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
भगतसिंग यांची संपूर्ण माहिती वाचा CLIK HERE
✿⭖⭖✿⭖⭖⭖✿⭖✿⭖⭖✿⭖⭖✿
★ सुखदेव ★
◆वडील :~ रामलाल थापर
◆आई :~ रल्लीदेवी
●जन्म :~ १५ मे १९०७
लुधियाना, पंजाब,भारत
●मृत्यु :~ २३ मार्च १९३१
लाहौर,पाकिस्तान
◆संघटना : नौजवान भारत सभा,
कीर्ती किसान पार्टी, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
सुखदेव यांची संपूर्ण माहिती वाचा CLIK HERE

✿⭖⭖✿⭖⭖✿⭖✿⭖⭖✿⭖⭖✿
★ राजगुरू ★
◆वडील :~ हरी राजगुरू
●जन्म :~ २४ ऑगस्ट १९०८
राजगुरूनगर, जिल्हा पुणे महाराष्ट्र, भारत
●मृत्यू :~ २३ मार्च १९३१
लाहोर,पंजाब,पाकिस्तान
◆संघटना :~ हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
राजगुरू यांची संपूर्ण माहिती वाचा CLIK HERE

✿⭖⭖✿⭖⭖✿⭖✿⭖⭖✿⭖⭖✿
No comments:
Post a Comment