"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 01. जून * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
दुर्गदिन
हा या वर्षातील १५२ वा (लीप वर्षातील १५३ वा) दिवस आहे.
आंतरराष्ट्रीय बाल दिन

                     ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : रमेश चंद्र लाहोटी यांनी भारताचे ३५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●२००३ : चीनमधील महाप्रचंड अशा ’थ्री गॉर्जेस’ धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
●२००१ : नेपाळचे राजे वीरेन्द्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेन्द्र यांनी निर्घृण हत्या केली.
●१९९६ : भारताचे ११ वे पंतप्रधान म्हणून एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
●१९४५ : ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची स्थापना झाली.
●१९३० : मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
●१८३१ : सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर धृवाचे स्थान निश्चित केले.

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : आर. माधवन – अभिनेता
◆१९२९ : फातिमा रशिद ऊर्फ ’नर्गिस’ दत्त – हिन्दी चित्रपट अभिनेत्री
◆१९२६ : नॉर्मा जीन बेकर ऊर्फ मेरिलीन मन्‍रो – अमेरिकन अभिनेत्री
◆१८७२ : नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना ...‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे.
◆१८४२ : सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन
●२००१ : नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या
●: गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व ’गडसम्राट’ (जन्म: ८ जुलै १९१६)
●१९९६ : नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते (जन्म: १९ मे १९१३ - इलुरू, तामिळनाडू)
●१९६८ : हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (जन्म: २७ जून १८८०)
●१९४४ : महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट, कलेला वाहून घेतलेल्या या चित्रकाराने सुमारे ५,००० हून अधिक चित्रे काढली.
●१९३४ : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक  (जन्म: २९ जून १८७१)

No comments:

Post a Comment