"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

आधार कार्ड व्हॅलिडेशन

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडेशन करण्यासाठी प्रोसेस केले असता बऱ्याच शिक्षकांना अडचण येत आहे. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड ची माहिती कदाचित व्यवस्थित नोंद केली नसावी किंवा शाळेत पालकांनी दिलेले कार्ड अध्यायावत नसावे अशा शक्यता दिसून येतात त्यामुळे शाळांनी ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड यापूर्वी invalid म्हणून शाळेच्या लॉगिनला दिसत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत शाळांनी वेळ न दडवता इ-आधार कार्ड डाउनलोड करून घेतल्यास अशा ई-आधार कार्ड वरील माहिती स्टुडन्ट पोर्टलमध्ये नोंद केल्यानंतर validचे प्रमाण जवळपास 100% दिसून येईल. याचे कारण आधार प्रमाणिकरणाकडे असलेला डेटाच ई-आधार कार्डमध्ये नजीकचा डेटा आल्याने विद्यार्थ्यांचे व्हॅलिडचे प्रमाण निश्चितच वाढताना दिसेल ,त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की शाळांमध्ये Invalid आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत  शाळांनी ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर पालकाचा मोबाईल नंबर असेल अशा पालकांना शाळेत बोलावून घेऊन अथवा ओटीपी देण्याची विनंती करून UIDAIच्या संकेतस्थळावर भेट देऊन शाळेतच UIDAIच्या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांची इ -आधार कार्ड डाउनलोड करून घेता येतील व अशी माहिती स्टुडन्ट पोर्टलवर view & update करून save केल्यास  व त्यानंतर validate  बटन वर क्लिक करून कार्यवाही केल्यास कमी वेळात आधार कार्ड वैध  होण्याचे प्रमाण वाढेल.

Validate - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर validate बटण येते.


Validation Process - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल त्यांच्याच नावासमोर validate बटण येते. ज्या ज्या नावासमोर validate बटण आले असेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदानंतर process पूर्ण होते व विद्यार्थ्याची माहिती UIDAI कडील माहितीशी सुसंगत झाली कि विद्यार्थ्याच्या नावासमोर Validated असे दिसते. तसेच invalid ठरल्यास पुन्हा माहिती पूर्ण करण्यासाठी Reports -> Status ->Invalid Aadhaar As per UIDAI वर माहिती तपासून update करून save करणे व पुन्हा validate बटणवर क्लिक करून पुढील कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरते.

View & Update - या मध्ये विद्यार्थ्याची personal details व Aadhaar Card Details या दोन टेबल मधील माहिती नोंद केलेली आहे ती पाहण्याची सुविधा दिलेली आहे. validate बटण वर क्लिक करण्यापूर्वी दोन्ही टेबल मधील माहिती पाहता येईल,दुरुस्ती करावयाची असल्यास करता येईल.


   विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट करण्याची कार्यवाही NIC स्तरावरून तसेच मुख्याध्यापक यांचे लॉगिन वरून दोन्ही प्रकारे सुरू आहे.काही वेळा मुख्याध्यापकांना कनेक्शन मिळत नाही अशा वेळेला काही वेळानंतर प्रयत्न केल्यास कनेक्शन प्रॉपर मिळाल्यानंतर व्हॅलिटेशनची प्रक्रिया गतीने होताना दिसून येईल. 

No comments:

Post a Comment