"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

25 सप्टेंबर "शिक्षक रजा आंदोलन"

 जाहीर आवाहन ! जाहीर आवाहन !! जाहीर आवाहन  !!

🙏🙏🙏🙏🙏🙏


  माझी भविष्याची सुरक्षितता ज्या माझ्या व्यवसायामुळे मिळाली- ज्या माझ्या जि प, नप, अनुदानित शाळेमुळे मिळाली, ज्या माझ्या विद्यार्थ्यांमुळे मिळाली तेच जर धोक्यात आले असेल तर मी शांत बसून कसा चालेल..?
   या विदारक परिस्थितीत मी भयावह भविष्य दुर्लक्षित करून आज शांत बसणे ही समाजाप्रती आणि कष्टकरी, कामकरी, गोरगरिब कुटुंबातून येत असलेल्या विद्यार्थ्यांप्रती माझी कृतघ्नताच राहील.
  या सर्व गोष्टींचा विचार करून प्रत्येक बांधवाने २५ सप्टेंबरच्या लढ्यात स्वतःला सहभागी करून घेण्यासाठी रजा घ्यावी..!!
*का घ्यावा सर्वांनी मोर्चात सहभाग ?*
(सर्व प्राथमिक शिक्षक संघटना - महाराष्ट्र राज्य )         


                           
       संचमान्यता शासन निर्णय दि.१५ मार्च २०२४ व कंत्राटी शिक्षक  
   भरतीचा शासन निर्णय दि. ५ सप्टेंबर २०२४ रद्द करणे य व इतर  
 प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी आंदोलन

  संदर्भ -  दि. १९ सप्टेंबर २०२४ चा आंदोलनाचा नोटीस

   राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे. सोबतच शिक्षण हक्क कायदा - २००९ मधील तरतुदीस विसंगत दि. १५ मार्च २०२४, ५ सप्टेंबर २०२४ (सुधारित २३ सप्टेंबर २०२४) च्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्वच संपणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण संपविण्याचे धोरण अलीकडे घेतलेल्या शासन निर्णयामुळे अधोरेखित झाले आहे. 

   यासह अन्य मागण्यांच्या सोडवणुकी संबंधाने शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्राथमिक शिक्षक संघटनांसह चर्चा करून प्रश्न समजून घेणे व त्यावर अनुकूल असा निर्णय घेण्याच्या बाबतीत प्रचंड उदासीनता आहे. त्यामुळेच अत्यंत व्यथित होऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि तेथे शिकणाऱ्या पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांना तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी निर्धार बैठक संपन्न झाली. या बैठकीत निश्चित केल्यानुसार खालील मागण्यांसाठी आंदोलन करीत असल्याचा नोटीस दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी शासनाकडे देण्यात आला. पुकारण्यात येत आहे. 
- प्रमुख मागण्या - 

(१) १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. 

(२) २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ (सुधारित २३ सप्टेंबर २०२४) चा शासन निर्णय रद्द करावा.

(३) विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे. 

(४) शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी.

(५) विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत. २०२४-२५ वर्षात राबविलेली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी.

         अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. त्याठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके व पुरवावीत. 

      पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात.

(६) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करणे.

(७) ** शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर शिक्षक म्हणूनच नियुक्ती व्हावी.

** राज्यातील शिक्षकांना १०-२०-३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी. 

      ** सर्व पदवीधर विषय शिक्षकांना शिक्षण आयुक्तांच्या शिफारशीनुसार सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी. 

     ** १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि नंतर सेवेत आलेल्या जिल्हा परिषदांच्या शाळांतील 

          शिक्षक व जि प कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १९८२ च्या पेन्शनचे आदेश निर्गमित करावे. ज्यांना पेन्शन लागू नाही अशा सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेन्शन योजना लागू व्हावी.

    सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षक व तसेच शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन त्रुटीचा अहवाल प्राप्त करून वेतन त्रुटी दूर कराव्यात. 

(८) अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.

(९) नपा / मनपा (गट क / ड) मधील शिक्षकांच्या वेतनाचे १००% अनुदान शासनाने द्यावे. नपा  मनपा (गट क / ड) मधील शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीत E-Kuber अंतर्गत व्हावे.

(१०) शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी.

(११) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात वाढती अनेकविध अभियाने, उपक्रम, निरनिराळे सप्ताह, 

      बहि:शाल संस्थांच्या परीक्षा, Online माहित्यांची वारंवारिता इत्यादी कामे ताबडतोब थांबवावी.

             याबाबत  शासन स्तरावरून अनुकूल निर्णय होत नसल्याने सर्व प्राथमिक शिक्षक संघटना - महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून -  काळी फीत लावून शासन निर्णयाचा दुर्लक्षाचा विरोध सुरु आहे. दि. १८ सप्टेंबर २०२४ पासून सर्व प्रकारच्या तथाकथित प्रशासनिक WhatsApp Group वरून लक्षावधी शिक्षक बाहेर पडले आहेत.

     आज दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी प्राथमिक शिक्षकांनी सामुहिक किरकोळ रजा घेऊन संपूर्ण राज्यात मोर्चा काढला आहे. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांबाबत तातडीने आवश्यक अनुकूल कार्यवाही करावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलनाशिवाय राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांना तरणोपाय राहणार नाही असे स्पष्ट करीत आहोत.
------------  

   जिल्ह्यातील व तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू-भगिनी यांना कळविण्यात येते की..

दि.25/09/2024 वार बुधवार रोजी जिल्हा परिषद यवतमाळ येथे *विराट आक्रोश मोर्चा...


    हा मोर्चा का काढला जात आहे,हे आपणास सर्वांना ज्ञात आहेच , तरी पण सर्वांना विनंतीपूर्वक समन्वय समितीच्या वतीने कळविण्यात येते की, मोर्चा मध्ये प्रत्येकाने सामील होणे गरजेचे आहे. आजच्या काळात नोकरी करणे खूप अवघड झाले आहे. सुखाची नोकरी म्हणून ज्या नोकरीकडे पाहिलं जायचं तीच नोकरी आज खूप त्रासदायक झाली आहे. ते म्हणजे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे , सरकारच्या चुकीच्या निर्णयाने, रोजच्या परिपत्रकाने, अशैक्षणिक कामे, आधारकार्ड सक्तीमुळे, शालेय पोषण आहारामुळे, शाळा बांधकामामुळे बी.यल.ओ. कामामुळे, वेगवेगळे सर्वेक्षण, दररोज एक लिंक भरणे यामुळे आपण सर्वजण अगदी त्रासून गेलेलो आहोत. हा त्रास वाचवण्यासाठी आपणास सर्वांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. एकीची ताकद काय असते हे मी तुम्हांला प्रत्येकाच्या वापरात असलेल्या एका वस्तूच्या रूपातून एक उदाहरण म्हणून सांगतो  ती वस्तू म्हणजे, *खराटा*--(झाडू) - याची एक काडी घेऊन आपण अंगण साफ करू शकतो का? उत्तर असेल नाही. अनेक काडया जर एका सुतळीने एकत्र बांधल्या तर त्याचा झाडू किंवा खराटा तयार होतो आणि आपण अंगण साफ करतो. हे झाले अंगण साफ करण्यासाठी. किंवा खराट्याची एक काडी तुम्ही सहज मोडू शकता , अनेक काडया एकत्र बांधल्या तर ते मोडू शकत नाही. अशाच प्रकारे पुढील काळात आपल्याला एकत्र राहणे गरजेचे आहे . म्हणून 25 तारखेच्या मोर्चात आपण सर्वांनी एकीचे दर्शन घडवून हा मोर्चा 100% यशस्वी करूयात आणि खराटा जसे आंगण साफ करतो  तसेच शासनाचे चुकीचे धोरण साफ करूयात. हा मोर्चा कोण्या एका संघटनेने पुकारलेला नाही तर तुमच्या आमच्या सर्वांच्या  नोकऱ्या शाबूत राहाव्यात ,पगार शाबूत राहावा, वर्गात मुलांना शिकविण्यासाठी वेळ मिळावा या सर्व कारणासाठी हा मोर्चा आहे.शिक्षकांनी शिक्षकांसाठी काढलेला  हा मोर्चा आहे.एव्हढच प्रत्येकाने लक्षात घ्यावे. बऱ्याच वर्षातून अनेक संघटना एकत्र आल्या आहेत. तरी आपली जबाबदारी आहे समन्वय समितीने पुकारलेल्या शासनाच्या विरोधातील मोर्चात एक  दिवस रजा भरून सामील व्हावे. हा मोर्चा खूप काही देऊन जाईल गरज आहे फक्त आपल्या उपस्थितीची. आहो मोजका पगार वाचवण्यासाठी किंवा वाढवून घेण्यासाठी आपल्या अंगणवाडी ताई किती एकीने एकत्र असतात. आपल्याला जर हजारोचे ,लाखाचे पगार सुरक्षित ठेवायचे असतील, नोकऱ्या सुरक्षित ठेवायच्या असतील तर शासन कोठले का असेना एकत्र रहाणे काळाची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना दरव्हा तालुका सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने कळकळीची विनंती  सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी रजा भरून तालुक्यातील शाळा 100% बंद ठेऊन , मोर्चात 100% सामील व्हावे ही पुन्हा एकदा नम्रपणे विनंती.

-------------------------------

*एक दिवस रजा संघटनेच्या आवाहानासाठी.

*एक दिवस रजा आपल्या न्याय हक्कासाठी.

*एक दिवस रजा मुलांना शिकविण्यास वेळ मिळावा यासाठी.

*एक दिवस रजा सरकारचे डोके ठिकाण्यावर आणण्यासाठी.

*एक दिवस रजा समन्वय समितीची व शिक्षक-बंधूभागिनी यांची एकजूट ताकद दाखविण्यासाठी.

*एक दिवस रजा स्वतःचे अस्तित्व अबादित ठेवण्यासाठी.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

✍️सतीश बोरखडे

सर्व शिक्षक संघटना समन्वय महासंघ तालुका दारव्हा

➖➖➖➖➖➖➖➖

"शालेय कामकाज व अध्यापना   व्यतिरिक्त शिक्षकांनी करावयाची खालील अतिरिक्त कामे, 

     "उघळा डोळे पहा नीट...!!"


१,- शाळा उघडणे

२,- वर्गखोल्या,परीसर,मुतार्या,संडास स्वच्छ करणे.

३,- घंटी वाजवणे.

४,- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.

५,- वर्गखोल्यांची रंगरंगोटी सजावट करणे.

६,- डिजिटल वर्गखोल्या तयार करणे.

   * *निवडणूका*

७, - ग्रामपंचायतची निवडणूक पार पाडणे .

८, - पंचायत समितीची निवडणूक पार पाडणे

९, - जिल्हा परिषदची निवडणूक पार पाडणे .

१०,- विधानसभेची निवडणूक पार पडणे.

११, -लोकसभेची निवडणूक पार पाडणे .

१२, - मतदार याद्या तयार करण्याचे BLO म्हणून काम पार पाडणे.

   * *बांधकामे*

१३,- ईमारत बांधकाम

१४,- संडास मुतार्या बांधकाम

१५,- हँडवाश स्टेशन बांधकाम

१६,- इमारत देखभाल दुरुस्ती

    * *सर्वेक्षणे*

१७,- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना शाळेत दाखल करुन शाळेच्या प्रवाहात आणने.

१८,- संपूर्ण गावाचे वयोगटानुरुप संवर्गारुप साक्षर निरक्षर सह दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण.

१९,- जनगणना सर्वेक्षण.

२०,- दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण.

२१, - पशुसर्वेक्षण

२२, - शौच्छालयाचे सर्वेक्षण

 * *शालेय समित्या स्थापण करणे*

२३, - शालेय व्यवस्थापण समिती स्थापण करण्यासाठी संपूर्ण निवडप्रक्रीया पार पाडणे.

२४,- शा.व्य.स.च्या मासिक सभा व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.

 २५,- पालक समिति निवड करणे,दरमहा सभा घेणे व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.

 २६,- मातापालक समिती निवड करणे.दरमहा सभा घेणे,त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे .

२७,- शालेय पोषण आहार समिती निवड करणे,दरमहा सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.

२८, - विद्यार्थीनी सुरक्षा समिती तयार करणे,सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटन करणे.

 २९,- तंबाखू व्यसनमुक्त समिती तयार करणे मासिक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.

३०,- तंबाखू मुक्त शाळा घोषीत करणे.

३१, - विद्यार्थी परिवहन समिती तयार करणे मासीक सभा घेणे इतिवृत्त कार्यवाही रजि.मेंटन करणे.

३२,- गावातील तंटामुक्त व इतर समित्यांवर पदसिद्ध सदस्य म्हणून मु.अ.ना भुमिका पार पाडावी लागते.

३३,- ग्रामसेवकाच्या अनुपस्थीतीत ग्रामसभेचा सचिव म्हणून मु.अ.ना भुमिका निभवावी लागते.

* *विविध शालेय योजनांची अंमलबजावणी करणे*

३४,- शालेय पोषण आहार योजने अंतर्गत स्वयंपाकीची व मदतनीसाची निवड करणे.

३५, - स्वयंपाकीची व मदतनीसाची करारनामे,बॕकखाते,आधार,मेडिकल सर्टिफिकेट इ.दस्तावेज फाईल तयार करुन कार्यालयाला सादर करणे, माहिती अॉनलाईन करणे.

 ३६,- रोजच्या उपस्थितीनुसार शालेय पोषण आहार लाभार्थांची रोजची रोज माहिती आनलाईन करणे.

३७, - शालेय पोषण आहार ठेकेदाराकडून प्राप्त साठा मोजून घेणे व सुरक्षितसाठवणूक करणे.

 ३८,- प्राप्त साठ्याची नोंदवही १ मध्ये प्राप्त खर्च शिल्लक साठ्याची नोंद घेणे व ग्रॕमपासूनचा हिशोब ठेवणे.

३९, - शिजवलेल्या शालेय पोषण आहाराची मुलांना अर्धा तास वाटपा अगोदर चव घेवून नोंदवही क्र.२ मध्ये नोंद घेवून त्याविषयी अभिप्राय नोंदवणे.

४०, - दर तिन माहिण्यांनी प्रत्येक विद्यार्थांची शारीरीक उंची वजन याची नोद घेवून त्याच्या प्रगतीची नोंद वही क्र.३ मध्ये घेणे.

 ४१,- स्वयंपाकी मदतनीस मानधन अदा करुन त्याचे कॕशबुक मेंटन करणे.

४२, - शालेय पोषण आहाराच्या वाटपाची,स्वच्छतेची भांडी धुनी व्यवस्था करणे

४३,- महिण्याच्या शेवटी संपूर्ण माहितीची डाग तयार करुन पाठवणे.

४४,- राजु मिना मंच उपक्रम राबवणे

४५,- विद्यार्थ्यांची अफलातुन बँक चालवने.

* *आरोग्य खात्यासी सबंधित योजनांची अंमलबजावणी*

४६,- प्रत्येक मुलांची आरोग्य  तपासणी  करुन घेणे.

४७,- आरोग्य तपासणी कार्डच्या नोंदी ठेवणे.

४८,- सर्वप्रकारच्या धनुर्वात रुबेला.... लसिकरण मोहिम राबविणे.

४९,- लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व नोंदी ठेवणे.

५०,- दिव्यांग विद्यार्थांसाठी विशेष कृतिकार्यक्रम राबविने.

५१,- राजीव गांधी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करणे.

५२,- अस्मिता योजनेची अंमलबजावणी करणे.

५३,- शाळेचा कृतिआराखडा तयार करणे.

* *विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी*

५४,- पूर्व उच्च प्राथमिक इयता ५ वी व पूर्व माध्यमिक इयता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करुन घेणे.फार्म आनलाईन भरणे, हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना पराक्षाकेंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.

५५,- नवोदय परिक्षेची तयारी करुन घेणे,फार्म भरणे हॉल टिकीट काढणे परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर ने आन करण्याची व्यवस्था करणे.

५६,- विद्यावेतन शिष्यवृत्ती परिक्षेची वरिलप्रमानेच कार्यवाही करणे.

५७,- आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीचे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव तयार करुन आनलाईन करणे.

५८,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन पाठविने.

५९,- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादार करणे

६०,- अस्वच्छ कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करुन सादर करणे.

* *शालेय दस्तावेज अद्यावत ठेवणे*

६१,- विद्यार्थ्याना दाखल करतांना प्रतीज्ञालेख रजिस्टरमध्ये नोंद घेणे.

६२,- विद्यार्थांना दाखल करुन घेणे त्याविषयीची संपूर्ण माहिती दाखल खारीज रजिस्टरमध्ये नोंदविने.

६३,- विद्यार्थांच्या वर्गवार दैनिक उपस्थीती हजेरीची नोंद ठेवणे.

६४,- शिक्षक उपस्थीती नोंद रजिस्टर ठेवणे.

६५,- चाचण्या सत्र परिक्षा घेवून निकाल रजिस्टर अध्यावत ठेवणे.

६६,- प्रमोशन रजिस्टर अध्यावत ठेवणे.

६७,- साठापंजी रजिस्टर अद्यावत ठेवणे.

६८,- BPLमुलींचा उपस्थीती भत्ता प्रस्ताव रजि.अद्ययावत ठेवणे.

६९,- उपस्थिती भत्ता वितरण रजिस्टर आद्यावत ठेवणे.

७०,- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वितरण रजि. अद्यावत ठेवणे.

७१,- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती रजिस्टर अद्यावत ठेवणे.

७२,- अस्वच्छ कामगारांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्ती नोंद तथा वितरण रजि.अद्यावत ठेवणे.

७३,- आवक नोंद रजिस्टर अद्यावत ठेवणे.

७४,- जावक नोंद रजि.अद्यावत ठेवणे.

७५,- टी,सी.देणे व त्याची नोंद रजिस्टर मेंटन करणे.

७६,- व्हिजीट रजिस्टर अद्यावत ठेवणे.

७७,- आरोग्य तपासणी रजिस्टर अद्यावत ठेवणे.

* *लेखादस्तके(कॕशबुक) जमाखर्च नोंद रजिस्टरे*

७८,- सर्वशिक्षा अभियान SSA अनुदान गणवेश अनुदान,शाळा अनुदान,बांधकाम,जमा खर्च हिशोब कॕशबुक मेंटन करुन नियमित लेखापरिक्षण (आॕडिट) करुन घेणे.

७९,- सादिल खात्यात जमा झालेल्या शिष्यवृत्या उपस्थीती भत्ता वाटप करुन जमा खर्च कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखापरिक्षण करुन घेणे.

८०,- शालेय पोषण आहार खाते MDM स्वयंपाकिचे जमा मानधन आदा करुन स्वतंत्र कॕशबुक मेंटन करणे व नियमित लेखा परिक्षण करुन घेणे.

८१,- शाळा सुधार फंड अंतर्गत लोकवर्गणी गोळा करुन शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे त्याचे स्वतंत्र कॕशबुक मेंटेन करणे.

८२,- प्रत्येक खात्यात जमा झालेल्या हेडवाईज  जमा खर्चाच स्वतंत्र रजिस्टर ठेवणे.

८३,- नियमित पासबुक नोंदी घेणे.

८४,- शाळेचे इलेक्ट्रिक बील भरणे

८५,- मोफत गणवेश योजना कापड खरेदी निविदा मागवणे,कापड घेणे दर्जीकडून शिवून घेणे,वाटप करणे त्याच्या गणवेश वाटप रजिस्टरमध्ये नोंदी ठेवणे

८६,- मोफत पाठ्यपुस्तक योजना पटसंख्येनुसार वर्गवार पुस्तकाची मागणी करणे.तालुका केंद्रस्थळावरुन पुस्तके आणने ती प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप करणे.पुस्तक वाटप रजिस्टर वर स्वाक्षरी सह नोंदी घेणे,

८७,- प्रत्येक खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करणे.

* *आॕनलाईन कामे*

८८,- शालेय पोषण आहार MDM स्टाॕक आनलाईन करणे,

८९,- दैनंदिन शालेय पोषण आहार लाभार्थांचे आॕनलाईन करणे.

९०,- स्कुल पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.

९१,- स्टुडंट पोर्टलची माहिती आॕनलाईन करणे.

९२,- प्रत्येक विद्यार्थांच्या चाचण्या परिक्षांचे गुण आॕनलाईन करणे

९३,- शाळा सिद्धी माहिती आॕनलाईन करणे.

९४,- सर्व दाखल विद्यार्थांची माहिती आॕनलाईन करणे.

९५,- आॕनलाईन विद्यार्थ्यांना डिटॕच अटॕच करणे.


Udise

इतर वेळोवेळी अकस्मात मागितली जाणारी  माहिती

* *फाईल्स*

९६,- प्रत्येक हेड वाईज कॕशबुक च्या खर्चाच्या पावत्यांचे स्वतंत्र चिकट फाईल्स.

९७,- आवक फाईल

९८,- जावक फाईल

९९,- प्रत्येक शिष्यवृतीचे स्वतंत्र फाईल

१००,- पगार पत्रक फाईल

१०१,- शालेय पोषण आहार फाईल

१०२,- टी.सी.फाईल

१०३,- जन्म तारिख दाखले फाईल

१०४,- रजा फाईल

१०५,- आर्डर फाईल

* *प्रशिक्षणे व इतर उपक्रम*

१०६,- वर्गवार प्रत्येक विषयाची केंद्र ते जिल्हा राज्य स्तरापर्यंतची प्रशिक्षणे

१०७,- मासिक शैक्षणिक परिषदा

१०८,- वेळोवेळी मु,अ.सभा

१०९,- गट सम्मेलने

११०,- बिटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव

१११,- तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

११२,- जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 

११३,- पंच तथा इतर समित्यात कार्य

११४,- नवरत्न स्पर्धा केंद्रस्तर ते जिल्हास्तरपर्यंत

११५,तंत्रस्नेही प्रशिक्षणे

११६,शालेय व्यवस्थापण समित्यांना प्रशिक्षण देणे.

* *मेळाव्यांचे आयोजन करणे*

११७,- पालक मेळाव्याचे आयोजन करणे.

११८,- महिला मेळाव्याचे आयोजन करणे.

११९,- बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे.

१२०,- विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन व नियोजन करणे.

१२१- सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.

१२२,-राष्ट्रीय सण,वर्षभर सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या प्रभात फेर्या काढून साजर्या करणे.

हे सर्व करुन एका शिक्षकाला दोन दोन तीन तीन वर्गाचे अध्यापण करावे लागते.

*अध्यापण कार्य*

१२३,- वार्षिक मासिक नियोजन करणे.

१२४,- वेळापत्रक तयार करुन त्यानुसार अध्यापण करणे.

१२५,- नियमित दैनिक टाचन काढणे.

१२६,- लाॕगबुक मेंटन करणे.

१२७,- मुलांचा गृहपाठ तपासने.

१२८,- घटक चाचण्या घेणे.

१२९,- सत्र परिक्षा घेणे.

१३०,- पेपर्स तपासने.

१३१,- निकालपत्रक तयार करणे.

१३२,- दैनंदिन नोंदी घेणे.

१३३,- प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करणे.

१३४,- निकाल जाहिर करणे.

१३५,- शाळेत वाचनालय चालवणे

१३६,- प्रयोगशाळा तयार करणे.

१३७,- वेगवेगळ्या विषयाचे कोपरे तयार करणे.

१३८,- घटकानुरुप शैक्षणिक साहित्ये तयार करणे.

१३९,- संगणक कक्ष तयार करुन विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे.


★ शिक्षकांवर निगराणी ठेवणारी यंत्रणा -

१४०,-प्रत्येक पालक

१४१,-सर्व शालेय समित्या

१४२,-ग्रामपंचायत कमेटी

१४३,-केंद्र प्रमुख

१४४,-शिक्षण विस्तार अधिकारी

१४५,- गटशिक्षणाधिकारी

१४६,-शिक्षणाधिकारी

१४७,-मुख्य कार्यपालन अधिकारी

१४८,-शिक्षण उपायुक्त

१४९,-शिक्षण आयुक्त

१५०,-शिक्षण मंत्री.

१५१,सर्व अधिकारी पदाधिकारी.

१५२,शेवटी वार्षिक शालेय तपासणी.


--------------

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

No comments:

Post a Comment