"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शालेय विषयवार उपक्रम


    सौ. अलकाताई राकेश फुलझेले  उपक्रमशील शिक्षिका 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल' च्या सक्रिय संचालक तालुका जिल्हा पालघर यांनी शाळेत राबवलेले  व स्वतः लेखन केलेले... 
   "माझी शाळा ~ माझे उपक्रम"   

सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे विषयवार उपक्रम... व मेजवानी मराठी नवोपक्रम मालिका...
~~●~~~~~~~~●~~

           ⧭⧭ उपक्रमाचे नाव ➽   
                  💰 खजिनाशोध 💰*
            ═••═
      👉 इयत्ता — तिसरी
      👉 विषय — मराठी
      👉 साहित्य — चिठ्ठ्या , डबा , खाऊ...
      👉 कृती —
🔹पाच पाच विद्यार्थ्याचे पाच गट  करावे.
🔸प्रत्येक गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹खजिनाशोध खेळाविषयी माहिती द्यावी.
🔸चिठ्ठी वाचून झाल्यावर त्याच जागेवर चिठ्ठी ठेवावी.अशी सूचना द्यावी.
🔹चिठ्ठीवर मजकूर लिहितांना कोड्याच्या स्वरूपात लिहावा.जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळेल.
🔸उदा — १) शुद्ध हवा ज्याच्याजवळ व कृष्णाला प्रिय असे ठिकाण......
२) जेथून आपण रोज शाळेत येतो व घरी परत जातो ते ठिकाण....
३)वर्गातील कचरा काढून त्यात टाकले जाते ते ठिकाण.....
४)शाळेचे रक्षण करतो तो......
५)राष्ट्रीय सणाला माझ्या शिवाय झेंडा फडकत नाही ते ठिकाण.....
६) शाळेतील लाल रंगाचे वाहन....
🔹वरील मजकूराच्या चिठ्ठ्या लपवून ठेवणे.विद्यार्थी गटानुसार एकेक चिठ्ठी शोधून वाचतील व दुसर्‍या चिठ्ठीकडे जातील.
🔸अशा प्रकारे चिठ्ठ्या वाचत वाचत शेवटी जो गट खजिना सर्वात आधी शोधेल तो गट विजयी....👏

        👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯कोड्यातून उत्तर शोधण्याची सवय लागते.
🎯विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शक्तीला चालना मिळते.
🎯कृती वेळेत व योग्य रितीने पूर्ण करण्याची सवय लागते.
🎯नेतृत्व गुणांचा विकास साधता येईल.
🎯विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद व आत्मविश्वास दिसून येईल.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
               ~~●~~~~~~~~●~~
             ⧭⧭ उपक्रमाचे नाव ➽   
🐟 मासे जोडून समान व विरूद्ध शब्दांच्या जोड्या लावूया...! 🐟         
     ═••═
      👉 शै.साहित्य—पूठ्ठ्यांचे मासे 🐟
 [ त्यावर समानार्थी व विरूद्धार्थी शब्द लिहिणे. ]
     👉प्रत्यक्ष कृती —
🔹 प्रथम पाच-पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करणे.
🔸प्रत्येक गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹प्रत्येक गटाला वर्तुळात बसवावे.
🔸प्रत्येक गटामध्ये पूठ्यांच्या माशांचे  दोन भाग करून द्यावे.
🔹माशांचे दोन भाग कसे जोडावे याबाबत मार्गदर्शन करावे.
🔸गटातील सर्व विद्यार्थी समान व विरूद्ध अर्थाची माशांची जोडणी करतील.
🔹जो गट सर्वप्रथम समानार्थी व विरूद्धार्थी  शब्दांचे मासे जोडतील त्या गटाला विजयी घोषीत करावे.👏👏
     
       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯शब्दसंपत्तीत वाढ करणे.
 🎯 अचूक निरीक्षणाची सवय लागते.
🎯विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तिला चालना मिळते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
               ~~●~~~~~~~~●~~




▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           ⧭⧭ उपक्रमाचे नाव ➽   

   📝 चला संवाद लिहूया...!! 📝
    ═••═
       👉 इयत्ता — पाचवी
       👉 विषय — मराठी
       👉 साहित्य — प्राणी,पक्षी यांची चिञ,वही,पेन

        👉 प्रत्यक्ष कृती —
🔹 पाच पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करावे.
🔸 त्येक गटाचा गटप्रमुख नेमावा.
🔹 प्रत्येक गटातील गटप्रमुखाला दोन प्राणी किंवा दोन पक्षी द्यावे.
🔸 गटप्रमुख गटातील इतर विद्यार्थ्यांशी चर्चा करतील.
🔹 चर्चेत प्राणी ,पक्षी आप-आपसात काय बोलत असतील याची कल्पना करतील.
🔸 प्राणी ,पक्षी यांचे आप-आपसातील सवांदाचे लेखन करतील.
🔹 गटातील विद्यार्थी प्राणी ,पक्षी यांच्या सवांदाचे सादरीकरण करतील.
🔸 प्रत्येक गटाने संवाद सादर केल्यावर टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.
    
       👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
-🎯कल्पना शक्तीला चालना मिळते.
🎯संवाद लेखनाचा सराव होतो.
🎯आत्मविश्वास वाढतो.
🎯नाट्यीकरण कौशल्यांचा विकास होतो.
🎯सर्जनशीलता वाढीस लागते.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
               ~~●~~~~~~~~●~~

            ⧭⧭ उपक्रमाचे नाव ➽   
🙈 ...ने यावे टिचकी मारूनी जावे..🙈
              ज्ञानरचनावादी उपक्रम....
   ═••═
     👉 इयत्ता — पहिली
     👉 विषय — मराठी
     👉 साहित्य — मूळाक्षर कॅन्डी
     👉 प्रत्यक्ष कृती —
🔹प्रथम दहा दहा विद्यार्थ्याचे दोन गट करून समोरासमोर तोंड करून बसवावे.
🔸एका गटातील विद्यार्थ्यांच्या हातात मुळाक्षर कॅन्डी द्यावी.
🔹हुशार विद्यार्थी गटप्रमुख म्हणून नेमावा.
🔸गटप्रमुखाने रांगेतील एका मुलाचे डोळे झाकून पुढील वाक्य म्हणावे. ~उदा...~ "क" ने यावे टिचकी मारूनी जावे.हसू नये,बोलू नये गुपचूप जागेवर जाऊन बसावे.
🔹ज्या विद्यार्थ्याजवळ "क" मूळाक्षर असेल तो विद्यार्थी हळूच टिचकी मारून जागेवर गुपचूप जाऊन बसेल.
🔸ज्या विद्यार्थ्याला टिचकी मारली त्या विद्यार्थ्याचे डोळे उघल्यावर "क" अक्षर कोणाजवळ आहे त्याला ओळखेल.
🔹अचूक अक्षर ओळखल्यास टाळ्या वाजवून अभिनंदन करावे.
🔸अक्षर ओळखता आले नाही तर बाद करावे.
🔹अशाप्रकारे सर्व मूळाक्षरे देऊन खेळ सुरू ठेवावा.
👉 टीप ~ अशाप्रकारे आपण शब्द,संख्याकार्ड व इंग्रजी लिपी ( Alphabets ) हातात देऊन खेळ घेऊ शकतो.
  
        👉 उपक्रमाची निष्पत्ती...  
🎯मूळाक्षरांची पक्की ओळख होणे.
🎯एका दृष्टीक्षेपात मूळाक्षरे ओळखणे.
🎯खेळातून अभ्यासाची गोडी निर्माण करणे.
🎯एकाग्रता वाढविणे.
🎯लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लावणे.
▬▬▬▬♏💲🅿 ▬▬▬▬
        ✍ सौ. अलका राकेश फुलझेले ✍
                    ~~●~~~~~~~~●~~
\\\\
  1. छान उपक्रम आहेत मॅडम
    असेच नवनवीन उपक्रम दैनंदिन अध्यापन करताना घ्यावेत

    ReplyDelete
  2. खूप छान उपक्रम राबविले आहेत

    ReplyDelete
  3. छणचजड

    ReplyDelete