"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

छत्रपती शिवाजी महाराज

    ❒ शिवाजी शहाजी भोसले ❒ 
इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर...
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या
प्रमाणावर...राज्य करणारा राजा म्हणजे
 राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा...!!

यशवंत किर्तीवंत | सामर्थ्यवंत वरदवंत| 
नितीवंत आणि जयवंत| जाणता राजा||
    ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

●जन्म :~ १९  फेब्रुवारी १६३०,  शिवनेरी किल्ला, पुणे
●मृत्यू :~ ३ एप्रिल १६८०, रायगड
●राज्याभिषेक :~ ६  जून १६७४

         ★ अधिकारकाळ :~【६ जून १६७४ ते ३ एप्रिल १६८०】
   ★ राज्यव्याप्ती :~पश्चिममहाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत

🔸राजधानी :~ रायगड किल्ला
🔹वडील :~ शहाजीराजे भोसले
🔸आई :~  जिजाबाई

          💥 राजब्रीदवाक्य 💥
 "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।"

    ◆छत्रपती शिवाजीराजे भोसले◆


        🔶 हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
       🔷महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजआणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजी महाराज्यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
~~●~~~~●~~
राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा, शिल्पकार जो स्वराज्याचा, कैवारी हा रयतेचा, श्वास असे तो मराठ्यांचा ! सदैव वाटतो करावा, गौरव ज्यांच्या कार्याचा माझ्या लाडक्या राजाचा, छत्रपती शिवरायांचा ! छत्रपती शिवरायांचा !
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
"शिवजयंती' प्रभावी भाषणे व  Pdf साठी क्लिक करा..

~~●~~~~●~~

       🔶शिस्तबद्ध लष्कर व सु tuघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. विएतनामच्या युद्धात शिवकालिन् गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करुन् अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.
     
    मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष  

         🔷पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते.

   शिवाजी महाराज कौटुंंबिक माहिती CLICK HERE  

           🔷 इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात.

✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
   ■ जाणता राजा ■

महाराष्ट्र असा माझा
महान त्या शिवबाचा
मातेचे बळ तयासी
मिळे टेका मावळ्याचा

मनी स्वप्न स्वराज्याचे
मिळे वर भवानीचा
म्यानातली तळपली
धुव्वा उडाला शत्रूचा

मांद पहा उतरला
मातलेल्या मुघलाचा
मानकछेद शिवास
महाराज शहाजीचा

मवसर गवसले
महाराजा गडामंधी
महत्वाकांक्षा वाढली
महब्बत उरामंधी

मनोकामना फळाला
माऊली त्या जिजाऊची
  महा राज्यभिषेक
महती वाढली शिवबाची

★लेखिका ~मीनाक्षी काटकर
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘

             💥 शिवाजी जयंती 💥

      🔶  भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगेरिअन कॅलेंडर भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात.

      🔷 शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगेरियन कॅलेंडर असते तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला  आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.

⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘✽⌘⌘⌘*⌘⌘⌘✽


🔅शिवजयंती भाषणे डाऊनलोड करा..🔅

*●------------------------------------●*
◆ शिवाजी महाराज – जीवनपट
◆ शिवजयंती चारोळ्या
◆ शिवरायांचे बालपण
◆ शिवाजी महाराज : हिंदी भाषणे
◆ शिवाजी महाराज : मराठी भाषणे
◆ शिवाजी महाराज : इंग्रजी भाषण
◆ स्वराज्याचे दैवत

     वरील सर्व माहिती pdf स्वरूपात डाऊनलोडसाठी एकाच पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
⛔ डाऊनलोडसाठी खाली ⏬⏬⏬ क्लिक करा..


⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘✽⌘⌘⌘
  1. किती आले किती गेले
  2. केले मुघलांना हद्दपार ।
  3. राजे बहु धरतीवरती
  4. ना कुणा शिवबांची सर ।।
  5. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘
  6. सह्याद्रीच्या रांगांवरती
  7. सदा मुघलांच्या नजरा ।
  8. बोटे छाटली तयांची
  9. त्या शिवबांना माझा मुजरा ।।
  10. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘
  11. अशी करारी नजर सदा 
  12. गनिमा भेदुनी पाही आरपार ।
  13. शिवरायांमुळेच जाहले
  14. स्वप्न स्वराज्याचे साकार ।।
  15. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘

  16. सदा गायी तुझे गुणगान
  17. असाची माझ्या पोटी वंश दे ।
  18. फक्त तुझ्याच.. फक्त तुझ्याच..
  19. शिवशौर्याचा तू अंश दे ।।
  20. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘
  21. शब्दही पडती अपुरे
  22. अशी शिवरायांची किर्ती ।
  23. राजा शोभूनी दिसे जगती
  24. अवघ्या जगाचा शिवछत्रपती ।।
  25. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘
  26. अंगी संचारीता शौर्य
  27. थरथरा कापे क्रौर्य ।
  28. जणू कडाडती वीज
  29. भासे तेज शिवशौर्य ।।
  30. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘
  31. न्यायदानाची जयांची
  32. असे तरहाच निराळी ।
  33. लेणे सौभाग्याचे शाबूत
  34. असे शिवशौर्यामुळे भाळी ।।
  35. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘
  36. मायमुलीच्या स्त्रीत्वाचा
  37. शिवबांनी केला सदैव सन्मान ।
  38. यमसदनी धाडुनी सैतानांना
  39. राखीली स्वराज्याची शान ।।
  40. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘
  41. न काळवेळ तयांना लागे
  42. शत्रू धारातीर्थी पाडाया ।
  43. स्मरता शिवरायांचे शौर्य
  44. लागे आजही इतिहास घडाया ।।
  45. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘

  46. डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच
  47. आजही वाजतोय जगती ।
  48. राखीले स्वराज्य अबाधीत
  49. असे हे एकमेव शिवछत्रपती ।।
  50. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘

  51. राजे तुम्हीच अस्मिता
  52. तुम्हीच महाराष्ट्राची शान ।
  53. जगती तुम्हीच छत्रपती 
  54. तुम्हीच आमचा स्वाभिमान ।।
  55. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘
  छत्रपती शिवाजी महाराज READ MORE
  1. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘

    ■ छत्रपती शिवाजी महाराज यांचे
   💥होळीच्या सणाचे इंजिनीअरींग💥
समाजाच्या भल्यासाठी, स्वराज्याच्या कार्यासाठी आम्ही आपली व्यक्तीगत कार्ये बाजूला ठेवली पाहिजेत.आम्ही आपल्या व्यक्तिगत सुखाची होळी केली तरच समाजाला विकासाची उब मिळणार आहे.हे लोकांना नीट कळावे आणि त्या त्यागातूनच पुढे कर्तुत्वान पिढी जन्मावी यासाठी महाराजांनी होळीच्या सणाचा उपयोग केला.
सलग २७ वर्ष महाराज राजगडावर राहिले आहेत.राजगडाच्या बालेकिल्ल्यातील राजवाडयासमोरिल मैदानात महाराज होळी करत असत.राजगडावरील होळी पाहिली की मग इतर किल्ल्यावर होळी पेटत असे आणि मग खाली गावागावात होळी पेटवली जात असे.
काही क्षणात एवढे किल्ले आणि गावात संपर्कयंत्रणा आगीच्या प्रकाशाच्या सहयाने निर्माण करणं ही देखील महाराजांची इंटरनेटच्या,कॉम्प्यूटर आणि मोबाईलच्या ४०० वर्ष अगोदर संदेशवहन क्रांती आहे.
होळी करण्यासाठी स्वतःचे काही तरी असावे लागते.होळी करण्यासाठी प्रत्येकाने एक-एक लाकूड दयायचे.होळी तयार केली की तिचे पूजन करायचे आणि एक प्रतिकात्मक छोटी पोळी या होळीला अर्पण करायची."होळी रे होळी पुरणाची पोळी"असे मोठयाने म्हणत पोळी होळीत टाकायची.भाकरी,भात लगेच बनविता येते.पोळी बनविणे अवघड काम पण आवडता पदार्थ आणि हि पोळी त्याग करण्याची तयारी ठेवायची.पण हिच दुर्मिळ असणारी पोळी मोठीच्या मोठी त्याग करावी लागू नये म्हणून अगदी छोटी पोळी बनवून प्रतिकात्मरितीने ती अर्पण करायची.अन्नाची नासडी होणार नाही याची काळजी घेतली आणि त्याच वेळी माणसांना सामाजिक जीवनात वावरताना त्यागाचा विसर पडू नये असा संस्कारही दिला.
महाराजांची होळी साजरी करण्याची पध्दत म्हणजे कर्तुत्वान,होतकरू  लोकांना आपले कसब दाखवण्याची सुवर्णसंधी.पराक्रम करणा-या आपल्या प्रत्येक मावळयाला सोन्याचं कडं देणारा हा जगाच्या पाठीवरील पहिलाच राजा.
सोन्याची राशी आपल्या रत्नशाळेत जमा न करता त्या नररत्नावर गुंतवणारा हा राजा.त्यामुळे या राजाला सोन्याचे नव्हे तर सोन्यासारख्या किंबहुना सोन्यापेक्षा मौल्यवान माणसाची जास्त कदर आणि आदर होता.
होळीचा सण साजरा करताना त्यात नारळ सुद्धा टाकण्याची परंपरा आहे.नारळ तसा पवित्र  पण तोही होळीत प्रसंगी टाकायची तयारी ठेवावी ही समाजाला समज देणारा आपला राजा.या होळीच्या सणात एक मानाचा नारळ राजांचा असे.आणि धाडसी तरूणांना हे आव्हान असे की तो नारळ पेटत्या होळीतून बाहेर काढायचा.
आता पेटत्या होळीत हात घालायचा म्हणजे जोखीम आली,धाडस आलं,म्हणजे आगीची भीती नाहीशी व्हावी हा प्रयत्न असे.आणि जो मावळा होळीचा नारळ बाहेर काढी तोच होळीचा मानकरी ठरे.आता वाजत गाजत मिरवणूक निघते ती या मानकऱ्याची आणि साक्षात महाराजांच्या हातून त्याला शाल,श्रीफळ,मानाचे पागोटे,तलवार आणि सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाई.किंमत जवळपास ३६०,००० रूपये.प्रत्येक सणातून धाडस शिकवणं हा महाराजांचा शिरस्ता होता.समाजाला वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याबाबत महाराज जागरूक असत.आगीत हात घालणाऱ्या मावळयाचे हात जळू नयेत,भाजू नयेत म्हणून पोत्याचा बारदाना ओला करून हाताला गुंडाळले जाई आणि मगच मावळयांना खेळात सहभागी करून घेतले जाई.प्रश्न होता तो फक्त धाडस करण्याचा हिंमत बांधण्याचा.त्यामुळे शेकडो लोकांनी हात घातल्यावर कुणातरी एकाच्याच हातात तो मानाचा नारळ असे.परंतु एवढया काळात शेकडो धाडसी माणसं तयार केली जायची.आगीचा आणि महाराजांचा या सणामुळे खूप जवळचा संबंध येई.
~~●~~~~●~~
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
"शिवजयंती' प्रभावी भाषणे व  Pdf साठी क्लिक करा..

~~●~~~~●~~

शत्रूला सगळयात मोठा तडाखा मराठयांच्या तलवारीने बसला नाही तर तो बसला हातातील मशालीनी .हीच मशाल मावळयांना प्रकाश देई आणि शत्रूला अंधारात बुडवी.
गावागावात होळी करून एकतेचा संदेश देणं.होळीत पोळी टाकण्याची भावना तयार करून त्यागाची शिकवण देणं आणि मानाचा नारळ मिळवण्यासाठी धाडस करायला लावणं.
स्वार्थ हीच अनियंत्रित आग आहे आणि ती आटोक्यात ठेवण्यासाठी सर्वानी आपआपल्या परीने योगदान दिलं पाहिजे,त्यागही केला पाहिजे.स्वराज्य आणि महाराष्ट्र उभा राहिला तो या त्यागाच्या भावनेतून आणि म्हणूनच "आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे"असा म्हणणारा तान्हाजी येथे जन्माला आले.बऱ्याच लोकांची नाव आपणाला आज ज्ञात नाहीत पण त्यांच्या त्यागातून महाराष्ट्र उभा आहे.
महाराजांनी राजधानी रायगडावर एक एकराचा परिसर होळीचा माळ म्हणून राखीव ठेवला.आजही आपण रायगडावरी होळीच्या माळावर गेलो तर आपणही समाजाचं,देशाचं काहीतरी देणं लागतो.याची जाणीव ठेवून त्या भूमीवर ,त्यागाची राष्ट्रप्रेमाची आठवण करून देणाऱ्या मातीवर कपाळ ठेवले पाहिजे.
सातत्याने आपल्या लोकांना कर्तुत्व दाखवण्यासाची संधी देण्यासाठी असं सोशल इंजिनीअरींग करावं लागतं.समाज उभा करायचा तर त्यासाठी त्याच समाजातील तरूणांना कर्तुत्वाची संधीसुद्धा निर्माण करावी लागते हेच सोशल इंजिनीअरींगच काम महाराजांनी केले.

$$$$$####$$$$####$$$$$$

शिवरायांचे आठवावे रूप ।

शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावासाक्षेप भुमंडळी ।

॥१॥शिवरायांचे कैसे बोलणे ।

शिवरायांचे कैसे चालाणे ।

शिवरायांची सलगीदे णे कैसी असे ।

॥२॥सकल सुखांचाके ला त्याग ।

म्हाणोनी साधिजे तो योग ।

राज्य साधनाची गबग कैसी केली ।

॥३॥ याहुनी करावे विशेष ।

तरीच म्हणवावे पुरूष ।
 उपरी आता विशेष ।

काय लिहावे ।
॥४॥ शिवरायांसी आठवावे ।

जीवित तृणवत मानावे ।

इहलोकी पर लोकी उरावे ।

किर्तिरुपे

॥५॥ निश्च्यायाचा महामेरू ।

बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारू ।

श्रीमंत योगी ॥६॥        
  1. ⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘


2 comments: