"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

July 07, 2025

गुरु पौर्णिमा सूत्रसंचालन

 

नमस्कार, 🙏
सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या पवित्र गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी .... मन:पूर्वक स्वागत करतो..!

"|| ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ||
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||

    गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला "गुरुपौर्णिमा" असे म्हटले जाते.
   आजचा दिवस आपल्या गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या ऋणाची आठवण करून देणारा आहे."
❀ पाहूणे स्थानापन्न करणे -           "हिऱ्याशिवाय कुंदणाला शोभा नाही... गोडीशिवाय ऊसाला शोभा नाही...!!  
सुगधांशिवाय फुलाला शोभा नाही... तसेच अध्यक्षांशिवाय कार्यक्रमालाही शोभा नाही...!!  
   म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय.... यांनी स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो.
   यानंतर प्रमुख पाहुण्यांना सन्मानपूर्वक मंचावर निमंत्रित करावे.

❀🪔 दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदना -

"आता कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करणार आहोत. ज्योती म्हणजे ज्ञान, आणि अज्ञानरूपी अंध:कार दूर करण्याचं प्रतीक.
माझं विनम्र आग्रह आहे की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुणे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करावी.   
    त्यानंतर आपण सरस्वती वंदना ऐकू."

❀ प्रमुख अतिथींचे स्वागत -     अतिथिंच्या आगमनाने... 
हर्षित झाला सारा मेळा...!!  
धन्य धन्य होऊनी करितो... 
हा स्वागताचा सोहळा... 
हा स्वागताचा सोहळा...!!
✪कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे स्वागत घ्यावे.

❀ प्रास्ताविक भाषण :~
   "आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो/करते  श्री/सौ. ______ यांना."

❀ गुरूंचा सत्कार -
गुरु विना कोण दाखवील वाट..!
जीवनपथ हा... अवघड डोंगर घाट...!!
"गुरु म्हणजे फक्त पुस्तक शिकवणारे शिक्षक नव्हे, तर जीवन घडवणारे शिल्पकार असतात.
   त्यांचं योगदान अमूल्य आहे. आज त्यांच्या चरणी आपलं मनःपूर्वक आभार व्यक्त करायचे आहे.
    "गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षक नव्हेत, तर आपल्याला जीवनाची दिशा देणारे, मार्गदर्शक, प्रेरणादाते. आज अशा सर्व गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस आहे.
आपल्या आदरणीय गुरूंचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी माननीय..... गुरुवर्य यांचा सत्कार करावा..

❉ गुरुंचे मार्गदर्शनपर भाषण-

"आता आपण ऐकणार आहोत आपल्या गुरूंचं मौल्यवान मार्गदर्शन. जीवनाच्या वाटचालीसाठी त्यांचं अनुभवसिद्ध ज्ञान आपल्या सर्वांसाठी अमूल्य आहे.
    मी विनंती करतो आदरणीय ...... [गुरुजींचं नाव] यांना की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं."
✪यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचे मनोगत घ्यावे...

सांस्कृतिक कार्यक्रम / कविता / भाषण / नृत्य-

"आता या कार्यक्रमात थोडं रंगतदार आणि भावनिक वातावरण निर्माण करणार आहोत एका छोट्या कवितेमधून / भाषणामधून / नृत्यप्रस्तावनेतून."
(कार्यक्रमानुसार नोंद घ्या आणि सुत्रसंचालनानुसार नावे घ्या.)
❀ अध्यक्ष भाषण :~
प्रभावशाली नेतृत्व, आभाळाएवढं कर्तृत्व, अशे कर्त्यवदक्ष.. कार्य कुशल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय...... यांनी आपले विचार प्रकट करावे.

 आभार प्रदर्शन -
"कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकांनी मेहनत घेतली. मी उपस्थित सर्वांच्या वतीने सर्व गुरुजनांचे, उपस्थित पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि कार्यक्रम संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो...!!
    "प्रत्येक सुंदर गोष्टीचा शेवट होतोच, पण आठवणी मात्र कायम राहतात.
   आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आदरणीय.... यांना निमंत्रित करतो
  आजच्या गुरु पौर्णिमा कार्यक्रमाचं समारोप करताना मी.... आमच्या शालेय परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे, आमचे गुरु, उपस्थित विद्यार्थी, आणि आयोजन करणाऱ्या सर्व सदस्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. आपण अशाचप्रकारे एकत्र येऊन गुरुशिष्य परंपरेला उजाळा देत राहू."

🙏❀ समारोप ❀ 🙏
   अध्यक्षांच्या परवानगीने आजचा सुंदर कार्यक्रम आपण येथेच थांबवत आहोत...
  "गुरु पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी, आपण सर्वांनी आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात योग्य मार्गक्रमण करण्याचं संकल्प घेऊ या.
धन्यवाद! || जय गुरुदेव ||

No comments:

Post a Comment