"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शालेय गणित नवोपक्रम मालिका...

   सौ. अलकाताई राकेश फुलझेले   उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 

   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   
सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... व गणित नवोपक्रम मालिका...
~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 1  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬       

      🤹‍♀खपची टाका अंक वाचा...🤹‍♂      
            ═••═
👉इयत्ता — पहिली
👉विषय — गणित
👉कृती —
🔹जेवढे अंक शिकवून झाले तेवढेच घ्या.
🔸वर्गात किंवा वर्गाबाहेर सहा चौकोन आखा.
🔹प्रत्येक चौकोनात एक अंक लिहा.
🔸अंक क्रमाने लिहू नका.
🔹प्रथम शिक्षक खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवतील.
🔸एका विद्यार्थ्याच्या हातात खपची देऊन चौकोनाच्या विरूद्ध दिशेला तोंड करून उभे करा.
🔹विद्यार्थ्याने खपची टाकल्यावर ती ज्या चौकोनात पडली त्या चौकोनातील अंक वाचायला सांगा.
🔸वाचलेल्या अंकावर कृती करून घ्या.
🔹उदा..३ च्या घरात खपची पडली तर तीन उड्या मार,तीन टाळ्या वाजव,तीन बोट दाखव,तीन दगड आण,तीन पाने आण....
🔸अशाप्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला संधी द्यावी.
🟣🔵🟥 🟡🟢

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯अंकांचे दृढीकरण होते.
🎯अंक अचूक ओळखतात.
🎯खेळातून विद्यार्थी लवकर शिकतात.
🎯खेळातून अभ्यासाची आवड निर्माण करणे.
🎯कृतींची भाषा सहज करता येते.
🎯शून्याची संकल्पना स्पष्ट होते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
              ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 2  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬     
       💠  गाडी आली.. पळा रे पळा... 💠    
            ═••═
   🎈 इयत्ता — पहिली🎈
     👉 शैक्षणिक साहित्य — घंटा, खंजिरी
       👉 कृती —
🔹मैदानावर मोठे वर्तुळ आखा.
🔸वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना वर्तुळावर उभे करा.
🔹एक गटप्रमुख वर्तुळामध्ये उभा करा.त्याने वर्तुळावरील मुलांना सूचना करावी की , " गाडी आली , गाडी आली पळा रे पळा....."
🔸गाडी आली ,गाडी आली पळा रे पळा असे म्हणतांना खंजिरी वाजवेल...तोपर्यंत मुलांनी पळावे.
 🔹खंजिरीचा आवाज थांबला की , मुलांनी थांबावे.तेव्हा गटप्रमुख एका मुलासमोर उभा राहून ४ बोलेल समोरचा विद्यार्थी ५ बोलेल ,त्यानंतरचा विद्यार्थी ६ बोलेल....याप्रमाणे २० पर्यंत म्हणावे.चुकणारा विद्यार्थी बाद होईल..
🔸पुन्हा खेळ सुरू होईल...अशाप्रकारे १ ते २० अंकाचा सराव होईल.
🔹प्रत्येक वेळी गटप्रमुखाने वेगवेगळ्या अंकापासून सुरूवात करावी.
🔸नंतर १ ते २० संख्या उलट क्रमाने उदा. २० , १९ , १८ ,१७.........म्हणण्यासाठी हा खेळ घ्यावा.
 🔹नंतर २१  ते  ३० संख्या....तसेच ३१ ते ४० संख्या.....अशाप्रकारे १०० पर्यंतच्या संख्याचा खेळ वाढवत न्यावा.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯१ ते २० संख्या क्रमाने म्हणता येतात.
🎯१ ते २० संख्या उलट्या क्रमाने म्हणता येतात.
🎯संख्याज्ञान दृढ होते.
🎯 खेळातून ज्ञान प्राप्त होते.
🎯गणित विषयाची आवड निर्माण करणे.
       ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
            ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 3  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬     
  💠  झटपट बेरीज वजाबाकी शिकूया.. ! 💠          
            ═••═
     👉इयत्ता - पहिली
     👉साहित्य — पिस्त्याची टरफले. ( पिस्त्याची २० टरफले आतून रंगवून घ्या. )
        👉 कृती —
🔹विद्यार्थ्यांना गोलाकार बसवा.
🔸दहा टरफले खुळखुळवून विद्यार्थ्यांच्या समोर टाकावी.त्यांना पुढील प्रश्न तोंडी विचारावी.....👇
 १ ) टाकलेल्या टरफलातील रंगीत बाजू वर दिसणारी टरफले मोजा ?
 २ ) बाहेरी बाजू वर दिसणारी टरफले मोजा ?
 ३ ) यातील मोठी संख्या कोणती ?
 ४ ) यातील लहान संख्या कोणती ?
 ५ ) या दोन्हींची बेरीज करा.
 ६ ) या दोन्हींची वजाबाकी करा.
 ७) याच टरफलातून पेक्षा लहान, पेक्षा मोठे, कितीने लहान, कितीने मोठे असाही सराव करून घ्यावा.
🔹हळूहळू पिस्त्याची टरफले वाढवत न्यावी..... शेवटी २० टरफले टाकून बेरीज वजाबाकीचा सराव घ्यावा.

         👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 संख्याज्ञानचे दृढीकरण होते.
🎯 लहान मोठ्या संख्येचा संबोध दृढ होतो.
🎯 तोंडी बेरीज वजाबाकी करतात.
🎯 खेळातून गणित विषयाची आवड निर्माण होते.
 ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
            ~~●~~~~~~~~●~~
🟢

     ⏬⏬ उपक्रम क्र.- 4  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬     
      💠  माझा मिञ शोधा.... 💠      
         
   ═••═
    👉 साहित्य —
विदुषकाची टोपी , चेंडू इष्टिकाचिती आकाराची खोकी, फासा, आयत, ञिकोण, चौरस, षटकोण, दंडगोल, लोलक यांच्या आकृत्या...
शंकू, गोल , इष्टिकाचिती, घन, आयत, ञिकोण , वर्तुळ  चौरस, दंडगोल, लोलक या अाकृत्यांच्या नावांची कार्डे...

         👉कृती—
🔹वर्गातील दहा — दहा विद्यार्थ्यांना समोरासमोर दोन ओळीत बसवा.
🔸पहिल्या ओळीतील दहा विद्यार्थ्यांच्या हातात अाकृत्या द्या.
🔹दुसर्‍या ओळीतील दहा विद्यार्थ्यांच्या हातात नावांची कार्ड द्यावी.
🔸"माझा मिञ मला द्या " खेळाविषयी सूचना द्यावी.
 🔹उदा....वर्तुळाची आकृती ज्या विद्यार्थ्याजवळ आहे त्याने व वर्तुळाच्या नावाचे कार्ड ज्या विद्यार्थ्याजवळ असेल ते दोघे जवळ येतील.
🔸सर्वात आधी आणि अचूक जोडी जे विद्यार्थी लावतील त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करावे. 👏
🔹याप्रमाणे भौमितीक आकार व त्यांची नावे यांच्या जोड्या *" माझा मिञ शोधा "* या खेळातून सराव घ्यावा.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯भौमितिक आकारांची ओळख होते.
🎯अाकृत्या व त्यांची नावे यांचे दृढीकरण होते.
🎯दिवसभराच्या अभ्यासाचा क्षीण घालवणे.
🎯 वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण करणे.
  ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
           ~~●~~~~~~~~●~~





▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 5  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬     
      💠 टाळी मारूनी जावे.....  💠       
            ═••═

   👉 इयत्ता — तिसरी व चौथी
   👉 शैक्षणिक साहित्य— 2 ते 10 पाढ्यांची संख्याकार्ड....
     👉 कृतीची कार्यवाही —
🔹दहा दहा विद्यार्थ्याचा दोन गट करावे.
🔸दोन्ही गट समोरासमोर बसवावे.
🔹एक हुषार विद्यार्थी गटप्रमुख म्हणून नेमावा.
🔸दहा विद्यार्थ्यांच्या गळ्यात 4 च्या पाढ्याचे एकेक संख्याकार्ड  लावावे.
🔹पुढच्या रांगेतील एका विद्यार्थ्याचे डोळे गटप्रमुखाने बंद करावे.
🔸गटप्रमुखाने सुरात म्हणावे, 'चार चोकने यावे, टाळी मारूनी जावे. हसू नये, बोलू नये,गुपचुप जाऊन बसावे.'
🔹चार चोक सोळा' म्हणून 16 संख्याकार्ड गळ्यात असलेला विद्यार्थी डोळे झाकलेल्या विद्यार्थ्याला टाळी देईल व जागेवर गुपचुप जाऊन बसेल.
🔸आता गटप्रमुखाने ज्या विद्यार्थ्याचे डोळे झाकले होते, ते उघडावे.
🔹डोळे उघडल्यावर त्या विद्यार्थ्याने 16 संख्याकार्ड गळ्यात असलेल्या विद्यार्थ्याचे नाव मोठ्याने सांगावे.
🔸जर त्याला ओळखता आले नाही तर तो बाद होईल.
🔹दुसर्‍या विद्यार्थ्याचे डोळे झाकावे व असाच खेळ सुरू ठेवावा.
🔸अशाप्रकारे 2 ते 10 पाढ्यांचा खेळ घ्यावा.
 🌀मोठ्या वर्गासाठी वर्ग — वर्गमूळ,घन — घनमुळ यासारख्या घटकाचा सराव या उपक्रमातून घेता येईल.

         👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯 हसत खेळत सर्वांचे पाढे पाठ होतात.
🎯 पाढ्यांचे दृढीकरण होते.
🎯 कृतीतून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.
🎯 एकाग्रता वाढते.
🎯खेळातून ज्ञान प्राप्त होते.
       ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
       ~~●~~~~~~~~●~~
     ⏬⏬ उपक्रम क्र.- 6  💠 उपक्रमाचे नाव  ⏬⏬     
     💠  टप्पा उडी मारुया... 💠         
            ═••═
           👉साहित्य —
फरशीवर जमिनीवर आखलेली १ ते १०० ची चौरस चौकट काढा.
           👉कार्यवाही —
🔹एका विद्यार्थ्याला १ या संख्येवर उभे करावे.त्याला दोनच्या टप्प्याने दहा उड्या मारायला सांगायच्या.
उदा— ३ , ५ , ९ , ११ , १५,  १७, १९ , २१...अशा उड्या मारतांना तोंडाने पुढच्या टप्प्याच्या संख्या म्हणेल.
🔸दुसर्‍या विद्यार्थ्याला १  या संख्येवर उभे करून ३ च्या टप्प्याने उड्या मारायला सांगावे.
🔹याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला १ पासून ९ पर्यंतच्या संख्येचे टप्पे दाखवण्यासाठी उड्या मारून घ्याव्या.
  👉सूचना— विद्यार्थ्यांना लांब उडी मोठ्या संख्येसाठी शक्य नसेल तर मोठ्या संख्येच्या टप्प्यासाठी धावत जाऊन त्या टप्प्यावर उभे राहायला सांगा व संख्या उच्चारायला लावा.
🔹विद्यार्थ्यांना १ ते १०० चौकटीतील सम संख्यावर उडी मारायला सांगावी.
🔸याचप्रमाणे विषम संख्येवर उडी मारायला सांगावी.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯संख्याज्ञानचे दृढीकरण होते.
🎯विद्यार्थी टप्पे ओळखतात.
🎯टप्प्याने संख्या ओळखतात.
🎯सम विषम संख्या ओळखतात.
     ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
         ~~●~~~~~~~~●~~
  आणखी गणित नवोपक्रम  वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 ⏪⏪
 01 0203
⏩⏩

 




No comments:

Post a Comment