"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

लोकमान्य टिळक


 ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक...
  ◆लोकमान्य बाळ गंगाधर टिळक◆
●टोपणनाव :~ लोकमान्य टिळक
●जन्म :~ २३ जुलै १८५६, रत्‍नागिरी, महाराष्ट्र,
●मृत्यू :~ १ ऑगस्ट १९२०
पुणे, महाराष्ट्र, भारत
●चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा
●पत्रकारिता/ लेखन :~ केसरी, मराठा
●वडील :~ गंगाधर रामचंद्र टिळक
●आई :~ पार्वतीबाई टिळक
●पत्नी नाव :~ तापीबाई
●तळटिपा :~ "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच "
   भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक आणि जाज्वल्य देशभक्त, मराठी माणसाचा अभिमान म्हणजे लोकमान्य टिळक. एक महान स्वातंत्र्यसेनानी, उत्कृष्ट वक्ते, उत्तम समाजसुधारक, आदर्शवादी असा राष्ट्रीय नेता, तसंच हिंदू धर्म, खगोलशास्त्र, संस्कृत आणि गणित या विषयांचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध, आधुनिक भारताचे शिल्पकार असणाऱ्या लोकमान्य टिळक यांची माहिती....
 ◆लोकमान्य बाळ गंगाधर टिळक◆
     हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

          टिळकांचे खरे नाव केशव आहे. परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे.
लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.

       सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.

 ~~~~~~~~

   ⇩⇩ लोकमान्य टिळक  मराठी भाषणे साठी क्लिक करा  ⇩⇩  



~~~~~~~~
         साहित्य आणि संशोधन :~ टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे.
~~~~~~~~

★लोकमान्य टिळक यांच्याबाबत इतर माहिती...

    ध्येयवादी विचारांनी भरलेले आणि आपले संपूर्ण आयुष्य देशकार्यासाठी घालवण्याचा पक्का निर्णय करणारे या मातृभुमीतले हीरे,  तसे तर दापोली मधले चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांच्या वडीलांचे म्हणजेच गंगाधरपंतांचे वास्तव्य शिक्षकाच्या नोकरीमुळे रत्नागिरीला होते. 

लहानपणापासूनच त्यांना उत्साही आणि उत्कट राष्ट्रवादी आणि क्रांतिकारी कार्यात भाग घेण्याची खूप आवड होती आणि म्हणूनच ते अशा राष्टवादी लोकांना पाठिंबा देत असत.
         वयाच्या १६ व्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १७ व्या वर्षी त्यांचे लग्न सत्यभामाबाई उर्फ तापीबाई यांच्यासोबत झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. १८७६ साली टिळक गणित विषयातून बी.ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले. यावरच न थांबता पुढे त्यांनी एल.एल.बी देखील केले. 
         डेक्कन कॉलेज मध्ये असताना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. १८८० मध्ये त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेज चालू केले. 
         टिळकांनी लोकजागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे चालू केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी, हा त्यामागील उद्देश्य होता. १८९६ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतकाऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. १८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. 
         भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेले अत्याचार पाहिल्यानंतर टिळकांनी आपले जीवन भारत आणि भारतातील जनतेला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले होते.
          टिळकांच्या सिंहगर्जनेने संपूर्ण इंग्रज सरकार हादरून जात असत. टिळकांनी संपूर्ण स्वराज्य घेण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या नेतृत्वाच्या अनोख्या शैलीमुळे त्यांना जनमानसात लोकप्रिय केले, इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती. त्यांना ब्रिटिश सरकारने भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले.
~~~~~~~~
   ◆लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त त्यांचे जीवनकार्य व कर्तृत्वाची महती सांगणारी शिक्षक व विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती Pdf स्वरूपात.... 
लोकमान्य टिळक याच्यावरील मराठी, हिंन्दी, इंग्रजीत भाषणे.
लोकमान्य टिळक यांचा  संपुर्ण जिवन परिचय मराठी, हिंन्दी व इंग्रजीत...

★★CLICK HERE 
⇩⇩⇩ DOWNLOAD★★
~~~ ~~~~~

No comments:

Post a Comment