"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

"बालिका दिन" 3 जानेवारी

      *❒ ♦सावित्रीबाई फुले♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━


  शिक्षणप्रसारक, समाजसुधारक, 
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या जननी, शिक्षणक्रांती ज्योती,
           यांची जयंती निमित्त त्यांचे पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!!
 *कोटी कोटी प्रणाम.*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●जन्म :~ ३ जानेवारी १८३१,नायगाव,तालूका खंडाळा, सातारा
●मृत्यू :~ १० मार्च  १८९७, पुणे

   ⚜ सावित्रीबाई फुले ⚜
   🔶 मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला, ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना  मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली 
अश्या "स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत"  भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका..... महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.


⧭बालिका दिन ➽ मराठी, हिंदी, इंग्रजी भाषणे व सूत्रसंचालन DOUNLOAD करा.... 

    🔷१८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते.

  🔶सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
    🔷१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनर्‍यानी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१८ सालीही चालू आहे.
    🔶सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी
"धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
    🔷केशवपन बंद करण्यासाठी व पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.


    काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
   🔶 सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽

◆क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ◆     
          जयंतीविशेष
                     ~ सूर्यकांत डोळसे
...........................
महाराष्ट्रातील लोकप्रिय कवी,
वात्रटिकाकार, मुक्त पत्रकार, 
व्याख्याते सूर्यकांत डोळसे 
यांच्या प्रचंड गाजलेल्या दोन रचना 
खास आई सावित्रीबाई फुले 
जयंतीच्या निमित्ताने
आपल्यासाठी......
1) होय, मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय....

होय, मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.

जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.

त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय....

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.

असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?
होय,मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय.... 

ही कही उपकाराची भाषा नाही.
आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
हा बेंडबाजा अगर ताशा नाही.

मी विसरून गेले होते,
आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
हल्ली मात्र तुम्ही 
आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
म्हणूनच तुमच्या बहिर्‍या कानी
हे गार्‍हाणे घालतेय.
होय,मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय..... 

माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.
तुम्ही शिकलात सवरलात.
पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
विकृत स्त्रीमुक्तीच्या
प्रत्येकजणी कहाण्या झालात.

माझा वारसा सांगून,
स्वार्थासाठी राबता आहात.
या सगळ्या संतापापुढे
आज मी भिड्भाड भुलतेय.....
होय,मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय..... 

बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?

तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की,
पुरोगामी होता येते,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय,मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय..... 

मान नको,पान नको,
आमचे उपकारही फेडू नका.
किर्तन-बिर्तन काही नको
झोडायची म्हनून
भाषणंही झोडू नका.

वाघिणीचे दूध पिऊन
कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
धर्म-संस्काराच्या नावाखाली
टाकाऊ परंपरा पाळीत आहात.

तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
म्हनून हे अंजन घालतेय...
होय,मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय.....

तुम्हांला आज 
काहीसुद्धा सोसायचे नाही.
काढणारे काढीत आहेत
तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.

तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा 
खरा वसा घ्यायला पाहिजे.
एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून
त्याला आधार द्यायला पाहिजे,
शाळा कॉलेजचे पिक तर
हायब्रिडसारखे डोलतेय.....
होय,मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय.....

मनमानी आणि स्वैराचाराला
पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,
यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
फक्त नवरे बदलणे,
घटस्फोट घेणे,
ही काही स्त्रीमुक्ती नाही.

माझी खरी लेक तीच,
जी असत्यापूढे झुकत नाही.
सावित्री आणि ज्योतिबांपूढे
आंधळेपणाने माथा टेकत नाही.

माझी खरी लेक तीच,
आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
स्वत:ची भाषा बोलतेय.
आमचाही वसा
तावून-सुलाखुन पेलतेय.....
होय,मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय..... 

आमच्याच मातीत,
आमच्याच लेकरांकडून
दूजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठीही
सरकारी जी.आर.निघावा लागला.

आपल्या सोईचे नसले की,
विचारांकडेही कानाडॊळा होतो.
समाजासाठी काही 
करायचे म्हटले की,
पोटात प्लेगचा गोळा येतो.
ज्योतिबांशिवाय सावित्री,
सावित्रीशिवाय ज्योतिबा,
समजून घेता येणार नाही.
विचारांची ही ज्योती,
एकटी-एकटी नेता येणार नाही.

सुनांना लागावे म्हणून तर
लेकींनो, तुम्हांला बोलतेय....
होय,मी सावित्री 
ज्योतिबा फुले बोलतेय...

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
----------------------------
2) क वि ता...

 ★ सावित्रीचा वसा

ज्योतीबांची सावली बनुन 
’यशवंत’ उभा करणे,
हा सावित्रीचा वसा आहे
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥धृ॥

सावित्री पोरीसारखी पोर होती,
सावित्री बाईसारखी बाई होती.
जेंव्हा रोग कळला,
रोगावरचा विलाज कळला,
तेंव्हा सावित्री दाई झाली,
तेंव्हा सावित्री आई झाली.

एकूणच सगळा प्रकार असा आहे
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?....॥१॥

चार भिंतीतला संसार
सावित्रीलाही करता आला असता.
’हम दो,हमारा एक’चा हट्ट
सावित्रीलाही धरता आला असता.
सत्यवादी सावित्री सरळ असली तरी
कर्मठ आणि दांभिकांच्या
गळ्यातला फासा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥२॥
ना शिकता सवरताही
संसाराची गाडी धकली असती.
सासर नावाच्या आभाळाला
सावित्री कशाला मुकली असती?

सावित्रीने केलेला विचार
आपण कशाला करू शकतो?
कारण तुमच्या आमच्या डोक्यात
भरलेला भुसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥३॥

घरात उभी गेलेली सावित्री
वेळोवेळी उभ्या उभ्या बाहेर आली.
ज्योतीबा नावाच्या योद्ध्याची
सावित्री वेळोवेळी ढाल झाली.

ती शिक्षणाचे दान देत राहिली,
ओढावून घेता येईल तेवढा दोष
ओढाऊन घेत राहिली.
आपला मात्र सदैवच
पसरलेला पसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥४॥

दगडाला भ्याली नाही,
शिव्या-शापालाही भ्याली नाही.
सावित्री नावाचे वाघिण
शेळी कधीच झाली नाही.
तुम्ही आम्ही शेळपट
सावित्री मात्र वाघिण होती,
कारण ज्योतीबाच तसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥५॥

सावित्रीलाही नटता आले असते,
सावित्रीलाही मुरडता आले असते.
अव्यवहारी नवरा म्हणून
ज्योतीबाला खरडता आले असते.

लष्कराच्या भाकर्‍या कशाला भाजता?
असे ओरडता आले असते.
पण सावित्रीचा धर्म
सांगा कुठे तसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥६॥

सगळ्या कुलूपबंद व्यवस्थेची
शिक्षण हीच चावी होती.
ज्योतीबांना सावित्री मिळाली,
त्यांना जशी हवी होती.

सावित्री उर्जेची जन्मदात्री होती,
सावित्री कवयित्री होती.
आपला जोडा आहे का?
सावित्री-ज्योतीबाचा जसा आहे?
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥७॥
सावित्री ज्योतीबांच्या सत्यधर्माची
जित्ता-जागता आरसा होती.
सावित्री ज्योतींच्या सत्यधर्माचा
जित्ता-जागता वारसा होती.

सावित्रीने दिलेली ललकार
आपल्याला देता येईल?
कारण सावित्रीचा तो कंठ,
आपला तो घसा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥८॥
तुमची आमची परीक्षा
सद्यस्थिती पाहते आहे.
ज्योतीबा आणि सावित्री
नसा-नसातून वाहते आहे.

ते हे बोलू शकत नाहीत
ते हे पेलू शकत नाहीत
ते संकटांना झेलू शकत नाहीत,
ज्यांच्या अंगोपांगी ससा आहे.
पुन्हा एकदा समजून घ्या
हा ’सत्यधर्म’कसा आहे?.....॥९॥

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)



1 comment: