━━═•●◆●★◆★●◆●•═━━
अरब देशात हातिमताई हा त्याच्या उदारपणासाठी प्रसिद्ध होता. हातिमताई मोकळ्या हाताने दान करायचा. त्याच्या दरवाजातून कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. तो कोणाही गरजूला आपली मौल्यवान वस्तू देण्यास मागे हटत नसे. लोक त्याच्याकडे बिनधास्तपणे येत असत. ते जे काही मागत ते हातिमताई देत होता एकदा हातिमताई मनात विचार आला, आपण मोठी दावत आयोजित करावी. ज्यात सर्वच स्तरातील व्यक्तिंना येण्याची मुभा असेल. यासाठी हातिमताईने खुले निमंत्रण दिले. दावतच्या दिवशी लोकांचे येणेजाणे सुरु झाले. हातिमताई प्रत्येकाचे स्नेहपूर्वक स्वागत करत होता. जेवल्यावर लोक त्याला आशिर्वाद देत होते. काही वेळाने हातिमताईने विचार केला. दावतीचे ठिकाण दूर राहणा-या लोकांसाठी अडचणींचे ठरत आहे, त्यांना सवारीतून घेऊन यावे. आपल्या काही साथीदारांना घेऊन तो दूर राहणा-या लोकांना भेटण्यास गेला. वाटेत त्याला एक लाकूडतोड्या दिसला. त्याच्या चेह-यावर थकावट स्पष्टपणे दिसत होती. हातिमताई म्हणाला,’’ मित्रा, जेव्हा हातिमताईने दावतचे खुले आमंत्रण दिले तेव्हा तू इतकी मेहनत कशासाठी करत आहेस. हे काम सोड, आणि माझ्या दावतमध्ये सामील हो. आरामात जेवण कर.’’ हे ऐकून लाकूडतोड्याने उत्तर दिले,’’ जे आपली भाकरी कष्टाने कमावितात त्यांना हातिमताईच्या जेवणाची गरज नाही. हातिमताई उदार असेल पण आमची कष्टाने मिळवलेली भाकरी ही त्याच्या दावतच्या जेवणापेक्षा कित्येक पटीने गोड आहे. हवे असेल तर तूच ती भाकरी खाऊन बघ’’ हे ऐकून हातिमताई निरूत्तर झाला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~* कष्टाने कमविलेले सर्वश्रेष्ठ असते .
No comments:
Post a Comment