"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शालेय मराठी नवोपक्रम मालिका...


   सौ. अलकाताई राकेश फुलझेले  
उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   

सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... व मेजवानी मराठी नवोपक्रम मालिका...
 ~~●~~~~~~~~●~~

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- १   

        कथा माझी ऐका..!!  
            
 ═••═
        👉इयत्ता — पहिली ते सातवी
        👉विषय — मराठी
        👉कृती —
🔹प्रथम आवडीच्या चांगल्या कथा ऐकविल्या.
🔸सोप्या,परिचित, कथा मोबाईलवर दाखवल्या.
🔹मी स्वत: कथा साभिनय सादर केल्या.
🔸दोन-दोन विद्यार्थ्यांना एकत्र बसवून चित्रकथा निरीक्षण करून चर्चा करायला लावल्या.
🔹विद्यार्थ्यांकडून चिञकथेचे अभिवाचन करून घेतले.
🔸रोज एक तास विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके वाचायला दिली.
🔹आजी-आजोबा,आई-बाबा,यांच्या कडून ऐकलेल्या कथा विद्यार्थ्यांना सांगायला लावल्या.
🔸प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना कथा साभिनय सादर करण्याची संधी दिली.
🔹विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्या- त्या वेळी करून नोंदी ठेवल्या.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯समजपूर्वक ऐकण्याची सवय लागते.
🎯सूक्ष्म निरीक्षण करायची सवय लागते.
🎯विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते.
🎯शाळेप्रती आवड निर्माण होते.
🎯विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास साधता येतो.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                 ~~●~~~~~~~~●~~
🟣🔵🟥💜🟩🟡🟢

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- २   

    🎤आपण सारे गाऊया...!!🎤  
               ═••═
👉 ~अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी,बालकेंद्रित,कृतिशील व्हावी,विद्यार्थ्यांना मातृभाषेच्या अध्ययनाविषयी गोडी निर्माण करणे. यासाठी वर्गात नवोपक्रम  मालिका सुरू केली.~ 👇
    👉 इयत्ता — पहिली ते सातवी पर्यंत उपक्रम घेता येतो.
     👉 विषय — मराठी
     👉 कृती —
🔹प्रथम विद्यार्थ्यांना बडबडगीत,बालगीत,कविता ऐकविल्या.
🔸कृतीयुक्त बडबडगीत,बालगीत,कविता मोबाईलवर दाखवल्या.
🔹स्वत: साभिनय गाणी सादर करून विद्यार्थ्यांकडून कृतीसह गायन करून घेतली.
🔸बालगीतांच्या प्रसिद्ध झालेल्या कॅसेटचा संग्रह करून प्रसंगानुसार त्या कॅसेट संगणकावर दाखवल्या.
🔹लग्नप्रसंगी गायली जाणारी गाणी गाण्यास विद्यार्थ्यांना संधी दिली.
🔸विद्यार्थ्यांचे गट करून रोज प्रत्येक गटाने कृतीयुक्त गाणे सादर करण्यास संधी दिली.
🔹 तालासुरात साभिनय गाणी मुलांना सादर करण्यास योग्य मार्गदर्शन केले.
🔸 *समजपूर्वक गाणी एेकतात का? गाण्यातील ओळींचा अर्थ समजून घेतात का?* हे पाहण्यासाठी योग्य वेळी प्रश्न विचारून पडताळा घेतला.


       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯समजपूर्वक ऐकणे.
🎯सुप्त प्रतिभाशक्तीला वाव मिळाला.
🎯शैक्षणिक वातावरण निर्मिती झाली.
🎯विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा येऊ लागला.
🎯वर्गात उपस्थितीचे प्रमाण वाढले.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
          ~~●~~~~~~~~●~~
 
        मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- ३   

    🎤 सुसंवाद साधू या...! 🎤  
          ═••═
      👉विषय —मराठी
      👉कृती—
🔹सर्वप्रथम छोटे छोटे संवाद ऐकविले.
🔸चिञ व संवाद वाचन करून घेतले.
🔹वर्तमानपञातील संवादाचे अभिवाचन करून घेतले.
🔸संवाद मोबाईल व संगणकावर दाखवले.
🔹स्वत: संवादाचे सादरीकरण करून दाखवले.
🔸हुशार विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयावर काही संवाद साभिनय बसविले.
🔹वर्गात बालसभा घेऊन संवादाचे सादरीकरण करून घेतले.
🔸वर्गातील मुलांचे गट पाडून संवादाचे विषय देऊन स्वत:च्या कल्पकतेने सादर करण्याची संधी दिली.
🔹वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना संवाद सादर करण्याची संधी दिली.
🔸संवादाचे विषय परिचित प्रसंगावर दिले.त्यामुळे अबोल विद्यार्थीही संवादात सहभागी झाले.
        👉संवादाचे विषय —
 भाऊ-बहिण, वडिल-मुलगी, मिञ-मैञिणी, डाॅक्टर-पेशंट, शिक्षक-विद्यार्थी, कावळा-चिमणी, सायकल-रिक्षा.....
🟣🔵🟥💜🟩🟡🟢

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯संवाद समजपूर्वक ऐकतात.
🎯संवाद व नाट्टीकरण कौशल्यांचा विकास होतो.
🎯कल्पना शक्तीला चालना मिळते.
🎯अबोल विद्यार्थी सहभागी झाले.
🎯भीती नाहिशी होऊन आत्मविश्वास वाढतो.
🎯वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
            ~~●~~~~~~~~●~~

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- ४   

 
      सूचना ऐकू कृती करू....!!          ═••═
    👉विषय — मराठी
    👉साहित्य — मराठी साहित्य पेटीतील सूचनासंच...
    👉 कृती —
🔸 एक कृती असणारी सूचना —
  १ ) एक अक्षरी सूचना —
   उदा...ये , घे , दे , खा  पी........
  २ ) दोन अक्षरी सूचना —   उदा.ठेव , आण , बस , चल , धाव , नाच , मार.....
  ३ ) दोन शब्दांची सूचना—
 उदा.पाणी आण , खाली बस , पुस्तक काढ , चहा पी , रांगोळी काढ....
 ४ ) तीन शब्द असणारी सूचना—
  उदा. १ ) पाच उड्या मार. २ ) निशा खाली बस.३ ) दोन टाळ्या वाजव.४) वर्गात कचरा करू नको.
🔹 दोन कृती असणारी सूचना—
उदा.१ ) अजय इकडे ये , पाणी पी...२ ) निशा चिञ काढ , रंग भर.३ ) कचरा उचल,कचराकुंडीत टाक.
🔸तीन कृती असणारी सूचना —
उदा. १ ) सिमा इकडे ये , साबण घे , हात स्वच्छ धू.
     २ ) शितल वही काढ , पेन काढ , फळ्यावरील शब्द लिही.
🔹वरील सूचना देऊन वर्गात सराव घेतला.
🔸गटपाडून गटप्रमुखाने वरील सूचना देऊन गटात सामूहिक व वैयक्तिक सराव घेतला.
🔹वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट तयार करून एक गट सूचना देणार व दुसरा गट कृती करणार याप्रमाणे *"सूचनांची स्पर्धा"*हा खेळ घेतला.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯लक्षपूर्वक ऐकून घेण्याचा शिष्टाचार वाढीस लागला.
🎯नम्रतेची भावना निर्माण झाली.
🎯आळस दूर होऊन चपळता आली.
🎯सांगीतलेली कृती योग्य रितीने  करण्याची सवय लागली.
🎯"मी नाही करणार जा." ही वृत्ती कमी झाली.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                ~~●~~~~~~~~●~~

      मराठी नवोपक्रम मालिका...!! भाग -- ५   

     माझ्या मागे म्हणा.......!!  
          ═••═
    👉साहित्य — मराठी साहित्य पेटीतील चिञवाक्य साचे...


    👉 कृती —
🔹चिञवाक्य साचे घेऊन वाचन घेतले.
🔸वर्तमानपञ व दिनदर्शिकेवरील सचिञ वाक्य म्हणण्याचा सराव घेतला.
🔹सोपी वाक्ये, सुविचार मी स्वत: बोलून माझ्यामागे सामूहिक, वैयक्तिक म्हणून घेतली.
🔸वर्गात दोन गट पाडून एक गट वाक्य सांगत तर दुसरा गट त्यांच्या मागे म्हणत.
🔹दोन-दोन विद्यार्थ्यांना पुढे बोलवून एक विद्यार्थी वाक्य सांगणार तर दुसरा विद्यार्थी वाक्य  बोलणार अशी वाक्यांची स्पर्धा घेतली.
🔸बाकी विद्यार्थी निरीक्षण करून चुकांचा शोध घेत.
🔹वरील प्रमाणे "माझ्या मागे म्हणा..." हा उपक्रम वर्गात राबविला.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯उच्चारदोष सुधारले.
🎯श्रवण कौशल्यांचा विकास झाला.
🎯वाक्य रचना करता येते.
🎯स्वराघातासह योग्य गतीने वाक्य बोलता येतात.
🎯वाक्यातील विरामचिन्हांचा अर्थ समजणे.
🎯स्वयंअध्ययनासाठी वरील उपक्रमाचा फायदा झाला.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
             ~~●~~~~~~~~●~~
  आणखी मराठी नवोपक्रम  वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 ⏪⏪
 01 02 03 04⏩⏩



No comments:

Post a Comment