"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

जागतिक कामगार दिन

गर्जा महाराष्ट्र माझा….

जागतिक कामगार दिन

आणि

महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.

⛳ जय महाराष्ट्र ⛳

एकजुटीने काम करू कामावरती

प्रेम करू

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🙏 जय महाराष्ट्र 🙏

 ★१ मे "जागतिक कामगार दिन"★ 

   १ मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. पहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. दुसरं कारण आहे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे.

युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.

१७ व्या शतकाच्या मध्यापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याच बरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या. त्यातलीच एक समस्या होती कामगारांची. औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला, पिळवणूकीला सुरुवात झाली. त्यावेळी कामाचे तास हे तब्बल १५ तास होते. कामगारांचं जीवन हलाखीचं होतं, त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे. कामगारांच्या अशा परिस्थितीतूनच पुढे जगाचा इतिहास बदलला.

कामगारांची पहिली मागणी होती ८ तासांच्या कामाची. पुढे चळवळीलाही ‘eight hour day' या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलिया मध्ये. २१ एप्रिल १८५६ रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये २१ एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

ऑस्ट्रेलिया मध्ये जे घडलं त्यापासून धडे घेत १ मे १८८६ रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी ८ तासांची मागणी केली. मागणी पाठोपाठ संप आणि मोठ्याप्रमाणात मोर्चे निघाले. शिकागो मधल्या आंदोलनात पोलिसांमुळे ६ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कामगारांच्या मनातला राग आणखीनच वाढला. याचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर बॉम्ब फेकण्यात आले. ७ पोलीस आणि ४ नागरिकांचा यात मृत्यू झाला. याला जबाबदार म्हणून ८ लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा झाली. या फाशीने त्यावेळी जगभर संतापाची लाट उसळली होती. कारण असं म्हणतात की या ८ जणांपैकी एकानेही बॉम्ब फेकला नव्हता.

अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर १९८० ला १ मे रोजीच कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं. योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि ८ तास काम या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मे दिन पण म्हटलं जातं.

तसं पाहायला गेलं तर प्रत्येक देशानुसार कामगार दिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण बऱ्याच ठिकाणी १ मे या दिवसाला मान्यता मिळाली आहे. खुद्द अमेरिकेत सप्टेंबर मधला एक दिवस कामगार दिन म्हणून ठरवण्यात येणार होता. पुढे कामगारांच्या समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांनी शिकागोच्या दुर्घटनेला श्रद्धांजली म्हणून १ मे या दिवसाची निवड केली.


१९०४ साली ॲम्स्टरडॅम येथे झालेल्या सेकंड इंटरनॅशनल संघटनेच्या परिषदेत संपूर्ण जगातील कामगार संघटनांना हे आवाहन करण्यात आलं की १ मे हा दिवस "8 hour day" म्हणून साजरा करावा.

भारतात कामगार दिनाची पाळेमुळे १९२३ सालापर्यंत मागे जातात. भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ ने १ मे १९२३ रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता. याचवेळी भारतात पहिल्यांदाच लाल झेंडा कामगार दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला.

अशा प्रकारे १ मे या दिवसाला कामगार दिन किंवा मे दिन म्हणून मान्यता मिळाली आहे. 

Click...

      महाराष्ट्र दिन १ मे  

गर्जा महाराष्ट्र माझा….

जागतिक कामगार दिन

आणि

महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.

⛳ जय महाराष्ट्र ⛳

मानवतेला उन्नत करणारे सर्व श्रम

प्रतिष्ठेचे आणि महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच सर्व कार्य 

परिश्रमपूर्वक उत्कृष्टतेने घेतले पाहिजेत..

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


No comments:

Post a Comment