"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

02/05/18 बुधवारचा परीपाठ

   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 02/05/2018 ❂*
       *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *02.मे :: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              वैशाख कृ. २
      तिथी : कृष्ण पक्ष द्वितिया,
          नक्षत्र : अनुराधा,
    योग : वरियान,  करण : गर,
सूर्योदय: 06:10, सूर्यास्त :19:01,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02. *कोल्हा काकडीला राजी –*
  ★ अर्थ ::~ लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02.     *शीलं परं भूषणम् ।*
  ⭐अर्थ ::~ शील (चारित्र्य) हेच
         श्रेष्ठ भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

      🛡 *★02. मे ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १२२ वा (लीप वर्षातील १२३ वा) दिवस आहे.

                 ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.
●१९९९ : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.
●१९९७ : टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.
●१९९४ : ’बँक ऑफ कराड’चे ’बँक ऑफ इंडिया’मधे विलिनीकरण झाले.
●१९९४ : नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
●१९०८ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

                  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६९ : ब्रायन लारा – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू
◆१९२१ : सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२)
◆१८९९ : भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी

                ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : ओसामा बिन लादेन – 'अल कायदा'चा संस्थापक
●१९९८ : पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५ व्या लोकसभेचे सदस्य
●१९७५ : शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार.
●१९७३ : दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक
●१९६३ : डॉ. के. बी. लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य
●१६८३ : रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित – शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन ’राज्यव्यवहारकोश’ तयार करणारे मुत्सद्दी
●१५१९ : लिओनार्डो डा विंची – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02.  *❃❝ महानता ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     पंडित नेहरूंच्या निधनानंतर
लाल बहादुर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांची राहणी साधी पण विचारसरणी फार उच्च होती. दिसायला लहान,पण कर्तुत्वाने व चारित्र्याने महान असा  राष्ट्र  नेता होता. ते पंतप्रधान असतानाची गोष्ट एके दिवशी आपल्या पत्नीला ललितादेवींना नासाडी आणण्याचीसाठी ते एका दुकानात गेले.त्यांना पाहून दुकानदाराने फार भारी अशा रेशमी साड्या दाखविल्या. हजार-दोन हजार त्यांच्या किमती होत्या.

     शास्त्रीजी म्हणाले, 'अरे एवढ्या महाग साड्या मला परवडणार नाहीत. दुसऱ्या साध्या व स्वस्त दाखव" तेव्हा दुकानदार म्हणाला ,"आपण पैशाची कशाला काळजी करता ?मी थोडे तुमच्याकडून पैसे घेणार आहे! आमच्यातर्फे ही आपणास भेट आहे "ते  ऐकताच शास्त्रीचे एक दोन पावले मागे सरकली जणू पुढे साप आहे आणि  त्याच्या  फण्यात लाचलुचपतीचे विष आहे, असा त्यांना भास  झाला. सात्विक संतापाने पंतप्रधान लाल होत उदगारले,  महाशय !भारताचा पंतप्रधान अशासाठी नाही झालो की, अशाप्रकारे भेटी घेत फिरू ! पुढे कधी शब्द तोंडून काढू नका अभद्र व्यवहारी करू नका. कृपया मला परवडतील अशा साड्या दाखवा".  स्वस्त साडया घेऊन व त्याचे पैसे चुकते करून शास्त्री दुकानातून बाहेर पडले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02.  *आवडत्या व्यक्तिपासुन*
        *मन दु:खी झाले तर*
        *हे वाक्य लक्षात ठेवा.*
     *"दु:ख महत्वाचे असेल तर*
   *त्या व्यक्तिला विसरा; आणी*
*व्यक्ति महत्वाची असेल तर*
         *दु:ख विसरा"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *✿ वर्षे व ऐतिहासिक घटना ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ १९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.

■ १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.

■ १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.

■१९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार

■ १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.

■ १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02.  *❒ लिओनार्दो दा विंची ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*एक महान चित्रकार व संशोधक*
❖पूर्ण नाव:- लिओनार्दो दी सेर पिएरो दा विंची

❖जन्म:-१५ एप्रिल १४५२, आंकियानो, फ्लॉरेन्स, इटली
❖मृत्यू:- २ मे १५१९, आंब्वास, इंद्र-ए-ल्वार, फ्रान्स

❖राष्ट्रीयत्व:- इटालियन
❖कार्यक्षेत्र:- चित्रकला, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, पुराजीवशास्त्र, शरीरशास्त्र, भूमिती, गणित, भौतिकशास्त्र, यामिकी

    लिओनार्दो हा १५ व्या शतकात रेनेसान्स काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्डो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राउन या लेखकाने नुकतीच 'दा व्हिंची कोड' या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली.

    बालपण लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरस अपत्य होता. जन्मानंतर त्याचा सांभाळ ५ वर्षे आईनेच केला. त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करायची तयारी दर्शविली व याचवेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले. अशात लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला. त्याचे वडिल सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे , देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला वेरोशिओ या प्रसिद्ध् चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला , शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने वेरोशिओ कडे केला. याचवेळी त्याने स्वत: हुन इतर शाखांचाही अभ्यास चालु ठेवला.

        ★मॅडोना ऑफ द रॉक्स★
   चर्चच्या दबावामुळे लिओनार्दोला अखेर मॅडोना ऑफ द रॉक्सचे दुसरे चित्र ही रंगवावे लागले. पहिले चित्र सध्या फ्रान्सच्या पॅरिस येथील लूव्र संग्रहालय येथे आहे तर दुसरे लंडन येथील म्युझियममध्ये आहे. पहिल्या चित्राला सध्या मॅडोना ऑफ द रॉक्स (लुव्र व्हर्जन) व दुसरया चित्राला मॅडोना ऑफ द रॉक्स (लंडन व्हर्जन ) म्हणुन ओळखतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार ~ 02/05/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment