"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 01. जुलै * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★राष्ट्रीय डॉक्टर दिन
★हा या वर्षातील १८२ वा (लीप वर्षातील १८३ वा) दिवस आहे.
★महाराष्ट्र कृषी दिन

                   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.
●१९५५ : ’स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट ●१९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली. याआधी ही बँक इंपिरिअल बँक या नावाने ओळखली जात होती.
●१९४९ : त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.
●१९४८ : बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना
●१९३४ : मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश
●१९१९ : कै. बाबूराव ठाकूर यांच्या ’तरुण भारत’ (बेळगाव) या वृत्तपत्राची सुरूवात झाली.
●१९०९ : क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.
●१८८१ : कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.

                   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६१ : कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)
◆१९४९ : वेंकय्या नायडू – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष
◆१९३८ : पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक, पद्मविभूषण
◆१९१३ : वसंतराव जाईक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)
◆१८८२ : डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (मृत्यू: १ जुलै १९६२ - कलकत्ता, पश्चिम बंगाल)

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक
●१९८९ : प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ
●१९६२ : डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (जन्म: १ जुलै १८८२ - पाटणा, बिहार)
●१९६२ : पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष
●१९४१ : सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार,
●१९३८ : गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान, राजकीय नेते,  

No comments:

Post a Comment