"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

परिसर अभ्यास नवोपक्रम मालिका


    सौ. अलकाताई राकेश फुलझेले  उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   

सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... व मेजवानी परिसर अभ्यास नवोपक्रम मालिका...
     ~~●~~~~~~~~●~~
     ⏬ उपक्रम क्र.- 1 💠 उपक्रमाचे नाव  ⏬       
    🌎चला वातावरणाचे थर पाहूया...!!🌍   
      ═••═
      👉इयत्ता—पाचवी
      👉विषय— परिसर अभ्यास
      👉प्रत्यक्ष कार्यवाही—
🌎पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे विविध थर Sun board वर कापून प्रत्येक थराला विविध रंगीत कागद चिटवून साहित्य तयार केले.
🌎पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठात "पृथ्वीचे वातावरण" हा घटक शिकवितांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर,स्थितांबर,मध्यांबर,आयनांबर व बाह्यांबर अशा विविध थरांची माहिती विद्यार्थ्यांशी चर्चा करून स्पष्ट केली.
      👉प्रत्यक्ष कृती—
🌎सर्व विद्यार्थ्यांना वर्तुळाकार बसवा.
🌎साहित्याच्या साह्याने पुढील तोंडीकाम व कृती करून घ्यावी.👇
🌎पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे थर क्रमाने लावा.
🌎क्रमाने लावलेल्या थरांची नावे व चिञे त्यावर ठेवा.
🌎पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तपांबराचा थर किती किलोमीटर आहे ?
🌎ढग,पाऊस,धुके,वारे,वादळे कोणत्या थरात घडतात ?
🌎स्थितांबराचा थर किती किलोमीटर पर्यंत आहे ?
🌎ओझोन वायू कोणत्या थरात आढळतो ?
🌎पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण कोणता वायू करतो ?
🌎विमान कोणत्या थरातून उडते दाखवा.
🌎कृञिम उपग्रह कोणत्या थरात आहे ते दाखवा ?
🌎राॅकेट कोणत्या थरापर्यंत जाते ते दाखवा.
🌎HOT AIR बलून कोणत्या थरापर्यंत जातो ते दाखवा?
🌎सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू अडवतो ?

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯साहित्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचे विविध थरांची माहिती लवकर समजते.
🎯ओझोन वायूचे महत्व समजले.
🎯आॅक्सिजन वायू व ओझोन वायू सजीवांचा रक्षक आहे हे समजले.
🎯परिसर अभ्यास या विषयाची आवड निर्माण होते.
🎯कृतीतून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.
  ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍              ~~●~~~~~~~~●~~

    ⏬ उपक्रम क्र.- 2  💠 उपक्रमाचे नाव  ⏬       
      🌍चला सूर्यमाला तयार करूया.!!🌍     
            ═••═
    👉इयत्ता — पाचवी
    👉विषय — परिसर अभ्यास
    👉 शै. साहित्य — ग्रहांच्या नावांची कार्डे
     👉प्रत्यक्ष कार्यवाही —
🌍मैदानावर सूर्यमालेचे रिंगण तयार केले.
🌍सर्व विद्यार्थ्यांना सूर्यमालेच्या रिंगणाच्या बाहेर गोलाकार बसविले.
🌍दगडांवर ग्रहांची नावे लिहून सूर्यमालेत योग्य क्रमाणे ठेवली.
🌍प्रत्येक ग्रहांचे सूर्यापासूनचे स्थान व माहिती समजावून दिली.
🌍सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह, सर्वात दूरचा ग्रह,सूर्यापासून पृथ्वीचे स्थान,दोन ग्रहांच्या मधला ग्रह,पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण प्रत्यक्ष समजावून दिले.
        👉प्रत्यक्ष कृती —
🌞एका विद्यार्थ्याला सूर्याचे स्थान दिले.
🌞नऊ विद्यार्थ्यांना ग्रहांच्या नावांची कार्डे दिली.
🌞सूर्यापासून प्रत्येक ग्रहांनी आपल्या आपल्या स्थानावर उभे राहून सूर्यमाला तयार करण्यास सांगीतले.
🌞पहिल्या वेळेस सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम उलटसुलट लावला.पण दुसर्‍या वेळेला सूर्यमालेचा अचूक क्रम लावला.
🌞प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरतो कृती करून घेतली.
🌞सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले.त्यामुळे चांगलाच सराव झाला.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
💫ग्रहांची नावे सांगता येणे.
💫सूर्यापासून प्रत्येक ग्रहाचे स्थान सांगता येणे.
💫दोन ग्रहांच्या मधला ग्रह पटकण सांगता येणे.
💫प्रत्येक ग्रह सूर्याभोवती विशिष्ट अंतरावरून फिरतो कृतीतून लवकर समजते.
💫प्रत्यक्ष कृती केल्यामुळे सूर्यमाला चिरकाल स्मरणात राहते.
💫सूर्यमालेसंबधीच्या सर्व संकल्पना स्पष्ट होते.
💫परिसर अभ्यास या विषयाची आवड निर्माण करणे.
   ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले                ~~●~~~~~~~~●~~
    ⏬ उपक्रम क्र.- 3  💠 उपक्रमाचे नाव  ⏬       
         🌍 प्रयोग — पृथ्वीचे फिरणे 🌍    
            ═••═
  👉इयत्ता — पाचवी
  👉विषय —परिसर अभ्यास
  👉साहित्य — मेणबत्ती , पृथ्वीगोल , टिकली...
   👉प्रयोगाची मांडणी —
🌍प्रथम सर्व विद्यार्थ्यांना वर्तुळात बसवा.
🌍वर्तुळाच्या मध्यभागी मेणबत्ती ठेवा.
🌍मेणबत्तीच्या भोवती एक छोटे वर्तुळ काढा.
🌍वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वीगोल ठेवा.
🌍पृथ्वीगोलावर एक टिकली चिकटवा.
🌍मेणबत्ती पेटवा वर्गात अंधार करा.

    👉प्रयोगाची प्रत्यक्ष कृती—
🌞पृथ्वीगोल घड्याळ्याच्या काट्यांच्या विरूद्ध दिशेने फिरवा.
🌞ज्या भागावर मेणबत्तीचा उजेड पडतो तेथे दिन व विरूद्ध बाजूला राञ विद्यार्थ्यांकडून कृती करून घ्यावी.
🌞पृथ्वीगोलावरील टिकलीवर सूर्योदय , मध्यान्ह , सूर्यास्त  विद्यार्थ्यांकडून कृती करून घ्यावी.
🌞पृथ्वीचे परिवलन , परिभ्रमण मुलांकडून प्रत्यक्ष करून घ्यावे.
🌞परिवलानासाठी 24 तास म्हणजे एक दिवस व परिभ्रमणासाठी 365 दिवस म्हणजे एक वर्ष स्पष्ट करणे.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯प्रत्यक्ष कृतीतून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.
🎯अद्भूत वाटणार्‍या घटना प्रयोगामुळे लवकर समजल्या.
🎯परिसर अभ्यास हा विषय सोपा वाटू लागला.
🎯पृथ्वीचे फिरणे या घटकासंबधीच्या सर्व संकल्पना स्पष्ट झाल्या.
  ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍            ~~●~~~~~~~~●~~



▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
    ⏬ उपक्रम क्र.- 4  💠 उपक्रमाचे नाव  ⏬       
        🌍कोण बनणार खगोलप्रेमी...!!🌍     
            ═••═
    🌍"पृथ्वीचे फिरणे" या घटकामध्ये पृथ्वीचे परिवलन,परिभ्रमण,दिवस व राञ, सूर्योदय, सूर्यास्त, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण प्रत्यक्ष प्रयोगातून स्पष्ट केले.आज त्यावरआधारित एक प्रश्नावली तयार केली.जो सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष कृतीतून देईल तो आजच्या उपक्रमाचा "खगोलप्रेमी"...!
     👉इयत्ता —पाचवी
     👉विषय —परिसर अभ्यास
     👉शै.साहित्य — सूर्य,चंद्र,पृथ्वी यांची एकञीत प्रतिकृती,बॅटरी ( TORCH )🔦...

      👉 प्रत्यक्ष कार्यवाही—
♻प्रथम सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसविले.
🎤सूर्यमालेविषयी एक प्रश्न विचारला..उदा.सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
☝सर्वात पहिले ज्या विद्यार्थ्याने हात वर करून अचूक उत्तर दिले त्याला हाॅट सीटवर बसविले.
🔹टेबलावर सूर्य,चंद्र,पृथ्वी यांची एकञीत प्रतिकृती व बॅटरी ठेवली.
🔸सर्व प्रश्नांची उत्तरे कृतीतून दाखवायची..खेळाचे नियम समजावून सांगीतले.
🔹प्रश्नावली घेऊन पुढील प्रश्न विचारले.👇
1 )पृथ्वीचे परिवलन दाखव..
2 )पृथ्वीचे परिभ्रमण दाखव...
3 )पृथ्वीवरील दिवस दाखव...
4 )पृथ्वीवरील राञ दाखव..
5 )सूर्यग्रहण दाखव..
6 )चंद्रग्रहण दाखव..
7 )पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे एक वर्ष दाखव..
8 )पृथ्वीचे स्वत:भोवती फिरणे एक दिवस दाखव..
9 )पृथ्वी कोणत्या दिशेकडून फिरते दाखव..
10 )पृथ्वीचा उपग्रह दाखव..
11 )सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?👇
✌☝येथे विद्यार्थ्यांनी तीन बोटे दाखवणे अपेक्षित आहे.
🔸वरील सर्व प्रश्नांची उत्तरे कृतीतून अचूक जो विद्यार्थी देणार तो आजचा "खगोलप्रेमी" म्हणून घोषित करावा.
👉शेवटी सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून कृती करून घ्यावी.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯अबोल विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी होतो.त्यामुळे तोंडीकामात गुण कमी मिळाले तरी कृतीतून त्याला पूर्ण गुण मिळतात.
🎯विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
🎯वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होतो.
🎯सूर्यग्रहण व चंद्रग्रहण होण्यामागचे नेमके कारण कळते.
🎯परिसर अभ्यास या विषयाचे प्रश्न सहज लक्षात राहतात.
  ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍             ~~●~~~~~~~~●~~
    ⏬ उपक्रम क्र.- 5  💠 उपक्रमाचे नाव  ⏬        
     🍋चला लिंबाचे लोणचे तयार करूया...!!🍋         
            ═••═
   👉इयत्ता पाचवीला परिसर अभ्यास या विषयात अन्न टिकविण्याच्या पद्धती या घटकात लिंबाचे लोणचे तयार करून घ्यायचे आहे.आज वर्गात विद्यार्थ्यांनी पुस्तकातील लिंबाच्या लोचण्याची कृती बघून स्वत: लोणचे तयार केले.👇
       👉इयत्ता — पाचवी
       👉 विषय — परिसर अभ्यास
       👉 साहित्य — लिंबे, मीठ, तिखट, साखर....
       👉 प्रत्यक्ष कृती —
🍋एका लिंबाच्या आठ फोडी करा.
🍋योग्य प्रमाणात तिखट,मीठ,साखर घाला.
🍋कोरड्या चमच्याने नीट फिरवा.
🍋सर्व मिसळलेले घटक कोरड्या बरणीत भरून ठेवा.
🍋 बरणीच्या तोंडावर स्वच्छ कापड घट्ट बांधून कडक उन्हात बरणी ठेवा.
🍋 शालेय पोषण आहारा सोबत लोणचे खायला द्या....

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯अचूक कृती करण्याची सवय लागते.
🎯विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद होतो.
🎯काळजीपूर्वक काम करण्याची सवय लागते.
🎯विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
🎯एकमेकांना सहकार्य करून काम करण्याची सवय लागते.
🎯या उपक्रमातून उत्पादक अन्नपदार्थ तयार करून स्वावलंबी जीवनाची दिशा मिळते.
  ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले                 ~~●~~~~~~~~●~~


    ⏬ उपक्रम क्र.- 6  💠 उपक्रमाचे नाव  ⏬        
    🌖चला चंद्राच्या कला पाहूया...🌖    
            ═••═
        👉इयत्ता — पाचवी
        👉विषय — परिसर अभ्यास
             🌎"पृथ्वीचे फिरणे" या पाठात चंद्राच्या कला हा घटक आपण विद्यार्थ्यांना रोज चंद्राचे निरीक्षण करून आकृतीसह नोंद ठेवण्यास सांगू शकतो.परंतू हा घटक जुलै महिन्यात असल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे चंद्रच दिसला नाही.खर तर अभ्यासक्रम तयार करतांना हा घटक सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात ठेवला पाहिजे.म्हणून या घटकासाठी आपण पुढील साहित्याचा वापर करून घटक सोपा करून शिकवू शकतो.
       👉प्रत्यक्ष कार्यवाही—
🌝प्रथम जून्या सिडी,काळा वेलवेट पेपर,सिल्वर पेपरचा वापर करून साहित्य तयार केले.
🌚या साहित्याचा वापर करून चंद्रकला,शुक्लपक्ष,कृष्णपक्ष,चांद्रमास,तिथी या सर्व संकल्पना स्पष्ट केल्यात.

       👉प्रत्यक्ष कृती —
🌖प्रथम सर्व विद्यार्थ्यांना वर्तुळाकार बसवा.
🌖विद्यार्थ्यांकडून पुढील कृती व तोंडीकाम करून घ्या.👇
🌕पोर्णिमेची आकृती दाखवा.
🌑अमावास्याची आकृती दाखवा.
🌘अमावास्या पासून पोर्णिमेपर्यंतच्या चंद्राच्या कला क्रमाने लावा.
🌖पोर्णिमेपासून अमावास्यापर्यंत चंद्राच्या कला क्रमाने लावा.
🌘पंधरवडा म्हणजे काय?
🌓शुक्लपक्षाचा पंधरवडा कसा तयार होतो आकृतीसह दाखवा.
🌗कृष्णपक्षाचा पंधरवडा आकृतीसह दाखवा.
🌕पोर्णिमा म्हणजे काय?
🌑अमावास्या म्हणजे काय?
🌖चांद्रमास म्हणजे काय?
🌔चंद्राला प्रकाश कोठून मिळतो.
🌙चंद्राच्या कला म्हणजे काय?
🌖तिथी म्हणजे काय?
🌝अशाप्रकारे साहित्याचा वापर करून आपण तोंडीकाम व कृती घेऊन आकारिक मूल्यमापनासाठी गुण देऊ शकतो.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🌚चंद्राच्या कला संकल्पना स्पष्ट होतात.
🌝विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास हा विषय सोपा वाटून अावड निर्माण होते.
🌚अमावास्या बद्दल मनात घर करून बसलेली अंधश्रद्धा दूर होते.
🌝वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होतो.
🌚तोंडीकाम व कृतीला गुणदान करता येते.
  ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
~~●~~~~~~~~●~~

    ⏬ उपक्रम क्र.- 7  💠 उपक्रमाचे नाव  ⏬        
    🌸 विद्यार्थी संसद निवडणूक प्रक्रिया 🌸     
            ═••═
    👉विषय — परिसर अभ्यास
    👉इयत्ता — पाचवी
               👉 दिनांक 22 / 06 / 2018 जिल्हा परिषद शाळा पास्थळ येथे विद्यार्थी संसद निवडणूक घेण्याचे आयोजन करण्यात आले.नेहमी हुषार व पुढेपुढे करणार्‍या ठराविक विद्यार्थ्यांनाच संधी न देता लोकशाही पद्धतीने उमेदवार उभे करून गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

     👉प्रत्यक्ष कार्यवाही—
🔹प्रथम दोन दिवसापूर्वी वर्गमंञी पदासाठी इच्छुक उमेदवार उभे केले.
🔸इच्छुक उमेदवारांनी वर्गासाठी काय काय करणार आहोत याचा दोन दिवस प्रचार केला.
🔹गुरूवार दिनांक 21 / 06 / 2018 सायंकाळी 2 : 00 वाजता नंतर आचारसंहिता सुरू झाली.त्यामुळे आता प्रचार थांबला.
🔸शुक्रवार दिनांक 22 / 06 / 2018 रोजी ठिक 11 : 00 वाजता मतदान केंद्र सुरू करण्यात आले.
🔹इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी मतदान अधिकारी 1, 2, 3 यांची कामे यशस्वीरित्या पूर्ण केलीत.
🔸इयत्ता 5 वी मधील एकेक विद्यार्थी मतदान अधिकारी 1, 2, 3 यांच्याकडे येऊन सही करून बोटाला शाई लावून मतदान कक्षात जाऊन कोर्‍या चिठ्ठीवरआवडत्या उमेदवाराचे नाव लिहून चिठ्ठीची घडी करून ठेवत होते.
🔹सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी मतमोजणी करून  वर्गमंञी, सफाईमंञी, आरोग्यमंञी, अभ्यासमंञी यांची नावे घोषीत केली.
🔸वर्गात सर्वञ आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
🔹अशाप्रकारे आनंददायी पद्धतीने व खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.

       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯लोकशाही पद्धत व मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजली.
🎯विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणूक पद्धतीची माहिती मिळाली.
🎯आपले कर्तव्य व जबाबदारी याची लहान पणापासूनच जाणीव होते.
🎯आचारसंहिता म्हणजे नेमके काय हे कळले.
🎯विद्यार्थी संसद व्यवस्थापनामुळे वर्गात शिस्त टिकून राहते.
👉 शेवटी मी सर्व मंञ्याची सभा घेऊन प्रत्येक मंञ्याची कार्ये , जबाबदारी व कर्तव्य समजावून सांगीतली.तसेच मंञीपदाची शपथ घेण्यात आली.
 ▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
    ~~●~~~~~~~~●~~

No comments:

Post a Comment