"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

June 06, 2025

सूत्रसंचालन – शिक्षक प्रशिक्षण समारोप समारंभ

“आपल्या सर्वांचे या शिक्षक प्रशिक्षणाच्या समारोप समारंभात मन:पूर्वक स्वागत व अभिनंदन करत आहे. गेल्या दहा दिवसांत आपण ज्ञानाची देवाणघेवाण, नवनवीन अध्यापन तंत्रांची ओळख, अनुभवांची वाटचाल आणि शिक्षण प्रक्रियेत गुणवत्ता वृद्धीचा अनुभव घेतला. आज या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करत आहोत...”
   “ज्ञान दे गा ज्ञानदेवा, प्रकाश दे गा दीप देवा...” या दिव्य ज्ञानप्रकाशाच्या प्रवासाचा आज आपण समारोप करत आहोत. आपल्या शिक्षक प्रशिक्षणाचा अंतिम दिवस – एक आठवणींनी आणि प्रेरणांनी भरलेला. या समारोप समारंभासाठी मी, (सतीश बोरखडे), सूत्रसंचालक म्हणून आपल्या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत करतो.
   उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, सहप्रशिक्षकगण, आणि माझ्या प्रशिक्षणार्थी बंधु-भगिनींना नम्र अभिवादन!

पाहूने स्थानापन्न करणे:-

 प्रशिक्षण संयोजक गटशिक्षणाधिकारी इतर उपस्थित अधिकारी व प्रशिक्षक यांना सन्मानपूर्वक मंचावर स्थानापन्न करण्यासाठी सूचना निमंत्रण द्यावे

दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन-
   कार्यक्रमाची सुरुवात प्रकाशाच्या प्रतीकातून करूया. ज्ञानदीप प्रज्वलनाचा क्षण आला आहे. मी नम्र विनंती करतो/करते की मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करावे. (दीपप्रज्वलनानंतर) धन्यवाद!
  या तेजस्वी सुरुवतीने आपल्या कार्यक्रमात सकारात्मक ऊर्जा संचारली आहे.

मान्यवर पाहुण्यांचे स्वागत-
▪️ मा. अध्यक्षस्थानावर विराजमान (पद व नाव) -
▪️ मा. मुख्य अतिथी __________
▪️ आदरणीय प्रशिक्षण समन्वयक-
▪️ मार्गदर्शक व समन्वयक  तसेच, आपल्या ज्ञानाचा खजिना आम्हाला खुला करून देणाऱ्या सर्व प्रशिक्षकगणांचे आणि प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रत्येक शिक्षकबंधू-भगिनींचे सुद्धा मन:पूर्वक शब्दसुमनाने स्वागत!

प्रास्ताविक/ अहवाल वाचन-
आता आपण प्रशिक्षणाच्या सारांशाकडे वळूया. या काळात काय शिकलो, काय अनुभवलं याचा संक्षिप्त आढावा घेण्यासाठी... मी विनंती करतो मा. __________ यांना, की त्यांनी प्रशिक्षणाचा अहवाल आपल्या समोर मांडावा.

 या वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी  प्रशिक्षणामधून मागील दहा दिवसात आपण अध्यापन शास्त्रीय दृष्टिकोन, एकविसाव्या शतकासाठी शिक्षक कौशल्य, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती, शिक्षणाचे ऑनलाइन स्त्रोत, शिक्षक सक्षमीकरण शिक्षण प्रक्रियेतून 21 व्या शतकातील विकसित भारत घडविण्यासाठी शिक्षकाची भूमिका यावर सर्वतोपरी चर्चा या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण केली.

  (प्रस्ताविकानंतर) आपल्या  सखोल माहितीबद्दल मन:पूर्वक आभार!


. प्रशिक्षणार्थींचे मनोगत-
प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांचा अनुभव ऐकणे हे खूप प्रेरणादायी असते. मी आमंत्रण देतो/देते श्री./श्रीमती. ____ यांना, त्यांनी आपला अनुभव मांडावा.

शिक्षक प्रशिक्षण समारोप भाषणे साठी CLICK करा...

.मान्यवरांचे मनोगत / भाषणे-
 आता आपण मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत.
▪️प्रथम, मी विनंती करतो मा. ______ यांना आपले विचार व्यक्त करावेत.
▪️पुढील मनोगतासाठी मी आमंत्रण देतो मा. __________ यांना...
(सर्व भाषणांनंतर –
“आपल्या सर्व मार्गदर्शकांचे मन:पूर्वक आभार. हे विचार आम्हाला निश्चितच शिक्षकी पेशात अधिक सजग बनवतील.”

अध्यक्ष भाषण-
“ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा...
त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा...!!”
   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री…………   आपणास मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

आभार प्रदर्शन :-
    कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिशेने जात असताना, ज्यांच्या सहकार्यामुळे हे प्रशिक्षण यशस्वी झाले, त्या सर्वांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. मी विनंती करतो श्री./श्रीमती.________ यांना, की त्यांनी आभारप्रदर्शन करावे.

★. राष्ट्रगीत व समारोप-
    चला तर मग, आपल्या देशभक्तीचा अभिमान बाळगून राष्ट्रगीतासाठी उभं राहूया. (🎵 राष्ट्रगीत 🎵) — यानंतर — आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करतो.

     आपण सर्वांनी आपल्या शाळेमध्ये  प्रशिक्षणात घेतलेले हे ज्ञान वापरून विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजाळा द्यावा, हीच अपेक्षा! धन्यवाद आणि शुभेच्छा!


(प्रमाणपत्र वितरण असेल तर आभार प्रदर्शन आधी हा भाग घ्यावा)
प्रमाणपत्र वितरण सूत्रसंचालन-
    आता आपला कार्यक्रम एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे – तो म्हणजे "प्रमाणपत्र वितरण सोहळा". प्रशिक्षण सत्रांमध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या आणि  प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आज प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

🙏 मान्यवरांना आमंत्रण:

मी नम्र विनंती करतो/करते की

 मा. _________(मुख्य अतिथी), मा. अध्यक्ष _________ आणि 

मा. _________ (प्रशिक्षण समन्वयक) यांनी मंचावरून प्रमाणपत्र वितरण करून गौरव करावा.

■ प्रमाणपत्र वितरण-
   मी आता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या नावांची अनुक्रमे घोषणा करणार आहे. संबंधित शिक्षकांनी पुढे येऊन मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारावे.
१) श्री./श्रीमती. __________
२) श्री./श्रीमती. __________
३) श्री./श्रीमती. __________
(आणखी नावे...) प्रत्येकाचे अभिनंदन करताना आम्हाला आनंद होत आहे!

📌 शेवटचा उल्लेख:
प्रमाणपत्र ही फक्त एक कागदपत्र नाही, तर आपल्या शिक्षकीय कारकिर्दीत एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जो आपल्या पुढच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरेल. प्रत्येक शिक्षकाच्या योगदानाला सलाम करत, आपण या सन्मानाचा समारंभ इथेच संपवतो.

No comments:

Post a Comment